Welcome to Marathistories .

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

शेवटी संतोष गेलातरी कुठे असेल...??? ते कुणाचे रक्त आहे...?? आणि तो कोण आहे...?? प्रश्नच प्रश्न पाहूयात पुढील येणाऱ्या काही भागांमध्ये... :) तो पर्यंत अशीच साथ देत राहा मित्रांनो....

Wednesday, 17 September 2014

पापी... एक गूढ सत्य भाग १०

पापी... एक गूढ सत्य (थरारक आणि रहस्यमयी कथा)

अध्याय चौथा - पुस्तक

भाग १०

"डॉ. साळुंखे आणि मी कॉलेज पासून मित्र होतो, त्यांनीच मला ह्या अंकशास्त्रत येण्यासाठी प्रेरित केलं. ते माझ्यापेक्षा कितीतरी पटीने हुशार होते. ते फक्त अंकशास्त्र ह्या विषयातच हुशार नव्हते, इतिहास पण त्यांचा खूप आवडता विषय होता... जेव्हा आम्ही आमची डॉक्टरेट पूर्ण केली होती, तेव्हा आम्ही विचार केला होता कि काळ्या जादूचा इतिहास आणि त्यामध्ये वापरण्यात येणारं अंकशास्त्र विषयी संशोधन करणार, पण जेव्हा आम्ही त्याची सुरुवात केली तेव्हा आम्हाला कळायला लागलं कि आम्ही जे काही करत आहोत ते खूप कमी आहे.... काळी जादू आणि त्यातील अंकशास्त्रत खूप शिकण्यासारखं आहे... आम्ही खूप जोमात आमचं संशोधन सुरु ठेवलं... डॉ. साळुंखे तर ह्यामध्ये पूर्णपणे गुंतले होते, जिथून माहिती मिळेल सर्वीकडून माहिती गोळा करत होते, पुस्तकं, पेपर्स, लेख आणि काही ठिकाणी स्वतः जावून भेट देणं हे तर त्यांचं दैनंदिन कार्यक्रम झालं होतं. ह्यातून त्यांनी खूप साऱ्या चिन्हांची जे काळ्या जादू मध्ये सुरुवातीला त्यांचा उपयोग होतो त्यांची माहिती आणि अर्थ शोधून काढला होता, ती माहिती घेवून आम्ही जगातल्या प्रतिष्टीत अंकशास्त्रज्ञांकडे पण गेलो आणि ती लोकं सुद्धा डॉ. साळुंखेचे तर्क मानायला लागले..." डॉ. अवधूत बोलता बोलता थांबले जसं कि पुढे काय बोलायचं आहे हे विचार करत आहेत...

"ह्या पूर्ण विषयात आम्ही दोघांनी एकत्रित होवून संशोधन केलं, आम्ही एकत्र मिळून अविश्वसनीय गोष्टी शोधल्या पण तरीही डॉ. साळुंखेला ह्या मध्ये अजून काहीतरी अपुरं राहिलं आहे आणि आम्ही ते शोधू शकलो नाही आहोत असं वाटायचं... आणि हे संशोधन करता करता शेवटी तो दिवस उजाडलाच ज्या दिवशी डॉ. साळुंखेने एका चिन्हाला डिकोड करून आणि त्याचं अर्थ जाणून त्या ठिकाणाचा पत्ता काढला, ती एका शहरातील इमारत होती, ती इमारत काळी जादू करणाऱ्यांसाठी खूप महत्वाची होती... आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो, ती इमारत प्राचीन काळातील काळी जादू करणाऱ्या लोकांचं घर होतं... आणि त्याच दिवशी आम्हाला माहित पडलं कि जसं काळ्या जादूत चिन्ह महत्वाचे असतात तसंच नंबर्स पण काळ्या जादूत खूप महत्व ठेवतात..."

"त्या इमारतीच्या तळघरात आम्हाला त्या भिंतीवर प्राचीन काळातील एक ओळ लिहलेली दिसली..."

"आणि ते काय लिहिलं होतं...?" संत्याने प्रश्न केला....

'कोणीही १ साठी नाही...'
'१ सर्वांसाठी आहे..."
'१११'

"पहिले पहिले तर आम्ही हि एक सामान्य ओळ वाटून, आम्ही तिला दुर्लक्ष केलं, आम्ही तर हा तर्क लावला कि हे फक्त अंकशास्त्रत वापरतात... नंतर डॉ. साळुंखेच्या डोक्यात पाल चुकचुकली कि जरूर काही ना काही तरी ह्यामध्ये एक संदेश लपलेला आहे, आणि तो काहीतरी दिशा दाखवत होता, त्यामुळे आम्ही त्याला डिकोड करण्याचा प्रयत्न करू लागलो आणि हे जेवढं सोप्प वाटत होतं तेवढं ते नव्हतं... मग आम्ही अंकशास्त्र चा पूर्ण इतिहास चाळायला लागलो आणि त्यात खूप खोलवर गेलो... खासकरून १११ हा नंबर कुठे सापडतो का ते पाहत होतो... " डॉ. अवधूत दोन मिनिटांसाठी पुन्हा थांबले....

"तुम्ही दोघांनी इंग्लंड क्रिकेट टीमच्या म्याचेस तर पहिलेच असतील...?" डॉ. अवधूतचा हा प्रश्न त्यांना खूप वेगळाच वाटला...

"हो पण त्याचा इथे काय संबंध आहे...?" दोघांनी विचारले...

"तेव्हा तुमच्या निदर्शनास आले असेल कि १११ ह्या नंबरला ती लोकं खूप अशुभ मानतात... ऑस्ट्रेलियाचे खेळाडू १३ ह्या नंबरला खूप अशुभ मानतात... जेव्हा पण १०० रनला १३ बाकी असतील तेव्हा ती लोकं आपली बोटं क्रॉस करतात म्हणजेज फिंगर क्रॉस करतात.... हम्म हे तर झाले क्रीस्चन लोकं, पण बुद्ध लोकं पण १ ह्या नंबरला अपवित्र मानतात, लिस्ट तर खूप मोठी आहे त्यामुळे ते सर्व काही एवढं महत्वाचं नाहीये, तर १ हि संख्या सर्व जातीमधील काळी जादू करणाऱ्यासाठी खूप महत्वाची संख्या आहे, त्यामुळे आम्ही १ ह्या संखेबद्दल अजून काही मिळते का जाणण्यासाठी अजून खोलात जावून अभ्यास करू लागलो..."

"तुम्हा लोकांना तर आठवतच असेल कि मी एकदा इजिप्त मधील पिरामिड्स विषयी काय बोललो होतो..?"

"हो तेच कि ते पिरामिड्स ५ साईड आणि ३ कोनांनी बनलेलं आहे..." शिऱ्या बोलला...

"हो एकदम बरोबर बोललास, पण लक्ष देण्यासारखी एक गोष्ट म्हणजे सर्व लाईन्स शेवटी येवून एकालाच मिळतात, म्हणजेच ती १ बनते, अंकशास्त्र असो किंवा काळी जादू १ हि संख्या एक पावरफुल संख्या सिद्ध झाली आहे, आम्ही ह्या विषयी इतिहासकार आणि अंक्शास्त्रज्ञ लोकांशी पण विचारपूस केली, पण शेवटी आम्हाला माहिती पडलं कि १११ हि कोणत्या शिक्तीशी निगडीत नसून ती संख्या एक कॉम्बिनेशन आहे..."

"कोणत्या प्रकारचा कॉम्बिनेशन..?" आता संत्याने हा प्रश्न केला होता...

"हाच प्रश्न आमच्याहि मनात घोंगावत होता, कि काय आहे हा कॉम्बिनेशन पण जो पर्यंत आम्हाला ह्याचं उत्तर नाही सापडलं तो पर्यंत आम्ही त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा गेलो... पण आम्हाला त्या तळघरात त्या ओळींशिवाय दुसरं काहीच नाही सापडलं..."

"तर मग तुम्ही ह्याला डिकोड कसं काय केलंत..?"

"तुम्हाला आठवतंय पिरामिड्स आणि त्याचे ५ साईड, ३ कोन सरळ रेषेत येवून एकाच जागी मिळतात... सगळ्यात वरती..." डॉ. अवधूत हासत बोलले...

"म्हणजे त्याचं उत्तर तळघरात नसून सर्वात वरच्या माळ्यावर होतं.." संत्या खुश होत बोलला...

"एकदम बरोबर बोललास, त्याचं उत्तर सर्वात वरच्या माळ्यावर होतं, १११ हि संख्या सूचना देत होतं आणखीन एका कोडकडे आणि ते कोड आहे SSS..."

क्रमशः....

आधीचा भाग                           पुढील भाग

Friday, 5 September 2014

पापी... एक गूढ सत्य भाग ९

पापी... एक गूढ सत्य (थरारक आणि रहस्यमयी कथा)

अध्याय तिसरा विधी

भाग ९

इथून १०० मैल लांब दोन आत्म्याचं भेट होत होती, ती एक अशी जागा होती जिथे असल्या लोकांना मंत्र शिकवले जातात... ते ठिकाण काळी जादू करणार्यांसाठी होतं...

"राहुल, तू माझा खरा अनुयायी विध्यार्थी आहेस, तू  मला पुन्हा ह्या जगात आणलंस, जेव्हा मी तुला पहिल्यावेळी पाहिलं तेव्हाच मी समजून चुकलो कि तूच पुढे माझा वारसा चालवणार आहेस... आणि आज तू मला एकदम बरोबर सिद्ध केलंस, मला तुझा अभिमान आहे.." बोल भावूक होते पण शब्द एकदम कणखर होते ज्यामुळे ती भावुकता दिसतच नव्हती...

"असं नका बोलू मालक, उलट मी लज्जित आहे कि मी ह्या कामासाठी पूर्ण १० वर्ष लावलीत..."

"मला माहिती आहे कि हे काम जेवढं दिसत आहे तेवढं सोप्प नाहीये... आपल्या साम्राज्यात कोणाचीही हिम्मत होत नव्हती हे कार्य करण्यासाठी, पण माझा तुझ्यावर सुरुवातीपासून विश्वास होता आणि आज ते तू पूर्णपणे सिद्ध आणि पूर्ण करून दाखवलंस..."

"पण अजूनही काम अर्धवटच झालं आहे... पुढच्या कामासाठी आपल्यांना त्या पुस्तकाची गरज भासणार आहे..." राहुल बोलला...

"हो पण त्या पुस्तक धारकाला तू त्याच्या बिळातून बाहेर पडण्यासाठी भाग पाडलं आहेस, आता आपल्यांना त्याचा पाठलाग केला पाहिजे कारण तोच आपल्यांना पुढचा रस्ता दाखवणार..."

"हो पण आता आपल्यांना एका शरीराची गरज आहे, कारण विधी अजूनही अर्धीच झाली आहे..."

"शरीर तर सापडेल, माझ्या डोक्यात एक व्यक्ती आहे... आता तुला चिंता करण्याची काहीच गरज नाही कारण आता मी तुझ्या सोबत आहे मीच आता तुला ह्यापुढे मार्गदर्शन करत राहीन.."

"मालक जर तुम्ही माझ्या सोबत असाल तर कोणाचीही मला थांबवण्याची हिम्मत होणार नाही, जो कोणी माझ्या ह्या १० वर्षाच्या स्वप्नांवर पाणी टाकण्याचा प्रयत्न करेल त्याला मी जिवंत सोडणार नाही..." एवढ्या वर्षापासून पाहिलेल्या स्वप्नाला पूर्ण होतांना पाहून राहुलच्या आवाजात एक वेगळीच धमक होती...

"त्या माणसाची चिंता करायची काहीच गरज नाही आहे, तो माणूस साळुंखे एवढा बुद्धिमान नाही आहे... तू फक्त त्याच्याशी खेळत राह एक न एक दिवस तरी तो त्या पुस्तकाची मदद घेईलच आणि आपल्यांना ती संधी मिळेल..."

"थोडा आराम करून घे, लवकरच आपल्यांना दुसरं चरण सुरु करायचं आहे... हि पूर्ण श्रुष्टी हादरली पाहिजे आणि आपल्या समोर सर्वांचे गुढघे टेकले पाहिजेत..."

तो व्यक्ती आता आपल्या योगाच्या आसनातून उठून उभा राहिला... त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच स्मिता आणि चमक होती... त्याने पुन्हा आपल्या छातीवर चाकूने क्रोसचा आकार बनवला आणि बिछान्यावर पडून आरामात झोपी गेला... पण त्याच्या चेहर्यावरची स्मिता अजूनही तशीच कायम होती...

***************************** 

दुसरीकडे मुंबईमध्ये डॉ. अवधूत, संत्या आणि शिऱ्या स्पेशल इन्वेस्टीगेशन ब्रांचच्या ऑफिसमध्ये बसलेले होते... संत्या आणि शिऱ्या अजूनही आत्ता थोड्यावेळापूर्वी डॉ. अवधूतने जे काही सांगितले त्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत होते...

"महासागर आटेल...? ह्याचा अर्थ काय आहे...!" राहून राहून संत्याच्या मनात हाच प्रश्न येत होता...

"शिऱ्या मला जरा आज पर्यंत मेलेल्या मुलींची नावं सांग जरा...?" डॉ. अवधूतने विचारले...

"मेघना, जी एक वेश्या होती, त्याच्या नंतर पल्लवी जी अनाथ होती जिला एका मंदिरातून उचललं होतं, आणि अलिशा, कॉल सेंटरमध्ये कामाल होती, जेव्हा ती आपली नाईट शिफ्ट संपवून घरी जात होती तेव्हा तिचं अपहरण करण्यात आलं होतं..." शिऱ्या बोलला...

"अलिशाचं पूर्ण नाव काय आहे...?" डॉ. अवधूतने विचारले...

"अलिशा खोत...!"

"मला हेच समजत नाही आहे कि नावात काय ठेवलं आहे...?" संत्या आता चिडत बोलला...

"माझं एवढंच म्हणणं आहे कि जवळ जवळ सगळ्याच धर्मात काळी जादू बंद करण्यात आली आहे आणि त्यावर खूप कठोर शिक्षा पण आहे... पण ह्या व्यक्तीने ज्या मुलींची हत्या केली आहे त्यांच्यामध्ये एक मुस्लिम, एक हिंदू आणि क्रिश्चन आहे... मी जेव्हा तुम्ही पाठवलेले फोटो पाहिलेत तेव्हा मला वाटलं कि कोणी एक काळी जादू करणारा माथेफिरू फक्त आपली शक्ती वाढवण्यासाठी आपल्या गुरुला बोलवत आहे, पण हे तर काही विचित्रच आहे, पण हा माथेफिरू तर एका समुदायातला आहे..."

"कोणता समुदाय...?" संत्या आणि शिऱ्या हे सर्व ऐकून गोंधळलेच होते...

"तुम्हाला गवंडीचा समुदाय किंवा इल्लूमीनटी समुदाय माहितीच असेल, तुम्हाला मला ह्यांचा भूतकाळ सांगायची गरज नाहीये... पण काळी जादू करणार्यांमध्ये पण असलाच एक समुदाय होता. ते स्वतःला पापी समजायचे... ज्यांनी देवाच्या आदेशाला पण आव्हान दिलं होतं, त्यांना सैतानाचा समुदायाने पण ओळखलं जायचं. त्यामुळेच त्याने त्याच ३ मुलींची निवडणूक केली आणि त्यांची हत्या करून त्याचं रक्त एका आत्माला अर्पण केलं... पण हि तर फक्त अर्धीच गोष्ट आहे... त्यांनी तर फक्त त्या आत्माला इथे बोलावले आहे, आता त्या आत्माला कोणत्या तरी शरीरात टाकायचं काम अजूनही बाकी आहे..." एवढं बोलताच भीती त्या दोघांच्याही चेहऱ्यावर डॉ. अवधुतांना जाणवत होती...

"असं नाहीये कि सर्वचजण ह्या समुदायातलेच असतील, खूप कमीच लोकांना म्हणजे जी व्यक्ती ह्या विद्येमध्ये अगदी हुशार असतात त्यांनाच ह्या संघटनांमध्ये घेतलं जातं, ती लोकं आपल्या काळ्या जादू मध्ये एकदम निपुण असतात... आणि हि गोष्ट वेगळीच आहे कि बाकी सर्व संघटना एकमेकांना सतत भेटत किंवा एकमेकांशी बोलत असतात, पण पापी लोकं कधीच एकमेकांना भेटत नाहीत, ते एकमेकांपासून खूप लांब असतात आणि पूर्ण दुनियेच्या लोकांशी पण दोन हात लांबच असतात. एक पापी आपली पूर्ण शक्ती आणि निपुणता आपल्या एका शिष्याला देतो आणि तोच आहे जो हे सर्व १० वर्षांपासून करत आहे, ज्याने आपल्या सैतान गुरूला पुन्हा ह्या जगात आणण्यासाठी हे सर्व केलं आहे..." आता हे सर्व ऐकून तर संत्या आणि शिऱ्या थरथरायलाच लागले...

"पण अजूनही तुम्ही आम्हाला महासागर आटेल ह्याचा अर्थ नाही सांगितला आहे... माहासागर आटेल म्हणजे होणार तरी काय आहे...?" संत्याने विचारले...

"ह्या समुदायात काळी आग सगळ्यात पवित्र वस्तू मानते आणि ते लोकं पाण्याला सगळ्यात खराब वस्तू मानतात... त्यामुळेच समुद्र कसा पाण्याचा असतो ना.. आणि माझ्या मते तो संदेश असा होता कि आगीने पाण्याला म्हणजेच महासागराला हरवलं आहे..."

"आणि तुम्ही पूर्ण पणे सांगू शकता कि तुम्ही ती माहिती चांगल्या प्रकारे डिकोड केली आहे..." संत्याने विचारले...

"हो... कारण हे मी खूप वर्षांपूर्वी ऐकलेलं आहे... आणि हा जो शेवटचा चिन्ह आहे ना तो पाहा... तो असा आहे ┴, हा चिन्ह त्याच्या गुरूच्या नावाचा शेवटचा अक्षर आहे... आणि तो पापी समुदायात अश्याच प्रकारे लिहिला जातो..."

"काय नाव आहे त्याचं...?" दोघांनीही एकत्रच प्रश्न विचारला..

"वेंक┴ (वेंकट), काळ्या जादूचा बादशाह..."

क्रमशः...


आधीचा भाग                           पुढील भाग

Tuesday, 26 August 2014

पापी... एक गूढ सत्य भाग ८

पापी... एक गूढ सत्य (थरारक आणि रहस्यमयी कथा)

अध्याय तिसरा विधी

भाग ८ 
 
“अरे देवा...” खुनाच्या ठिकाणी पोहचून आणि तिथलं दृश्य पाहून  डॉ. अवधूतच्या तोंडून हे उद्गार निघाले.
 
जसं त्या मुलीचा मृतदेह तो खुनी सोडून गेला होता ती त्याच अवस्थेत खोलीच्या मधोमध सिलिंग पंख्याला लटकलेली होती... तिच्या डोळ्यातून बुबुळ बाहेर निघाले होते…  तिला पाहूनच कोणीही सांगू शकतं कि त्या मुलीने मरणापूर्वी किती वेदना सहन केल्या असतील…
 
“हा खुनी आता खूप भयानक होत जात आहे…” डॉ. अवधूत मृतदेह पाहताच उद्गारले…
 
“हो पण ह्यावेळी काही तरी नवीन आहे जे, आपण ह्या पूर्वी कधीच पाहिलं नाही…” संत्या बोलला…
 
“काय…?” शिऱ्या आणि डॉ. अवधूत दोघांनी एकत्र प्रश्न केला…
 
“शिऱ्या तू गेल्या १० वर्षात झालेल्या खुनाच्या फाईल्स पूर्ण वाचल्या आहेत...?"
 
“हो मग…”
 
“शिऱ्या तू त्या फाईल्स एकदम व्यवस्थित आणि नीट नाही पाहिल्यास किंवा वाचल्यास, लक्षपूर्वक बघ ह्या मुलीची हत्या तिच्या पोटात चाकू खुपसून झाली आहे, जे आज पर्यंतच्या एकाही खुनात झालेले नाहीये…” संत्या मुलीच्या पोटाजवळ इशारा करत म्हणाला…
 
“तुम्ही दोघांनी मला अजून पर्यंत नाही सांगितलं कि खुनी गेल्या १० वर्षांपासून हत्या करत आहे ते…!!” डॉ. अवधूत चमकत बोलले…
 
“क्षमा करा आम्ही सांगायला विसरलो कि गेल्या १० वर्षात असले ५ खून झाले आहेत, पण त्यामध्ये ह्या प्रकारे हत्या कधीच करण्यात नाही आली…” संत्या शवाकडे बोट दाखवत बोलला…
 
“आज पर्यंत त्या खुन्याने मुलीचा गळा कापून किंवा छातीत चाकू खुपसून हत्या केली आहे, जे ह्या आधीच्या दोन हत्यांमध्ये झालं आहे, पण ह्या प्रकारे आम्ही पहिल्यांदाच पाहत आहोत…”
 
“ह्याचं एकच कारण आहे कि आज पर्यंत त्या खुन्याची जी काही उद्दिष्टे होती त्यामध्ये तो यशस्वी होत नव्हता… कदाचित तुम्हाला माहिती असेल कि ३ हि संख्या काळ्या जादू करणाऱ्याला खूप फायदेशीर असते… ३ ह्या संख्येचा तो तेव्हाच वापर करतो जेव्हा त्याला स्वतः वर पूर्ण विश्वास असेल कि तो जे काही काम करत आहे ते पूर्ण होणारच…. कदाचित गेली कित्तेक वर्ष तो ह्यामध्ये  यशस्वी झाला नसेल… त्यामुळे ह्यावेळी हा तिसरा खून ह्या प्रकारे झाला आहे…” डॉ. अवधूत त्या मृतदेहाच्या अवतीभोवती फिरत नीट पाहत बोलला…
 
“असं काय खास आहे ह्या ३ संख्या मध्ये…?” संत्याने हा प्रश्न विचारला…
 
“प्रत्येक माणसाचं जीवन ह्या नंबर्समध्येच गुंतलेलं आहे… खरतर अंकशास्त्र खूप आधी पासून आपल्या अवतीभोवती आहे… ती फक्त काळ्या जादूमध्येच महत्व ठेवते असं नाही, ती कुठेही कधीही उपयोगी पडते… राजा, वैज्ञानिक, कलाकार, संगीतकार, नेते किंवा आपल्या क्रिकेटर्स लोकांचं उदाहरण घ्या… हि लोकं नंबर्सना खूप महत्व देतात… खूप मोठ्या वैज्ञानिकां पैकी एक सर इसाक न्यूटन, ३ ह्या संखेला खूप मानत होते…”
 
“७ हि संख्या खूप चांगली आणि एक विलक्षण संख्या आहे, हिंदू ह्याचा उपयोग लग्न कार्यासाठी करतात… मुस्लिम त्याचा उपयोग आपल्या धार्मिक विधी पूर्ण करण्यासाठी करतात… खूप सारे असे उदाहरणं आहेत, आणि ह्या विश्वात अशी कोणतीच वस्तू नाही जी संख्यांपासून वेगळी राहू शकते…”
 
“तुम्ही त्या इजिप्तमध्ये बनलेल्या पिरामिड्स पाहिल्या आहेत काय…?” डॉ. अवधूतने त्यांना प्रश्न केला…
 
“हो मी पाहिला आहे मी एकदा इजिप्तमध्ये गेलो होतो..” शिऱ्या बोलला...
 
“तर मला हे सांग कि पिरामिड्समध्ये किती बाजू आहेत!!…”
 
“चार" शिऱ्याने पटकन उत्तर दिलं …
 
“हि एक मूळ चूक आहे… खरंतर पिरामिडचं बेस तर तुम्ही पकडतच नाहीत, ती पण तर एक बाजू आहे… ह्याचा अर्थ असा कि हि पण एक ऑड संख्या आहे… आणि एक गोष्ट पिरामिड त्रिकोणमध्ये बनला आहे… हा पण एक ऑड नंबर आहे… आजही पिरामिडशी प्रेरित होवून सर्वीकडे इमारती बनवल्या जातात..., कारण फक्त ह्याच्यासाठी त्या इमारतीचा आकार असा राहिला पाहिजे कि त्या मध्ये शक्ती राहिली पाहिजे…”
 
“तुम्ही दोघांनी एक डॉलरची नोट तर पाहिलीच असेल…. ज्या मध्ये अंधुक अश्या पिरामिडच्या ३ बाजू दिसतात… आता ह्या मध्ये तर काहीच योगायोग नसू शकतो ना...." डॉ. अवधूत आपल्या चेहऱ्यावर स्मिता आणत बोलले...
 
“आपण आपल्या जवळपासच्या वस्तूंवर लक्ष नाही देत, अंकशास्त्र पाहिल्या पासूनच आहे... आजही आहे आणि उद्याही राहणार, बस आपण ते पाहणं बंद करतो..., अंकशास्त्र काळ्या जादुमध्ये उपयोगी पडते…” डॉ. अवधूत अजूनही त्या मृत देहावर काही सापडतं कां ते शोधत होते…
 
“आणि मी हे एकदम अचूक सांगू शकतो कि त्याने ह्या पूर्वीही केव्हा तरी त्या मृत देहांवर असले नंबर्स काढले असतील..." डॉ. अवधूत त्या मुलीच्या पाठीवर इशारा करत बोलले…
 
“ह्याचा अर्थ काय आहे…?” शिऱ्याने त्या नंबर्स आणि चिन्हांना पाहून अचंबित होत विचारले...
 
“हा एक म्यासेज आहे त्या आत्म्यासाठी, कि ती आत्मा एकदा येवून त्या शरीराला भेटावं ज्यामुळे त्याला रक्त प्राप्त होईल…”
 
“पण ह्या चिन्हांचा काही तरी अर्थ असेलच, जसं कि तुम्ही ह्या आधीही सांगितलं होतं…” संत्या बोलला..
"हो पण... पण जसं मी सांगितलं होतं, ह्या चिन्हांचा अर्थ सांगणे कठीण आहे, हे चिन्ह वापर करणार्यांवरती अवलंबून असतं कि तो त्या चिन्हांचा वापर कसा करणार आहे, तरीही ठीक आहे मी एकदा प्रयत्न करून पाहतो, मी ह्यांना लिहून घेतो, कारण मी इथे लगेच विचार करून काहीच सांगू शकत नाही... मला थोडा वेळ पाहिजे..." एवढं बोलून डॉ. अवधूतने ते चिन्ह आपल्या डायरीमध्ये उतरवायला लागले आणि ते झाल्या नंतर ते इमारतीतून बाहेर पडले आणि त्यांच्या मागोमाग डोक्यात असंख्य प्रश्नचिन्ह घेवून संत्या आणि शिऱ्या पण निघाले...
'Ω, Ð, ┴ , शेवटी तो त्या आत्म्याला सांगतोय तरी काय...' डॉ. अवधूत मनातल्या मनातच पुटपुटले... शिऱ्या आणि संत्या काही तरी बोलण्यात गुंतले होते पण डॉ. अवधूतला वाटत होते कि त्यांनी हे चिन्ह ह्या पूर्वीही कधी तरी पहिले आहेत... ते आपल्या विचारचक्रात त्यांना शोधायला लागले, जेव्हा ते आपला मित्र साळुंखे सोबत अंकशास्त्र शिकत होते तेव्हाचे ते विचारचक्र होते... त्यांच्या मनात अचानक साळुंखेचे बोल ऐकायला आले...

'हे चित्र पाहिलेत का तू अवधूत...? हि एक आग आहे, आणि ती आग पिवळी नसून काळी आहे...' साळुंखे त्याला एक चित्र दाखवत बोलला...

'काळी आग इथे काही तरी डेमोनिक म्याजीक असल्याकडे इशारा करते आहे कि नाही...?' अवधूतने विचारले...

'हो पण फक्त एवढंच नाही, ज्यांना कोणाला कोणत्या आत्माला पुन्हा बोलवायचे असेल तर तो आल्या जादूच्या उपयोगाने ते करू शकतो, खरंतर ती व्यक्ती त्या जादूने त्या आत्म्याला पुन्हा एक नवीन जीवन देण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे ह्या काळ्या आगीचा वापर होतो... आणि हि विधी पूर्ण करण्यासाठी तीन मुलींच्या रक्ताची गरज भासते...' साळुंखे बोलले...

'काळ्या आगीपासून जन्म म्हणजेच काळ्या शक्तीशी मैत्री...?' अवधूतने विचारले...
'हो.... देवाची निंदा करणारी लोकं एकत्र येवून आपलं एक स्वतःच साम्राज्य बनवतात... देवाने सर्व काही दोन वस्तू मध्ये विभागून ठेवलं आहे... जसं कि स्वर्ग-नर्क, पुरुष-स्त्री , आणि त्या हरामखोरांनी काळ्या आगीला आपल्यासाठी पवित्र वस्तू मानलं..' एक विचित्रच भाव अवधूतच्या चेहऱ्यावर आले...
'हे माहिती करणं किती सोप्प होतं तो तर त्या साम्राज्य पैकीच कोणाला तरी एकाला बोलावत आहे... तो तर त्याचा विद्यार्थी आहे... अरे देव ह्याने कोणाच्या आत्म्याला बोलावलं आहे...' आता तर सर्व काही आरश्या सारखं साफ झालं होतं पण मनात एक विचित्र भीती यायला लागली होती, पुढच्या होणाऱ्या घटनांची कल्पना करून...
"मला माहित पडलं ह्याचा अर्थ काय आहे..." डॉ. अवधूत खूप हळू आवाजात बोलले खरे, पण लगेच संत्या आणि शिऱ्या त्यांच्या जवळ आले...
"आज तर महासागर आटणार आहे..." एवढं बोलून डॉ. अवधूत ने तो कागद ज्यावर त्याने ते चिन्ह आणि नंबर्स लिहिले होते तो कागद त्यांच्या समोर केला आणि ते पाहून संत्या आणि शिऱ्याचा चेहरा पण भीतीयुक्त भयाने व्यापलेला दिसायला लागला...
क्रमशः...

आधीचा भाग                   पुढील भाग 

Tuesday, 4 February 2014

पापी... एक गूढ सत्य भाग सातवा

पापी (थरारक आणि रहस्यमयी कथा)

अध्याय तिसरा विधी

भाग सातवा


त्या मुलीने शुद्धीवर येत हळू हळू तिने आपले डोळे उघडले... तिला त्या खोलीचा अंदाजा घेता घेता थोडा वेळ लागला... काही वेळा नंतर तिला माहिती पडलं कि ती खोलीच्या मधोमध उभी आहे, तिचे दोन्ही हात एका दोरीने सिलिंग पंख्याशी बांधलेले आहेत... आणि पाय पण एका लोखंडाच्या साखळीने बांधलेले आहेत. ती समजून चुकली होती कि ती आपल्या जागेवरून किंचित सुद्धा हलू शकत नव्हती... ती मनातल्या मनात प्रार्थना करू लागली कि कोणी तरी यावं आणि मला संकटातून सोडवावं...

"कसं वाटतंय आता तुला...?" एका व्यक्तीने खोलीत येवून विचारले...

"कोण आहेस तू...? आणि मला असं बांधून का ठेवलं आहे...?" त्या मुलीने आपल्या कंपन पावणाऱ्या आवाजात विचारले...

"तू इथे एका महान कार्याचा एक भाग बनण्यासाठी आणण्यात आली आहेस..."

"ए हे तू काय बरळत आहेस..? कोणतं काम...? ...... तू माझा रेप करणार आहेस काय...?" त्या मुलीने घाबरत विचारले तिच्या चेहऱ्यावर घर्मबिंदू जमा झाले होते...

"नाही मला तर फक्त तुझं रक्त पाहिजेय..." ती व्यक्ती एकदम शांतपणे बोलली...

"काय...?" ह्या उत्तराने त्या मुलीचा भीतीने थरकाप उडाला...

"खूप झाल्या गोष्टी आता काही काम पण करूयात.." एवढं बोलून त्या व्यक्तीने टेपने त्या मुलीचं तोंड बंद केलं...

ती व्यक्ती तिच्या समोर आली आणि आपल्या एका हातात घेतलेला वाडगा तिच्या पोटा समोर धरला... दुसऱ्या हातात त्याने एक मोठा चाकू घेतला आणि तिच्या पोटावर ठेवून डोळे मिटून तो मंत्रोच्चारण करू लागला... काही वेळाने त्याचे मंत्रोच्चारण बंद झाले आणि त्याने आपले डोळे उघडले... त्याच्या समोर एक भीतीने थरथरणारी मुलगी होती, पण ती व्यक्ती एकदम शांत पणे उभी होती...

आता त्याने तो चाकू पूर्ण जोराने तिच्या पोटात खुपसला... जसंच त्याने तो चाकू तिच्या पोटात खुपसला तिच्या पोटातून रक्ताची धार निघाली... तिच्या तोंडावर टेप असून सुद्धा वेदनेने तिची किंचीतशी किंकाळी ऐकू येत होती... काही वेळानेच तो वाडगा तिच्या रक्ताने पूर्ण पणे भरला... त्या मुलीने आपल्या पूर्ण ताकदीनिशी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला पण असमर्थ राहिली...

आता तिचा चेहरा काळा पडायला लागला होता... तिच्या कपाळावरची नसं हिरवीगार होवून दिसायला लागली होती... असं वाटत होतं जणू ह्या मुलीच्या शरीरात काही रक्तच उरलं नव्हतं... ती मुलगी वेदनेने विव्हळत होती... तिला हलायचाही मुळीच चान्स नव्हता... अशी वेदना जी मृत्यू पेक्षा भयंकर होती... ह्या वेदनेतून तिची लगेच सुटका व्हावी म्हणून आपल्या मनात कुठे ना कुठे ती प्रार्थना करत होती.. पण हे सर्व काही क्षणाचा खेळ आहे हे तो माणूस जाणून होता... त्या मुलीच्या चेहऱ्यावरची वेदना पाहून सुद्धा त्या व्यक्तीचं मन पाघळल नाही एवढा निर्दयी होता तो... त्याने तिच्या रक्ताने आधी तिच्या पाठीवर काही चिन्ह काढले आणि मग भिंतींवर... जाता जाता त्याने एक स्प्रे पूर्ण खोलीत मारला आणि एकवार सर्वीकडे नजर फिरून पाहिलं कि काही उरलं तर नाही ना...

'माझे मालक तुमच्यासाठी रक्त आणलंय ते स्वीकार करा...' तो व्यक्ती व्यक्ती आपल्या चेहऱ्यावर स्मित आणत बोलला आणि तिथून निघून गेला...

भिंतीवर आता नवीन चिन्ह आणि नवीन नंबर्स दिसत होते... थरार आणि रहस्य अजूनच वाढत जात होतं... प्रश्नच प्रश्न.... का तो एवढे खून करत आहे...? तो खरोखर कोणत्यातरी आत्माला आणण्याचा प्रयत्न करत आहे का...? पण कोणाच्या...? पाहूया पुढच्या आणखीन काही भागात.... लवकरच तुमच्या समोर त्याची उकल होईल... अरे ते चिन्ह तर राहिलेच कि... तुम्ही पण विचार करून सांगा त्या चिन्हांचे व नंबर्सचे रहस्य काय असणार...

33, 44, ┴, =

क्रमशः...

आधीचा भाग                   पुढील भाग

Wednesday, 22 January 2014

पापी... एक गूढ सत्य भाग सहावा

पापी (थरारक आणि रहस्यमयी कथा)

अध्याय दुसरा नंबर्स आणि चिन्ह

भाग सहावा

"तुम्ही आम्हाला मदत करायला तैयार आहात हे कळल्या पासून मी एवढा आनंदित आहे कि काय सांगू तुम्हाला डॉ. अवधूत सर..." संत्या एकदम खुश होत बोलला, जेव्हा त्याच्या सेलवर डॉ. अवधूत सरांचा फोन आला होता तेव्हा आणि त्याच वेळी ते दोघे तडकीफडक सरळ त्यांच्याकडे येवून पोहोचले.... डॉ. अवधूतला पण तीच शंका होती जी संत्याला होती...

"हे पहा... मला कोणाला भेटायला नाही आवडत पण तुम्ही जे काही चित्र पाठवले होते त्यांना मी इग्नोर पण नाही करू शकत..." डॉ. अवधूत आपल्या त्याच ओळखीच्या गंभीर शैलीत बोलले... "तुमच्या जवळ आणखीन किती माहिती आहेत त्या सर्व मला जाणून घ्यायच्या आहेत..."

"तुम्ही पहिल्या मुलीच्या मृत देहाचं चित्र तर पाहिलंच असाल, तिचा गळा कापून तिचं रक्त काढण्यात आलं होतं, त्या उलट दुसऱ्या मुलीचं तिची छाती कापून... पहिली मुलगी वेश्या होती आणि दुसरी एक अनाथ जिला एका पंडितने काळजीने तिला मोठं केलं होतं... पण अचंबित करणारी गोष्ट म्हणजे ह्यांच्याच रक्ताने खुन्याने भिंतींवर काही नंबर्स आणि चिन्ह रेखाटले होते त्यांचे चित्र तर पाठवलेच आहेत तुम्हाला..." संत्या बोलला...

"तुम्ही पहिल्या मुलीचं जिची हत्या झाली आहे तिच्या विषयी आणखीन काही माहिती जमा नाही केली काय...?" डॉ. अवधूत...

"मी समजलो नाही तुमच्या गोष्टीला.. हे जरुरी आहे काय....?" संत्याने प्रश्न केला...

"जसं तुम्ही दुसऱ्या मुली विषयी सांगितलं कि ती मुलगी अनाथ आहे आणि तिला पंडितने वाढवलं... मग पहिलीच काय...? ती वेश्या होती ह्याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही तिचं नाव गाव काय आहे वैगेरे माहिती गोळा केली असेल कि नाही...?"

"तिचं नाव शेवंता, ती तरवडे गावाची, ह्याच्या व्यतिरिक्त जास्त माहिती आम्ही गोळा केली नाही... पण हे सर्व विचारण्याच्या पलिकडचं कारण जरा मला सांगाल का...?" संत्याने पुन्हा प्रश्न केला...

"तुम्ही माझ्या जवळ आला आहात त्यामुळे निश्चितच तुम्ही माझी पुस्तकं किंवा माझे लेख वाचले आहेत.. आणि तुम्हाला एवढी तरी कल्पना लागलीच असेल कि खुनी काही कमी नाही... हा खुनी मुलींची हत्या फक्त आणि फक्त त्यांच्या रक्तासाठीच करत आहे, त्यामुळे ह्या वरून तरी हे सिद्ध होतंय कि ह्या मागे काळ्या जादूचा उपयोग होणार आहे, आणि काळ्या जादूमध्ये रक्ताचाच जास्त वापर होतो, किती तरी वेळा ह्याचा उपयोग जादू करण्यासाठी होतो आणि काही वेळा आपल्या जादूचं अजून सामर्थ्य वाढवण्यासाठी करतात... तो खुनी त्या रक्ताने जे काही करणार आहे त्याची तीव्रता केवढी असेल मला माहित नाही... पण त्याने भिंतींवर बनवलेल्या नंबर्स आणि चिन्हांनी फक्त एवढंच सांगू शकतो कि ती व्यक्ती एक जुनी खेळाडू आहे काळ्या साम्राज्याची... खूप वर्षांपासून ती व्यक्ती हे काम करत आली असेल... हे काळी जादू शिकवणारी कोणती संस्था किंवा शाळा तर नाही आहे, त्यामुळे हि तुम्हाला गुपचूप लपून छपून शिकावी लागते, पण ह्या व्यक्ती ला तर आपल्या जन्म झाल्या पासून हि काळी जादू ध्यानी आहे..." डॉ. अवधूत सरांच्या स्पष्टी कारणाने संत्या पण अस्वस्थ झाला...

"पण सर रक्ताचं आणि काळ्या जादूचं काय घेणं देणं...? काळी जादू तर कोणाचं केस घेवून किंवा त्याचे कपडे घेवून मग स्मशानात बसून काही मंत्र उच्चारून होते ना...?" संत्याने आपली आशंका जाहीर केली...

"मी तर एवढंच सांगेन कि तुमचे ज्ञान ह्या विषयी खूप कमी आहेत, माझ्या सोबत या..." एवढं बोलून डॉ. अवधूत आपल्या घरातील छोट्याश्या ग्रंथालयात गेले आणि त्यांच्या मागोमाग ते दोघे...

"आमच्या विषयाच्या बाषेत काळ्या जादूला डार्क ऍक्ट म्हणतात, तुम्ही जे काही सांगितलं ते सगळं तर खूप खालच्या स्थराच काम आहे... पण तुमच्या विचारांच्या हि पलीकडे काळ्या जादूचं साम्राज्य आहे... तुम्ही जे काही सांगितलं ते फक्त एक सामान्य माणसाचं एक साधारण काम आहे पण जर तुम्ही अजून खोलवर जाल तर काळ्या जादूत पण किती तरी वेगवेगळे प्रकार आहेत... जसं कि नाईट म्याजीक, डेथ म्याजीक, ब्लड म्याजीक आणि सर्वात भयानक डेमॉनिक (आसुरी) म्याजीक... खरं म्हणजे ह्याचे असले अजून खूप सारे प्रकार आहेत पण अजून डिटेलमध्ये तुम्हाला सांगणं मी जरुरी नाही समजत.. पण जसं कि त्या चित्रात पाहिलं आहे, त्यांची ज्या प्रकारे हत्या करण्यात आणि रक्त काढण्यात आलं आहे त्याचा उपयोग सोप्प्या भाषेत सांगणं म्हणजे तो ब्लड म्याजीक आणि ब्ल्याक म्याजीकचा एकत्र प्रयोग तो डेमॉनिक (आसुरी) म्याजीक पूर्ण करण्यासाठी करत आहे..." डॉ. अवधूतच्या ह्या माहितीने त्या दोघांचे शरीर थरारले होते...

"डेमॉनिक (आसुरी) म्याजीक असतं तरी काय...?" ह्यावेळी शिऱ्याने प्रश्न विचारला... जो पूर्ण वेळ गप्पच होता...

"कोणत्या हि आत्म्याला बंदीतून सोडवून त्याला पुन्हा आणणे..." डॉ. अवधूतने त्यांना स्पष्ट शब्दांत समजावून सांगितलं...

"तर तुमचं म्हणणं असं आहे कि, हा जो कोणी हत्या करत आहे तो कोणत्या तरी आत्म्याला पुन्हा आणायला पाहत आहे..."

"हो, आणि ह्या चिन्हांकडे पहा ज्या कि ह्या चित्रांमध्ये दोन हाडं क्रॉस ठेवून बनवले आहेत, सगळ्यात वरती काही नंबर्स आहेत, त्याच्या डाव्या बाजूला एक चिन्ह आहे, काही गोलाकार आणि Ω असा. मग खालच्या बाजूला आणखीन एक चिन्ह आहे = असा जो कि दोन रेघांनी बनलेला आहे जो कि सरळ सरळ आत्म्याशी निगडीत आहे. पहिली रेघ शरीराला दर्शवते आणि दुसरी आत्माला, ह्याचा सरळ सरळ अर्थ असा होता कि हि काळी जादू कोणत्या ना कोणत्या तरी आत्म्याला पुन्हा बोलावण्यासाठी केली जात आहे.." डॉ. अवधूतने ते चिन्ह एका कागदावर बनवत त्यांना समजावून सांगितले.

"आता हे दुसऱ्या चित्रात पहा, इथे नंबर्स वेगळे आहेत आणि उजव्या बाजूला Ð असल्या प्रकारचं चिन्ह आहे आणि त्याच्याच खाली एक = ह्या चिन्हा मधलं अंतर पहिल्यापेक्षा थोडं कमी झालं आहे, ह्याचा अर्थ असा आहे कि ती आत्मा आता शरीरापासून जास्त लांब नाही आहे..." डॉ. अवधूतचं स्पष्टीकरण ऐकून ते दोघे अचंबित होतात.

"पण हे नंबर्स काय सांगतात...?"

"मी नंबर्स विषयी काही सांगू शकत नाही, हे नंबर्स स्वतःच एक गुपित आहे, पण ती माहिती सर्वात मोठं रहस्य आहे. मी बोललो नव्हतो तुम्हाला हा खूप जुना खेळाडू आहे... काळ्या जादूमध्ये आत्माला संदेश पाठवण्यासाठी पहिल्या चरणात नंबर्सचा उपयोग होतो, हे एक कोड प्रमाणे असतात, जशी बायनरी भाषा नसते कॉम्प्युटरमध्ये तशीच, बस त्याच प्रकारे आपल्यांना हे नंबर्स पण डिकोड करायला लागतील..."

"पण मग Ω आणि Ð ह्या चिन्हांचा अर्थ काय होतो...?"

"Ω ह्या चिन्हाचा असा खास काही अर्थ नाही आहे, हा चिन्ह तर प्रत्येक काळी जादू करणारा माणूस आपापल्या परीने वापर करतो, हा चिन्ह कदाचित कोणत्या तरी शहराचं नाव दर्शवत आहे किंवा कोणत्या तरी शहराची माहिती यात दिली आहे किंवा असंच काहीतरी जे मी व्यवस्थित सांगू शकत नाहीये..."

"ह्याचा अर्थ असा कि त्या खुन्या मागे कोणती ना कोणती तरी भयाण शक्ती त्याच्या पाठीशी आहे..." शिऱ्याने पुन्हा आपली शंका जाहीर केली...

"होय लक्षपूर्वक ह्या नंबर्स ना पहा सुरुवातीला हे सांगतात कि हे कुठून आहेत आणि त्यांचा खुन्याशी काय संबंध आहे... जर खुन्याला पकडायचं असेल तर आपल्यांना पहिले हे नंबर्स डिकोड केले पाहिजेत..." डॉ. अवधूत अजूनही ते नंबर्सच पाहत होते...

"म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो कि ह्या केसमध्ये तुम्ही आमची मदत करायला तैयार आहात...?" संत्याने एका नवीन जोशात विचारले...

"होय माझ्याकडे ह्याच्या पलीकडे काहीच उरलं नाही आहे..."

'मी अजून कोणत्याच प्रियाला ह्या हिंसक माणसाचा शिकार होतांना नाही पाहू शकत...' डॉ. अवधूत आपल्या मनातल्या मनातच बोलले...


क्रमशः...

आधीचा भाग                   पुढील भाग

Thursday, 9 January 2014

पापी... एक गूढ सत्य भाग पाचवा

पापी... एक गूढ सत्य (थरारक आणि रहस्यमयी कथा)

अध्याय दुसरा नंबर्स आणि चिन्ह

भाग पाचवा

"ह्या महिन्यात झालेली हि दुसरी हत्या आहे, इथे बसून हातावर हात ठेवून विचार करण्यापेक्षा, ते जे कोणी डॉ. अवधूत आहेत त्यांना आग्रह करून, लवकरात लवकर ह्यावर तोडगा काढण्यासाठी सांगायला पाहिजे...?" शिऱ्याच्या आवाजात चिंता साफ दिसत होती...

"मी त्यांना समजावण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे, खरं म्हणजे ते काही ऐकूनच घ्यायला तैयार नाहीत... मी आधी जसं बोललो होतो कि असल्या घटना ह्या आधी पण घडल्या आहेत मी त्या विषयी काही किरकोळ माहिती गोळा केली आहे... ते पाहून तू आश्चर्यचकित होशील..." संत्या बोलला...

"ते काय...?" शिऱ्याने उत्सुकतेने विचारले...

"अज्जूने (अजित गायकवाड) आज काही फाईल्स पाठवल्या आहेत, ज्या मध्ये काही अश्या केसेस आहेत ज्या आपल्या केसशी तंतोतंत जुळतात..." एवढं बोलून संत्याने ती फाईल शिऱ्याच्या पुढे सारली...

"गेल्या १० वर्षात ५ वेळा एकदम अश्याच प्रकारे मुलींची हत्या करण्यात आली आहे, ज्या प्रकारे ह्या २ मुलींची हत्या झाली आहे..." संत्या बोलला...

"तर तुला असं बोलायचे आहे कि ह्या घटना आधी पण झाल्या आहेत..." शिऱ्याने विचारले...

"होय, पण फाईल्स वाचून समजलं कि शिवाय पेपरवर्क सोडून ह्या केसवर काहीच पडताळणी केली गेली नाही आहे, पण ह्यातील रिपोर्ट्स आणि घटनास्थळीचे चित्र पाहून तरी मला असं वाटतंय कि हत्यारा एकच आहे... आणि एक गोष्ट माहिती आहे जेव्हा अशी घटना घडते तेव्हा दरवेळी मुलींची संख्या वाढतच जाते... गेल्यावेळी 4 मुलींची बळी दिली गेली होती..."

"हि तुझी फ़ाइल बोलते कि दरवेळी खुनाची संख्या वाढते त्यामुळे ह्यावेळी ४ पेक्षा जास्त हत्या होणार...?" शिऱ्या आपल्या त्याच चीतपरीचीत चिडचिड्या स्वरात बोलला...

"मी पक्का तर नाही सांगू शकत कि ह्यावेळी ४ किंवा त्याही पेक्षा जास्त हत्या होणार आहे, पण आपल्यांना एका गोष्टीवर दूरदृष्टी टाकली पाहिजे, कि ज्या प्रकारे त्या मुलींची हत्या होत आहे आणि त्यांचे रक्त घेतले जात आहे, ह्या विषयावर मी डॉ. अवधूतचे पुस्तक वाचले आहे... आणि माझा संशय असा आहे कि त्या रक्ताचा आणि काळ्या जादूचा काहीतरी मोठा संबंध आहे..." संत्या बोलला...

"आता तुझं वायफळ बोलणं बंद कर... माणसं चंद्रावर जावून आले आहेत, ह्या वैज्ञानिक युगात ह्या गोष्टींवर कोण विश्वास करणार आणि कोण हे सर्व करणार...? मी तर असल्या गोष्टींवर विश्वास नाही ठेवत... ह्या सर्व हत्या कोणत्या पागलने नाहीतर माथेफिरूने केल्या असतील... आणि आता पुन्हा तो असले गुन्हे करत फिरत आहे, आजचे क्रिमिनल, सायकोलॉजि केस तुला असल्या प्रकारचे खूप सारे उदाहरण देवू शकतात..." शिऱ्या बोलला...

"खरोखर...? शिऱ्या तू आहेस म्हणून सांगतोय माझ्या कारकिर्दीत मी एक गोष्ट शिकली आहे कि जिनिअस आणि इनसानिटी मध्ये एक धुसर रेघ असते... आणि हा माणूस ज्या प्रकारे मुलींची हत्या करून त्यांचं रक्त काढत आहे आणि मग असा गायब होतो कि जसं काही त्याचं काहीच अस्तित्व नव्हतं, हे कुठेही माथेफिरूच्याकडे इशारा नाही करत.. आणि एवढी सारी हत्या एवढ्या चतुराईने केल्या गेल्या आहेत आणि त्याच प्याटर्न नुसार... आणि आजपर्यंत त्याने त्याच्या विरुद्ध एकही पुरावा सोडला नाही, इथे काही न काही तरी असं आहे जे आपल्यांना दिसत नाही आहे एक अशी शक्ती जी ह्या सर्वांच्या मागे आहे आणि त्यांची मदत करत आहे..." संत्या बोलला...

"हे बघ मी पण एकदम पक्का नाही सांगू शकत कि शेवटी हत्यारा हत्या का करत आहे.... तरीपण डॉ. अवधूतशी वार्ता करण्यात समस्या काय आहे... ह्या बाबतीत ते आपल्या पेक्षा जास्त ज्ञान ठेवतात, जर ह्या केस मध्ये काळ्या जादू विषयी काहीच नसेल तर ते एका क्षणात सांगतील आणि जर असेल तर त्यांच्या पेक्षा अधिक चांगला कोणीच नाही जो आपली मदत करू शकेल..."

"बघ जर तुला वाटतंय कि ते ह्या बाबतीत आपली मदत करू शकतात तर ह्यासाठी त्यांना आग्रह करण्यासाठी तुझ्याकडे खूप कमी वेळ आहे..." शिऱ्या शांत स्वरात बोलला...

"मी त्यांना मुलींच्या हत्येचे आणि तिथल्या चिन्हांचे चित्र पाठवले आहेत... आशा आहे कि ते त्यांना पाहून आपल्यांना संपर्क करतील... पण जर असं नाही झालं तर आपल्यांना कोणी दुसरा शोधला पाहिजे जो आपली मदत करू शकेल... पण ह्या वेळी ह्या खुनीला मी जिवंत सोडणार नाही..." संत्या काहीतरी विचार करत बोलला... त्याच्या डोळ्यांपुढे काही नंबर्स आणि चिन्ह आले.. ते अश्या प्रकारे होते...
 

22, 33, Ð, =

तर मित्रांनो काय असेल ह्या चिन्हांचे रहस्य... प्रश्नच प्रश्नच नाही का... त्याची लवकरच तुमच्या समोर उकल होईल...

क्रमशः...

आधीचा भाग                   पुढील भाग

Thursday, 26 December 2013

पापी... एक गूढ सत्य भाग चौथा

पापी... एक गूढ सत्य (थरारक आणि रहस्यमयी कथा)

अध्याय दुसरा नंबर्स आणि चिन्ह

भाग चौथा

ती छोटीशी खोली मधोमध ठेवलेल्या मेणबत्त्यांनी आणि धुरांनी भरलेली होती एक वेगळ्याच प्रकारचं सावट त्या खोलीत पसरलं होतं... त्या खोलीच्या भिंतीवर काही चित्रविचित्र चिन्ह आणि अक्षरं बनवलेले होते... त्या खोलीच्या मधोमध बनवलेल्या वर्तुळात एक माणूस बसलेला होता... खरं म्हणजे त्या माणसाचा चेहरा एकदम साधा होता... त्याचे डोळे बंद होते पण त्याचं तोंड पुटपुटल्या सारखं सुरु होतं... कदाचित तो व्यक्ती मंत्रोच्चारण करत होता...

त्या व्यक्तीच्या समोर दोन हाडं एक क्रॉस करून ठेवलेले होते... काही वेळाने तो सारखा सारखा जवळ ठेवलेल्या भांड्यातल्या भस्माला चिमटीतून उचलून त्या हाडांवर फेकायचा... काही वेळ वारंवार हे केल्यानंतर त्याने आपले डोळे उघडले... आणि त्याच्याच जवळपास अजून एका भांड्यात ज्यामध्ये रक्त भरलेलं होतं... ते रक्त घेवून तो त्या हाडांच्या बाजूला वर्तुळाकार शिंपडत राहिला... ३ चक्कर मारून झाल्यावर काही रक्त तो त्या हाडांवर पण शिंपडायचा, हे तो तोपर्यंत करीत राहिला जोपर्यंत भांड्यातील पूर्ण रक्त संपत नाही...

आता ती व्यक्ती उठून उभा राहिला आणि एकटक तिथे पाहायला लागला, जसं काहीतरी होणार आहे... लवकरच त्या हाडांमधून आगीचा भडकाव उठायला लागला... पण ती व्यक्ती ह्याहीपेक्षा जास्त अनुमान लावत होती... त्या आगीचा भडकाव पिवळा नसून काळा होता... लवकरच तो आगीचा भडकाव घराच्या छपरांना शिवायला लागला...

तो लगेच आपल्या गुढग्यांवर बसून नमस्कार करण्यासाठी झुकला आणि त्याच्या तोंडून शब्द निघाले, "माझे मालक, माझे महाराज... तुमच्या येण्याचे मी तुमचा सेवक स्वागत करत आहे..."

तो ती आग शांत होईपर्यंत तसाच राहिला आणि आग विझल्यानंतर तो तिच्याजवळ आला... ती हाडं अजूनही तशीच होती जशी काही वेळापूर्वी ठेवल्या होत्या... पण समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता आणि एक वेगळीच चमक होती... काही तरी मिळवण्याचा आनंद, जो कि त्याच्या किती तरी वर्षांच्या परिश्रमाचं फळ होतं... आज एवढ्या वर्षांनी त्याची पूजा पास झाली होती... आज तो क्षण लांब नव्हता त्याच्या कित्तेक वर्षाचं स्वप्न पूर्ण होणार होतं...

आता तो माणूस त्या वर्तुळातून बाहेर पडला आणि खोलीतील एका कोपऱ्यात ठेवलेल्या बेड जवळ गेला... बेडवर बसून जवळ टेबलावर ठेवलेला एक सुरा त्याने उचलला आणि त्या सुऱ्याने त्याने आपल्या छातीवर एक क्रॉसचा निशाण बनवला.. निशाण बनवून त्याने तो सुरा जिथून उचलला होता तिथेच पुन्हा फेकून दिला... आणि तो त्या पलंगावर असा पहुडला जसं कि केवढा थकला आहे... त्याच्यावर सुऱ्याच्या जखमेचा लवलेश मात्र जाणीव हि झाली नाही... तो पहुडल्या पहुडल्या लगेच गाढ झोपला... त्याच्या छातीवरून रक्त वाहत आता जमिनीवर पोहोचलं होतं पण त्या माणसाची शुद्धच जणू हरवली होती...

क्रमशः...

आधीचा भाग                   पुढील भाग

Friday, 13 December 2013

पापी... एक गूढ सत्य भाग तिसरा

 पापी... एक गूढ सत्य थरारक आणि रहस्यमयी कथा

अध्याय पहिला पराभव

भाग तिसरा


 
"कम ऑन पप्पा, पकड़ा मला, तुम्ही ह्याहीपेक्षा चांगलं करू शकाल तरच जिंकू शकाल नाही तर तुम्हाला पराभव पत्करावा लागेल..." ती आपल्या पप्पांशी बोलत होती... पण तिचा श्वास आत्ता अडखळत होता...

"टाईम अप प्लीज..." तिच्यासाठी एवढंस वाक्य बोलणं पण कठीण जात होतं... ती थांबून आपल्या श्वासांवर नियंत्रण आणत बोलली...

तिने पुन्हा पाळायला सुरुवात केली, ती मुलगी अजूनही त्याच्या पासून लांब पळत होती, शेवटी त्याने थोड्या श्रमाने तिला पकडले... जसंच त्याने तिला पकडलं आणि तिचा चेहरा आपल्याकडे फिरवला, तिचं एका माणसात रुपांतर झालं होतं... त्या माणसाचा चेहरा पूर्णपणे रक्ताने भरलेला होता आणि काही रक्त त्याच्या तोंडातून स्त्रवत होतं...

डॉक्टर अवधूत कुलकर्णी आपल्या दुस्वप्नातून उठले होते... काही विचित्र गोंधळ त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता... अचानक बेडच्या जवळ ठेवलेल्या फोनची रिंग वाजली... ते विचारात डुबले कि एवढ्या रात्री त्यांना कोण कॉल करू शकतो ते... त्यांनी आपल्यात घड्याळात पाहिले पहाटेचे ४ वाजले होते, त्यांनी रिसीवर उचलला...

"हेल्लो, मी डॉक्टर अवधूत कुलकर्णीशी वार्ता करू शकतो का.." समोरून एका माणसाचा आवाज आला...

"हो बोलतोय... आपण कोण...?"

"मी संतोष पाटील स्पेशल इन्वेस्टीगेशन ब्रांच मुंबई, मला तुमच्याशी खूप जरुरी वार्ता करायची आहे..."

"तुम्हाला आत्ता माहिती आहे, कि सध्या काय वेळ झाली आहे ती...?" डॉ. अवधूत चिडत बोलले...

"होय... पण माझं तुमच्याशी बोलणं खूप जरुरी आहे..."

"तुम्हाला माझा नंबर कसा मिळाला...?" आता डॉ. अवधूत तो काय बोलत आहे त्याकडे दुर्लक्ष करत बोलले...

"मी बोललो होतो ना कि मी स्पेशल ब्रांच मधून आहे... त्यामुळे आम्ही कोणाचाही नंबर आणि पत्ता शोधू शकतो, आमच्याकडे आमचे काही सोर्सेस आहेत..."

"तर मग तुमच्या त्या सोर्सेसने तुम्हाला हे नाही सांगितलं का कि मला मैत्री करणे पसंत नाही आहे आणि खास करून जे पोलीसातून असतील तर..." आता ते जरा चिडून मोठ्याने बोलायला लागले होते...

"होय डॉ. मला माहिती आहे... खरोखर तुमचा पत्ता सापडणं खूप कठीण होतं पण आम्हाला आमच्या गरजेपायी हे करायला लागलं... ह्यावेळी एक तुम्हीच आहात जे आमची मदत करू शकता..."

"मी तुमची मदत जरूर करू शकलो असतो पण क्षमा करा मला आपलं उरलेलं जीवन शांतीपूर्वक व्यतीत करायचं आहे..."

"प्लीज डॉ. मी काय बोलतोय ते एकदा ऐकून घ्या... जर तुम्हाला ह्याच्यामध्ये काही करण्यासाठी रस वाटत नसेल तर मी तुम्हाला पुन्हा त्रास नाही देणार... ह्यामध्ये खूप साऱ्या लोकांचं जीवन अवलंबून राहिलं आहे..."

"हे जग खूप खराब आहे... इथे प्रत्येकाचं जीवन कोणावर ना कोणावर तरी अवलंबून आहे आणि कोणालाच माहिती नाही कि कधी काय होईल आणि काय नाही ते... आणि जाणाऱ्यांना कोणीच थांबवू शकत नाही..."

"जर तुम्ही आम्हाला सहकार्य कराल तर खूप लोकांचा जीव वाचेल, तुम्ही हे करू शकता हे तुम्हाला पण माहित आहे... माणुसकीच्या नात्याने ह्यांना वाचवा..."

"कोण बोललं तुम्हाला कि मी माणूस आहे, मी तर फक्त एक शरीर आहे जो फक्त श्वासोश्वास करतोय, माझी आत्मा कधीच निघून गेली आहे... माझ्या सोबत तुमचा वेळ नका वाया घालवू, कोणीतरी दुसरा शोधा जो खरोखर तुमची मदत करू शकेल..." एवढं बोलून डॉ. अवधूतने रिसीवर आपटला...

त्याने आपले डोळे बंद करून एक दीर्घश्वस घेतला आणि पुन्हा त्याने त्याच स्वप्ना विषयी विचार करायला सुरुवात केली जी त्याला गेल्या १० वर्षांपासून सतावत होती आणि असंच रात्रीअपरात्री तो चर्फडून जागा व्हायचा... त्याने कपाटातून झोपेच्या गोळ्यांची बाटली काढून ३ गोळ्या खाल्ल्या...

त्याला पूर्ण विश्वास आणि खात्री होती कि पुन्हा तेच स्वप्न पडणार... पण ते काही बहुमोल क्षण जे त्यांनी आपल्या मुलीसोबत घालवले आहेत.... ते पाहण्यासाठी ते पुन्हा त्याच रक्ताने माखलेल्या माणसाचा चेहरा पाहण्यासाठी सज्ज होतात.क्रमशः...

आधीचा भाग                   पुढील भाग

Thursday, 12 December 2013

पापी... एक गूढ सत्य भाग दुसरा

 पापी... एक गूढ सत्य थरारक आणि रहस्यमयी कथा

अध्याय पहिला पराभव

भाग दुसरा 

त्या दिवशी इन्स्पेक्टर शिरीष भोसले घरचा चिकन-करीचा बेत ओरपुन निद्रास्त झाले होते तेंव्हाच त्यांना पोलीस स्टेशनमधुन गुन्हाची बातमी देणारा फोन आला होता आणि चरफडतच रात्रीच्या गारठ्यात ड्युटीचे कपडे अंगावर चढवुन ते घराबाहेर पडले होते.

"शिऱ्या, काय विचार करतोयस तू...?" पूर्ण पडताळणी करून पोलिस स्टेशनमध्ये पोलिस इन्स्पेक्टर शिरीष भोसले उर्फ शिऱ्या आणि स्पेशल ब्रांच ऑफिसर संतोष पाटील उर्फ संत्या बोलण्यात मग्न होते...

"काहीच नाही, उलट तूच मला सांगितले पाहिजेस असं मला वाटतं, कारण इथे एक्स्पर्ट तूच आहेस ना...!!" शिऱ्या त्याची टिंगल करत आणि टोमणा मारत बोलला...

"हे बघ... हे माझं काम नाही आहे, मला पोलिस कमिश्नरांनी डायरेक्ट ऑर्डर दिले आहेत म्हणून ह्या केसमध्ये मी तुझी मदत करतोय..." संत्याने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला...

"हो हो मला माहिती आहे कि फक्त स्पेशल ब्रांचवालेच कामं करतात आणि आमच्यासारखे पोलिसवाले असेच भरती करून ठेवले आहेत..." शिऱ्याने पुढचा तीर मारला...

"ठीक आहे, कदाचित आपल्यांना एकत्र काम करण्यापलीकडे आत्ता काहीच उरलं नाही आहे... तर मग आता तू काय माहिती गोळा केली आहेस..." शेवटी संत्यानेच त्याच्याशी हुज्जत न घालता कामाची गोष्ट काढली...

"ती एक वेश्या होती... आणि ते वेश्यावृत्तीचे धंदे इरफान चालवतो..." शिऱ्याने माहिती दिली...

"इरफान...??" संत्याने विचारले...

"हो... मी त्याच्याशी बोललो, पण ज्याने तिला पाठवण्यासाठी सांगितले होते, त्याने आपलं नाव, गाव काहीच सांगितलं नव्हतं बस हा पत्ता देवून पाठवण्यासाठी सांगितलं होतं..." शिऱ्या बोलला...

"इरफानला ज्या नंबरवरून कॉल आला होता त्या नंबर विषयी तू काही माहिती काढलीस कि नाही..."

"हो... पण प्रयत्न बेकार गेले... आय.एस.डी. फेक नंबर..."

"आणि मेडिकल रिपोर्टमध्ये काही खास बाबी...?"

"रिपोर्टमध्ये हे नमूद केलं आहे कि हिचा खून करण्याच्या पहिले हिच्याशी कोणीच शारीरिक संबंध केला नाही... ह्याचा अर्थ असा होतो कि हिला फक्त हिचा खून करण्यासाठी बोलावलं गेलं होतं... आणि एकदम लक्षपूर्वक पाहशील तर तिच्या गळ्यावर ह्या प्रकारे घाव केला आहे कि तिचं फक्त रक्तच निघालं पाहिजे... आणि हीच गोष्ट आहे कि जी माझं डोकं फिरवत आहे..." शिऱ्या एका दमात एवढी सर्व माहिती संत्याला सांगतो...

"ह्या खुनाची खूप साऱ्या बाबी खूप गुंतागुंतीच्या आहेत... सारखं सारखं मला असं का वाटतंय कि हे कोणत्या सध्या माणसाचं काम नाही आहे, हि केस जशी दिसते त्याहीपेक्षा गुंतागुंतीची आहे, आणि काही ना काही तरी असं आहे जे आपल्यांना दिसत नाही आहे किंवा आपण त्याला पाहूनही दुर्लक्षित करत आहोत..." संत्या तर्क लावत बोलला...

"त्यासाठीच तर तुला इथे पाठवलं आहे..." शिऱ्या पुन्हा सुरु झाला होता...

ह्यावेळी संत्याने त्याच्याकडे दुर्लक्ष करत घटना स्थळाचे चित्र लक्षपूर्वक पाहायला सुरुवात केली... अचानक त्याची नजर एका चित्रावर केंद्रित होते...

"खुन्याने दिवाळावर हे जे काही नंबर्स आणि चिन्ह बनवले आहेत त्या विषयी तू काही विचार केला आहेस काय...?" संत्याने विचारले...

"खरं सांगू मी थकलोय ह्या विषयी विचार करून करून कि कोणी एका वेश्याला बोलावणार आणि मग तिचं रक्त काढून तिचा खून करून तिच्याच रक्ताने दिवाळावर काही लिहून पण जाणार... आणि पूर्ण रूम अशी असेल जिथे जसं काही घडलंच नाही... तिथे एकाचे पण बोटांचे ठसे मिळालेले नाहीत..." शेवटी शिऱ्याने आपला पराभव मानला...

"नाही ह्यात आपण पूर्णपणे पराभूत झालेलो आहोत..." संत्याने त्याचे अर्धवट वाक्य पूर्ण केलं...

"एक मिनट... एक मिनट थांब कदाचित मी कोणाला तरी ओळखतो जो आपली ह्यात मदत करू शकेल... मला पूर्णपणे तरी काही आठवत नाही पण असल्या हुबेहूब मिळणाऱ्या मर्डर केसच्या फ़ाइल्स मी वाचल्या आहेत... त्यामध्ये असलंच रक्ताने लिहिलेल्या नंबर्स आणि चिन्हांची माहिती होती... हे चिन्ह आणि नंबर्स एका कोडींग प्रमाणे आहेत... हे चिन्ह आणि नंबर्स काही तरी सांगत आहेत पण असं समजणार नाही ह्यांना डिकोड करावं लागणार..." संत्या दृढतापूर्वक बोलला पण त्याची नजर त्या नंबर्स आणि चिन्हांवरून हटतच नव्हती...


क्रमशः...

आधीचा भाग                   पुढील भाग

Wednesday, 11 December 2013

पापी... एक गूढ सत्य भाग पहिला

 पापी... एक गूढ सत्य थरारक आणि रहस्यमयी कथा

अध्याय पहिला पराभव

भाग पहिला

पूर्ण खोली गडद काळोखाने भरलेली होती... एका बेडवर लागेल्या छोट्याश्या बल्बच्या अंधुक प्रकाशात फक्त तो बेडच दिसत होता... त्या बल्बचा प्रकाश एवढा अंधुक होता कि फक्त त्या बेडशिवाय तिथे काहीच दिसणं कठीण होतं... त्या बेडवर एक मुलगी गुडघ्यांमध्ये डोकं खुपसून आकसून बसली होती. त्या अंधुक प्रकाशात आणि एअर कंडीशनवाल्या त्या खोलीतपण त्या मुलीच्या कपाळावर घर्मबिंदूचे थेंब पाहून
कोणालाही तिच्यातल्या भयाचा अंदाजा येवू शकत होता...

"शैलजा मी काय सांगतोय ते नीट ऐक..." त्या काळोखातून एक भारी भक्कम आवाज आला...

"आता बेडवर झोप आणि आपले डोळे बंद कर..." तिथूनच पुन्हा अजून एक आदेश आला आणि त्या मुलीने लागलीच त्या आदेशाचे पालन केले... जसं काय ती त्याच आदेशाची वाट पाहत होती.

त्या मुलीला जसं सांगितलं जात होतं तसंच ती आपले डोळे बंद करून बेडवर झोपली. तिला असं करतांना पाहून असं वाटत होतं कि ती मुलगी कोणत्या तरी असहाय्य कारणामुळे निषेद करू शकत नव्हती. काहीच क्षणानंतर तिला जाणवले कि एक गरम श्वास तिच्या सर्वांगावरून फिरून गेला आहे, आणि काही अस्वस्थ क्षणानंतर तिला वाटलं कि जसं कोणीतरी तिचे पाय घट्ट पकडले आहेत. तिच्या काही समजायच्या आधीच तिचे पाय कोणत्यातरी वस्तूने बेडला बांधले गेले. ह्या प्रसंगाने ती एवढी घाबरली गेली कि तिच्या तोंडून एक किंकाळी फुटणारच होती कि तिच्या तोंडावर कोणाचातरी एक वजनदार हात पडल्यामुळे ती किंकाळी तिच्या तोंडातल्या तोंडातच घुटमळली गेली.

"शु$$हह्ह्ह ... मला तुला काहीच इजा पोहचवायची नाही आहे... माझी अशी कल्पना आहे कि मी अश्या मुलीचं चित्र काढू जी माझ्या बेडवर बांधलेली आहे... यु नो इट्स अ काइंड ऑफ फेटिश.." तो व्यक्ती तिला शांत करण्यासाठी बोलला.. आणि त्याचे ते शब्द कामी आले, कारण त्या मुलीच्या चेहऱ्यावरचं टेन्शन आता कमी झालं होतं...

आता त्याने पहिले त्या मुलीचे पाय बांधले आणि मग नंतर हात आणि सगळ्यात शेवटी त्या मुलीच्या डोळ्यावर एक पट्टी पण बांधली... आता त्याच्या बेडवर एक हात, पाय आणि डोळ्यावर पट्टी बांधलेली एक मुलगी होती. त्याने मागे होवून काही अंतरावून त्या मुलीला निहारले.

"परफेक्ट..." त्या व्यक्तीच्या तोंडून अनायसंच निघाले.

त्या व्यक्तीने एक काळा कोट चढवलेला होता, ज्याच्या खिशातून त्याने एक बॉलसारखी वस्तू काढली. तो हळू हळू त्या मुलीकडे जात होता... त्या मुलीला काहीच समजत नव्हते कि शेवटी तिच्या सोबत होतंय तरी काय...?? अचानक त्या व्यक्तीने तिच्या गालावर एक जोरदार चपराक लगावली. जसंच त्या मुलीने वेदनेने आपलं तोंड उघडलं त्या व्यक्तीने त्या चेंडू सारख्या वस्तूला तिच्या तोंडात खुपसून तोंड टेपने बंद केलं.

आता त्या व्यक्तीने दुसऱ्या खोलीत जावून एक वाडगा आपल्या सोबत घेवून आला. त्या वाडग्यामधून त्याने एक मेणबत्ती काढली आणि तिला जळवून ती बेडच्या उश्याशी ठेवली... आणि त्या प्रकाशात त्याने आसपासच्या सर्व वस्तूंवर एक नजर फिरवली आणि त्याच्या चेहऱ्यावर एक संतुष्टीचे भाव आले.

'चला मग आता खरी मजा सुरु करूयात...' एक स्मित हास्य देत तो स्वतःशीच पुटपुटला.

आता त्या व्यक्तीने त्या मुलीच्या शेजारी बसून आपला एक हात त्या मुलीच्या मानेवर ठेवला आणि त्या हाताला असा फिरवायला लागला जसं तो तिथे काही तरी शोधत आहे... अचानकच त्याचा हात जसंच त्या मुलीच्या मानेखाली पोहोचला त्याने शोधण बंद केलं. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच स्मित हास्य उमटलं. त्याने लगेच आपले डोळे बंद करून मंत्रोच्चारण सुरु केलं आणि दुसऱ्या हाताने त्याच वाडग्यामधून एक मोठा सुरा बाहेर काढला.

काही क्षणानंतरच त्या व्यक्तीचे मंत्रोच्चारण आणखीनच वाढले गेले... त्या मुलीचं शरीर जसं आग कशी भडकते तसं भडकत होतं... तिने स्वतःला सोडवण्यासाठी आपले हात पाय मारण्याची धडपड सुरु केली. त्या मुलीला समजून चुकलं होतं कि तिच्या सोबत आत्ता काही तरी वाईट आणि खूप भयंकर घडणार आहे... स्वतःला सोडवण्यासाठी ती आपली सर्व शक्ती पणाला लावून ती दोर तोडण्याचा प्रयत्न करत होती पण तिची शक्ती त्या दोरीसमोर अपुरी होती.

तो व्यक्ती तिच्या प्रतिकाराला दुर्लक्ष करून आपले मंत्रोच्चारण अजून जोराने बोलायला लागला आणि त्याचवेळी त्याने तो सुरा त्या मुलीच्या मानेवर सपकन फिरवला. त्या वेदनेमुळे ती मुलगी अजून जोराने आपले हात पाय आपटून आपटून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू लागली, पण त्याकडे दुर्लक्ष करून त्या व्यक्तीने भळाभळा गळणाऱ्या रक्ताला त्या वाडग्यात भरू लागला.

ती व्यक्ती आपल्या मनात एकदम द्वेष बाळगून होती... त्याच्या वागणुकीवरून तरी असं वाटत होतं हे सर्व काही त्याच्यासाठी काहीच नाही आहे...

ती मुलगी आता अजून जोराने आपले हात पाय आपटत होती... तिच्या शरीरासोबतच तिची आत्मा पण त्या वेदनेला सहन करत होती... त्या मुलीची अशी हालत झाली होती कि तिच्या शरीरातील आत्मा तिला सोडून जाण्याचा मार्ग पाहत होती पण त्या आत्म्याला पण मार्ग दिसतच नव्हता... जसं जसा वेळ जात होता त्या मुलीची प्रतिकार करण्याची क्षमता आता कमी होत जात होती.. अजूनही त्या जखमेतून रक्त प्रवाह सुरु होता पण वेग कमी झाला होता...

तो वाडगा आता त्या मुलीच्या रक्ताने पूर्णपणे भरला होता... त्या व्यक्तीने तो वाडगा सावधपणे बाजूच्या टेबलावर ठेवला... आता आपल्या दुसऱ्या खिशातून त्याने एक पेंटिंग ब्रश काढून त्या मुलीच्या रक्ताने भिंतीवर काहीतरी लिहिलं आणि त्या मुलीच्या जखमेला टेप लावून बंद केलं.. ती निष्प्राण मुलगी आता बेडवर पहुडली होती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव सरळ सरळ सांगत होते कि ती मरण्याच्या पहिले तिने खूप वेदना सहन केल्या असतील आणि आता तिच्या आत्म्याने शरीरातून मार्ग काढून पळ काढला होता... कारण त्या आत्म्याने आपला पराभव स्वीकारला होता...

ती व्यक्ती काही वेळासाठी त्या खोलीतून बाहेर निघून गेली आणि जेव्हा आतमध्ये आली तेव्हा त्याच्या हातामध्ये एक स्प्रेची बाटली होती. त्याने पूर्ण खोलीत स्प्रे मारण्याच्या आगोदर सर्वीकडे एकवार नजर फिरवली कि काही सुटल तर नाही ना... पूर्णपणे तपासून झाल्यावर त्याने पूर्ण खोलीत स्प्रे मारला आणि तो ब्रश आणि सुरा आपल्या खिशात ठेवला... आणि त्या मुलीला ज्या दोरीने बांधलं होतं तिथून तिची सुटका केली.

"च्च च्च बेच्चारी..." एवढं बोलून तो त्या खोलीतून बाहेर आला...

अजूनही ती खोली पूर्णपणे गडद काळोखात होती, त्यात त्या बेडवर अर्धनग्नावस्थेत त्या तरुणीचे प्रेत पडले होते, तिला सोडून काही पण दिसणं कठीण होतं... मुलीचं पूर्ण तोंड आणि बेडवरची चादर तिच्या रक्तांनी माखली होती... त्या मुलीचे डोळे अजूनही उघडे होते आणि त्या डोळ्यात मरण्याच्या पहिले तिला झालेली असहाय्य वेदना आणि दुखः साफ दिसू शकते...

क्रमशः...

पुढील भाग