Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Friday, 24 June 2011

भाग ~ ~ ३ एक प्रेम कथा


"सिधा चालत राह... आता आपली बडबडपण जरा बंद कर..." नितीन त्याच्यावर रागावून बोलला...

त्याच्या नंतर त्यांनी चीखळवाल्या रस्त्यावरून चांगल्या रस्त्यावर आल्यावरच दम सोडला... तेव्हा पर्यंत ते श्वासपण मोजत मोजतच घेत होते... दोघेही एकमेकांचे हाथ पकडून वेगाने पुढे चालत राहिले... आता त्यांना बेडकांच्या डराव डराव ओरडण्याचा आवाजही कोणत्या भूतनगरी मध्ये चाललेल्या एक रहस्यमयी संगीताहून कमी नाही वाटत होता... झाडामधून जरापण काही सरसराहट झाली कि दोघांचा श्वासच थांबायचा... रामाचा नाव जपत जपत एकदाचे ते त्यांच्या गाडीजवळ पोहोचले... पण त्यांना जेव्हा जाताना एक तासाहून अधिक वेळ लागला... परत येताना अर्धातास पण नाही लागला...

"साल्या... कोणत्या मेलेल्या लोकांच्या पर्यंत घेवून गेला होतास तू मला....?" नितीनने आपल्या चेहऱ्यावर आलेल्या घामाला पुसत म्हणाला....

"माफ कर मित्रा... मला माहिती नव्हत कि..." रोहनने दीर्घ श्वास घेत म्हणाला..

"अरे साल्या.... हे सांग कि नीरु कोण आहे...? काय भानगड आहे तुझी तिच्याबरोबर... आणि तिने तुला ईथे कशाला बोलावलं..." नितीन रागात बोलला... त्याला एक गोष्ट सुखद वाटत होती कि, ते तिथून सुखरूप परत आले.... 'तिथून...'..

गाडीने जसा वेग पकडला... त्याला भास झाला कि काहीना काहीतरी गडबड जरूर आहे, "गाडीच्या चाकाची हवा निघाली आहे... वाटत... आता काय करायचं...?" बोलून नितीनने गाडीचा वेग कमी करून तिला बाजूला थांबवल...

रोहनने जरा घाबरून नितीनला बघितलं, "माफ कर यार... माझ्यामुळे..."

नितीन त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्षकरून गाडीमधून उतरला आणि चाकं बघू लागला चारही चाकं जमिनीत रुतली होती... सगळ्या चाकांची हवा गायब होती... नितीन परत गाडीत आला आणि आपल डोक पकडून बसला.... "आता काय करायचं... एका चाकाची हवा गेली असती तर..."

"पुढच गाव आता किती लांब असेल यार..." रोहन स्वताच्या नासमजपणामुळे नितीलापण सतावल्यामुळे खूप दुखी होता...

"असेल काही... ५-७ कि.मी. अजून.. का...?" नितीन आता एकदम स्वस्थ होवून बोलला...

"तिथपर्यंत घेवून चल कसपण... काय माहित तिथे गाडी दुरुस्त करणारा भेटेल..." आणि काही कुठला पर्यायपण नव्हता... नितीनने गाडी हळूहळू पुढे चालवायला सुरुवात केली...

गाव आल्यावर पहिले त्यांनी गाडीला एका घरासमोर उभी केली... हे घर गावाच्याबाहेर होत.... काही वेगळच, "ईथे विचारूया... गावामध्ये कोणी गाडी दुरुस्त करणारा असेल तर..."

दोघेहि गाडीतून उतरले आणि त्या घराचा दरवाजा वाजवायला लागले...

"कोण...?" घरातून एक असा वेगळ्या प्रकारचा गोड आवाज त्यांच्या कानामध्ये शिरला... आवाज कोणत्यातरी नवयुवातीचा वाटत होता...

"आम्ही जरा बाहेरून आलोय... जरा मदत पाहिजे...!" नीतीने रोहन बोलायच्या आताच उत्तर दिलं....

"बाबा ...! बघा जरा कोण आहे..?" आतून त्या मुलीचा तोच गोड आवाज बाहेरपर्यंत येत होता...

'चर्रर्रर्रर्र...' दरवाजा जुना होता... त्याच आवाजाने खुलला.. एकदातर ह्या अवजानेपण त्यांना घाबरून टाकलं...

जवळ जवळ ६० वर्षाच्या एका म्हाताऱ्या माणसाने दरवाजा खोलला... त्याच्या आवजामध्येपण एक गोडपणा होता... वरून खालपर्यंत त्याने त्या दोघांना पाहिलं आणि बोलला, "जुन्या वाड्याच्या इथून आला आहात ना...?"

इथेतर राहून राहून झटके लागत होते... नितीनने रोहनकडे बघितल आणि हळू आवाजात बोलला... "काय...? जुना वाडा...? आम्ही काही समजलो नाही..." दोघांची हालत बघण्यालायक होती... रोहन मनामध्ये विचार करत होता कि... हि रात्र कश्याप्रकारे तरी निघून जावूदे....

क्रमश....

Previous Chapter                                        Next Chapter

1 comments: