Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Wednesday, 22 June 2011

भाग ~ ~ २ एक प्रेम कथा


"असलं ठिकाण तू बघितलं का नाही...? तू तर मास्टर आहेस असल्या ठिकाणांचा... अर्ध जीवन तर तू जंगलामध्येच घालवलस... माझ्यावर काय उपकार करण्यासाठी बोलतोयस का...? रोहन त्याच्याबरोबर मस्करी करत बोलला...

"हा... घालवली आहे... पण असं थोडीच... पूर्ण बंदोबस्त करूनच जायचं असत... तू तर मला असा घेवून आलास, जसा मी तिचा जावई आहे आणि तुला काय वाटलं ती आपली वाट ऐर्पोर्टवर डोळे लावून बसली आहे... देव जाणे कोणत्या घडी कोणता जनावर बाहेर निघून येईल...? ते तर बर झाल कमीत कमी मी माझी बंदूक आपल्याबरोबर आणली... काय भरोसा आहे असल्या सामसूम ठिकाणाचा..." नितीनने सांभाळून सांभाळून आपले पाय ठेवत बोलला... दोघांचीही पेंट पूर्ण चिखलाने खराब झाली होती....

त्याच्यानंतर त्यांना जास्तवेळ चालायला नाही लागल... काही पुढे अजून चालल्यावर ते एका चांगल्या रस्त्यावर पोहचले... रस्ता पुरातन काळासारखा छोट्या छोट्या विटांनी बनलेला होता... ती जागा एका अंगणासारखी वाटत होती... पाण्याचा तो तलाव इथपर्यंत हि पसरला होता... "चल, आपले पाय साफ करून पुढे जावूया... आता ते घरपण जास्त लांब नव्हत..." रोहन दिर्घश्वास घेत बोलला..

दोघांनी तिथे आपले पाय धुतले आणि परत पुढे निघाले.....

"यार.... इथे गल्ली आणि भिंत तर भरपूर दिसत आहेत.. पण घर कुठे आहेत...? काय ह्या गावात ते एकच घर आहे जिथे दिवा दिसतो आहे...?" नितीनने अचंबित होवून रोहन कडे बघितल....
 
"मी तिला नाही विचारलं... नाही यार... काय माहित एकच असेल... चल... तू चालत राह..!" रोहन नितीन बरोबर चालता चालता बोलला...

दोघांनाही विचित्र अनुभवाचा सामना करावा लागत होता... खुपवेळ चालल्यानंतरही तो प्रकाश त्यांना तेवढाच लांब वाटत होता... त्यालोकांनी गल्ल्यापण बदलून बघितल्या, पण प्रत्येकवेळेला थोडे दूर गेल्यावर पुन्हा तोच प्रकाश त्यांनासमोर दिसत होता... आणि पुन्हा त्यांना त्याच रस्त्यावरती चालण्याचा भास होत असे....

"च्या मारी ... बघ... रोहन... मला सगळी गडबड वाटते... ह्या जागेवरही आजकाल कोणीहि घर बनवतात काय... 'ती' मुलगी खरच ईथे राहत असेल ना...?" नितीन थकून तिथेच उभा राहिला...

"तू माझा मित्र... अरे... तो बघ एक छोटा मुलगा..!" रोहन एकदम खुश होवून म्हणाला...

रोहनचे वाक्य ऐकून नितीन एकदम भानावर आला... "छोटा मुलगा... रात्री ११ वाजता.... घराच्या बाहेर, ते पण अश्या सुमसाम जागेवरती ..? तू मला शेवटी खर का नाही सांगत आहेस... कोण आहे ती मुलगी... तिच्या घरातले काय करत असतील इकडे...!" नितीनच डोकं चक्रावलं... ज्याप्रकारची परिस्थिती तिथे निर्माण होत होती... असं होण स्वाभाविकच होत....

रोहनने काहीच न बोलता नितीनचा हाथ पकडला आणि त्याला त्या छोट्या मुलाकडे घेवून गेला...
 
तो छोटा मुलगा दिवाळाखाली बसून काहीतरी करत होता... जसे ते दोघे त्या मुलाजवळ पोहचले... तो मुलगा त्यांना बघून हसला...

खूप गोंडस मुलगा होता तो... त्याच वय जवळ जवळ ८ वर्ष वाटत होत... त्याचा चेहरा बघून दोघेजण हैराण झाले... त्या छोट्या मुलाच्या चेहऱ्यावर कसलीतरी जखम झाली होती.. एकदम ताजी जखम... त्याच्या होठा जवळून रक्त वाहत होते... त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती... आणि चेहऱ्यावर एकप्रकारचा गुपित हास्य होत...

दोघेही त्याच्यापासून काही अंतरावर थांबले... तरीपण तो छोटा मुलगा, त्याच्याकडे एकटक बघत होता.. त्याच्या डोळ्यामध्ये आश्चर्याचे भाव आणि भय दिसत नव्हते.. पण त्याच्या डोळ्यांमधल्या चमकपणामुळे ते दोघे आश्चर्य झाले... नितीनने त्याच्यापासून काही अंतर ठेवून विचारलं, "ईथे काय करतो आहेस, मुला... एवढ्या रात्री...?" 
"आपल्या पायाचा चिखल साफ करत आहे काका..." मोठ्या मासुमपणाने त्या छोट्या मुलाने उत्तर दिल... त्याचा आवाज आणि बोलण्यावरून त्यांना वाटल नव्हत कि त्याच वाह ४ वर्षाहून जास्त असेल... शक्यतो त्याच्या देहावरून त्यांनी तो ७-८ वर्षाचा असेल असा अनुमान लावला होता...

"ईथे कोणी नीरु राहते का...? सांगू शकतो तीच घर कोणत आहे...?" रोहनच हृदय धडधडत होत... इकडे तर सगळ अजीबच वाटत होत... त्याला तिथून लवकर निघण्यामध्येच समजदारी समजली...
मुलाने आपल बोट दाखवून त्या दिव्याकडे इशारा केला..., "तिकडे..! आम्ही सगळे तिकडेच राहतो... त्या वाड्यामध्ये...!"

"म्हणजे... म्हणजे... तू... तुझी कोण लागते का ती....?" रोहनला राहून राहून झटके लागत होते...

"पण त्या 'वड्याचा' रस्ता कुठून आहे.. आम्ही तर शोधून शोधून थकलो.. आणि तू अजून घरी का नाही गेलास... इकडे काय करतोयस...?" नितीनने त्या छोट्या मुलाला प्रश्न केला...

"मी हरवलोय काका... मलाही रस्ता मिळत नाही... एवढ्या दिवसापासून शोधतोय..." मुलाने तेवढ्याच मासुमपणाने उत्तर दिलं...

"क्क...किती दिवसांपासून...?" त्या मुलाच्या प्रत्येक उत्तराबरोबर त्या दोघांच्या हृदयाचा ठोक्यांच वेग वाढत होता...
 
"७४ वर्षापासून...?" 
"पळ नितीन पळ... आपण फसलोय... नाहीतर आपण मारले जावू..." रोहनने नितीनचा पळण्यासाठी हाथ खेचला.. पण कोण जाणे कशासाठी नितीन तिथून हलला नाही.. कारण उत्सुकतेमुळे, "कशाला... मस्करी करतोयस मित्रा...? कशाला खोट बोलतोयस..?

मुलग्याच्या चेहऱ्यावर ह्यावेळी आश्चर्य आणि वर्षापासूनची तडप दिसून येत होती, "मी मस्करी कशाला करू काका...? मेलेली माणस खोट बोलत नाहीत...!"

रोहनची तिथेच उभ्या उभ्या बोलती बंद झाली... ज्या प्रकारची चित्रविचित्र परिस्थिती तिकडे निर्माण होत होती, ज्याप्रकारे तो मुलगा त्यांना मिळाला आणि जे काही तो बोलला... त्यामुळे त्या दोघांच हृदय बाहेर येण्याची वेळ आली होती. रोहनला जाणवत होत कि त्याने इथे येवून किती मोठी चूक केली होती ती.. तो तिथून पळून जाण्याच्या विचारात होता, पण नितीनला सोडून तो कसा पळणार... तो बस नितीनच्या इशाऱ्याची वाट बघत होता, ज्याने घाबरून आपली बंदूक त्या मुलग्यावर ताणून बोलला, "चालता हो ईथून..?"

"काय काका...?" त्या मुलाच्या चेहऱ्यावर भोलापण जास्त जाणवत होत...

"पळून जा ईथून...! पळ चल..."

"पण मला एकदा घरी सोडून याना... मला घर नाही सापडत आहे...!" त्या मुलाने त्यांच्याजवळ प्राथना केली...

पण त्या मुलाचा आवाजच असा होता कि जो त्यांना त्यांच्या पायावर त्यांना तिथे उभ राहायचं साहस देत होता... पण पुढे जाण्याचा विचारच त्यांच्या डोक्यात येत नव्हता... नितीनने रोहनकडे पाहिले आणि दोघे उलटे पाय परत फिरले... काही अंतर असाच सावधानिपुर्वक मागे बघत बघत, जोपर्यंत ते त्या मुलाच्या दृष्टीआड झाले तेव्हा, रोहनच्या गळ्यातून आवाज आला, "रस्ता तर माहित आहेना मित्रा...?" 
क्रमश.....

Previous Chapter                           Next Chapter

1 comments:

  1. hey...bro nice story yaar.please cont.

    ReplyDelete