Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Saturday, 25 June 2011

भाग ~ ~ ४ एक प्रेम कथा

"तुमच्या पायामध्ये हा जो चिकट चीखळ लागला आहे न... त्याच्यामुळे विचारलं... हे त्या तिथल्याच वाड्याजवळचा चीखळ आहे...!" म्हातारा त्यांना बोलला...

दोघांनी जस खाली बघून सांगितलं..."हा पण...?"

"
तुम्ही त्या खुनी तलावाच्या जवळून गेला होतात न मुलांनो... या... आतमध्ये या...!" म्हातारा बोलून मागे घरात जाण्यासाठी वळला...

"
नाही.... धन्यवाद...ते... आम्हाला बस.. हेच विचारायचे होते कि... ईथे कोणी गाडी दुरुस्त करणारा आहे का... आमची गाडी..." रोहनसाठी एकक्षण पण थांबण्यासाठी मुश्कील होत होत...

"
हा हा हा हा .. या ... या आतमध्ये या...!" म्हाताऱ्याने मोठ्या प्रेमाने रोहनचा हाथ पकडला आणि हळूच आतमध्ये खेचला... रोहनला प्रतिरोध करायची क्षमताच उरली नव्हती... तो त्यांच्या बरोबर आत घुसला...

आता नितीनकडेपण कुठलाच पर्याय उरला नव्हता... रोहनला असा सोडून पळून कसा जाणार...? नाहीतरी त्याचीपण हालत खराब झाली होती.. तोपण त्यांच्यापाठोपाठ आतमध्ये शिरला..

"
या बसा...! ईथे या... अरे लाजत का आहात...? या बसा ना...!" म्हाताऱ्याने त्यांना एका खोलीत घेवून जावून पूर्ण हट्ट करून ते त्यांना एक जागी बसायला सांगत होते... पण साधेपण्यापाठी लपलेली एक भायवहता त्यांनी एक तासभर पहिले जाणवली होती... त्यामुळे त्या दोघांच्या मनामध्ये एक चलबिचल चालू होती... दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि पूर्ण सावधानतिने ते एका दिवाळाला लागून असणाऱ्या एका पलंगावर बसले... त्यांच्यापाठी एक सपाट दिवाळ होती.. ते तिथे ह्यामुळे बसले कि जेणेकरून त्या झोपडीत होणाऱ्या सगळ्या हालचालींवर नजर ठेवू शकू...

"
श्रुती बेटा... जरा पाणी वैगेरे घेवून ये... एवढा वेळ कशाला लावते आहेस...?" म्हाताऱ्याने त्या दोघांच्या समोर बसत आवाज दिला...

"
आली बाबा...!" आतून तोच गोड आवाज त्यांच्या कानात पडला...

"
तर... तिथे काय करायला गेला होतात तुम्ही लोक...? शहरातले वाटता...!" म्हाताऱ्याने मोठ्या आनंदाने त्यांना विचारले...

"
खरतर... आम्ही रस्ता भटकलोय...!" नितीन त्या गोष्टीला गोलगोल करून बोलला... हे त्यांना कधीच सांगायचं नव्हत कि ते एका मुलीच्या शोधात तिथे आपली आई घालायला गेले होते ते...

"
हं.... तुम्ही दोघेच गेला होता कि अजून कोणी राहिलं तिथे...?" म्हाताऱ्याने आश्चर्याने त्यांना विचारले...

"
म्हणजे काय...? आम्ही दोघेच होतो बस...!" आतापण नितीननेच उत्तर दिलं... रोहन तर चुपचाप त्यांच बोलण ऐकत होता... तो ह्याच विचारात होता कि ईथून सटकायचे कसं...

"
बर झालं... दोघे व्यवस्थित परत आलात ते...!" म्हाताऱ्याने दिर्घश्वास घेत आपली विडी जळवली, "पिता काय...?" बोलत म्हाताऱ्याने विडीचा बंडल त्यांच्या पुढे केला...

"
नाही... धन्यवाद...!" नितीनने नम्र होवून नकार दिला...

तेव्हा रोहन एकदम अचानक आश्चर्याने त्या पलंगावरून उठला, "नीरु.......?"

क्रमश....

Previous Chapter                                          Next Chapter

0 comments:

Post a Comment