Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Tuesday, 28 June 2011

भाग ~ ~ ५ एक प्रेम कथा


नितीनने आश्चर्यचकित होवून पहिले रोहनकडे पाहिले आणि मग त्याच्या नजरेचा पाठलाग करत त्याची पण नजर दरवाज्यावर अडकली...

"
काय झालं बेटा... ? तू उभा का झालास...?" म्हतार्यानेपण रोहनला बोलता बोलता दरवाज्याकडे बघितलं, "हि माझी मुलगी आहे... श्रुती... ये बेटा..."

रोहनचा जणू श्वासच अटकला होता... दरवाज्यामधून येणारी मुलगी निरुच तर होती... तीच नीरु जिच्यामुळे रोहन वेडा झाला होता... सुंदरताच एक अदभूत उदाहरण होती ती डोक्यापासून पायापर्यंत, सुडोल उंच शरीर, गोलाकार चेहरा, डोळे एकदम काळे... हलका गुलाबीपण घेवून रसिले तिचे होठ... आणि... काय सांगू तुम्हाला अप्सरेसारख सौंदर्य दिसत होत... तिच्या साधेपणातून आणि तिच्या भोलेपणातून, तिच्या लाजरेपणातून, तिच्या प्रत्येक अदातून सौंदर्य प्रतीत होत होतं....

एकदाही आपली नजर न वर बघता तिने पाण्याचा ग्लास टेबलवर ठेवला आणि परत निघाली...

"
मुली... जेवण बनव... काय माहित कधीपासून भुके असतील बेचारे...!"

"
हा बाबा, मी भाजी शिजवत ठेवली आहे.." डोळ्यांच्या पापण्या खाली ठेवतच वळून तिने आपल्या लाजणाऱ्या होठांनी बोलली आणि बाहेर निघून गेली...

"
नाही... आम्हला भूक नाही आहे... आम्ही बस निघतो आता... तुम्ही फक्त कोणत्यातरी गाडी बनवनाऱ्याचा घर सांगा..." नितीन उभा राहत बोलला... खरतर रोहनला आश्चर्यचकित बघत नितीनच्या मनात अनेक प्रश्न उभे राहत होते... आणि त्याला लवकरात लवकर सगळ व्यवस्थित करायचं होतं...

"
नाही.. असं कसं जावू देवू तुम्हाला..? हि पण काय जायची वेळ आहे.. आणि ह्या गावात कोणीच गाडी दुरुस्त करणारा नाही आहे.. आता आरामात जेवून झोपून जा... सकाळी बघून घ्या काय करायचे आहे ते..." म्हाताऱ्याने परत नितीनचा हाथ पकडून त्याला खाली पलंगावर बसवलं...

नितीनने रोहनकडे बघितले... त्याच्या डोळ्यामधील चमक सांगत होती कि त्याला त्याची मंजिल मिळाली आहे..

"
ठीक आहे काका... आता तुम्ही एवढा आग्रह करत आहात तर... तुमच मोठ उपकार असतील आमच्यावर..." रोहनला तर त्याच एक कार्य पूर्ण झाल्यासारखं वाटलं...

"
ह्याच्यात उपकाराची वार्ता कुठे आहे बेटा...! माणूसच माणसाच्या कामाला येतो... आणि आपल्या देशात तर 'अथिती देवो भवः' आहे. कुठल्याच गोष्टीची चिंता करू नका... हे आपलच घर समझा...!" म्हाताऱ्याने मोठ्या मानाने हसत त्यांना सांगितलं...

म्हाताऱ्याच्या बोलण्याने त्यांना सांत्वना दिली... कमीत कमी इथेतरी अजूनपर्यंत तसं झालं नाही, ज्यामुळे त्यांना इथेपण काही चित्रविचित्र होण्याची भीती नव्हती...

अरे काका... ह्या खुनी तलावाचं काय चक्कर आहे...? नितीनने अडखळत विचारलं...

क्रमश....

Previous Chapter                                              Next Chapter

3 comments:

  1. good going . keep it up ...

    ReplyDelete
  2. nice story santosh... keep it up... please post another parts of the story...

    ReplyDelete
  3. khup chan story aahe... pudhacha part kadhi yenar...

    ReplyDelete