Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Thursday, 30 June 2011

भाग ~ ~ ६ एक प्रेम कथानितीनच्या वाक्याबरोबर म्हतारयाचे डोळे भूतकाळातील गोष्टी आठऊ लागले, "त्या गोष्टीबद्दल गावातील माणस कोणाला काही बोलत नाही पोरा... फक्त एवढे लक्षात ठेव कि पुन्हा कधी त्या तलावाकडे चुकून सुद्धा जाऊ नका... आणि कोणाला या गोष्टीबद्दल सांगू नका... तुम्ही सही सलामत परत आलात, यासाठी देवाला धन्यवाद द्या...!"


"
आम्ही कोणाला सांगणार नाही... पण सांगायला काय हरकत आहे...? काही तरी सांगा...!" नितीन आणि रोहन दोघेही काही सांगायला तयार झालेल्या म्हाताऱ्याकडे पाहू लागले...

"
हं... कोणाला पण चुकूनसुद्धा सांगू नका... माझ्या आधीच्या काळाची माणस बोलायची कि जुन्या वाड्यातील लोकं बाहेरच्या माणसांचा तिरस्कार करायचे... एकेकाळी कोणी इंग्रज तुमच्यासारखा रस्ता विसरून तिकडे गेला होता... आणि सकाळी त्याची लाश तलावाच्या किनारी सापडलेली... एवढे मोठे मोठे किडे त्याच्या अंगावर फिरत होते, आणि त्याच अर्ध शरीरही खाऊन टाकल होतं... म्हाताऱ्याने किड्यांची लांबी दाखवण्यासाठी आपल्या बोटांना लांब लांब केल... त्या देहाच डोक तर गायबच झालं होतं... त्याच पोट फाडून टाकल होतं... आणि हृदय छातीतून बाहेर आलं होतं.. झालं मग काय... त्याच्या मृत्यूच कारण समजण्यासाठी इंग्रजांनी तिकडे ठाण मांडला... खूप प्रयत्न केले पण त्यांना काहीच समजल नाही, पण त्यानंतर खूप खून झाले... पण सर्वच्या सर्व बाहेरच्या माणसांचे... म्हणून आम्ही कोणाला काही सांगत नाही... शिकलेली.. माणस ह्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही... आणि कोणी तिकडे, तिकडच रहस्य उलगडायला जायचा आणि फुकटचा मारला जायचा... काय फायदा...? म्हणून आम्ही कोणाला काहीच सांगत नाही..." एवढं बोलून तो म्हातारा गप्प झाला...

आम्ही अशी चुकी करणार नाही काका... कोणाला यातल काहीही सांगणार नाही... आणि सांगा ना... आणखी काय आहे तिकडे...? आणि तो खुनी तलाव...? नितीनची उत्सुकता वाढत जात होती...

"
तुम्ही आता ऐकल्याशिवाय मला सोडणार नाही... खरतर तो तलाव खूप जुना आहे हजार वर्षांपूर्वीचा... त्या तलावाचं पाणी कधी जास्त सुकत नाही... पण तुमच्यासारखे जे कोणी जिवंत येतात... ते सांगतात कि रात्री त्या तलावाचं पाणी लाल लाल होतं एकदम रक्तासारख... म्हणून आम्ही त्याला खुनी तलाव म्हणतो... आत्मांच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी आम्ही सर्व गावातील माणसे तेथील पिंपळाच्या झाडाची पूजा करतो... बघणारे म्हणतात कि रात्रीपर्यंत त्या झाडावर प्रकाश दिसतो पण रात्री त्या झाडापर्यंत कोणी पोहचू शकला नाही.. पण जो कोणी तिथे पोहचला... नक्की मेला असेल... मी असं ऐकल आहे कि तिकडे एका छोट्या मुलाची आत्मापण भटकत असते..."

"
हा..." रोहन त्या मुलाबद्दल बोलणारच होता कि तेवढ्यात नितीनने त्याचा हाथ दाबला... आणि तेवढ्यात त्याने आपल वाक्य बदललं, ".... आत्मा असतात.. मी पण ऐकलं आहे...!"

"
ऐकलं काय आहे मुला... गावातल्या लोकांनी तर त्या मुलाला बघितल हि आहे... असं सांगतात कि तो छोटा मुलगा तिथे येणाऱ्या माणसाला त्याच्या घरी सोडायला सांगतो.. पिंपळाच्या झाडावर..."

"
पण ते सर्व आत्मा कोण आहेत...? आणि बाहेरच्या माणसांचा का तिरस्कार करतात...?" म्हाताऱ्याच्या प्रत्येक उत्तराबरोबर नितीनची उत्सुकता वाढतच जात होती... सर्वकाही जाणून घेण्यासाठी.. खर तर तो आत्मा वैगेरे या गोष्टींवर विश्वास ठेवत नसे.. पण आज रात्रीचा अनुभव त्यांना त्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यास परावृत्त करत होते...

"
आता खरं काय ते देवच जाणत असेल... मुला आमच्याकडे तर फक्त ऐकलेल्या कहाण्या आहेत... सांगतात कि त्या पिंपळाच्या झाडाच्या जागी पहिलं कोणत्यातरी राजाचं राजमहाल होतं... तीन राण्या होत्या त्याच्या तिन्ही खूप सुंदर होत्या... पण एकेदिवशी एका मुगल राजाने त्या राजाला हरवून राण्यांच्या समोर त्या राजावरती हत्ती चालवून त्याला मारून टाकलं आणि त्याच्या महालाला आपले बनवून टाकले आणि तिन्ही राण्यांबरोबर सर्व बायकांना आपल्या बंदिवासात ठेवल... जे काही तो त्या राण्या आणि अन्य बायकांबरोबर करायचा ते सांगण्याच्या लायकीच नाही आहे... तुम्ही माझ्या मुलासारखे आहात... पण हा प्रत्येक सकाळी त्या महालातून एक अर्थी उठायची... हे सगळं तेव्हापर्यंत चालू होतं जोपर्यंत महालातील सर्व बायका संपत नाहीत... सांगतात कि या सर्व आत्मा त्या राजा आणि राण्यांच्या आहेत..."

ओह...! नितीन आपली प्रतिक्रिया व्यक्त करत बोलला...

क्रमश....

Previous Chapter                                      Next Chapter

1 comments: