Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Tuesday, 21 June 2011

भाग ~ ~ १ एक प्रेम कथाUpdate 1"अरे हे काय होत...?" रोहन अचानक आजूबाजूच्या घनदाट जंगलातून त्याच्याकडे येणाऱ्या जनावराला बघून लगेच घाबरून बाजूला झाला. जनावराने एकदम त्याच्यावरती उडी मारली, क्षणभर त्यांना वाटले कि त्या जनावराने त्यांच्यावरती हल्ला करायचा प्रयत्न केला ..."तू त्याचे दात बघितले का रे...?" नितीन बोलला.
जवळ जवळ १० - १० फुटांच्या लांब लांब उड्या मारून ते जनावर त्या ओबडधोबड रस्त्यावरून त्या घनदाट जंगलातून गायब झाला.


दोघेहि दोन मिनिट स्तब्ध तिथेच उभे राहून त्या विचित्र जनावराकडे तो जनावर नजरेआड होई पर्यंत पाहत राहिले... आणि पुन्हा आपल्या अनोळखी रस्त्यावर चालत राहिले...


उफ.... कुठे घेवून आलास यार...? किती शांतता आहे इथे...? इथे तर माणसाची जाताच दिसत नाही आहे... इथे सगळ किती विचित्र वाटतंय... तुला वाटत तुझी नीरु इथे भेटेल तुला. मला वाटत तुला कोणीतरी येडा बनवलाय... कशाला खाली फुकट तुझी आणि माझी रात्र वाया घालवतोय... चल परत जावूया... मला तर जाम भीती वाटते इथे... एवढ बोलून नितीनने सावधगीरीसाठी बंदूक काढून हातात घेतली.


"
अस नाही आहे यार... ती इथेच राहते... आजूबाजूला, बघ जरा...! प्रयत्न केल तर ती आपल्याला जरूर भेटेल... ती जर नाही भेटली तर मी पागल होणार... यार!" रोहन पुढे चालता चालता बोलत होता...


नितीन पुढे पुढे भरपूर सावध होवून चालत होता... सावध होणे स्वाभाविकच होत... ज्या टाईमाला ते दोघे तिथे होते, त्या ठिकाणी आजूबाजूला कोणताच शहर किंवा गाव नव्हतच... सगळीकडे भयानक अस वातावरण पसरल होत... आवाज येत होता फक्त बेडकांच्या ओरडण्याचा, आणि राहून राहून झाडीमधून सरपटणाऱ्या प्राण्यांचा... लांब लांब तर कृत्रिम प्रकाशाचा पण नामोनिशाण नव्हत... बस अर्धा चंद्र आणि लुकलुकणाऱ्या ताऱ्यांचा हलका फुलका प्रकाश येत होता, जो त्यांना रस्ता दाखवत होता... रस्ता पण एवढा खराब होता कि कुठे उंच तर कुठे खाली.. मध्ये मध्ये तर खोल खड्डे होते.. ते खड्डे एवढे खोल होते कि, जर बघून नाही चालल तर एक माणूस त्याच्यामध्ये गायब होवू शकतो... दोन्ही बाजूला - फुट उंच झाड होती...


"
आता जर रस्ता चांगला असता तर गाडी घेवून आलो असतो... तुला काय वाटत..? इथे कोणी माणूस नावाचा प्राणी राहत असेल.. आणि ती पण मुलगी... खर बोल, तुला पण भीती वाटते ना, इथल वातावरण बघून..." नितीनने चालता चालता रोहनला विचारले...


"
भीती वाटते म्हणून तर तुला सोबत आणलं... नाही तर मी एकटाच आलो नसतो का..." रोहनने बोलला... आणि अचानक दचकला, "नितीन बघ... पुढे रस्ता चांगला दिसतोय... मी नाही बोलत होतो.. आपण जरूर यशस्वी होवू... पुढे नक्की कोणत तरी गांव असणार... बघच...!"


"
अरे साल्या.... तिच्याकडे कोणतातरी चांगला रस्ता विचारला असता तर तू... ती लोकपण कुठेतरी बाहेर जात असतील...?" नितीनला पण पहिल्या रस्तापेक्षा आत्ताचा रस्ता चांगला वाटला आणि तो फटाफट चालू लागला.


"
यार, काय करू, हा एकच रस्ता तिने सांगितला...!" रोहनहि नितीन सारखा फटाफट चालू लागला.


"
विचित्रच प्रेयसी आहे रे तुझी... एक तर रात्री भेटायची जिद्द करते आणि वरून रस्ता पण असा सांगितला... चल बघ, अस वाटत आपण पोहोचणारच आहोत... बघ तिकडे प्रकाश दिसतोय..." नितीनने आपला उजवा हाथ तिथे दाखवून इशारा केला.


दोघेही उजवीकडे वळले होते कि अचानक थांबले..., "इथे तर पाणी आहे.. यार...!" रोहन आपला पाय पाठी घेत म्हणाला...


"
हा... कोणतातरी तलाव वाटत... चल... पुढे रस्ता असेल...!" नितीनने रोहनला सांगितलं आणि दोघेही परत रस्त्यावर चालायला लागले...


काही अंतर पुढे गेल्यावर... त्यांना एक उजवीकडे जाणारी पायवाट दिसली, ती बघून दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं आणि ते दोघे त्या पायवाटकडे निघाले...


"
अरे च्या आईला ... इथे तर चीखळ आहे...! चल परत चल... हा रस्ता नाही आहे..." मनामध्ये नितीन त्या मुलीला शिव्या देत होता... जिच्या प्रेमामध्ये पागल रोहन त्याच्याबरोबर त्याचीपण वाट लावत होता...


"
यार, अर्ध्या रस्त्यावर तर आलोच आहोत... पुढे तलावामध्ये पाय धुवूया... आता तो प्रकाशपण जवळच दिसतोय..." रोहन नाराजीने नितीनकडे बघत म्हणाला...


"
चल साल्या... जर तरीपण ती मुलगी नाही भेटली तर बघच... असलं घाणेरड ठिकाण मी आजपर्यंत नाही पाहिलं..." बडबडत नितीन पुन्हा रोहनच्या पुढे पुढे चालत राहिला...


क्रमश...
0 comments:

Post a Comment