Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Friday, 1 July 2011

भाग ~ ~ ७ एक प्रेम कथाते तिघेजण बोलत होते.. तेवढ्यात श्रुती जेवण घेवून आली आणि ते टेबलवर ठेवू लागली.. रोहन सारखा तिच्या डोळ्यांकडेच बघत होता, जेणेकरून ती त्याच्याकडे बघेल आणि तिच्या डोळ्यात स्वतःसाठी आपलेपणा शोधत होता... पण त्याच्या दुर्भाग्यामुळे अस काही झालं नाही... श्रुती तर मान वर करून बघत सुद्धा नाही... ती जेवण टेबलावर ठेवून म्हणाली तुमच्यासाठी पण घेवून येवू का बाबा...? तिच्या आवाजात एवढी गोडी होती कि रोहन तिच्या तोंडून आपलं नाव ऐकण्यास व्याकूळ झाला होता... जर तिचे वडील तिथे नसले असते तर त्याने कधीच आपली इच्छा पूर्ण केली असती...

"
नको बेटा... आता थोड्या वेळापूर्वीच तर जेवलो होतो.. तू जा... जावून झोप आता... मी येतो थोड्या वेळात..."

"
ठीक आहे बाबा... मी कडी लावत नाही.. तुम्ही येवून नंतर दार बंद करा..." श्रुतीने आपल्या वडिलांकडे बघून सांगितलं आणि मग पुन्हा पाठी फिरली...

"
तुमच्या घरी अजून कोण कोण राहतात काका...?" रोहनचा इंटरेस्ट फक्त नीरु बद्दल जाणून घेण्याचाच होता...

"
बस आम्ही दोघे जणच राहतो बेटा... माझी बायको... हिला जन्म देताच देवाघरी गेली... मग अजून कोणी मुलं नाही... काही दिवसानंतर मी एकटाच राहून जाईन..." म्हाताऱ्याने उत्तर दिलं...

"
ते का...?" जेवता जेवता रोहनने म्हाताऱ्याकडे बघून विचारलं....

"
लग्न नाही का करायचे आहे तिचं... मुलगी तर..." बस म्हातारा एवढच बोलला...

चपातीचा तुकडा रोहनच्या गळ्यात अटकला, "केव्हा.... केव्हा करणार आहात तिचं लग्न...?"

आत्ता तर हि नाही बोलत आहे... म्हणते कि आता शिक्षण पूर्ण करणार मगच विचार करेन... नादान आणि भोळी आहे... पण जीद्दीपण खूप आहे जे मनात ठानल ते ठानल... मग ती कोणाचही ऐकत नाही...

"
ओह..." रोहनच्या जीवात जीव आला... पहिलं त्याला वाटलं कि तिचं लग्न वैगेरे पक्क तर झालं नसेल ना...

जेवण झाल्यावर म्हाताऱ्याने भांडी उचलली आणि त्यांना आपण सकाळी भेटूया बोलून निघून गेला...

म्हातारा गेल्यानंतर रोहनने नितीनकडे बघत बोलला, "काय...? कशी वाटली...?"

"
हिच आहे ती...?" नितीनला शंशय तर आला होताच.. पण त्याहीपेक्षा त्याला आश्चर्य वाटत होतं....

रोहन एकदम आनंदित होवून गेला... आणि एका वेगळ्या विचारात तो बिछान्यावर आडवा झाला...

"
पण... हीच नाव तर श्रुती आहे तू तर नीरु म्हणत होतास...?" नितीनने दुसरा प्रश्न विचारला...

"
नावात काय ठेवलं आहे यार... फक्त एवढ लक्षात ठेव, जिच्यासाठी मी आलो होतो... ती मला भेटली आहे... मी तुझ्या उपकाराची परतफेड कधीच करू शकणार नाही... मी नाही सांगायचो... माझी नीरु मला नक्की भेटेल..." रोहनवर प्रेमाचं भूतस्वार झालेलं...

"
अरे साल्या... तिने तर तुला बघितलं हि नाही आणि तू असा उड्या मारतो आहेस... तुला ती विसरली तर नाही ना.. किती दिवस आधी भेटली होती...?" नितीन उठून बसला..

"
ते सगळ मी तुला नंतर सांगतो... पण तू हे तर सांग कि कशी वाटली तुला...?"

"
भरपूर सुंदर आहे... खरं सांगू तर... हिच्यासारखी मुलगी मी अजून पाहिली नाही... जर हि नीरु नसती तर मी विचार केला असता माझ्यासाठी... आणि आता पण काय माहित... कि हि श्रुतीच आहे... तुझ्या निरुची हमशकल... तुझी निरुतर तुला तिथेच भेटेल... त्या जुन्या वाड्याजवळ... हे हे हे..." नितीन हसत म्हणाला...

"
अरे असं नको बोलूस यार... मला बरं नाही वाटत..." रोहन उदास होवून बोलला...

"
मस्करी करतोय यार... पण एक गोष्ट मला समजली नाही...!" नितीनला अचानक काही सुचलं...

"
ती कोणती...?" रोहन पण उठून बसला...

"
हिने तुला तिथे कशाला बोलावलं...? आणि बोलावलं तरी तिथे भेटली पाहिजे होती... आता कोणाला माहित होत कि आपल्या गाडीच्या चाकांची हवा जाणार आणि आपण परत येवून ह्याच घराचा दरवाजा ठोकणार ते... जर आपण सिधा निघून गेलो असतो तर थोडेही ईथे परत कधी आलो असतो...." नितीन विचार करत बोलला...

"
हा यार.. ते तर आहे... जेव्हा मी तिच्या बरोबर बोलेल तेव्हा जरूर हि गोष्ट तिला विचारणार.." रोहन बोलला...

"
आता तरी सांग कि हि तुला कोठे भेटली...? कशी भेटली... आणि कशी पटली...?" नितीन हे सगळ ऐकण्यासाठी उत्सुक होता...

"
एकदा मला तिच्या बरोबर बोलू दे... तेव्हा सगळ सांगेन.. आमच भेटण काकांच्या (म्हाताऱ्याच्या) गोष्टीवाणी कमी नाही काय.. मला माझ्या स्वतःवर विश्वास नव्हता कि मी तिला भेटेन.."

"
आता सांग ना... आता काय अडचण आहे...?" नितीनने आता त्याला विनंती केली...

"
नाही... आता नाही.. खूप वेगळी गोष्ट आहे हि... पण आता काहीच सांगू शकत नाही.. पहिले हिच्याबरोबर बोलून तर दे एकदा...!" रोहन बोलला आणि परत झोपला, "चल आता झोपून जावूया.. सकाळी लवकर उठायचे आहे...!"

"
ठीक आहे बेटा.. लोकं काम झाल्यावर किती मतलबी होतात ते.. हे मी पाहतोय... चल ठीक आहे... मी वाट बघेन, तुझी तिच्याबरोबर बोलण्याची... शुभ रात्री...!"

"
हा शुभ रात्री... यार. .. शुभ रात्री...!" रोहन बोलला आणि उशी आपल्या छातीवर ठेवली आणि झोपला... त्याच मन अधीर झालं होतं कि कधी मी एकदा तिच्या बरोबर बोलतोय...

क्रमश....

Previous Chapter                                             Next Chapter

1 comments: