Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Sunday, 3 July 2011

भाग ~ ~ ८ एक प्रेम कथारात्रीचे ठीक २ वाजून १७ मिनिट... रोहन दरवाज्याबाहेर पावलांचा आवाज ऐकून एकदम दचकला... त्याच्या स्वप्नाला पंखपण लागले नव्हते कि खोलीत प्रकाश पसरला.. थोड्याश्या नाराजीने नीरु त्याच्या डोळ्यामध्ये बघू लागली.. आणि हळू हळू चालत ती त्याच्या पायाच्या शेजारी पलंगावर येवून बसली...
 
"हा कोण आहे...?" निरुने हळू आवाजात नितीनकडे इशारा केला आणि विचारले...
 
"माझा मित्र... तो माझ्या भावासारखा आहे... का...?" रोहनने उत्तर दिलं...
 
"ह्याला... कशाला आणलं...? मी तर एकट यायला सांगितलं होतं...?" अजूनपर्यंत राग निरूच्या नाकावरती होता...
 
"कमाल करतेस तू पण...? एवढ्या खतरनाक जागेवर एकट... जीव घेण्याचा विचार होता काय...?" रोहनने ते दृश्य आठवून उत्तर दिलं...
 
"जिव तर मी तुझा घेणारच... वेळ येऊदे एकदा..." एवढ बोलून नीरु कातील अदाने हसायला लागली... तिच्या ह्याच अदाचा रोहन दिवाना होता, "चल ठीक आहे... तुझी हि गोष्ट स्वीकार करते... ह्याला घेवून ये... पण ह्याला लांबच उभा कर... मला तुझ्याबरोबर महत्वाच काही तरी बोलायचं आहे... माहितेय केव्हापासून तुझी वाट बघते आहे... तुला तर त्याची जाणीवपण नसेल, माझ्या प्रेमाची..."
 
"तुझी हीच गोष्ट तर मला समजत नाही... बोलतेस कि माझ्यावर प्रेम करतेस... पण आजपर्यंत एकदापण तू मला तुझ्या बाहुपाशात घेतले आहेस का... प्लीज एकदा मला तुझ्या बाहुपाशात येऊदे ना..." रोहन रोमांचित होवून बोलला...
 
"मीपण तर तेवढीच तडपतेय देव...! तुला काय माहित, माझं एक एक क्षण कसं निघत... हे आपलं अंतर किती तडपवतय, माझ्यापेक्षा जास्त कोण समजणार... बस वाट बघा..." निरूच्या डोळ्यामध्ये त्याच्यासाठी खूप प्रेम दिसत होत..
.
"किती वेळा सांगू कि मी रोहन आहे... जर कुठल्या देवच्या धोक्यामुळे तू माझ्यापाठी पडली आहेस तर मला माफ कर... तरीपण मी एवढच सांगू शकतो कि मी तुझाविना जिवंत राहूच शकत नाही.. तुझ्या प्रेमामध्ये तु मला पागल करून टाकलाय..."
 
"दुनियासाठी तू कोणपण असो... पण माझ्यासाठी तू फक्त देव आहेस... मला तुझं हेच नाव चांगलं वाटत.. मी तर तेच बोलणार..." डोळ्यामध्ये एक मादकपणा घेवून नीरु त्याच्याकडे एकटक बघत होती...
 
"तू मला पूर्ण पागल करून टाकणार आहेस... मी रोहनला तू देव बोलतेस आणि स्वतःच नाव नीरु सांगतेस परुंतु तुझे वडील तुला श्रुती म्हणून बोलावतात...मी काय समजू आणि काय नाही..." रोहन नावांच्या चक्करमधून अजूनपर्यंत बाहेर निघाला नव्हता...
 
"तिथे येशील तेव्हा सगळ समजून जाशील... आता मी तुला ईथे काय सांगू...?" नीरु जरा उदास होवून त्याच्याकडे बघत बोलली...
 
"विचित्र मुलगी आहे... ईथे माझ्यासमोर बसली आहे... त्यावेळी तर माझ्याकडे नजर वर करून पण बघितलं नाहीस... आणि आता हि एवढ्या छोट्या गोष्टीसाठी मला तिथे बोलावतेय... एवढी खतरनाक आणि भयानक जागा मी आजपर्यंत बघितली नाही... माहिती आहे का तुला...?" रोहनला त्या भयानक चित्रविचित्र जाग्याची आठवण आली....
 
"काय...? तू तिथे गेला होतास...?" पण मी तुला १२ वाजल्यानंतर बोलावलं होत ना.. तू थांबला का नाहीस तिथे..." नीरु अधीर होत बोलली...
 
"कसं थांबणार... जेव्हा आम्ही तिथे गेलो होतो तेव्हा आम्हाला तिथे एक छोटा मुलगा भेटला... किती भयानक वेळ होती ती माझातर जीवच गेला असता... आणि तुला माहित आहे... तिथे भूतांच वास्तव्य आहे... तुझ्या बाबांनीच सांगितलं..." रोहन स्पष्टपणे बोलला...
 
"त्यांना भूत म्हणून त्यांची मस्करी नको उडवू देव... तुला आम्ही... आणि आमच्या वेदनांची जाणीव नाही आहे... प्रत्येक वेळी कोणत्यातरी वेदना आणि दुख आम्ही सहन करत असतो... हे तुला काय माहित.. तू तर आजाद आहेस... कुठे पण जावू शकतोस... पण ते लोक एक प्रकारच्या बंधनामध्ये बांधलेले असतात... प्रत्येकवेळी तोच भयानक प्रसंग त्यांच्या डोळ्यात येत असतो ज्यावेळी देवाने पण त्यांच्या डोक्यावरून आपला हाथ मागे घेतला होता... ते प्रत्येकवेळी ह्याच विश्वासात असतात कि एक एक दिवस कोण तरी येणार आणि त्यांना ह्या नरकातून मुक्ती देणार... ये ना देव... फक्त एकदा ये... मी प्रत्येकवेळी तुझीच वाट बघत असते... एकदा तिकडे ये.. मला त्या नरकातून काढून स्वर्गात घेवून चल" नीरु बोलता बोलता तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले..
.
"अशी काय करतेस मला हि तुझी बैचैणी बघवत नाही आहे... पण असं काय आहे जे तू ईथे सांगू शकत नाहीस.. तिथे जाण जरुरी आहे नीरु...?" 
"तिथे जाणे जरुरू नाही आहे देव.. पण मला भीती वाटते... मी जर तुला ईथे सगळे सांगितलं तर तू तिथे कधीच येणार नाही..." नीरुचे डोळे पाणावले होते...
 
"ह्याचा अर्थ तुला माझ्या प्रेमावर भरोसा नाही आहे... ह्याचा अर्थ असा आहे कि जरूर तू माझ्यापासून काहीतरी लपवते आहेस... जर तू माझ्यावर विश्वास नाही करत आहेस तर मी पण तुझ्यावर कसा काय विश्वास करणार...?" रोहन सगळी गोष्ट ऐकण्यासाठी आतुर झाला होता...
 
"तुझ्या आतल्या देव वर माझा पूर्ण विश्वास आहे.. पण बाहेरच्या रोहन वर माझा विश्वास नाही... ह्या दरम्यान तू किती वेळेला बदलला असशील.. मी ह्यामुळे घाबरत आहे ..." नीरु त्याच्या चेहऱ्याला आपला हाथ लावणार तेवढ्यात काही आठवल्यागत तिने लगेच हाथ मागे खेचला...
 
"बघ नीरु वा श्रुती, तू कोण पण असो... तुने मला तुझ्या प्रेमात पागल केलच आहेस... आता खरा पागल नाही होयचंय... जो पर्यंत तू मला खर काय आहे ते सांगत नाही, तो पर्यंत मी तिथे परत नाही जाणार... मुळीच नाही..." रोहन बोलला...
 
"असं का करतोयस देव... काय मी अशीच तडपत राहू...? तू माझी गोष्ट समजत का नाही आहेस... ये ना प्लीज..." नीरु विनवणी करत बोलली...
 
"मी तर सगळ समजतो आहे... जर मला समजत नसतं तर मी ईथेपर्यंत कशाला आलो असतो... चल ठीक आहे... मी तुला वचन देतो.. जर तू मला ईथे सगळ सांगत असशील तर मी तू बोलशील तिथे यायला तैयार आहे..." रोहन मोठ्या अत्माविशासाने बोलला...
 
काही वेळ विचार करत नीरु बोलली, "हे रोहनच वचन आहे कि देवच ..."
 
रोहन चिडत बोलला, "हे काय यार, देव... रोहन... दोघांच वचन आहे... देवच पण आणि रोहनच पण... आता तरी संग..."
 
"विचार कर... देवला जर फासावर जरी लटकवला तरी तो वचन तोडणारा नाही आहे..." नीरुला हायसं वाटल...
 
"ह्म्म्म... ठीक आहे... देवच वचनच समझ तू...!" रोहनने बोलून आपला हाथ नीरुच्या पुढे केला पण नीरु ने काहीच प्रतिक्रिया नाही केली..
 
नीरुने एक दीर्घश्वस सोडला आणि वर छताकडे बघत अचानक ती बोलायला लागली, "तो छोटा मुलगा... ज्याची तू वार्ता करत होतास... तो माझा छोटा भाऊ आहे..."
 
"काय....?" रोहन नीरुची हि गोष्ट पचवू शकला नाही आणि झोपेतच तो कापायला लागला... अचानक हडबडल्यागत जवळ जवळ जोरात ओरडत तो उठून बसला... त्याच्या ओरडण्यामुळे नितीन एका क्षणात उठून पलंगावर उभा राहिला, "काय झालं...?" 
"हा .. हा बल्ब कशाला बंद केलास... नीरु कुठे आहे..." रोहनला चक्कर येत होती... बंद डोळ्यामध्ये त्याला जिथे प्रकाशच प्रकाश दिसत होता... डोळे उघडताच... काळोखा शिवाय काहीच दिसत नव्हत... तिथे तर पहिल्या पासूनच अंधार होता... प्रकाश तर स्वप्नात नीरु सोबत घेवून आली होती...
क्रमश....

Previous Chapter                                          Next Chapter

1 comments:

  1. Waiting for the update sirji ..

    ReplyDelete