Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Tuesday, 20 September 2011

भाग ~ ~ ९ एक प्रेम कथा

एक प्रेम कथा

Update 9

"नीरु इथे..? साल्या तू पागल झाला आहेस काय...? स्वप्न बघत होतास कि..?" नितीन ने रोहन चे खांदे पकडून त्याला हलवत विचारल...

रोहन कसं बसं स्वतःला सांभाळून, "हा यार... स्वप्नच होत... मला माफ कर... झोपून जा..."

"आत्ता थोडी जी काही रात्र उरली आहे... त्याच्यामध्ये तरी चांगली झोप घेवू दे... काय झाल आहे तुला... सांगा ना... तू स्पष्ट खुलून का नाही सांगत आहेस...?" नितीन ने त्याच्या खांद्यावर हाथ ठेवून त्याला प्रेमाने विचारले...

"काही नाही यार... झोपून जा... सकाळी वार्ता करूया...!" एवढ बोलून रोहन ने अंगावरती चाधर घेवून झोपण्याचा प्रयत्न करू लागला.
 
"बघ... कुठली पण गोष्ट मनात ठेवली नाही पाहिजे... आणि मग माझ्यापासून हे सगळ लपवून तुला भेटणार तरी काय...? बाकी तुझी इच्छा... सकाळ ची वाट बघेन..." नितीन ने एवढे बोलून आपल्या डाव्या कुशीवर झोपून गेला.

रोहन ला काहीच समजत नव्हत... गेल्या काही २ महिन्यापासून त्याची रात्रीची झोप आणि दिवसाची चैन गायब झाली होती... कारण नीरुच होती... प्रत्येक रात्री ती त्याच्या स्वप्नात यायची आणि दिवस भर तो तिच्या स्वप्ना मध्येच मंत्रमुग्ध असायचा... त्याच जीवन कसं अचानक बदलून गेल होत... प्रत्येकवेळी आपल्या दुनियेत एकदम मस्त असणार रोहन सुरुवाती मध्ये तर तो ह्या स्वप्नांचा आनंद घ्यायचा आणि रात्री त्याला त्याच्याकडे बोलावणारी ती सुंदरीच्या आठवणीमध्ये दिवसभर मंत्रमुग्ध... नितीन जेपण सांगत होता ते सगळे खर होत... हीच मुलगी रोहन च्या स्वप्नात का येते... काय नातं आहे त्याच्याबरोबर.

आपल्या मस्त अंदाज चा मालिक रोहन त्यांच्या मित्रांमध्ये गप्पा गोष्टी आणि मुलींना भाव न देणारा अचानक असा कसा शांत शांत राहायला लागला आहे... 

नितीन त्याच्या सगळ्यात जवळचा मित्र मधला एक.... तो अनोळखी जाग्यावर जाणारा, फिरणारा आणि तिथली माहिती काढण्यासाठी शौकीन होता.. रोहन ने त्याला एक कहाणी सांगितली कि तो एका काही दिवसांपूर्वी भेटला होता आणि त्याला आता समझल कि ती मुलगी त्याच्यावर भरपूर प्रेम करते म्हणून ती त्याला भेटायला तिथे बोलवत आहे... पहिले तर नितीन ने साफ नकार दिला पण भरपूर दिवस त्याला रोहन चा उतरलेला चेहरा बघून वाईट वाटत होत म्हणून त्याने एक दिवस त्याला विचारले, "कुठे आहे ती मुलगी... चाल भेटून येवूया..."

"यार.. त्याचं घर गावापासून खूप दूर आहे..." रोहन बोलला...

"अच्छा... घाबरतोस तू... म्हणून मला बोललास... ना.. नाही तर तू मला सांगितलं पण नसत कि तू एका मुलीवर प्रेम करायला लागला आहेस..." नितीन बोलला...

"काही पण समझ यार... पण मला तिला एकदा भेटून यायचं आहे...!"

"चाल मग उद्या जावूया...!" नितीन तैयार झाला होता जाण्यासाठी...

आणि ती उद्या 'आज रात्रच' होती...

क्रमश....

Previous Chapter                                       Next Chapter

1 comments:

  1. very nice story vachta vachta asye vate ki mi suddha hya soricha ek bhag aahye pudhcha chapter lavkarat lavkar upload kara khup utsukta lagli aahye ki pudhye kai honar ..............................

    ReplyDelete