Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Saturday, 31 March 2012

भाग ~ ~ १० एक प्रेम कथा

एक प्रेम कथा

Update10


पण जे काही त्यांनी आज रात्री पहिले... त्यामुळे त्यांची व्याकुळता कमी होण्याऐवजी अजूनच वाढली होती... खास करून तेव्हा, जेव्हा त्याने आपल्या स्वप्नात येणारी मुलगी साक्षात आपल्या नजरेने पाहिली होती... श्रुतीच्या रूपाने... त्यावेळी तर त्यांना त्या जुन्या वाड्याच्या येथून परत येताना, ते असाच विचार करत होते कि हा आपल्या डोक्याचा काही भासच आहे... पण आत्ता, ते कधीच असा विचार करू शकत नाही... त्याच्या स्वप्नाची राणी साक्षात होवून त्याला भेटली होती... भले हि तिचा अंदाज कसा हि असो... भले हि तिचा नाव श्रुती असो... काही ना काही तरी कारण ह्याचापुढे जरूर आहे... ह्याच गावाची मुलगी त्याच्या स्वप्नात कशी येवू शकेल..

पण आत्ता... आज रात्रीच्या स्वप्नाबद्दल तो काय करेल... खरच जर 'नीरु' भूत असेल तर... तिने जुन्या वाड्या जवळ भेटलेल्या छोट्या मुलाला 'आपला भाऊ आहे असे बोलत होती'... आणि भूत तर घाबरवतात... प्रेम वैगेरे थोडी करतात... तरीपण ती भूतच आहे हे सामझायचे तरी कसे... मुलगी तर त्याच्या समोरच होती... रोहानला वाटत होत कि तो तिच्या प्रेमामध्ये एकदम पागल होणार आहे... तो पुन्हा तिला आपल्या स्वप्नात आणण्याचा प्रयत्न करत होता... आपल्या खूप सारे प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी... त्याचे तिच्याबरोबर काय संबंध आहेत..?, हे जाणून घेण्यासाठी... ह्याच सगळ्या गोष्टीमुळे त्याचा डोळा कधी लागला त्यालाच कळले नाही... आणि कधी स्वतःला नीरु बोलणारी श्रुती परत त्याच्या स्वप्नात आली हेच त्याला कळले नाही...

"काय झाले होते... तुम्ही असे मधेच कुठे गेला होता.." नीरु तिथेच बसली होती... त्याच्या पायाजवळ...

"मी कुठे गेलो होतो... गेली तर तूच होतीस... माझ्या स्वप्नातून..." रोहन झोपेत बडबडला...

"हो.. पण स्वप्न तर तुझच होत ना... तू ने ते स्वप्न तोडलस, म्हणून मला जायला झाल..!"
"तू स्वप्नामध्येच का येतेस...? उठून ये ना बाजूच्या खोलीत तर आहेस..." रोहन बोलला...

नीरु ने ईथेच त्याला सगळ सांगून टाकायचा निर्णय घेतला होता... शेवटी तिच्या देव ने तिला वाचन दिले होते कि ह्या जन्मात तिची मदत करणार... "समझण्याच प्रयत्न कर देव... मी ती नाही आहे... जी तू समझत आहेस... ती तर श्रुतीच आहे, जीला तू तुझ्या समोर बघत आहेस... मी देवची प्रियदर्शनी आहे.. आणि ह्या जन्माची तुझी नीरु..."

रोहन कसा तरी आपल्या रागाला आवरत होता... त्याला सगळे आजच माहिती करून घ्यायचे होते..."म्हणजे आपला गेल्या जन्माचा काही तरी संबंध आहे...?"

"गेल्या जन्माचाच नाही.. तर अश्या किती तरी जन्माचा आहे... प्रियदर्शिनी च्या प्रत्येक जन्मात मी तुझी वाट बघत होते... पण मी तुला ह्याच जन्मात शोधू शकले.." नीरु बोलली..

"पण तू मला आगोदर पण शोधू शकली असतीस... म्हणजे गेल्या जन्मात..." रोहनने तर्क दिला...

"हो... आणि मी खूप शोधलं पण... माझी एक सिमा आहे.. त्या सीमेपलीकडे आम्ही जाऊच शकत नाही... २ महिने आगोदर तू ह्या गावाच्या जवळून गेला होतास... आणि मी तुला ओळखले... तेव्हा पासून मी तुझी वाट बघते आहे कि तू कधी परत येणार माझ्या जवळ... म्हणजे नीरु जवळ... कधी आपल मिलन होणार... ह्याच कारणामुळे मी ह्या घरात राहणाऱ्या मुलीचा रूप चोरी केला आहे... कारण हिच्या आकर्षणामुळे मी तुला भेटू शकू आणि तुला माझ्या कडे परत आणू शकू... कारण हिच्याहून सुंदर मला आणखी कोणती हि मुलगी मला आसपास दिसली नाही.." नीरु बोलतच होती कि, रोहन ने मध्येच तिला टोकले...

"पण जर तू आत्मा आहेस तर आपण कसे भेटू शकतो... सांग..."

"नाही मी आत्मा नाही आहे... मी ने पण किती तरी वेळा जन्म घेतला आहे.. ह्या वेळेला पण नीरुच्या रुपात... फक्त तीच मन त्या लॉकेट मध्ये अडकून, त्या वाड्यात राहिला होत, जे देव ने प्रियदर्शनी ला दिल होत... म्हणजे तु ने मला.. प्रेमाची पहिली आणि आखरी निशाणी च्या रुपात..."

"हे लॉकेटच काय चक्कर आहे...?" रोहनने परत तिला टोकले..

"ती एक मोठी कहाणी आहे... आपल्या प्रेमाची... आपल्या मिलनाची... कधी फुरसत मध्ये सांगेन..." नीरु आत्ता त्याचे उत्तर ऐकण्यासाठी उतावीळ होत होती...

रोहन ला आत्ता काही काही गोष्ट समजत होती... पण काही काही नाही पण समजत होत्या, "आणि आत्ता असली नीरु ला कोण शोधणार...? कुठे कुठे भटकू मी... आणि का भटकू...?"

"तुला भटकायची काही जरुरत नाही... प्रत्येक जन्मात ती माझ्या संपर्कात आहे... कारण मी पण तिचाच भाग आहे... अम्रीतसर पासून ५० कि.मी. लांब बटाला गावात राहते ती... सरकारी कॉलेज च्या जवळ घर आहे तीच... मला गर्व आहे कि प्रत्येक जन्मात ती कुवारीच राहिली कारण तिने कोणाबरोबर लग्नच नाही केले... तुझ्या शिवाय मी कोणाचा हि विचार नाही केला देव... " एवढे बोलून निरूचा गळा भरून आला...

"ओह... आणि मी..?" रोहन ला तिची मगरमिठीची कहाणी मध्ये मजा येत होती...

"तुझ मला नाही माहित... आणि ह्या जन्माचे तर तुला माहितच आहे..." निरुने त्याला प्रेमाने बघत सांगितले...

"तर काय ती मला बघतच ओळखेल ...?" रोहन ने प्रश्नांची लाईन लावली होती..

"बस फक्त हीच एक समस्या आहे... त्याच्यासाठी तुला तिला तिथेच आणायला हवं... वाड्या जवळ..." नीरुने उदास होवून सांगितले...

"आत्ता हे वाड्याच काय चक्कर आहे...?" प्रश्ना मधूनच एवढे प्रश्न निघत होते कि रोहन जुने प्रश्न विसरत होता...

"जिथे तू गेला होतास तिथे एक पिंपळाच झाड आहे.. त्याच्या खालीच आपला जुना वाडा आहे... तुला निरुला घेवून तिथेच यायचे आहे..."

"एक मिनट...एक मिनट.. जी मुलगी मला ओळखत नाही... तिला मी कसे काय घेवून येवू शकतो... आणि ते पण असल्या जाग्यावरती जिथे छोटी मुल पण एवढी खतरनाक आहेत..." रोहनला आत्ता चक्कर येत होती...

"ह्याच... उत्तर माझ्याजवळ नाही आहे... पण जर तू तिला आपल्या प्रेम पाडलेस तर ती येवू शकते... तुझ्या बरोबर... तुला तीच प्रेम पण जिंकायला हवं आणि विश्वास पण... हे काम तुला तुझ्या पद्धतीने करायला हवं..."

"मला नाही माहित कि मुलींची मन कशी जिंकता येतात... ह्या गोष्टीत मी एकदम अनाडी आहे... तूच काहीतरी सांग...!" रोहनला काहीच समझत नव्हत...

"तू जेव्हा देव होतास तेव्हा पण असाच होतास... लाजाळू.. पण तुला काही ना काही तरी केलेच पाहिजे..." नीरु आपल्या देवच्या आठवणींमध्ये हरवून हसत होती...

"मला माफ कर नीरु... हे सगळ मी नाही करू शकत... कोणत्या अनोळखी मुलीबरोबर मी ने अजून पर्यंत वार्ता सुद्धा केली नाही आहे... आणि तू तिला इथे आणायचे बोलतेस... हे नाही होवू शकत... आणि मग तिला पण रात्रीच इथे आणायला हवं... हा ना...?"

"हा देव... हि माझी मजबुरी आहे..."


क्रमश....

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment