Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Sunday, 1 April 2012

भाग ~ ~ ११ एक प्रेम कथा

एक प्रेम कथा

Update11


"शिट... नेव्हर पोसिबल... अस कधीच होवू शकत नाही... आणि तूच सांग.. मी तुझ्या बोलण्यावर कसा विश्वास ठेवू... आणि विश्वास केला तरी एवढ मोठ टेन्शन का घेवून बसू...? हे माहिती असून सुद्धा कि तू एक भटकती आत्मा आहे; माझ्या मनात तुझ्यासाठी सहानुभूती शिवाय काहीच नाही आहे... तू ने माझे हस्ते खेळते जीवन खराब केले आहे... मी पागल सारखा झालो आहे.. तुझ्या गोष्टी जरी मी खऱ्या समजल्या तरी मला काहीच आठवण नाही आहे... मग नंतर मी तर कोणा बरोबर हि प्रेम करू शकतो... लग्न करू शकतो... खर सांगू तर मी सकाळी श्रुती च्या वडिलांशी माझ्या विषयी वार्ता करणार आहे... मला तिच्याशी प्रेम झाले आहे... तर का मी उगाच नीरु च्या मागे पुढे फिरत राहू...? प्लीज माझा पाठलाग सोड... ह्याच्यापुढे माझ्या जीवनात कधीच नको येवूस... मला कंटाळा आलाय तुझ्या गोष्टी ऐकून... मी आत्ता काहीच ऐकण्याच्या मूड मध्ये नाही आहे..." रोहन रागाच्या भरात निरुला बोलला...

अचानक अश्या अनपेक्षित उत्तराने निरूचा चेहरा सफेद पडला... रोहन ला ह्या वेळी स्वतः हून ती गमावून बसण्याचे भय आणि रागाने ती थरथर कापायला लागली, "देव... तुझ्या वचनाचे काय होणार...?" एवढे बोलून निरूचा गळा भरून आला...


"भाड मध्ये गेल वचन... आय डोन्ट केअर... मला मरायचे नाही आहे आत्ता... जगायचे आहे... स्वतःसाठी... घरच्यांसाठी...!"


नीरु उभी झाली..." ठीक आहे देव...मी आत्ता जाते... पुन्हा कधीच परत येणार नाही..." अस बोलून नीरुच्या डोळ्यात जे अश्रू होते ते आत्ता झर झर पडायला लागले...

 "तु ने.. देव आणि प्रियदर्शिनी च्या प्रेमाचा अपमान केला आहेस... तुला काय माहित देवचे वचन किती सख्त होते... एवढे बोलून तिने आपला ड्रेस वर पासून खाल पर्यंत फाडून टाकला... तुला फक्त तुझी हवास मिटवायची आहे ना... घे पुरी करून आता" आणि ती त्याच्या समोर अशी अर्धनग्न अवस्थेत उभी राहिली...

तिला असे पाहून...रोहन चे डोळे शरमेने झुकले गेले.. त्याला असे शरमेने डोळे झुकवलेले बघून नीरु ने उभ्या उभ्याच बोलायला सुरुवात केली..., "एकदा कोणाला वचन दिले तर ते, तो जीव देण्यापर्यंत निभवायचा... काश तुला देव आणि प्रियदर्शिनीच्या प्रेमाची प्रचीती दाखवली असती..." नीरु ने भरभरून आलेल्या गळ्याने बोलली आणि चुपचाप रडतरडत त्याच्या स्वप्नातून गायब झाली...


दुसऱ्या दिवशी सकाळी म्हाताऱ्याने येवून रोहन आणि नितीनला उठवलं... रोहनच्या डोक्यात दुखत होत... रात्रीच्या स्वप्नाची गोष्ट त्याच्या डोक्यात अजूनपर्यंत घुटमळत होती...


"काय झाले...? बरा तर आहेस ना..?" नितीन ने त्याला अश्याप्रकारे आपले डोके पकडून बसलेले पाहून त्यला विचारले...


"नाही यार.. सगळ ठीक आहे.. बस असच जरा डोक दुखत आहे.." रोहन ने नितीन कडे बघत बोलला..


"तर आत्ता निघूया कि, आत्ता पण नीरुला भेटायची इच्छा आहे..." म्हातारा गेल्यानंतर परत नितीन ने रोहनला मस्करी करत विचारले...


"तीच नाव पण नको घेवूस यार माझ्या समोर..." रोहन रागात बोलला..


"अरे.. मी तुला फोनवर जुन्या वाड्याजवळ येणाऱ्या मुली बद्दल नाही विचारत आहे... मी तर हिची वार्ता करतो आहे; श्रुतीची... भेटली तर इथेच होती ना तुला... काही दिवसांपूर्वी... तू बोलत होतास.." नितीन ने त्याला विचारले...


"आत्ता काहीच नको बोलूस यार... प्लीज... माझ्या डोक्यात दुखत आहे.." रोहन आत्ता पण आपले डोके पडकून बसला होता...


"चल सोड...तू टेनशन कशाला घेतो आहेस... आत्ताच निघूया बस इथून..." नितीन ने त्यावेळी त्याच्याबरोबर ह्याविषयी अजून पुढे चर्चा नाही करणार म्हणून काहीच नाही बोलला...


"मी जरा फ्रेश होऊन येतो यार... बाथरूम कुठे आहे... काही आयडिया आहे..?" रोहन उभा राहत बोलला...


"बाहेर निघून उजवीकडे सरळ निघून जा..."


"धन्यवाद..." बोलून जसा रोहन बाहेर जाण्यासाठी वळला, त्याच्यासाठी चहा घेवून आलेल्या श्रुती शी धडक देता देता वाचला..., "ओह... सॉरी..!" रोहनने लगेच ब्रेक लागल्यागत तिथेच थांबला...


श्रुती त्याच्यासमोर आपली मान खाली घालून उभी होती.. काय गजब चा गोडवा होता तिच्या चेहऱ्यावर... सुंदरताच एक उदहरण होती ती... काही वेळ कोणच, काही नाही बोलत आहे आणि रोहन सारखा आपल्या कडे बघतोय हे तिरप्या डोळ्याने पाहून तीच बोलली, "चहा..."


"ओह... आत मध्ये ठेव... मी येतो आत्ता.. धन्यवाद..!" बोलून रोहन तिच्या बाजूने निघून गेला...


श्रुती चहाचा ट्रे घेवून आतमध्ये गेली आणि टेबल नितीन कडे सरकवून चहा त्या टेबलवर ठेवली... मागे वळून जशी ती बाहेर निघणार... नितीन ने तिला टोकले.. "काय नाव आहे तुझ...?"


ह्या अनपेक्षित प्रश्नाने श्रुती लगेच तिथेच थांबली... लाजरी होती पण पागल नव्हती... तिच्या वडिलांनी किती वेळा तीच नाव त्यांच्यासमोर घेतले असणार.. ती समझली... लाईन मारायच्या विचारात आहे वाटते... ती २ मीनट थांबली आणि परत पुढे निघाली..


"नीरु... हे पण तुझच नाव आहे ना...!" नितीन ने तिच्या पुढे चालणाऱ्या पावलांना परत विराम लावला..


"ना...नाही..." श्रुती ने उत्तर दिले...


"रोहन तुझ्यासाठीच इथे आला आहे... कोणीतरी तुझ नाव घेवून त्याला इथे बोलवत होती... तुम्ही दोघे भेटला आहात ना पहिले कधी... तुम्ही दोघे प्रेम पण भरपूर करता एकमेकांवर.." नितीनला जेवढ माहिती होत तेवढ बोलला..


श्रुतीला नितीन काय बोलत आहे काहीच समझले नाही... ती मागे वळून काहीतरी बोलणार होती... पण तिची हिम्मत नाही झाली... मागे न वळता, आणि न थांबता ती सरळ बाहेर निघून गेली...

"काय मुलगी आहे..!" नितीन बडबडला... आणि वर्तमानपत्र उचलून वाचायला लागला... श्रुती ने नितीन शेवटी काय बोलला ते ऐकल...

काही वेळानंतर रोहन परत आला तर तो म्हातारा तिथेच बसला होता... रोहन आल्या आल्या थंड झालेली चहा उचलायला लागला तर म्हाताऱ्याने त्याला थांबवले... "राहून दे बेटा... थंड झाली आहे... श्रुती बोलत होती कि ती दुसरी बनवून आणते..."


"ओह.. काका ह्याची काशाल जरुरत आहे... उगाच तुम्हा लोकांना कशाला त्रास..." रोहन ने आपल बोलण संपवलं पण नव्हत कि तेव्हड्यात श्रुती तिथे हाजीर झाली होती... ट्रे मध्ये एक कप चहा घेवून...

नितीन डोळ्याच्या इशाऱ्याने रोहनला इशारा करत होता... जणू विचारात होता..."काय यार... तुझ्या वर एवढी मेहरबानी कशी..."

ह्यावेळी श्रुती सीधा रोहन च्या समोर येवून उभी राहिली आणि ट्रे त्याच्या समोर केल... रोहन ने चेहरा वरती करून तिच्या डोळ्यात पहिले... ह्यावेळी आश्चर्याने ती त्याच्याकडेच बघत होती... डोळ्यात डोळे घालून... रोहन तिच्या डोळ्यात पाहताक्षणीच सोम्मोहित झाला होता... जेव्हा कितीतरी वेळाने रोहन ने ट्रे नाही पकडला तेव्हा श्रुतीला बोलायलाच लागल, " चहा घ्या...!"


"ओह... हा...धन्यवाद..!" रोहन चाचपडत बोलला... श्रुतीचे वडील जर तिथे नसते तर नितीन ने काही ना काही तरी बोललाच असता...

"अच्छा... काका आम्ही आत्ता निघतो आहे... तुम्ही सांगू शकता का पंक्चर बनवणारा कुठे भेटेल...?"

"एवढ्या लवकर कुठे बेटा.. जेवण वैगेरे करून जा..." म्हाताऱ्याने अतिथीधर्माच्या नाते बोलला...


"नाही काका... आगोदरच तुम्ही एवढा त्रास घेतला आहात... खर तर आम्हाला उशीर होत आहे...  पंक्चर बनवायचं आहे... माहित नाही कुठे भेटेल... आम्हाला आत्ता आज्ञा द्या..."


"ठीक आहे बेटा... जशी तुमची मर्जी... पंक्चर बनवणाऱ्याची दुकान पुढच्या गावात आहे..." म्हाताऱ्याने एवढ बोललाच होत कि बाहेरून श्रुतीचा आवाज आला, "बाबा... एकदा जरा इथे या...!"


"एक मिनट..." म्हातारा बोलून बाहेर निघून गेला... रोहन ने चहाचा प्याला ठेवून ते दोघेही असेच बाहेर आपल्या गाडी कडे आले...


"नितीन... हे कसे झाले...? तू ने खरो खरच नीट बघितलं होत ना रात्री..." रोहन जागीच ओरडला...


"काय झाले...?"


"हवा तरी बघ चाकांची..." रोहन जसा ओरडतच बोलत होता...


"ओह.. माय
गॉड... कमाल आहे... हा मी मोबाईलची ब्याटरी लावून व्यवस्थित बघितल होत... तेव्हा तर कोणत्याही चाकांमध्ये हवा नव्हती... कमाल आहे यार.. इथे पण...?"

"काय झाल बेटा...?" रोहनच ओरडणे ऐकून म्हातारा जवळ जवळ पळतच बाहेर आला होता...

"काका.. हि... हवा... रात्री तर बिलकुल पण नव्हती... आत्ता कुठून आली...?" रोहन ने चाकांच्या इथे इशारा करून बोलला...

हे ऐकून म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर एक शिखण सुद्धा पडली नाही, "आम्हाला असल्या चमक्ताराची सवय झाली आहे बेटा... आज रात्रीच... श्रुती जेव्हा सकाळी उठली तेव्हा तिच्या ड्रेस गळ्यापासून खालपर्यंत फाटला होता... वाईट मानून घेवू नका... पण जर तुमच्या खोलीची कडी जर बंद नसती तर मी तुमच्या वर संशय केला असता... पण इथे काही पण होवू शकत..."

नितीन ने आश्चर्याने परत एकदा रोहन कडे बघितले... तो रात्री आलेल्या नीरु बद्दल विचार करत होता... एकदम सुन्न उभा राहून...

"ठीक आहे काका... आत्ता आम्ही निघू..." नितीन सगळे विसरून जायाची तैय्यारी करू लागला...

"शहराकडेच जाणार आहात ना तुम्ही बेटा..." म्हाताऱ्याने विनाम्रताने प्रश्न विचारला...

"हा... शहराकडूनच जाणार आहोत... का...?" नितीन ने उत्तर दिले...

"नाही... काही खास गोष्ट नव्हती... पण ते... श्रुती ला पण शहरातच जायचे आहे... कॉलेज मध्ये... जर तुम्हाला जास्त उशीर नाही झाला असेल तर ती पण तुमच्या बरोबर गेली असती... बस ची वाट बघून जास्त वेळ खराब होतो.. अशी ती बोलत होती..." म्हातारा बोलला...

नितीन मनामध्येच खुश झाला... मग आपली ख़ुशी मनामध्येच लपवत तो बोलला..."हि पण काही बोलायची गोष्ट आहे काका... तुम्ही लोकांनी आम्हाला एवढी मदत केली... आम्हाला काहीच घाई नाही आहे... आत्ता तर चाकांची हवा पण आली आहे... तर ते पण काम सध्या नाही आहे... तुम्हे जेवढ वेळ बोलाल तेवढा वेळ आम्ही इथे थांबायला तैय्यार आहोत..."

"अच्छा बेटा... ! खर तर तिच्या कॉलेज ला अजून २-३ तास आहेत... पण मी तिला सांगतो... ती लवकर तैय्यार होईल..." म्हातारा खुश होत बोलला...

"नाही काका... काहीच लवकर नाही आहे... तोपर्यंत आम्ही एक काम करून येतो... एका तासात परत येवू... तेव्हा पर्यंत ती पण तैय्यार होईल..." नितीन आपली ख़ुशी लपवत बोलला...

"ठीक आहे बेटा... जशी तुमची मर्जी... मी श्रुती ला सांगतो..." म्हातारा एकदम खुश दिसत होता...

"आम्ही फक्त एका तासात परत येतो... काका..." नितीन एवढ बोलून गाडीत बसला... रोहन पण त्याच्या संगतीच जाऊन बसला... पण त्याला काहीच समजत नव्हत कि शेवटी हा नितीन चालला तरी कुठे आहे... नितीन ने म्हातारा आत मध्ये गेल्यानंतर गाडी चालू केली..., "काय रे... आत्ता तरी खुश हो... तुझ्या मना सारख होत आहे... मन भरून बोल आत्ता तिच्याबरोबर... (तोंड वाकड करून) माझ्या बरोबर तर ती नीट नाही बोलली..." एवढे बोलून नितीन ने आपली बत्तीसी दाखवली...

"पण आत्ता तू परत कुठे चालला आहेस...?" रोहन ने विचारल...

"जुन्या वाड्या जवळ... बघूया तरी काय कारण आहे तिथे..." नितीन ने गाडीची स्पीड वाढवली...

"तू पागल झाला आहेस काय...? मला नाही जायचे आहे तिथे..." रोहन जवळ जवळ ओरडत बोलला...

"तुला काय वाटते... काही दम आहे का म्हाताऱ्याच्या गोष्टींमध्ये... मला तर भरपूर मोठ नाटक वाटत आहे... आणि मला वाटत कि म्हातारा पण ह्या नाटकात शामिल आहे... बघ.. त्याला चाकांमध्ये आपोआप हवा आल्याने आश्चर्य नाही वाटल... उलट कथा सांगायला लागला... मुलीचा ड्रेस फाटला रात्री... ह... आणि आत्ता बघ... कसा आपल्या पोरीला आपल्या सारख्या जवान मुलांबरोबर पाठवतो आहे... भल एवढ पण कोणी नादाण असू शकत का कोणी ह्या जगात... मला तर वाटते कि श्रुतीनेच तुला नीरु बनून फोन केला असेल... काही ना काही तरी चक्कर जरूर आहे मित्रा... हे लोक तुझी करोडोची संपत्ती जप्त करायच्या मूड मध्ये तर नाहीत ना ... तुला वेडा बनवून... पेडा खायचा तर विचार नाही आहे ना त्यांचा..." नितीन बोलतच राहिला असता जर रोहनने त्याला मध्येच टोकले नसते तर...

"गप्प बस यार... अस काही नाही आहे... हा फक्त एक योगायोग असेल... तू गाडी परत फिरव..." रोहन चिढत बोलला...

"गाडी तर आता खुनी तलावाच्या इथेच थांबणार मित्रा... मला ते पिंपळाच झाड बघून यायचं आहे... आणि त्या छोट्या मुलाला पण शोधायचे आहे... तुला उतरायचे असेल तर उतर... थांबवू काय...?"

रोहन काहीच नाही बोलला... काही विचार करत तो गाडीच्या बाहेर बघायला लागला....


क्रमश....

Previous Chapter                              Next Chapter

1 comments:

  1. khup chaan story lihit aahes mitra... keep it up...

    ReplyDelete