Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Friday, 13 April 2012

भाग ~ ~ १२ एक प्रेम कथा

एक प्रेम कथा

Update12


"उशीर नाही होणार काय? आता चालत जायला लागणार..." रोहनने रस्त्याच्या पुढे खोल खड्डा बघत बोलला..


"इथून गाडीला रस्त्याच्या खाली उतरवून प्रयत्न करतो... त्याच्या नंतर जास्त वेळ नाही लागणार... कदाचित निघेल... चल इथून तर गाडी पार झाली... चल तू बोल आत्ता... काय चक्कर आहे तुझं श्रुती बरोबर.. आत्ता मला तर वाटतं आहे कि तू कुवारा नाही राहणार... तुला काय वाटतं?" ते गाडी बरोबर हळू हळू जात होते.

"काहीच नाही वाटत मित्रा... मलाच काही समझत नाही आहे... तर मी तुला कसं सांगू?" रोहनने त्याच्याकडे बघत बोलला..

"का? मला नाही सांगणार तर कोणाला सांगणार... साल्या, मित्र आहे मी तुझा... भावासारखा.." नितीनने त्याच्यावर बोलण्यासाठी जोर टाकला... "जर आज तुने सगळं काही नाही सांगितलं तर समझून जा... मग तुझी माझी दोस्ती इथेच संपली.."

"तर हे तलाव आहे ते... ह्याच्यामध्ये तर चांगलं साफ पाणी आहे... रात्री लाल कसं होतं.." नितीनने तलाव बघून रोहनला विचारणं सोडून गाडी थांबवून तिथेच उतरला... रोहन पण त्याच्याबरोबर उतरला..., "चल ना यार.. परत जाऊया.."

"अरे फाटते का तुझी... म्हाताऱ्याची गोष्ट खरी जरी असली तरी इथे दिवसा काहीच नाही होतं... चल ये..." बोलून नितीन एक रस्ता बघत डावीकडे वळला.


"ती गोष्ट नाही आहे यार... पण माझं मन नाही करत आहे... पुढे चालायचा... मूड ऑफ आहे..." रोहन त्याच्या पाठी पाठी चालत राहिला.

"कमाल आहे यार... आत्ता तर चिखळ नाही आहे... असे वाटतंय आपण दुसऱ्या रस्त्यावरून आलोय आज..."

रोहन काहीच नाही बोलला... त्याच्या डोक्यात निरुची वाक्ये येत होती... जर स्वप्न खरं असेल तर ती त्याला जरूर बघत असणार... कमीत कमी तिला माहिती तरी पडलं असणार कि मी आलोय... विचार करूनच रोहन सावध झाला...

चालत ते तलावाच्या पलीकडे त्याच जागेवरती उभे राहिले जिथे काल रात्री ते त्या छोट्या मुलाला भेटले होते... वातावरण आत्ता पण तिथे शांत होतं पण ती शांतता भयावह नव्हती... ह्याच्या उलट एक वेगळीच शांतता तिथे पसरली होती... असं वाटतं होतं कि इथे पहिले कोणतं गांव असेल... पण आत्ता तिथे काहीच नव्हतं... शिवाय जुन्या विटांची गल्ली, तुटलेली फुटलेली, आर्धी पडलेली दिवाळ आणि एक दोन भटकणारे जनावर..

"कुठे भेटू शकतो तो मुलगा... साल्या ने रात्री खूप वेडा बनवलं... खरंच घाबरलो होतो मी..." नितीन एका जागेवर जाऊन उभा राहिला...

"मी पण..." रोहन च्या तोंडून निघालं...

"मला तर वाटतं तो कुठल्या आदिवशी जातीतला असणार... हि लोकं असल्याच जागेवरती जाऊन राहतात.." नितीन मुलाच्या बद्दल तर्क लावत बोलला...


"तुला तो आदिवशी वाटतो... किती प्रेमळ होता दिसायला... काय माहित कि तो पण एक आत्मा असेल.." रोहन हळू हळू त्याला लाईनी वरती आणत होता.. कारण जेव्हा तो त्याला त्याची गोष्ट सांगेल तेव्हा तो हसायला नाही पाहिजे...

"आत्ता तू पण सुरु झालास म्हाताऱ्या सारखा... आणि मला तू जेनेटिक्स शिकवू नकोस.. आदिवासी काय सुंदर नाही असू शकत... काय माहित कोणत्या विदेशी बरोबर लफडं झालं असेल कोणत्या आदिवासी मुलीचं.. होतं यार... पण आत्ता कुठे गेले ते..?" नितीन चारही बाजूने फिरून काही तरी शोधत होता...

"कोण..?" रोहन ने विचारले...

"आदिवासी यार... आणि कोण भेटणार इथे... अरे बघ... तेच पिंपळाच झाड... ज्याच्याबद्दल तो म्हातारा बोलत होता... ना.." नितीन तिकडे निघाला....

"जाऊ दे यार... चल परत चल... उशीर होत आहे..." रोहन तिथेच उभ्या उभ्या बोलला... मनातल्या मनात निरुची आठवण आणि तिने सांगितलेल्या त्या जागा रोहनला कसं तरी वाटत होतं... त्याच मन नाही करत होतं एक क्षण पण तिथे उभं राहायचं...

"अरे ये ना.. २ मिनिटामध्ये काहीच नाही होतं..." नितीनने परत येत रोहनचा हाथ पकडून खिचला.. "तरी पण तिला आज कॉलेजमध्ये थोडी जायचे आहे... तिला तर तुझ्याबरोबर फिरायचे आहे... प्रेमाची वार्ता करायची आहे... जर ह्याच्यामध्ये ह्यांच (म्हाताऱ्याच) कुठलं नाटक नसेल तर तू तिच्याबरोबर बिनधास्त लग्न कर..." बोलून नितीन हसायला लागला...

"मला नाही जायचे आहे पुढे... तुला जायचे असेल तर जा..." रोहनने आपला हाथ सोडवून तिथेच उभा राहिला... निरुची गोष्ट आत्ता त्याच्या डोक्यामध्ये एक घण्टा प्रमाणे वाजत होती... त्याचं डोकं जड झाल्या सारखं झालं, "मी इथेच थांबतो..."

"साल्या घाबरगुंड्या... मला नाही माहित होतं तुझी पण... चल तू इथेच थांब... मी आत्ता आलोच बघू तरी ते झाड कसं आहे आणि किती व्याटचा बल्ब तिथे टांगला आहे... जे पूर्ण रात्रं त्याच्यावर उजेड असतो..." एवढं बोलून नितीन त्याला तिथेच सोडून पुढे निघाला...

रोहन आत्ता तिथे एकटा राहिला होता... त्याला आत्ता खरोखर वाटत होतं कि काही ना काही तरी जरूर गडबड आहे त्याच्या लाइफ मध्ये... नीरु ने रात्री बोललेली गोष्ट राहून राहून त्याच्या डोक्यात फिरत होती... बेशक रोहनला भीती नाही वाटत होती.. पण डोक्यात रात्रीच्या आठवणींमुळे त्याचं मन आणि डोकं शिथिल होत होतं...

अचानक रोहनला आभास झाला कि त्याला पाठून कोणीतरी स्पर्श केला आहे... घाबरून त्याने पाठी वळून बघितले... पण तिथे कोणच नव्हतं... काहीच नाही.., "शिट... हे मला काय झालं आहे...?" मनातल्या मनात रोहन बडबडला... आणि परत वळून नितीनला बघायला लागला... नितीन झाडाजवळच उभा होता...

तेव्हा छोट्याश्या भिंतीवर ठेवलेला दगड तिथून खाली पडला... योगायोगाने रोहन पण तिथेच बघत होता... आपोआपच रोहनच्या हृदयाची ठोके वाढू लागले... हळू हळू पुढे चालत त्याने भिंतीच्या पलीकडे पाहिले... पण तिथे कोणच नव्हतं...

सगळं काही वेगळंच होतं... पण रोहनला ते वेगळं नाही उलट एक इशारा वाटत होता... नीरु कडून, तिचं तिथे असण्याचा...

"तू इथेच आहेस काय...?" रोहन हळूच बोलला... पण त्याला काहीच उत्तर नाही मिळालं...
"नीरु... नीरु... जर इथे असशील तर उत्तर दे..." रोहाने परत आवाज दिला... पण कोणी असणार तर उत्तर देणार ना...

तेव्हा त्याला नितीन त्याच्याकडे येताना दिसला... रोहन गप्प झाला आणि त्याच्याकडे बघत राहिला...

"मला विश्वास नाही वाटत कि तू इथे येणार.." नितीनने त्याच्याजवळ येवून विचारले...

"हो.... मी येणार नव्हतो... पण तूच मला इथे जबरदस्ती आणलंस ...  चल आत्ता..." रोहनने मागे वळत त्याला उत्तर दिले आणि चालायला लागला...

"म्हणजे तू माझ्यासाठी इथे नाही आलास...!" नितीन तिथेच उभा राहिला...

"चल यार... तुझ्यासाठीच तर आलोय... नाही तर तू तोंड फुगवून बसला असतास... आणि मला पुढच्या वेळी काम निघालं असतं तर नखरे केले असतेस... चल आत्ता..." रोहन परत येवून त्याच्याजवळ उभा राहिला...

"पण... काय तू विचार नाही केलास कि माझं काय होणार..." नितीन आपल्या जागेवरून हलला नाही... इथे उभ्या उभ्या बोलत होता...


"काय विचित्र सारखा बडबडतोयस... आत्ता चल तरी..." रोहन रागात बोलला... त्याला तिथून लवकरात लवकर निघायचं होतं...

"पण तू सामाझण्याचा प्रयत्न का करत नाही आहेस... देव..." नितीनच्या तोंडून 'देव' ऐकूनच रोहन उडाला...

"काय... काय बोललास तू...?"

"माझं काय होणार देव... तुझ्या वचनाचं काय होणार... बोल"

"अरे देवा... नीरु..." रोहनच्या आश्चर्याचा ठिकाणा नव्हता...

"हो देव... मी आत्ता पण तुझी वाट बघत आहे... प्लीज... निरुला घेवून ये इथे... मला मुक्ती दे... मग जे मनात येईल ते कर... मी कधीपासून तुझी वाट बघून तडफडत आहे... कमीत कमी... मला इथून... सोडव तरी..." एवढं बोलताच नितीन धडाम करून पाठीवरती पडला, "देव... मला परत त्या पिंपळाच्या इथे घेवून चल..."

"नितीन... काय झालं तुला...?" रोहनने ढोपरा वरती बसून त्याचं डोकं आपल्या हाताने उचललं... जमीन फिरते असे त्याला दिसत होतं...

"मला परत घेवून चल देव... उन्हात मला... इन्फेक्शन होतं... त्याचं विष तुझ्या मित्राच्या शरीरात पसरणं... चालू झालं आहे... मला लवकर तिथेच घेवून चल... मी परत निघून जाईल..." नितीन अडकत अडकत बोलत होता... त्याचा श्वास जोर जोरात चालू होता...

रोहनच्या ध्यानीमनी काही नाही आलं... त्याने कसे तरी नितीनला उचलले आणि आपल्या कांध्यावरती घेवून पिंपळाच्या झाडाकडे धावला...

"हो... इथेच झोपव... झाडाबरोबर..."

रोहनने तसंच केलं...

"मला मुक्ती दे देव... ह्याला इथून घेवून जा..." एवढं बोलून नितीनचे डोळे बंध झाले आणि रोहनने तसंच केलं जसं त्याला सांगितलं होतं... तो पहिल्या सारखा नितीनला आपल्या कांध्या वरती घेवून फटाफट चालत होता...

"अरे... मला असं का उचलून घेतलं आहे मूर्खा... उतरव खाली..." नितीन एवढं बोलला तेव्हा कुठे रोहनच्या जीवात जीव आला... आणि त्याने नितीनला कांध्या वरून उतरवून उभा केला...

नितीनचा श्वास भरपूर जोरात चालू होता... जसं काही भरपूर मोठी रेस लाऊन आला आहे..., "हे काय होतं... कुठे उचलून घेवून जात होतास मला...?"

"तुला माहिती तरी आहे का तू कुठे आहेस...?" रोहनने त्याचा हाथ पकडून त्याला खेचून पुढे चालू लागला...

"सांग तरी काय झाले...?" नितीन आत्ता सामान्य होत होता...

"चल बाहेर चल सगळं सांगतो..." रोहन बोलला आणि काही वेळातच ते गाडी जवळ होते...

"तुझ्यामध्ये भूतं आली होती..." रोहनने त्याच्याकडे बघत बोलला...

"हा हा हा हा... तुला माहित नाही.. मी आत्ता पण भूत आहे... भयानक भूत..." नितीन गुर्ण्याच्या आवाजात बोलला.., "गप्प बस साल्या... मला हि मस्करी एकदम खराब वाटते... चल गाडी मध्ये बस..." बोलून नितीन गाडीत बसला...

"तुला विश्वास नाही बसत ना... तुला माहिती तरी आहे का मी तुला कुठून आणले ते..." रोहन त्याच्या बाजूच्या सीट वर बसत बोलला...

"हो... माहित आहे... मी झाडाखाली झोपलो होतो जेव्हा तुने मला उचललं होतं..." नितीनने गाडी चालू करत उत्तर दिले..


"का... का झोपला होतास तू तिथे..." रोहनने परत प्रश्न विचारला...

नितीन एका क्षणासाठी गप्प बसला... मग रोहनच्या चेहऱ्याकडे बघत बोलला, "माहित नाही... कमाल आहे यार... विश्वास नाही होतं... काय माहित झोप आली असेल... सावली बघून..."क्रमश....

Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment