Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Saturday, 14 April 2012

भाग ~ ~ १३ एक प्रेम कथा

एक प्रेम कथा

Update13


"ह्म्म्म... असू शकतं...." रोहन ने पुढे काहीच नाही बोलायचा निर्णय घेतला... कारण त्याला नितीनचा स्वभाव माहित होता... तो आत्ता नितीनला सगळं सांगू शकला असता पण नितीन परत तिथे जाऊन त्याने शोधाशोध सुरु केली असती..., "आत्ता तर सरळ आपण जात आहोत ना, श्रुतीच्या घरी...?"
"आय हाय... काय गोष्ट आहे यार? तू तर खूप उतावीळ झाला आहेस... चिंता नको करूस... आज पूर्ण दिवस ती तुझ्या बरोबरच असणार... बस थोडासा इशारा कर तिला..." नितीन मस्करी करत हसत बोलला..
"तुला ती कशी वाटते...?" रोहन ने नितीनला विचारलं...
"म्हणजे काय...?"
"बस असंच.. सांग ना.. कशी वाटते...?" रोहनने परत जोर देत विचारले...
"स्वीट आहे, सुंदर आहे, लाजाळू आहे... सगळं मिळून माझी वाहिनी बनण्या लायक आहे... पण जुन्या वाड्यावर बोलावून घाबरवण्याचा तिचा किंवा तिच्या बापाचा काही कट असला तर मी त्यांना सोडणार नाही... पहिलेच सांगतो... मला धोखेबाज लोकं नाही आवडत..." नितीन हळू हळू गाडी चालवत बोलला, कारण रस्ता अजून हि कच्चा होता...
"मी काय विचारतोय... आणि तू काय उत्तर देत आहेस...?" रोहन बोलला...
"अरे दिलं तर उत्तर... एकदम झक्कास आहे... बाहुपाश्यात घेवून टाक तिला आज... हा हा हा.." नितीनने मस्करी केली आणि आत्ता तो गाडी एकदम फास्ट चालवत होता कारण कच्चा रस्ता संपून चांगला रस्ता आला होता...
"आणि जर.. मला कोण्या दुसऱ्या मुलीबरोबर प्रेम असेल तर... ?" रोहनने त्याच्या चेहऱ्याकडे बघत बोलला...

"साल्या... स्वतःबरोबर माझीपण कशाला वाट लावत आहेस.. किती 'वासंत्या' आहेत तुझ्याकडे... काल हिच्यावरती फिदा होतास तर आज दुसरी वरती.. आत्ता मला नको सांगूस कि ती दुसरी मुलगी कोण आहे ती... सामझलास.. !" नितीनने रागाने त्याच्याकडे बघत बोलला...
"मी.. मी तर मस्करी करतोय यार..." रोहन अडखळत बोलला आणि गाडीच्या बाहेर बघू लागला.. गांव पण जवळ आले होतं...


"मस्करी करतोय..." नितीन ने त्याच्यासारखं तोंड वाकडं करून त्याची नकल मारली आणि गाडी घरासमोर उभी केली आणि होर्न वाजवायला लागला... म्हातारा जवळ जवळ पळतच बाहेर आला.


"ती.. तैयार झाली आहे का काका ?" नितीनने गाडीच्या खिडकीचा ग्लास खाली करत बोलला...


"हो बेटा.. ती तैयार आहे... तुम्ही जेवण जेऊन घ्या एकदा... श्रुतीने बनवून ठेवलं आहे... तुम्हा दोघांसाठी..."


रोहन काही बोलणारच होता कि तेवढ्यात नितीन बोलला, "ठीक आहे काका..." बोलून दोघे गाडी मधून खाली उतरून घरामध्ये आले...


आतमध्ये जाताना, जेवण जेवताना आणि मग बाहेर येताना, नितीन त्याची भिरभिरती नजर घराच्या प्रत्येक कान्याकोपऱ्यात फिरवत होता... कदाचित त्यांच्याबरोबर आदल्या दिवशीच्या घटने संबंधित काही पुरावे शोधत होता... पण काही असणार तर भेटणार ना... शेवटी चौघेजण घराच्या बाहेर आले... श्रुती साठी रोहनने पाठचा दरवाजा उघडला आणि ती त्याच्यामध्ये गपचूप जाऊन बसली..."ठीक आहे बाबा... मी ४ वाजेपर्यंत परत येईल...!"


"ठीक आहे..." आणि मग नितीन कडे बघत बोलले, "अच्छा बेटा... आरामात जावा... आणि हिला Bus-Stand जवळ उतरवा... तिथून ती स्वतः निघून जाईल..."


"का चिंता करता काका.. आम्ही कॉलेज जवळच सोडू तिला... ठीक आहे... नमस्ते..."


"देव तुमचं भलं करो बेटा..." म्हाताऱ्याने एवढे बोलताच नितीनने गाडी भरधाव धाववली...क्रमश....

Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment