Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Thursday, 17 May 2012

भाग ~ ~ १५ एक प्रेम कथा

एक प्रेम कथा

Update 15


"म्हणजे काय...?" नितीन काय बोलत होता रोहनला काहीच समझले नाही."तू आता माझ्या गोष्टींचा अर्थ काढत नको बसू आणि आपलं नाटक चालू ठेव... पहिले तू मला बळजबरी तिथे घेवून गेलास जिथे माणसांची जातच दिसत नव्हती... नंतर परत येताना तुला ती भेटली... आता ह्या मुलीने नकार दिला तर तू बोलत आहेस कि हि ती मुलगी नाही आहे... अर्थ काय आहे तुझ्या गोष्टींचा... येडा समझला आहेस काय...?" नितीन रागात त्याच्याकडे बघत बोलला.

"नाही यार तुझ्याशी खोटं का बोलू मी... प्रत्येकवेळी मी तुला माझा मोठा भाऊ मानला आहे.. पण खरंच मलाच काही समझत नाही आहे हे सगळं काय होत आहे ते... मला नेहमी चक्कर येते ह्या गोष्टींचा विचार करून... तूच मला सांग मी करू तरी काय करू..." रोहन बोलला...

"हं... पण तू आत्ता कोणत्या आधारावर बोलतो आहेस कि हि 'ती' मुलगी नाही आहे.. परत फोन आला होता काय...?" नितीनने त्याला विचारले.
"हं... हो...!" रोहनने असंच बोलला...


"लात मार ना त्या गोष्टीला... हि मुलगी बघ किती सुंदर आहे... पाहिजे तर हिला पटवून देवू काय... चालेल...!" नितीनने सगळी गोष्ट विसरून, श्रुतीची गोष्ट काढली.


"कसं..?" रोहन डोळे बंद करत बोलला..


"ते सगळं तू माझ्यावर सोपव... फक्त एवढं सांग, ह्याच्यानंतर तू बारा होशील ना, म्हणजे तुझ्या डोक्यातला भ्रम.." नितीनने गाडी थांबवून त्याच्या कांध्यावर्ती हाथ ठेवला.


रोहन काही वेळ शांत बसला, आणि मग बोलला, "नाही यार, मला तिला भेटायचे आहे एकदा... त्याच्यानंतर तू जे बोलशील मी ते करेन..."
"त्या मुलीला बघितलं आहेस कधी तू...?" नितीनने त्याला प्रश्न विचारला.


"नाही.." रोहनने परत आपले डोळे बंद केले.


"ह्याच तर एका गोष्टीवर मला राग येतो... का आपलं जीवन असं वाया घालवतो आहेस.. तुने तिला बघितलं सुद्धा नाही आहे... मग का तिच्या मागे पागल झाला आहेस... मी पैज लाऊन सांगू शकतो कि ती मुलगी हिच्या पेक्षा सुंदर नसणार... एकदा नीट नजरभर  पाहिलं तरी आहेस का तू तिला... किती गारवा भेटतो तिला बघितल्यावर..." नितीनने आपल्या हृदयावरती हाथ ठेवत बोलला...


"तुला गारवा भेटतो तर तूच पटव ना तिला...!" रोहनला आत्ता त्याच्या बोलण्याने कंटाळा आला होता... त्याच मन तर तिथेच फिरत होतं... "बटाला"!.


"तू काय समझतोस...आज पण मी का गप्प बसलो आहे कारण हि तुझी आहे.. नाही तर मी केव्हाचाच तिला घेवून गेलो असतो..." नितीन बोलला.


"हुंह.. खूप गप्प बसलास तू आज... आज तू तिला खूप सतावलंस आणि बोलतो गप्प होतो... तुला काय वाटतं हि मुलगी आता तुझ्या कडे बघेल सुद्धा... ?" रोहन त्याला टोकत बोलला.


"तुने काय मला तुझ्यासारखा मूर्ख समझला आहेस काय... एक एक दिवसात मी दोन दोन मुलींना पटवलं आहे... आणि हि बेचारी तर खूप नादान आहे... हिला पटवायला तर एक तास पण नाही लागणार... मुलींची.. सायकॉलोजी, जिओग्राफी, केमिस्ट्री... सगळं माहिती आहे मला..." नितीनने आपली छाती फुगवत बोलला...


रोहन नितीनच्या ह्या गोष्टीवर हसल्याशिवाय राहिला नाही... नितीन खोटं नाही बोलत होता... रोहनच्या स्वभावाहून तो उलट होता... तो एकदम टी२० स्टाईल चा खिलाडू होता... ज्या मुलीवर मन आलं तिला पटवलच समझा... इथेच नितीन आणि रोहन मध्ये फरक होता...


"चल तुला जे मनात येईल ते कर... पण माझा प्रश्न तर सोडव..." रोहन बोलला..


"आत्ता ती मुलगी कुठे भेटेल..."" नितीन पटकन सिरिअस होत बोलला...


"बटाला..!" रोहनने पटकन उत्तर दिलं...


"बटाटा...? हि कोणती जागा आहे...? आणि ती तुला कशी ओळखते...?" नितीनने वाटतं नाव बरोबर ऐकलं नसावं.


"बटाटा नाही बटाला... आणि आम्ही केव्हाच नाही भेटलो..." रोहन स्पष्ट भाषेत बोलला...


"हे घ्या... मग काय स्वप्न आलं होतं...?" नितीन मस्करी मध्ये बोलला...


"खरं सांगू कि खोटं...?" रोहन डोळे उघडत त्याच्याकडे बघत बोलला...


"आत्ता पण खोटं बोललास तर कानाखाली देईन... समझल काय आहे मला...? चल सांग..." नितीन बोलला...


"हो... स्वप्न आलं होतं... !" रोहन न थांबता बोलला...


"काय...?" नितीनला त्याची गोष्ट मस्करी वाटत होती...


"स्वप्नच आलं होतं यार... तुझी शपथ...!" रोहन हि गोष्ट कोणाला तरी सांगायची होती म्हणून... त्याने आपल्या सगळ्यात चांगल्या मित्राला सांगितली...


"असं वाटतंय तुला चढली आहे... चल ये... बिअर पिऊया... नंतर वार्ता करूया..." बोलत हसून नितीनने गाडी चालू करून पुन्हा शहराकडे वळवली
क्रमश....

Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment