Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Saturday, 19 May 2012

भाग ~ ~ १६ एक प्रेम कथा

एक प्रेम कथा

Update 16


"हे सगळं काय आहे यार...? तूने मला पहिले का नाही सांगितले? तुला त्या मुलीची नाही कोणी चांगल्या सायकॉलोजीस्टला शोधायची गरज आहे..." सगळी गोष्ट ऐकल्या नंतर नितीनची हीच प्रतिक्रिया होती... तो आणि रोहन एका बार मध्ये बसून बिअर पीत होते.

"तू असा बोलू शकतोस मित्रा, कारण तुझ्या बरोबर असं काहीच झालं नाही आहे, तू नाही समझू शकत... जर हे सगळं माझ्या डोक्यातला भ्रम असता तर तूच सांग जी मुलगी मला स्वप्नात दिसायची, तीच मुलगी मला खरोखर कशी काय भेटली... खरंतर आम्ही एकमेकांना कधीच भेटलो सुद्धा नाही, आणि पाहिले सुद्धा नाही... मग त्या म्हाताऱ्याने जुन्या वाड्या बद्दल जे काही सांगितलं... त्या मुलीने पण मला तिथेच बोलावलं होतं... आपल्या गाडीची आपोआप हवा निघाली... सकाळी आपोआप भरली गेली.. स्वप्नात तिने माझ्यासमोर स्वतःची ड्रेस फाडली... आणि सकाळी ते पण सगळं खरं होतं... आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मीने तुझ्या तोंडून निरुच नाव ऐकलं होतं.... जेव्हा आम्ही त्या जुन्या वाड्याजवळ गेलो होतो... काय तू आत्ता पण हेच बोलशील कि हे सगळं भ्रम आहे...?" रोहनने एवढं बोलून आपल्या बिअरचा एक सिप मारला.


"हो... तेव्हा तर बोलतो... कि ह्याच्या मध्ये बाप लेकीचा काहीतरी प्लान आहे... प्रत्येक स्वप्नाच्या मध्ये ह्या दोघांचा काहीतरी संबंध आहे... ज्याणे कथा सुनावली तो तिचा बाप आहे.. जुना वाडा पण त्यांच्या गावाचाच आहे... छोटा मुलगा उभा करू शकतात ते तिथे... आणि चाकांची हवा पण ते काढू शकतात... कारण त्यांना विश्वास होता कि परत येताना आपण त्यांचाच दरवाजा ठोकवणार ते... सकाळी जागण्याच्या आगोदर चाकांमध्ये हवा पण ते भरू शकतात... तुला आठवतंय... जेव्हा आपण त्यांचा दरवाजा ठोकवला होता तर श्रुती काय बोलली होती ते... 'बाबा ते आलेत..' काय अर्थ आहे ह्याचा..? हाच ना कि ते आपली वाट बघत होते... मी पैज लावून सांगू शकतो कि हा त्यांचाच कट असेल... तू समझ किंवा नको समझूस..." नितीनने निष्कर्ष लावला..


"आणि तू मला जेव देव... देव... म्हणून हाक मारत होता ते..?" रोहन त्याची सगळी गोष्ट ऐकल्यानंतर बोलला.


"आता तुझी अशी हालत झाली आहे तर हा हि एक भ्रमच असू शकतो.. मला तर फक्त एवढंच आठवतंय कि, पिंपळाच्या झाडाच्या थंडगार सावलीमुळे मला तिथेच झोप लागली असेल... आणि मग नंतर तू मला तिथून उचलून कांध्यावर्ती घेवून पळत सुटलास..." नितीन आत्तापण रोहनच्या पुनर्जन्म आणि आत्माची गोष्ट खरी मानायला तैय्यार नव्हता.


"तुझ्या बरोबर बोलणेच चुकीचं आहे... ह्यामुळे मी एवढ्या दिवसापासून हि गोष्ट लपवत आलो होतो... फक्त रॉकिलाच हि गोष्ट सांगितली होती... पण तो घाबरला आणि माझ्यासोबत येण्यासाठी नकार दिला... " काही वेळ थांबून रोहन परत बोलायला लागला.. "चल तुझी गोष्ट खरी मानतो... पण एकदा बाटला जाऊन बघून यायला काय जातंय... जर तिथे कोणी नीरु भेटली तर तुला विश्वास बसेल ना..." रोहन त्याला समझावून समझावून थकला होता.. पण नितीन अजून पर्यंत ह्याच्यामध्ये काही तरी कट आहे हेच मानत होता...


"बघ.. पहिले तर तुला तिथे कुठली मुलगी भेटणार नाही आहे... त्या लोकांनी बस फक्त विचार केला असेल कि आपण एकदा तिकडे जाऊ... त्याच्या नंतर आपल्या सौंदर्याने श्रुती तुला आपल्या जाळ्यात फसवेल... पण तिथे कोणी मुलगी भेटेल तर ह्यात मोठी गोष्ट काय आहे.. एवढं मोठं नाटक करणाऱ्यांसाठी... बोल... कोण जाणे तिथे भेटणारी नीरुपण ह्या नाटकात शामिल असेल."


"पण तू हे का विसरतोयस कि स्वप्न तर मला येत आहेत... माझं स्वप्न पण काय कोणाचं कट असेल...? कि तुला असं पण वाटतंय कि मी पण ह्या नाटकात शामिल आहे... आणि खोटं बोलत आहे, स्वप्नाविषयी" रोहन चीढत बोलला...


"नाही... तू ह्याच्यामध्ये शामिल नसशील.. पण हा जर कट असेल तर हा तुझ्याविरूद्धच आहे... पण मला वाटतंय स्वप्न नाटकातला एक भाग आहे... आपल्याला कोणत्या तरी निओरोलीजीस्टशी वार्ता केली पाहिजे..." नितीनने अजून एक तर्क लावला...


"शिट यार.. तू ह्या गोष्टीला सारखा सारखा तिथेच का येवून सोडतोस... शेवटी गोष्ट अशी आहे कि कोणाला... खास करून ह्या बाप बेटीला माझ्या विरुद्ध कट रचून काय भेटणार आहे...?" रोहन आत्ता एकदम रागात बोलला...


"तुझ्याकडे
असणारा भरमसाट पैसा... तुला प्रेमामध्ये फसवून हि किंवा ती नीरु तुझ्या बरोबर लग्न करू शकते... आणि मग आर्ध्या दौलतीची मालकीण बनू शकते... ह्याच्यामध्ये कोणा दुसऱ्याचा पण हिस्सा असू शकतो... म्हणजे तुझ्या कोणत्या खास मित्राचा किंवा नाते-वाईकांचा... कारण ह्या लोकांच्या मध्ये एवढी हिम्मत नाही आहे एवढी मोठी प्लान्निंग करायची... आपल्यांना ह्यांची मुळ शोधली पाहिजेत... कोणी ना कोणी तरी जरूर आहे... ह्या सगळ्यांच्या पाठी... आणि मी आजच माहिती करून राहणार..." नितीनने बिअरची बाटली संपवून टेबल वर ठेवली...

रोहनने आपल्या डोक्यावरती हाथ मारला, "अच्छा... आजच माहिती करणार.? विचारू शकतो कसं..?"  रोहनने विचारलं.


"काय वेळ झाली आहे...?" नितीनने विचारलं..


"१.३० वाजले आहेत... का...?"


"श्रुती येताना बोलत होती कि ती ४ वाजे पर्यंत येणार... बस मधून घरी जाण्यासाठी तिला कमीत कमी १.३० तास तरी लागत असणार... लवकर अजून एक एक बिअर मांगव... नंतर कॉलेजच्या इथे जाऊया...?" नितीनने वेटरला इशारा केला.


"शेवटी काय करायचा विचार केला आहेस तू यार..?" रोहन
त्याला बघत बोलला...

"श्रुतीला सगळं काही सांगायलाच लागणार..." नंतर वेटरकडे बघत बोलला..."२ चिल्ड अजून..."


"तू काय परत श्रुतीला जबरदस्ती गाडी मध्ये टाकण्याचा विचार करत तर नाही आहेस..?" रोहनने आश्चर्याने विचारले.


नितीनने आपल्या होठांवर बोट ठेवून त्याला गप्प राहण्याचा इशारा केला.


रोहनला विचार करूनच अंगावरती शहारे आले, "आणि जर ती निर्दोष निघाली तर...?"


"तर काय...? सकाळी तिला परत तिच्या कॉलेज मध्ये सोडू... आपल्यांना कोण ओळखत..?" नितीन एकदम आरामात बोलला.. जसं त्याच्यासाठी ती एकदम छोटीशी गोष्ट असेल .


"तुझ्या गाडीचा नंबर..?" रोहन कश्याप्रकारे तरी त्याला हे करण्यासाठी थांबवत होता...


"मीने आज पर्यंत माझ्या गाडीवर कधी खरी नंबर प्लेट लावली आहे काय...?" नितीन मिशीत हसत बोलला.


क्रमश....
Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment