Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Saturday, 26 May 2012

भाग ~ ~ १७ एक प्रेम कथा

एक प्रेम कथा

Update 17


"मी आजच घरी निघून जाऊ का...? आई पण चिंता करत असणार..." रोहन त्याच्या प्लान मध्ये सहभागी होण्यासाठी तैयार नव्हता.

"हे तर अजूनच चांगल होईल... नाहीतरी मला आजच तुला घरी पाठवायचं होतं... गाडी देऊन... पण आत्ता तर तुला ट्याक्सी करून जायला लागणार..." नितीन खुश होत बोलला.

"मला काही प्रोब्लम नाही आहे... तू फक्त स्वतःची काळजी घे... तिचं कुठल्या हि प्रकारचा फायदा नको घेवूस... बेचारी खूप निरागस आहे..." रोहनने गाडी मधून निघत बोलला...

"तू गप्प बस ना यार... मी काय तिचा रेप नाही करणार आहे... काही विचारायचं तर आहे तिला.. ठीक आहे ना..." नितीन बोलला.

रोहन काहीच बोलला नाही... तो चुपचाप नितीनला बघत होता... "तरी पण यार..." रोहन आत्ता पण नितीनच्या हट्टाचा विरोध करत होता.

"चिंता नको करूस यार... तुला तर माहिती आहे कि मी मनाने किती चांगला आहे..." नितीनने रोहनशी  हाथ मिळवला आणि गाडी स्टार्ट केली.

----------------------------------------------------

कॉलेजच्या गेट वर एक तास वाट बघून शेवटी श्रुती गेट मधून त्याला बाहेर येताना दिसली.

"ओय... आली .." नितीन मनातल्या मनात बोलला आणि गाडी स्टार्ट केली.

काहीतरी मनात बडबडत नीतीने गाडी थोडा अजून पुढे आणली जिथे श्रुती रोड क्रॉस करत होती.

श्रुतीने गेट मधून बाहेर येतानाच त्याची गाडी ओळखली होती आणि नितीनला पण आपल्या कडे बघत असताना बघितलं होतं. तिने आपली मान खाली केली आणि त्याला ओळख न दाखवता ती कॉलेजच्या पुढे चालू लागली होतीच कि नितीनने बरोबर गाडी तिच्या जवळ उभी केली, "हाई... श्रुती..."

श्रुतीने त्याला तिरप्या नजरेने बघितले आणि काहीच न बोलता ती पुढे चालू लागली... नितीनने एक क्षण पण नाही घालवला तो फटाफट गाडी मधून उतरला आणि श्रुतीच्या समोर येवून उभा राहिला.. "मी पण गावातच जात आहे... ये ना गाडीत बस..."

श्रुतीने नजर वर करून नितीनला बघितल आणि, "मला जाऊदे... मी बस ने जाईल... बाजूला हो माझ्या रस्त्यामधून..."

"तू तर खाली फोकट त्या गोष्टीला मनाला लाऊन घेतलं आहे यार... ती फक्त एक थट्टा होती.. जर मी सिरिअस असतो तर तुला इथे सोडलं असतं का... ऐक तरी... मी तिथेच जात आहे... गावात..." नितीन ने तिला प्रेमळ पणे समझवण्याचा प्रयत्न केला.

नितीनच्या ह्या लाडी गोडी श्रुती वर हलकासा परिणाम जाणवला... श्रुतीचे डोळे आपसूकच खाली झाले...

"तू समझत का नाही आहेस...? हे माझं कॉलेज आहे... सगळे  मला इथे ओळखतात... माझ्या बद्दल काय विचार करणार...? प्लीज बाजूला हो आणि तुला जिथे जायचे आहे तिथे जा... मी बस ने जाईल... आगोदर पण जायाची... प्लीज मला जाऊ दे.." श्रुती बोलली..

नितीनला तिच्या बोलण्यावरून समझल कि काम होवू शकतं... "मला माहिती नव्हतं कि तू इतक्या कोमल मनाची आहेस कि जराश्या गोष्टी मुळे तुला इतके दुख होणार... मी तर फक्त आपला समझून मस्करी केली होती... असंच... तुझ्या ह्या गोड  चेहऱ्यावरती  हा राग चांगला नाही वाटत... जर तू बोलत असशील तर मी इथे सगळ्यांसमोर कान पकडून उभा राहू शकतो... पण प्लीज... मला माफ कर... परत कधीच अशी चूक नाही करणार... तुझी शपथ...!" आणि नितीन खरोखरच आपल्या कानाला हाथ लाऊन उभा राहिला...

नितीनने एवढं बोलल्यामुळे श्रुतीला त्याची गोष्ट मनाला लागली होती... तरी पण.. तिथे सगळ्यांसमोर ती गाडीमध्ये बसणे  अशक्य होते... पहिलेच तिथे तिला आपलं तमाशा होतं आहे असं दिसत होतं... काय माहित काय विचार करून श्रुतीच्या तोंडून निघालं... "थोडं पुढे ये प्लीज... इथे माझं तमाशा नको बनवूस... एवढं बोलून ती त्याच्या बाजूने पुढे निघाली..."

नितीन खुशीने उड्या मारत गाडी जवळ गेला...

नितीन हळू हळू गाडी पुढे घेवून जात होता...

बस स्टोप जवळ येता येता श्रुतीचं चालणं हळू हळू झालं... कदाचित तिने मन बनवलं होतं, गाडीत बसण्याचं... कारण श्रुतीला माहिती होतं कि त्याने तिला कॉलेज मध्ये सुखरूप सोडलं होतं...

"ये आत्ता...!" नितीन ने गाडी तिच्या बराबर येवून उभी केली...

श्रुती ने एकदा भिर भिरती नजर रोड वर उभे असणाऱ्या लोकांवर टाकली... तिथे कोणीच ओळखीच न दिसल्यामुळे तिने पटकन दरवाजा खोलला आणि आतमध्ये येवून बसली.

"लवकर चल प्लीज..." एक दिर्घश्वास घेत श्रुती बोलली आणि पुढच्या सीटच्या पाठीमागे डोकं ठेवून डोळे मिटून बसली..

क्रमश.... 
Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment