Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Wednesday, 30 May 2012

भाग ~ ~ १९ एक प्रेम कथा

एक प्रेम कथा

Update 19नितीनने तिला बेडवर ठेवून एकदा मनातल्या मनात... "किती सुंदर मुलगी आहे..." एवढं बोलून तो अचानक उठला आणि रूम मधून बाहेर निघून गेला.


रूम बंद करण्याचा आवाज येताच... श्रुतीने हळूच आपले डोळे उघडले... आपल्या श्वासावरती कंट्रोल करत तिने एक भिरभिरती नजर पूर्ण रूम मध्ये फिरवली... तिथे कोणीच नव्हतं... पण तिथे पसरलेली शांतताच एक भयावह वातावरण वाटत होती... श्रुतीच्या डोळ्यापुढे काही क्षणापूर्वी अमानुशिक दृश्य राहून राहून येत होतं... त्या दिवाळाकडे पण बघण्याची तिची हिम्मत होत नव्हती... श्रुती अचानक उठली आणि बाहेर निघायच्या दरवाज्या जवळ गेली... पण तिचा हा प्रयत्न व्यर्थच गेला... कारण दरवाजा बाहेरून बंद होता...


"अरे देवा... आत्ता मी काय करू...?" गुढगे मोडून तिथेच बसून रडणाऱ्या श्रुतीकडे काहीच पर्याय नव्ह्ता...


"आत्ता.... आलो म्याडम...!" अचानक आलेल्या आवाजाने श्रुती जवळ जवळ उडालीच... "कोण... कोण आहे...?" भयमुळे श्रुतीचे डोळे आणि हृदय एकदम दोन्ही बाहेर निघायला तैय्यार होते... पण त्याच्या नंतर तिला काहीच आवाज नाही आला.


असल्या वातावरणात मोठ मोठे तीस मार खान पण थर थर कापायला लागतात... श्रुती तरी पण एक मुलगी होती... भयमुळे ती रूम मध्ये इकडे तिकडे बघत ती दिवाळाला टेकून उभी राहिली होती.


अचानक दरवाजा उघडला आणि जवळ जवळ ३५-४० वयाचा एक विचित्र चेहऱ्याचा, लांब तगडा माणूस रूम मध्ये आला... श्रुती भय मुळे एकदम घाबरून ती एक कोपऱ्यात जाऊन उभी राहिली...


"काही पाहिजे का म्याडम...!" त्या माणसाने एकदम विनम्रतेने तिला विचारलं.. पण ती विनम्रता पण श्रुतीला कोणी यमराज बोलत आहे अशी वाटत होती...


"कोण आहेस तू... मला इथून जाऊ द्या प्लीज...!" श्रुतीने उभ्या उभ्याच आपले दोन्ही हाथ जोडून त्याच्याकडे बघत बोलली...


"मी भगवान आहे म्याडम... भगवानदास ... साहेबांचा नोकर आहे... आणि त्यांच्या पाहुण्यांचा पण... आत्ता साहेब इथे नाही आहेत.. काही पाहिजे असेल तर परत मला आवाज देवू शकता... काही पाहिजे का तुम्हाला आत्ता...?"


"मला जावू द्या प्लीज... मला जायचे आहे इथून...!" श्रुती त्याला बोलली...


"पण इथून तर कोणीच परत नाही जात.. जेव्हा साहेबांच काम झालं तर ते तुम्हाला मला गिफ्ट करतील... हा हा हा ... तेव्हा पर्यंत तुम्ही माझी मालकीण आहात... पण माझ्या समोर परत जाण्याचं काही बोलायचं नाही... साहेबांनी मला सांगून ठेवलं आहे कि मला काय करायचे आहे ते... जर तुम्ही इथून निघायचा प्रयत्न  केला तर... हे हे हे..." भगवानदास बोलला आणि बाहेर निघून गेला... बाहेरून दरवाजाला कडी लावली...

क्रमश.... .

Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment