Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Friday, 18 May 2012

भाग ~ ~ २ भय....!

Update 2

असो, सवयीमुळे जेव्हा आज रात्री पण मी उठलो तर मला वाटले कि मी काहीतरी आवाजाने उठलो ना कि लघवीमुळे. पण रात्रीचे १ वाजले होते आणि मी झोपेत होतो, लघवी करण्यासाठी मी अर्धे डोळे उघडून धडपडत भिंत पकडत बाथरूम कडे निघालो.

आणि परत बाथरूम च्या दरवाजा जवळ मला तोच आवाज ऐकू आला. काही तरी जमिनीवर पडण्याचा आवाज. आवाज खूप हळू होता  पण साफ ऐकायला येत होता. मी माझे डोळे पूर्ण उघडले आणि बाथरूमच्या दरवाज्या जवळ एक क्षण थांबलो.


तेव्हा आवाज परत आला, ह्यावेळी आवाज पडण्याचा नव्हता, एक वेगळ्या प्रकारचा आवाज होता. असं वाटलं कोणीतरी धारधार वस्तूने काहीतरी खुरडण्याचा प्रयत्न करत आहे, जसं सुरी किंवा खिळ्याने आरश्यावर घासण्याचा आवाज.


आवाज माझ्या आई वडिलांच्या खोलीच्या दिशेने येत होता, जे अनपेक्षित होतं. माझ्या आई वडिलांची सवय होती कि लवकर झोपून जायचं आणि सकाळी लवकर उठून पार्क मध्ये चालण्यासाठी जात होते. मला टीवी चा आवाज कमी कर असं सांगून रात्रीचे १० वाजता त्यांच्या रूम ची लाईट बंद व्हायची, ह्याचा अर्थ असा कि रात्रीच्या १ वाजता ते खूप गाढ झोपेत असायचे.


पण त्या रात्री असं नव्हतं, त्यांच्या रूमची लाईट चालू होती आणि आतमधून तो विचित्र आवाज येत होता. एका क्षणासाठी मी बाथरूमचा दरवाजा सोडून त्यांच्या रूमकडे जाण्यासाठी निघालो, पण कदाचित मी त्यांच्या रूम कडे गेलो असतो, बघितलं असतं आतमध्ये काय चाललं आहे, त्याच्या नंतर जे काही झालं असतं ते माझ्या सध्याच्या परिस्थितीहून तरी चांगलं असतं. पण मी असं केलं नाही.


त्यांच्या रूमकडे जाऊन बघण्या बदली मी पहिले बाथरूम मध्ये जाणे जरुरी समझले, मी त्यांच्या रूम कडे जाता जाता परत पाठी फिरलो आणि बाथरूम मध्ये घुसलो.


आणि एकदा परत मला तोच आवाज ऐकू आला, ह्यावेळी पण तोच खुरडण्याचा आवाज पण त्याच्या नंतर अजून एक आवाज आला त्याने मी भानावरती आलो. कोणाच्या तोंडावरती जबरदस्ती जर हाथ ठेवून त्याचं तोंड बंद करतात तर तोंडातून होणारा आवाज कसा असतो, तसाच आवाज होता. माझे सगळे काम लवकर संपवून आणि बाथरूम मधून बाहेर निघून मी आई वडिलांच्या रूम कडे निघालो.


लहानपणी एक गोष्ट ऐकली होती, अकबरच्या दरबारात कोणीतरी बोललं होतं कि, आई वडिलांना त्यांच्या मुलांचा जीव सगळ्यात प्यारा असतो. सगळेजण ह्या गोष्टीवर सहमत झाले फक्त बिरबल सोडून. बिरबल बोलतो कि नाही सगळ्यांना आप-आपलं जीव प्यारा असतो आणि त्याच्या नंतर दुसऱ्या कोणाचा. मोठ्या चर्चेनंतर बादशाह ने बिरबलला त्याची गोष्ट साध्य करायला सांगितली.


बिरबलने शिपाईला एक अशी माकडीण पकडायला सांगितली जिच्याकडे छोटं मुल असेल. जेव्हा शिपाईने माकडीणीला पकडून आणलं तर, त्या माकडीणीला एका पाण्याच्या सुख्या ट्यान्क मध्ये तिला तिच्या मुलासह बांधलं गेलं. मग बिरबल ने त्या ट्यान्क मध्ये पाणी भरायला सांगितले.

क्रमशः 

Previous Update                  Next Update

0 comments:

Post a Comment