Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Friday, 1 June 2012

भाग ~ ~ २० एक प्रेम कथा

एक प्रेम कथा

Update 20श्रुती एका कोपऱ्यात उभ्या उभ्या थर थर कापत होती.. घाबरल्या मुळे तिचा गोरा चेहरा, पिवळा पडला होता... राहून राहून तिला तिच्या घरी असलेल्या वडिलांची आठवण येत होती आणि ती रडायला लागली होती... आत्ता तर ते तिच्यासाठी चिंता पण करायला लागले असतील...


"म्याडम जेवण...!" दरवाजा उघडून आतमध्ये येवून भगवानदासने टेबल वरती एक ताट ठेवलं... एकदा तर श्रुतीच्या मनात आलं कि पळून जाण्याचं प्रयत्न करू... पण तिच्या पायांनी तिला साथ दिली नाही... तिला भगवानदासची गोष्ट आठवली... 'साहेबांनी मला सांगून ठेवलं आहे कि तुम्ही पाळण्याचा प्रयत्न कराल तर काय करायचे आहे ते...'


घाबरलेल्या श्रुतीने जेवणाकडे बघितले सुद्धा नाही... भगवानदास गेल्या नंतर तिने आपले अश्रू पुसत बेड वर जाऊन बसली...


----------------------------------------
"तर काय बोलणं झालं त्या मुलीबरोबर...?" रोहन नितीनच्या शेजारी एकटा बसला होता...


"काही खास माहिती नाही पडलं... तिला घरी जायची घाई होती आणि ती रडायला लागली... तर मला तिच्या वर दया आली आणि मी तिला जाऊ दिलं... परत भेटण्याचं वचन घेवून...!" नितीन एकदम खोटं बोलला...


"माझ्याने आणखी वाट नाही पाहवत यार... मी उद्या सकाळीच पंजाबला जाणार आहे.. चल ना माझ्या बरोबर... मीने आई वडिलांना पण विचारले आहे..." रोहनने नितीनला बरोबर चलण्याचा आग्रह केला.


"काय सांगितलं तू त्यांना...? कि तुला स्वप्नात त्यांची सुनबाई भेटली म्हणून...?" एवढं बोलून नितीन जोरात हसला...


"मी पागल आहे काय...?" रोहन बोलला...


"मग...?"


"बस असाच काही तरी बोललो... तू बोल ना... येतोयस ना माझ्या बरोबर...?" रोहनने नितीनला परत विचारले...


"का..? तिथे पण भूत वैगेरे भेटण्याचे चान्सेस आहेत का...?" नितीन परत जोरात हसायला लागला..

"माझी मस्करी नको करूस यार... तुला माहिती आहे माझ्याने एवढी लांब ड्राईविंग नाही होणार ते... आणि ड्राईवरला तर मी सोबत नाही घेवू शकत... ये ना यार..." रोहन बोलला...

"बघ माझ्या कडे एक दिवसापेक्षा जास्त टाईम नाही आहे... तुला स्वतः काहीतरी करायला लागणार..." नितीनने साफ नकार दिला...

"खरं तर मी ने रविंदरला माझ्यासोबत येण्यासाठी तैय्यार केला आहे... पण बस किंवा ट्रेनने जायला लागणार" रोहन बोलला...

"त्याच्यात काय होणार.. जा ना मग...
ड्राईविंगचा ताप पण नाही होणार... चल आत्ता मी निघतो आहे... सकाळी लवकर उठून एक काम पूर्ण करायचं आहे..." एवढं बोलून नितीन उठला...

रोहन त्याला दरवाजा पर्यंत सोडायला आला आणि परत येवून आपल्या बेड वर झोपून गेला.

क्रमश.... .

Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment