Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Sunday, 3 June 2012

भाग ~ ~ २२ एक प्रेम कथा

एक प्रेम कथा

Update 22श्रुतीने त्याच्या गोष्टीला होकार दिल्या मुळे नितीनने प्रेमाने तिच्या गालावर एक पप्पी दिली, "तू कुठल्या हि गोष्टीची चिंता नको करूस... ते सगळं एक नाटक होतं... तुला घाबरवण्यासाठी... कारण तू चुपचाप माझी प्रत्येक गोष्ट मान्य करावी..."


नितीनच्या बोलण्यावरून आत्ता श्रुती एकदम निश्चिंत झाली होती... पण पूर्ण पणे नाही... "पण... ते मृतदेह...?" ते आठवताच  श्रुती परत एकदा शहारली...


"हा हा हा... एक मिनट... भगवान दास...!" नितीनने जरा जोरात आवाज दिला...


"होय साहेब..." भगवानदास दरवाजाच्या बाहेरून बोलला...


नितीन उठला आणि दरवाजा खोलत बोलला, "जा एकदा तो मृतदेह उचलून आण..!"


भगवानला माहिती पण नव्हतं कि नाटक संपलं आहे.. नितीनच्या जवळ जाऊन तो हळू आवाजात बोलला, "पण साहेब.. त्यांना तर मी धुवून टाकलं आहे..."


"हो.... हो... तेच..." बोलत नितीन परत येवून श्रुतीच्या बाजूला येवून बसला..., "खरं म्हणजे ते रबरचे पुतळे आहेत... शिकार करण्याच्या वेळेस आम्ही त्याच्यावर रक्त लाऊन जनावरांना आकर्षित करतो.. आत्ता तू पूर्ण उजेडात त्यांना बघशील तर सगळं समझून जाशील..."


श्रुती प्रतिक्रिया देणारच होती कि तेवढ्यात भगवानदास 'एका मृतदेहाला' केसांना पकडून खेचत रूममध्ये आणलं.


श्रुती आश्चर्याने उडालीच..., "हे तर... नकली आहेत..."


"मी काय आत्ता फारसी बोलत होतो... !" नितीन हसत बोलला..., "मी काय तुला एक आदमखोर दिसतो...?"


हे ते पुतळेच होते ज्याने श्रुतीला आपल्या मर्जीच्या विरुद्ध नितीनला होकार दिला... नाहीतर... "आत्ता तरी मला घरी सोडून ये... मी काही पण सांगेन बाबांना... सकाळ पर्यंत नाही गेली तर ते मरून जातील..."


"आत्ता कुठे... आत्ता तर तुला इथे आणण्याचा प्लान पण पूर्ण नाही झाला आहे... बाबांची चिंता नको करूस... मी एका मुली कडून तुझ्या घरी फोन करून घेतला आहे कि तू तिच्या जवळ आहे आणि आजची रात्र इथेच थांबणार आहे..." नितीन बोलला...


"पण तुला घरचा नंबर कुठून भेटला...?" श्रुतीने आश्चर्याने विचारले...


"तुझ्या बाबांकडून घेतला होता.. जेव्हा मी आणि ते एकत्र बसलो होतो... असंच..." नितीन दरवाजा बंद करून तिच्या जवळ येवून बसला...


"पण तुने माझ्या बरोबर असे का केले...?" श्रुतीने परत एकदा डोळ्यात पाणी आणत त्याला विचारले...


"तुझे १० करोड आणि माझ्या ३० करोड साठी... जर तू माझ्या बरोबर लग्न करायला तैय्यार असशील तर ते आपले ४० करोड होतील..." लग्नचा विषय काढून त्याने तिच्या दुखत्या नसावरती बोट ठेवलं होतं... तिला कधीच माहिती नव्हतं कि तिला लग्नासाठी प्रपोज करणारा पहिला मुलगा असा भेटेल म्हणून.. एवढं विचार करूनच श्रुती परत रडायला लागली...


"डोन्ट बी इमोशनल यार... जीवनात काही हासील करण्यासाठी काहीतरी विसरायला लागतं... आणि १० करोडसाठी तर हि गोष्ट काहीच नाही आहे... तू रडगाणे सोड आणि मी काय सांगतोय ते नीट ऐक...!" नितीन तिच्याकडे बघत बोलला...


"काय ऐकू मी आत्ता...?" श्रुती परत रडायला लागली... "तुम्हाला माहिती तरी आहे काय कि मुलीची आबरू किती महत्वाची असते ती...? आणि तुम्ही माझी किंमत लावत आहात... माझ्या जीवनाची... आता मी जगणार तर फक्त माझ्या बाबांसाठी...तुम्हाला माहित नाही कि तुम्ही माझ्या मनाला किती ठेस पोहचवली आहे ती...!" श्रुती रडत रडत बोलली...


"पण मी बोललो ना... कि मी तुझ्या बरोबर लग्न करायला तैय्यार आहे... मी काय बोलतोय ते तरी ऐक.. नाही तर... तुला माहिती आहे" नितीन बोलला...


श्रुतीला तर घाबरवण्याचा फक्त एक इशाराच काफी होता... हि धमकी ऐकून ती परत एकदा थरथरायला लागली... म्हणून श्रुती परत एकदा गप्प बसली...


"माझं एक काम तुला करायला लागणार... त्याच्या बदली मी तुला एक किंमत पण देईन... १० करोड..." नितीनने तिच्या हातांना आपल्या हातात घेत बोलला...


"काय...?" श्रुतीने उत्तर १० करोडच्या लालची मुळे नाही दिलं होतं... पण उत्तर तर देणं गरजेच होतं... गोष्ट ऐकणं गरजेच होतं...


"पहिले तुला एक गोष्ट ऐकवतो... रोहन त्याच्या वडिलांचा एकुलता मुलगा आहे... सरळ सरळ त्याच्या बापाची ८० करोडीची मालकी हक्क त्याच्या कडेच येणार... पण मला नाही वाटत तो एवढी मोठी दौलत सांभाळू शकेल... खूप सिधा आणि सरळ सभ्य मुलगा आहे बेचारा... कोणी ना कोणी तरी तिची हि दौलत लुटणारच... तर का नाही मी काही विचार करू... हे हे हे... खरं म्हणजे मोठा भाऊ माणतो तो मला...!" बोलता बोलता नितीन थांबला...


श्रुतीची काही प्रतिक्रिया नाही भेटत म्हणून त्याने परत बोलणं सुरु केलं, "खरं म्हणजे काही महिन्यांपासून त्याला एक विचित्र स्वप्न येत आहे... त्याच्या स्वप्नात तू येतेस आणि त्याला तुझ्या जवळ बोलावतेस... गेल्या जन्माची शपथ देवून... हे सगळं एक विचित्र आणि माझ्या डोक्याबाहेर आहे... पण काही घटनांमुळे मला पण विचार करण्यासाठी मजबूर केलं... रात्री तुझं जे ड्रेस फाटण... ते तू स्वतः त्याच्या स्वप्नात फाडलं होतं... किती विचित्र आहे ना... असो आपल्यांना त्याच्याशी काय घेणे देणे... फक्त कामाची गोष्ट ऐक... तुला बघून तो तुलाच त्याच्या स्वप्नाची राणी समझायला लागला होता... पण नंतर स्वप्नातच तुनेच त्याला बोललं होतं कि तू ती मुलगी नाही आहेस... कोणी दुसरी आहे... नीरु नावाची... समझलीस काही...?"


"नाही...!" खरोखर श्रुतीला काहीच समझल नव्हतं....


"चल एक मिनट... तुला सगळी गोष्ट एक दम क्लीअर सांगतो... " एवढं बोलून नितीनने तिला पूर्ण गोष्ट सागायला लागला जे त्याचं जुन्या वाड्या कडे जाण्या पासून आज रोहन कडून ऐकलेली कहाणी पण त्याने एकदम स्पष्ट तिला समझावली...


"जर त्याची सगळी गोष्ट त्याच्या डोक्याचा काहीतरी भ्रम आहे तर तुम्ही त्या पिंपळाच्या झाडाला खाली का पडले होता...?" श्रुतीला आत्ता रोहनची कथा खूप आवडत होती... खरंतर तर तिच्या डोक्यात तो एक भ्रम नसून पूर्व जन्माची एक खरी कथा आहे असं ती मानत होती...


"ते मी नाटक करत होतो... एका ठिकाणी मी त्याला हे सांगत होतो कि हे सगळं काही खरं नाही.. दुसरी कडे त्याच्या डोक्यात मी नीरुच भूत भर भरून टाकत होतो... कारण त्याला माझ्यावर काही संशय ना येवो..." नितीनने तिच्या समोर आपल्या मनात चाललेली घाणेरडी प्लानिंग तिला समझावली...


श्रुतीने त्याच्या डोळ्यात बघितले... नितीन ने आपल्या बद्दल श्रुतीच्या डोळ्यात राग बघितला, "अशी काय बघतेस...?"


"काही नाही आत्ता माझ्या कडून काय पाहिजे तुला...?" श्रुतीने आपली नजर झुकवत बोलली...


"ह्याचा अर्थ असा कि तू माझ्या प्लान मध्ये सहभागी होणार आहेस... तू रोहनला विश्वासात घे कि तुला सगळं काही आठवलं आहे... आणि तूच त्याच्या पूर्वजन्माची प्रिया आहेस... म्हणजे ह्या जन्माची रोहनची नीरु ...!"

क्रमश.... .

Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment