Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Tuesday, 5 June 2012

भाग ~ ~ २३ एक प्रेम कथा

एक प्रेम कथा

Update 23"तुला तर वेळेचे काही भानच नाही आहे... किती वाजता यायला सांगितले होते तुला...?" रोहन रवि येताच त्याच्यावर ओरडायला लागला...

"काय झालं मित्रा...? टेन्शन नको घेवूस यार.. मी आलोय ना... बघ तुझ्यासाठी उठल्यावर लगेच आंघोळी न करताच पळत पळत आलो... फक्त परफ्युम मारला आहे... " नंतर रविने पुढची गोष्ट हळूच त्याच्या कानात सांगितली... "मळलेल्या कपड्यामध्येच... धुतलेले भेटलेच नाही यार... तू ने काल रात्रीच सांगितलं होतं..."

"तू नाही सुधरणार...! आपली ट्रेन सुटली ना... ट्रेनमध्ये जाण्याचा प्रोग्राम होता... आता बसमध्ये जायला लागणार..." रोहन तोंड वाकडं करत बोलला...

"अशी पण कुठे घाई आहे...? येणारी आपल्या आप मला सुधरवेल... कोणी हिच्यासारखी... " बाजूने जाणाऱ्या सुंदर मुलीकडे बघत रवि बोलला... मुलगीने  कदाचित त्याचं बोलणं ऐकलं... आपलं चालणं हळू करत एकदा रागाने रविकडे बघितलं आणि परत चालायला लागली...

"बघ कशी बघत होती... मला असल्याच मुलीची गरज आहे... एकदम लाल मिरची सारखी... जी मला सुधरवू शकेल... बरोबर ना !... हे हे हे..." रवि थोडा अजून जोरात बोलत मुलगी पर्यंत त्याची कम्प्लेंट पोहचवली...

"आपल्या तोंडाला फेविकॉल लावून जरा बंद ठेवत जा... नाही तर कधी अशी धुलाई होईल कि..." रोहनने परत वळून बघणाऱ्या मुलीकडे बघत खेद प्रकट केला...

"अरेय धुलाई वूलाई सोड... चल बस स्टोप शुधू कुठे आहे तो... नाही तर बस सुटायचा आरोप पण माझ्या डोक्यावरतीच मारशील... बाकी पोरगी एकदम आईटम होती.. ना..?" रवी बोलला..

"अबे हे काय आहे काका... बस स्टोप तर आहे हा...!" रोहन चीढत बोलला...

"ओह... आय एम सॉरी.. मी तर विसरलोच होतो कि तुने मला परत फोन करून बस स्टोपवरती यायला सांगितले होते ते... पण आपण जात तरी कुठे आहोत... ते तरी सांग..!" रवीची बडबड चालूच होती...

"भाड मध्ये जात आहोत आपण... आत्ता एक दम शांत उभा राह... थोड्यावेळात बस येणार आहे..."

"बघ भाऊ... भाडमध्ये जायचं वा कुठे हि... पण खटारा बसने मी नाही जाणार... एक दम नवीन करकरीत बस पाहिजे.. एक्स्प्रेस..!" रवी बोलला...

"हं... तुझ्या बापाची जागा आहे काय हि... सोड... त्याची चिंता नको करूस...  ए.सी. बस आहे... "

"मग ठीक आहे... बघ भाऊ.. जिथे पण जायचे आहे.... माझ्याशी बोलू नकोस... पूर्ण झोपून जाणार आहे मी... आज ५ तास आगोदर उठायला लागले आहे मला... तुझ्या मुळे... तरीपण जायचे कुठे आहे आपल्यांना... ते तरी सांग..."

"तू गप्प राहशील तेव्हा तर मी सांगेन... इथून अम्रीत्सरला जाणार आहोत... पुढचं पुढे सांगेल तुला... आत्ता पुढे काहीच नको विचारूस..!" रोहन त्याला बोलला...

"अम्रीत्सर..? अम्रीत्सर मध्ये तर एकदा माझी आजी हरवली होती.. यार... सुवर्ण मंदिराच्या इथे काहीतरी खाण्यासाठी उतरली होती.. आणि माझ्या आजोबांना पण आठवण नव्हती कि माझी आजी त्यांच्या बरोबर आहे... बस... काय झालं गाडी स्टार्ट केली आणि निघाले... नंतर आठवण झाली तर खूप वैतागले... तुला माहित आहे जेव्हा शोधत शोधत ते परत आले तर आजी त्यांना काय करत भेटली... ?" रवी ने विचारले...

"काय यार...?" रोहनने चीढत विचारले...

"काही तरी खात भेटली... अजून काय...? काही तरी खाण्यासाठी तर उतरली होती... हे हे हे..."

"बस आत्ता गप्प हो.. बस आली चाल ब्यॉग उचल..." रोहन ने त्याचे तोंड बंद केले आणि ब्यॉग उचलून बस मध्ये चढला...

"आहा... जर बसची सीट अशी असेल तर घरचं पेट्रोल का वाया घालवा...! खरंच यार... खूप चांगली झोप येणार..." एवढं बोलत रवी ने आपले पाय उचलून पुढच्या सीट वर ठेवून आपल्या झोपण्याचा प्रोग्राम बनवला...

पुढच्या सीट वर बसलेल्या सरदारजीने मागे वळून त्याला पाहिले, "ओए ! पूर्ण बस विकत घेतली आहे तुने... पाय तर खाली घे...!"

"आत्ता कुठे सरदारजी... आत्ता तर टेस्ट ड्राईव वर जात आहे... हा हा हा.." बोलत रवी ने आपले पाय खाली घेतले आणि आपली बेल्ट ढिली करायला लागला...

तेवढ्यात सरदारनी सरदारजी ला ओरडायला लागली... तर सरदारजी बोलले..."मी काय बोललो आहे लाडो.. माझ्या कांध्या वरती पाय ठेवणार तर मी काहीच नको बोलू... बघ तू गिफ्ट केलेल्या शर्टला खराब करून टाकले.. " सरदारजी बोलला...

अचानक बस मध्ये चढलेल्या एका सुंदर तरुणीला बघून रोहनचा श्वासच थांबला... खुल्या केसांना सारखी हाथ लावत, नजर खाली ठेवत ती मुलगी आपला सीट नंबर शोधत येत होती... गोऱ्या रंगाने आणि संमोहित करणाऱ्या डोळ्यांनी काही क्षणासाठी रोहनला पण हैराण केलं... ह्याच कारणामुळे बसचे प्रत्येक व्यक्ती तिला न्याहाळायला लागला.. रोहनला भान तेव्हा आली जेव्हा ती मुलगी त्यांच्या जवळ येवून..."एक्सक्युझ मी..! हि आमची सीट आहे...!"

रवी रोहनला कुठे बोलून देणार होता..., "अच्छा... सीट काय संगती आणायला पाहिजे काय घरून..? मी विचार केला कि बस मध्येच भेटेल.. काही प्रोब्लेम नाही तुम्ही पण या इथे खूप मोठी सीट आहे.. ते काय आहे ना आम्ही सीट आणायला विसरलो... काय रोहन...?" एवढं बोलून रवी एका साईडला सरला...

त्या मुलीला त्याच्या बोलण्याने हसायला पण आलं आणि राग पण... त्याच्या बिंदास बोलण्यामुळे अचानक त्या मुलीला पण एक वेळ समझल नाही कि काय बोलू आणि काय नाही... ती काही बोलणार तेवढ्यातच रोहन बोलला, "सॉरी मिस! हा कधी बस मध्ये बसला नाही आहे... त्यामुळे... पण माझ्या मते हि आमचीच सीट आहे...!"

"ते काय आहे म्याडम मुल कधी आपलं वचन नाही बदलत... तसंच ते सीट पण नाही बदलत... आमची सीट शोधून तिथे बस... आम्ही खूप नरम काळजाचे आहोत... काहीच नाही बोलणार... काय रोहन...!" एवढ बोलून रवी त्या मुलीला डोळे फाडून बघत होता...

मुलीला अचानक काय सुचलं काय माहिती... तिने खिडकीच्या बाहेर बघितलं आणि आवाज दिला..., "रितू... लवकर ये...!"

"काय झालं...?" मुलगी काही ह्या अंदाजाने वरती चढली जसं काही तिला कोणी आपतकालीन वेळेस आवाज दिला आहे.. मुलगी तीच होती जिला रवीने बस स्टोप वर उभ्या उभ्या फ्लर्ट चालू केली होती.. ," काय झालं...? काही प्रोब्लेम आहे काय...?"

रितू कडून एवढी तीर्व प्रतिक्रिया बघून ती बोलली, "हे आपली सीट नाही सोडत आहेत..."

"तू...?" रीतुने रवी ला ओळखून रागाने त्याला बघितले...

"ओह... आपण एकमेकांना ओळखतो काय...? माझी मेमरी थोडी कमी आहे... पण बघ... मला तुझ नाव अजून पर्यंत आठवणीत आहे... रितू!... असो... आपण पहिले कुठे भेटलो होतो.. ?" रवी ने छाती फुगवत आपली बत्तीसी दाखवत बोलला...

"आत्ता सांगते... चला उठा इथून... नाही तर आत्ता पोलीस काकांना बोलावते..." रितूने रागात आपल्या कमरे वरती हाथ ठेवून त्याला बोलली...

"पोलीस मामा तुझे काका आहेत काय...? आपण तर असेच एकमेकांचे नातेवाईक झालो... हे हे हे..." रवी पण काही कमी नव्हता...

"चल उठ ना यार.. पाठची सीट असेल आपली.. सॉरी... मिस... डोन्ट माइंड प्लीज..." बोलत रोहनने रवी चा एक हाथ पकडून त्याला खेचले... त्यामुळे रवीला उठायला लागलेच.. आणि दोघे पाठच्या सीटवर जाऊन बसले...

"ये..."मुलीने पाठी बघत रविला आपले नाजूक हथांचे डोले दाखवत चीढवले..., "माहित आहे रितू... मुलं कधी आपली सीट नाही बदलत... हा हा हा हा हा..."क्रमश.... .

Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment