Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Friday, 8 June 2012

भाग ~ ~ २५ एक प्रेम कथा

एक प्रेम कथा

Update 25"एक मिनट थांब ना यार... त्यांना तर उतरू दे..." अमित्सरच्या बस स्टोप वरती उतरताच रवीने रोहनच्या कांध्यावर्ती असणाऱ्या ब्यागेला पकडून त्याला खेचले...


"का...? आत्ता काय बाकी आहे...? लवकर चल आणि माहिती कर कि बटालासाठी कोणती बस जाणार आहे ते.." रोहन त्याला जवळ जवळ खेचतच विचारले..., "सगळ्या रस्त्यामध्ये तू त्यांना सतावत आलास... आत्ता त्यांचा येरीआ (Area) आला आहे.. इथे तुला ते सोडणार नाही... बघ...!"


"ओये होय... काय बोलला आहेस मित्रा यार तू... येरीआच (Area) नाही तर मी पण आत्ता त्यांचा झालो आहे यार.. खास करून त्या लाल मिरचीचा... बघितलं नाही तू... सारखी पाठी वळून अशी बघत होती कि जशी खाऊन टाकणार आहे... उफ ह्या पंजाबच्या मुली..." रवीने पाठी वळून बसकडे बघत बोलला...


मुली अजून पर्यंत बस मधून उतरल्या नव्हत्या... जशी रितू उठायला लागली... तिला पाया खाली काहीतरी जाणवले... हा मोबाईल होता..., "ओह... हा कोणाचा राहिला...?"


"ड्राइवरला दे रितू... कदाचित बेचाऱ्या सरदारचा असेल... परत आला तर ड्राइवरलाच विचारेल..." दुसऱ्या मुलीने रितूला बोलली...
"तू पागल आहेस काय..? येवढा महाग फोन... कोणी परत नाही करणार त्याला... ज्याचा पण असेल तो ह्या नंबर वर फोन तर करेल... तेव्हा आपण सांगू कि फोन आमच्या जवळ आहे येवून घेवून जा..." रितू बोलली...


"हो.. हि गोष्ट पण ठीक आहे.. ये.? त्या मुलाचा तर नाही आहे ना हा फोन...? बघ आपल्या जवळच येत आहे..." मुलगी बस मधून उतरताच रवीकडे इशारा करत बोलली...


रितू रविला बघताच आग बबूळा  झाली..., "येवू दे त्याला... त्याला तर मी असा फोन देईन कि स्वप्नात पण आठवण करेल मला... तू गप्प राह फक्त.." रितूने फोनला आपल्या पाठच्या खिश्यात ठेवला...


रीतुच्या जवळ येताच रवी तिच्या चेहऱ्याकडे बघताच थोडा सावध झाला... ती सारखी त्याला रागाने बघत होती... रवीची टोन अचानक बदलली.., "तुम्हाला तर राग आला... मी तर फक्त असाच कोणी आपला आहे समझून बोललो होतो..."


पहिल्यांदा रवीच्या तोंडून अशी गोष्ट ऐकून रितू पण थोडी शांत होत बोलली, "अच्छा... एक आम्हीच तुम्हाला पूर्ण बस मध्ये कोणी आपलं दिसलो...?"
"अरे माझं काय आहे मी अजून यंग आहे.." रवीने 'अजून' ह्या शब्दावर जोर देत बोलला..., "आत्ता पर्यंत तर सगळेच 'आपले' आहेत... जो पर्यंत कोणी भेटत नाही... असो हे बटालासाठी बस कुठून भेटणार...?"


"बटाला? तू.." दुसरी मुलगी बोलतच होती कि रीतुने तिचा हाथ दाबला... "पहिल्यांदा आला आहात का इथे...?" रीतुने एक गुप्त हास्य देत विचारले...


"हो मग...? बस असच समझा कि देवाने तुम्हाला भेटण्यासाठीच इथे खेचले आहे.. त्या रोहनच्यामुळे... माझं नाव रवी आहे... आणि तुमचं..?" रवी बोलला...


"अनारकली... छान आहे ना..." एवढं बोलून रितू हसायला लागली...


"खूप प्रेमळ नाव आहे.. काश माझं नाव सलीम असतं... आणि ह्यांच .." रवीने दुसऱ्या मुलीचे नाव विचारले...


"गुलाबो..! तू रस्ता विचारायला आला होतास कि...?" रितू आत्ता बोर झाली होती...


"प्लीज... आय विल बी ओब्लीजड...!" रवी मान खाली घालून बोलला...


"तुला वाट पाहायला लागणार... एक तास तरी... त्याच्या नंतर ती समोर भेटेल... झालं...?" रितूने तोंड वाकडं करत बोलली...


"मला तर पहिल्या नजरेत झालं होतं... बस फक्त तुझ्या हो ची गरज आहे.." रवी जाता जाता पण मस्करी करायला नाही विसरला...


गुलाबोने रवी जाताच रितूला विचारले, "तू त्यांना खोटं का बोललीस... बस तर निघणारच असेल... त्याच्या नंतर काय माहित कधी येणार...?"


"काय म्याडम... खूप चिंता होतेय... कोणता पसंद आला?" रितूने मस्करी केली...


"तुला माहित आहे रितू... मला असल्या गोष्टी बिलकुल नाही आवडत... मग का...?" गुलाबो नाराज होत बोलली..


"अरे यार... मस्करी पण करू नाही शकत काय..? असो जर मी त्यांना मूर्ख नाही बनवलं असतं तर त्याने पुन्हा आपल्यांना बोर केलं असतं... चल आत्ता लवकर चल... बस निघून गेली तर..." आणि दोघे जाऊन बटलाला जाणाऱ्या तैय्यार असलेल्या बस मध्ये बसले... आणि बस निघाली... रितूने बस मध्ये बसताच रवीला ठेंगा दाखवून चीढवलं आणि हसायला लागली...


"यार.. जर ह्यांची बस नाही गेली असती ना तर हि अनारकली पटलीच असती.." रवीने आपले हाथ मळत बोलला...


"हं... तुला वाटतंय तू ह्या जन्मात कोणी मुलगी पटवू शकशील..?" रोहनने हसत व्यंग केला...


"अरे... काय बोलतोस तू यार...? तू तो.. काय बोलतात... तो श्लोक नाही ऐकला का... 'मुलगी हसली तर फसली' बघितलं नाही का तू...  ती माझ्या कडे बघत हसताना..." रवी बोलला...


"हं... हसत होती...? चल सोड... यार आत्ता एक तास कसं काढणार.. आणि कुठली वेहिकल नाही जात का बटाला?" रोहनला बटाला पोहचण्याची घाई होती...


"यार हि अम्रीत्सरची गोष्ट तर समझते... पण बटाला पटाला मध्ये तुझं कोणतं काम आहे..? जिथे बस पण नाही जात.." रवी बोलला आणि लांब उभ्या एका वृत्तपत्रवाल्याला आवाज दिला... पेपर वाला पळत पळत आला.., "साहेब कोणतं पेपर देवू...?"


"हे बटाला साठी बस कधी येणार... अजून काही नाही जात का तिथे...?" रवीने विचारले...


"आत्ता तुमच्या जवळून तर गेली बस इथून... पठाणकोटवाली... तिथूनच जाते... असो बाहेर जाऊन कुणाला पण हाथ दाखवून लिफ्ट घ्या... आम्ही पंजाब वाले खूप मोठ्या मनाचे असतो... हे हे हे... पेपर कोणता देवू...?"


"हं... खूप मोठ्या मनाचे असतात पंजाब वाले... तुझी कोणत्या वृत्तपत्रवाल्याशी ओळख असेल तर एक वृत्त छापायला सांग... एक सुकडी पंजाबन आम्हाला मूर्ख बनवून गेली... चल दे... कोणता हि एक दे..." रवी बोलून रोहनकडे नाराजीने बघितले...


"नाही नाही चुकी तर माझी आहे... जे मी तुला माझ्या बरोबर आणले ते... अबे त्यांनाच रस्ता विचारायचा होता तुला...?" रोहन आणि रवी बाहेर येवून उभे होतेच कि एक लांब गाडी त्यांच्या जवळ येवून उभी राहिली.. गाडीची काच खाली झाली आणि आतमध्ये बसलेल्या एका स्मार्टश्या युवकाने विचारले..."मित्रा हे बटाला अजून किती लांब आहे...?"


रोहन बोलणारच होता कि रवीने पटकन हाथ टाकून दरवाजा अनलॉक केला आणि पटकन आतमध्ये जाऊन बसला...


"हे काय आहे मित्रा...?" युवकने आपले गोगल्स डोळ्यावरून काढत बोलला...


रवीने त्याच्या बोलण्यावर लक्ष न देता पाठचा दरवाजा उघडला, "बस ना  रोहन... हा मित्र पण बटालाला जातोय..."


रोहन ने त्या युवकाकडे बघितले तर त्याने आपले कांधे उचकावले... रोहन पाठी जाऊन बसला... युवकने गाडी पुढे केली...


"किती लांब असेल बटाला इथून...?" युवक ने परत विचारले...


"पुढे जाऊन विचारूया ... टेन्शन नको घेवूस भाऊ... आत्ता मी बरोबर आहे..." रवीने हसत त्याच्याकडे बघितले...


"म्हणजे तुला पण नाही माहित...?" युवकने चेहरा वळवून रवीकडे एकदा बघितले...


"असं आहे मित्रा... आम्ही पण इथे पहिल्यांदाच आलो आहोत... मी विचार केला... एक से भले तीन... तुझी पण मदत होईल... आणि आम्ही पण पोहचू..." रवी बोलला...


"हा हा हा... कमाल माणूस आहेस यार... घे... सिगारेट पितोस काय...?" युवक ने सिगारेट काढत विचारले...


"नाही मित्रा नाही... आणि जेव्हा पर्यंत आम्ही गाडी मध्ये आहोत... ह्याला जळवू पण नकोस..." रवी बोलला...


युवकाने अचानक गाडीला ब्रेक लावला... आणि रवीला बघायला लागला...


"काय झालं भाऊ...? पुढे जाऊन विचारूया ना..." रवीने त्याच्या हातातून सिगारेट घेवून परत पाकीट मध्ये टाकली...


गाडी मध्ये बसलेला तो युवक अचंबित होता... अचानक तो जोर जोरात हसायला लागला आणि गाडी स्टार्ट केली...


क्रमश.... .

Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment