Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Saturday, 9 June 2012

भाग ~ ~ २६ एक प्रेम कथा

एक प्रेम कथा

Update 26"नाव काय आहे आपलं...?" आपल्या स्वभावाप्रमाणे रवीला इथेही शांत बसणे नाही जमलं.

"शेखर..!" युवक ने हसत बोलला आणि मग विचारलं, "तुझ पण सांगून टाक यार.. नाही तरी तू सांगितल्या शिवाय गप्प नाही बसणार आहेस..!"

"रवी.. आणि हा जो पाठी बसून मला रागाने बघत आहे त्याचं नाव आहे रोहन... माझा सगळ्यात लाडका मित्र... हे नका समझू तो रागात आहे... ते काय आहे २ महिन्यांपासून ह्याचा चेहराच असा झाला आहे..."

"असं काय झालं आहे मित्रा.. गर्लफ्रेंड रुसली आहे काय..?" शेखर ने पाठी बघत विचारले...

"नाही मित्रा... तू ह्याला अजूनपर्यंत समझू नाही शकला आहेस काय... ह्याच्या कुठल्या हि गोष्टींचा राग मानू नकोस.." रोहन गाडीमध्ये बसण्याच्या नंतर पहिल्यांदा बोलला होता...

"हा हा हा... ते तर मी बघतोच आहे... बटालामध्ये कोणी नातेवाईक आहेत काय...?" शेखर ने विचारले...

रोहनच्या बोलायच्या आगोदरच रवी बोलला, "नातेवाईक? अरे मला तर अजून पर्यंत समझले नाही आहे कि हा मला फुटपाथ वर झोपायला सांगणार कि कुठला हॉटेल पण नसीब होईल... माहित नाही काय ठेवून विसरला आहे बटालाला .." रवी तोंड वाकडं करत बोलला...

"जिथे मी झोपणार तिथे तर तुला झोपवणारच... आत्ता तुझ्या साठी हॉटेल तर खोलू नाही शकत मी.." रोहन बोलला...

"बाय दि वे... मला सांगा तरी कोणत्या कामासाठी जात आहात.." शेखरला माहिती करायची उत्सुकता झाली...

"अजून पर्यंत मलाच त्याने नाही सांगितले तर तुम्हाला काय सांगणार...? ५-७ दिवसाचं काम बोलत आहे... आत्ता तरी सांग यार... का डोक्याची दही करतोयस...?" रवीने रोहन कडे बघत विचारले.

रोहन खिडकीच्या बाहेर बघायला लागला... त्याला काहीच नाही बोलता बघत शेखरच बोलला..."बाय दि वे ५-७ दिवसांची गोष्ट आहे तर तुम्ही माझ्या बरोबर राहू शकता... तिथे माझ्या एका मित्राचं घर आहे... एकटाच राहतो... जर तुमच्या सिक्रेट मिशन वर काही प्रोब्लेम होत नसेल तर...?"

"थ्यांक्स यार... तू तर माझ्या पेक्षा कमाल आहेस.. काही ओळख नाही पाळख नाही आणि राहायला देत आहे.. आपली खूप जमणार यार..." रवी खुश होत बोलला...

"तुला ओळखण्यासाठी वेळच किती लागणार आहे..." शेखर बोलला आणि हसायला लागला... रोहन पण हसल्या शिवाय नाही राहिला...
अचानक गाडीला ब्रेक लागताच रोहन आणि रवीचं लक्ष समोर गेलं...

"ओह तेरी... हि तर तीच बस आहे..." रवी बोलला...

बस रस्त्याच्या मधोमध उभी होती... त्याच्या समोर दुसरी गाडी उभी होती... कदाचित बसचा अपघात झाला असावा... बसच्या जवळच ८-१० प्रवासी उभे होते... त्याच्यामध्येच रवीची अनारकली... आणि 'ती' गुलाबो उभी होती.. रवीचं लक्ष त्यांच्याकडेच गेलं...

"एक मिनट थांब शेखर मित्रा..." रवीने खिडकी बाहेर तोंड काढून जोरात आवाज दिला, "या या..." जसे त्यांची जुनी ओळख आहे...

पण शेखरला ह्या वेळी राग नाही आला... तो हसत रवीला बघत होता...

"धन्यवाद भाऊ..." त्यांच्या मधल्या एका प्रवासीने त्याच्या जवळ येताच बोलला...

"अरे भाऊ... भाड्याची नाही आहे... आपली आहे आपली" रवी बोलला आणि गाडी मधून उतरून त्या मुलींच्या इथे गेला..., "या आत्ता.. कधी पर्यंत उभी राहणार... बस तर एका तसा नंतर येणार ना..."

दोन्ही मुलींनी लाजत आपले चेहरे फिरवले... काही वेळ आगोदरच तर रितूने त्याला मूर्ख बनवलं होतं...

"विचार काय करताय अनारकली आणि पार्टी... हि विचार करण्याची वेळ नाही आहे... गाडी मध्ये बसायची वेळ आहे... लवकर करा... या... मी गाडीला २ मिनट पेक्षा जास्त वेळ नाही थांबवणार..." रवी बोलला आणि वळून निघून गेला...

"काय करूया...? जाऊया...?" रीतुने विचारले...

"तू पागल आहेस काय...? डोक तर नाही सटकल आहे...? अनोळखी मुलांबरोबर.. आपण गाडी मध्ये बसुया... जरा विचार करून बोलत जा यार.." दुसऱ्या मुलीने साफ मनाई केली...

"अरे ह्याच्या मध्ये ओळख पाळख... काय बघियाची आत्ता अंधार पण होत आला आहे... सगळ्या बस भरून येत आहेत... कधी पर्यंत वाट बघणार...? राहिली गोष्ट ह्या लल्लू ची ... मी ह्याला खूप चांगल्या प्रकारे ओळखून आहे.. ह्याची बस बोलायची सवय आहे.. काही करायचं दम नाही आहे ह्याच्यात.. आणि दुसरा मुलगा तर एकदम सभ्य आहे... शोलेच्या अमिताभ सारखा... तो तर काही बोलतच नाही... चल ना काहीच नाही होत..." रीतुने तिचा हाथ पकडत बोलली...

त्या मुलीने आपली मान वळवून गाडी कडे बघितले... आणि काही क्षण थांबून तिच्या बरोबर चालायला लागली... त्या गाडीजवळ येताच रोहनने दरवाजा उघडला आणि बाजूला सरला...

"तू बस पहिले..." मुलीने रितूला सांगितले...

"ठीक आहे..." रितू रोहन बरोबर मध्ये बसली... आणि त्या मुलीच्या बसताच शेखर ने गाडी चालू केली... त्याला अजून पर्यंत समझल नाही कि मामला काय आहे...

पण रवी होता ना... गाडी सुरु होताच सुरु झाला, "ह्यांच्याशी भेट मित्रा... एक आहे अनारकली आणि दुसरी गुलाबो... जर आज हे नसते तर आपण आज भेटू शकलो नसतो... आणि आमचा बटालाला  राहण्याचा एवढा चांगला बंदोबस्त झाला नसता..." बोलत रवी हसायला लागला...
"असं का...?" शेखर ने विचारले...

"ते तर तुम्ही ह्यांनाच विचारा... नाही तर मी सांगेनच... मीठ मिरची लावून... सांगून टाका... एका अनोळखी प्रवास्यांबरोबर केलेली घटना..."

मुली आपले मान खाली करून बसले होते.. त्यांना काहीच सुचत नव्हतं कि काय बोलावे... शेखर ने त्या गोष्टीला तिथेच सोडलं आणि विचारायला लागला, "तुम्हाला जायचे कुठे आहे...?"

"ब... बटाला ..." रितू ने मान खाली ठेवतच उत्तर दिलं...

"म्हणजे एकाच ठिकाणचे प्रवासी आहात..." शेखर बोलला आणि गाडीची स्पीड वाढवली...

-----------------------

"बोलत असाल तर घर पर्यंत सोडून येवू..." बटाला येताच मुलींनी गाडी थांबवायला सांगितली तर रवीने मस्करी केली...

काहीच नाही बोलता मुली गाडीतून खाली उतरल्या... मग अचानक परत पाठी वळत रितू पुढे गेली आणि बोलली, "धन्यवाद... आणि मला माफ करा..."


क्रमश.... .

Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment