Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Saturday, 9 June 2012

भाग ~ ~ २७ एक प्रेम कथा

एक प्रेम कथा

Update 27"काय मुली होत्या यार...? ह्या कुठे भेटल्या तुम्हाला...?" शेखरने मुली जाताच रवीकडे बघत विचारले...

"काय मुली होत्या यार...? उलट धन्यवाद बोलून निघून गेली... बरं झालं मी त्यांना घेवून आलो ते नाहीतर माहित नाही कुठे फिरत असल्या त्या... कमीत कमी आपला मोबाईल नंबर तर देऊन गेल्या असत्या..." रवी तोंड वाकडं करत बोलला...

मोबाईल शब्द ऐकून रोहनला एक फोन करायची आठवण झाली.. आणि खिश्यात हाथ टाकताच तो उडालाच, "अरे?... माझा फोन..."
"काय झालं..?" शेखर आणि रवी एकसाथ बोलले...

"फोन गेला... कुठे पडला वाटतंय..." आपल्या शर्टच्या आणि जीन्सच्या खिश्यात हात टाकून सुद्धा त्याला काहीच नाही सापडले तर रोहन निराश झाला..
"ओह..!" रवीच्या तोंडून निघाले, "आत्ता?"

"एक मिनट... नंबर सांग..." शेखर आपला मोबाईल काढत बोलला...

रोहनने नंबर सांगितल्या वर..., "फोन तर कुणा वाईट माणसाला भेटला वाटतंय... स्वीच ऑफ येतोय...!" बोलत त्याने अचानक मोबाईल स्क्रीन वर बघत शेखर उडालाच, "आपण रोहन आहात...?"

"आणि मी रवी... आत्ताच तर सांगितलं होतं भाऊ..." रोहनच्या बोलण्या आगोदरच रवीने उत्तर दिले...

"नाही म्हणजे.. माझं म्हणजे... आपण स्काय व्युव इस्टेट (Sky View Estate) चे मालक रोहन आहात...?" शेखर ने आश्चर्यचकित होवून गाडीला ब्रेक लावला..

"मालक तर माझे वडील आहेत... मी तर फक्त त्यांचा वारीस आहे... अजून पर्यंत मी ऑफिस बघणे चालू नाही केले आहे... अजून शिकतोय मी... पण.. तुला हे कसे सगळे माहित...?" रोहन बोलला...

"माझी तुमच्याशी वार्ता झाली होती.. काही दिवसांपूर्वी.. गुडगांव मध्ये तुमच्या एका कंस्ट्रक्शन (Construction) मध्ये भागीदारी विषयी... आठवण आहे..? तुम्ही मला तुमच्या पप्पांचा नंबर दिला होता... आणि हो.. तुम्ही तुमचं नाव पण रोहनच सांगितले होते..." शेखर बोलला...

"सोर्री... मला आठवत नाही आहे... खरंतर पप्पांनी माझा पण नंबर विजिटिंग कार्ड वर टाकला आहे.. त्यामुळे जेव्हा पण त्यांचा फोन बंद असतो तर माझ्या कडे फोन येतो... "

"हो.. मीने पण तुमचा नंबर कार्ड मधूनच काढला होता... आणि तुम्ही नाव सांगण्यानंतर मी नंबर यस. वी. इस्टेट नावाने सेव केला होता... कमालच झाली यार... मला अजून पर्यंत विश्वास नाही होतं आहे कि मी एवढ्या मोठ्या माणसाबरोबर बसलो आहे..." शेखर खरोखर आश्चर्यचकित होता... त्याने आपला एक हाथ रोहनच्या पुढे केला तर रोहनने दोन्ही हथांनी त्याचा हाथ पकडला...

"मग तुझी डील झाली का...?" रवीने शेखर ला विचारले...

"हो... ती तर पहिल्या पासून डन होती... फक्त काही फोर्मलीटीज बाकी होत्या..." शेखर बोलला आणि गाडी स्टार्ट केली...

"मग तर खूप चांगलं झालं यार.. आत्ता आपण तिघेही पार्टनर आहोत... आत्ता तुझ्या जवळ राहून फ्रीच जेवण जेवायला पण लाज नाही वाटणार... हा हा हा..!" रवीने त्याच्याशी हाथ मिळवला...

"पण एक गोष्ट समजली नाही यार... इथे बटालामध्ये? आणि ते पण बसने...?" शेखर च्या डोक्यात अजून खूप प्रश्न होते...
"सगळी ह्याची कारस्तान आहे.. बोलला ड्राइवरला नाही घेवून जायचे... आणि एवढ्या लांब गाडी चालवायला प्रोब्लम होईल...!"रवी तोंड वाकडे करत बोलला..
"पण तरी पण यार.. इथे या छोट्याश्या शहरात काय काम निघालं...?" शेखरने विचारले...

रवीने पाठी वळत रोहन कडे हाथ जोडून चेहरा खाली झुकवत, "आत्ता तर सांगा गुरुदेव...! आत्ता तर तुझा बटाला पण आला..."
रविला तर सांगायचे होतेच... आणि आपल्या वयाच्या शेखरला पण सांगितल्याने काही नाही होणार..."खरंतर मी इथे एका मुलीच्या शोधात आलो आहे...!"

"ओय... तुने मला एका मुलीसाठी एवढ्या लांब आणलं... आणि हि दुर्गती केली.. तिथे मुलींची कमी आहे काय... आणि कॉलेज मध्ये तुझ्यावर किती जणी फिदा आहेत हे तरी माहित आहे का तुला...? मुलीसाठी आला आहे इथे... मला नाही जायाचे तुझ्या बरोबर... उतरव मला खाली... शेखर भाऊ गाडी थांबवा.. आत्ताच्या आत्ता गाडी थांबव..."रवी काय काय बोलायला लागला...

शेखरने खरोखरच गाडीला ब्रेक लावला...

"मस्करी करत होतो यार... चल ना लवकर.. खूप जोरात भूक लागली आहे... हे हे हे ... आणि तहान पण..." रवी ने चालायसाठी आग्रह केला आणि हसायला लागला...

शेखर पण हसायला लागला, "अजून कुठे जाणार मित्रा... आलोय तर..!"

"ओह... मला वाटले कि तुम्ही दोघे मला जबरदस्ती खाली उतरवणार..." रवी हसला आणि गाडीतून उतरला.. रोहन गाडी मधून उतरल्यावर रवीने त्याच्या कांध्यावरती हाथ ठेवला आणि त्याला एका बाजूला घेवून गेला, "हे मुलीचा काय मामला आहे मित्रा..?"

"सांगतो यार... सगळं काही सांगतो..." रोहन बोलला आणि तिघेही समोरच्या तीन माळ्याच्या एका सफेद बिल्डींगच्या समोर आले... गेट वरती त्यांना गेटकीपर ने थांबवले, "कोणाला भेटायचे आहे सर...?"

"आम्हाला त्यालाच भेटायचे आहे जो ह्या घराचा मालक आहे.. अमनला भेटायचे आहे... गेट खोल यार..." शेखर चीढत बोलला...

"पण... पण साहेब बीजी (busy) आहेत.. कोणाला पण आत मध्ये सोडायला नाही सांगितले आहे.. एक तास तरी अजून..."

"साला... पीत बसला असेल... पिण्याशिवाय त्याला सुचतं तरी काय..." शेखर मनातल्या मनात बडबडला आणि फोन काढून त्याचा नंबर डाइल करायला लागला...


क्रमश...

Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment