Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Tuesday, 12 June 2012

भाग ~ ~ २८ एक प्रेम कथा

एक प्रेम कथा

Update28"ओय... यार शेखर..!" अमन खाली येतच होता कि शेखर त्या दोघांना घेवून वरतीच पोहचला...

"साल्या... आज तरी कमीत कमी वाट बघायची होती...  आज सकाळी सकाळीच चालू झाला वाटतंय..?" शेखर मस्करी करत बोलला...

"हे हे हे... नाही तर...!" अमन हसत बोलला...

"नाही तर म्हणजे...? काय दारूची परफ्युम लावायला लागला आहेस काय...?" शेखर ने त्याच्या तोंडाचा वास घेत बोलला...

"हो... यार... थोडा छोटासा प्रोग्राम बनवला होता..."अमन बोलला आणि रोहन आणि रवी शी हाथ मिळवत बोलला, "हे भाऊ...?"

"भाऊच आहेत समझ..." शेखर बोलला...
"चल मित्रा खालीच जाऊन बसुया..." अमन ने शेखर चा हाथ पकडून त्याला खाली घेवून गेला..

खाली येताच त्यांना रूम मध्ये बसवून अमन ने रोहन आणि रवी कडे बघत विचारले, "थोडीशी चालेल काय...? कि जेवणच वाढायला सांगू...?"

---------------

खाली एकदम मेहफिल जमली होती... ग्लासांना वाजवून आत्ता अर्धा तास झाला होता... दारूच्या नाशे मध्ये रोहन ते सगळं काही सांगत होता जे तो असंच सांगायाल थोडा अडखळायचा...

"ओह तेरी... मग काय झालं...?" अमनने विचारले...

"सोड यार.. का वेळ फुकट घालावतोस... आय डोन्ट बिलिव इन ऑल दिस फुलीश थिंग्स... एका स्वप्नासाठी एवढं सिरिअस आणि इमोशनल व्हायची काय जरुरत आहे..." शेखर सुपरस्टीशिअस गोष्टींमध्ये विश्वास नाही करत होता...

"पूर्ण गोष्ट तर ऐक डमरू..." रोहनने शेखरला ओरडले आणि गोष्ट सांगायला लागला...

"कोण डमरू... मी... हा हा हा..!" शेखर जोर जोरात हसायला लागला..., "डमरू.. हा हा हा..."

"तुला नाही ऐकायचे ना... जा समोर जाऊन बस... आणि आपलं तोंड बंद ठेव... मी माणतो ह्या गोष्टीला... आणि मला ऐकायची आहे..." अमन येवून शेखर आणि रोहन च्या मध्ये बसला.. शेखर उठला आणि बडबडत समोर जाऊन बसला, "डमरू...हा हा हा..."

वार्ता आत्ता चालू होतीच कि तिथे रवीने रूम मध्ये प्रवेश केला, "अच्छा... एकटे एकटे...!"

शेखर तो येताच उभा राहिला, "साले डमरू.. तू होतास कुठे... जरा हे तरी सांग...?"

"भाऊ तू मला डमरू कसं काय बोलतोस.. ते तर रोहन बोलतो.. मी जरा बाहेर फिरून, थोंडी थंडी हवा खाऊन आलो आहे..." रवी त्याच्या शेजारी बसत बोलला...

"कारण माझ्या आतमध्ये रोहनचं भूत घुसलं आहे.. हा हा हा हा हो हो !" शेखर मस्करी करत बोलला...

"गप्प बस ओय... असल्या गोष्टींची मस्करी नाही करायची असते... कोणाच्या हि बरोबर अशी गोष्ट होवू शकते..." अमन ने त्याला प्रेमाने समझावले.

"कोणा बरोबर काय झाले आहे? जरा मला पण सांगा..." रवी ने आपला ग्लास उचलला आणि सगळ्यांना चिअर्स केलं..

"चल भाऊ रोहन.. आत्ता सगळे इथे आहेत.. सुरुवात पासून शेवट पर्यंत सगळं काही सांग... पहिलेच बोलतो आहे शेखर मध्येच काही नाही बोलणार... बघ नाही तर... !" अमनने शेखरला चेतावणी दिली..

"नाही बोलणार यार... चल बोल!" एवढं बोलून शेखर पण रोहन कडे बघायला लागला...

रोहन ने गोष्ट सांगायला सुरुवात केली...

"अरे देवा.. ! म्हणजे तुझ्यासाठी एक मुलगी किती तरी वर्षांपासून वाट बघत आहे.. आज पर्यंत!" अमन ने पूर्ण गोष्ट ऐकल्या नंतर प्रतिक्रिया दिली, " मीने तर असं फक्त गोष्टींमध्येच ऐकलं आहे.. आज पहिल्यांदा खरोखर जिवंत पुरावा बघत आहे.."

"अबे घोन्चू ! हि पण तर एक गोष्टच आहे.." शेखर बोलला...

"म्हणजे? ... हि गोष्ट आहे रोहन...?" अमन ने रोहन कडे बघत विचारले...

रोहन काहीच नाही बोलला... जुनी आठवण करून करून त्याच्या चेहऱ्या वर घाम आला होता... शरीरात राहून राहून शहारे येत होते... तो मान खाली घालून बसला होता...

"अरे यार... स्वप्नं गोष्टीच तर असतात... स्वप्नामध्येच येते ना ती... आणि जे स्वप्ना शिवाय  झालं आहे त्याच्या विषयी नितीन भाऊ एकदम ठीक बोलत आहे.. हे जरूर त्या म्हाताऱ्या आणि त्या मुलीची काहीतरी कट आहे.. जरूर कुठल्या तरी मंत्राचा उपयोग घेवून ते ह्याच्या स्वप्नात आली असेल.. तू काय बोलतो रवी...?" शेखर ने सगळ्यांसाठी अजून एक एक पेग बनवला...

"साला! कुत्र्या!... २ महिन्यांपासून माझ्या पासून लपवलस... कधी मला मित्र नाही समझलस... मला अजून पर्यंत काहीच नाही सांगितलं ह्याने...!" अजून पर्यंत गप्प बसलेला रवी सगळी गोष्ट चूपचाप ऐकून तो उठला आणि रोहन च्या जवळ बसून त्याच्या छातीशी लागला..., "पहिले का नाही सांगितले यार.. मी आलो असतो तुझ्या बरोबर... कुठे हि... तुने मला परका मानला यार.. मला परका समझला यार ..!"

"आता गप तरी बस यार... जराशी चढल्या वरती सुरु होतोस..."रोहन ने पण त्याची पाठ थोपटली...

"आज मी त्या प्रकारे सुरु नाही झालो आहे यार... किती हसायचा तू... किती मस्ती करायचो आपण... पण दो महिन्यांपासून माहित नाही का असा झालास यार तू... ना कुठे फिरायला येत... ना कधी फोन उचलत.. आणि भेटतो पण दिलीप कुमार च्या स्टाइल मध्ये... मी विचार तर करायचो कि जरूर तुझं काही ना काहीतरी लफडं असणार... पण हे तर मी स्वप्नामध्ये पण विचार नाही केला होता कि हे सगळं स्वप्नाचं लफडं आहे... पण आत्ता चिंता नको करू.. इथे बटाला मध्येच आहे ना ती...?" रवी भावूक होत बोलला...

"हो..." रोहन ने हामी भरली...

"तिला शोधायचे आहे ना बस... बाकी काम तू तर करशीलच...?" रवी ने विचारले...

"फक्त शोधायचं नाही आहे यार... तिला तिथे घेवून पण जायचे आहे.. जुन्या वाड्याजवळ" रोहन ने स्पष्ट केलं...

"ती तर येणारच... एवढं तुझ्यावर प्रेम करते ती.. तुझ्या साठी तर ती पूर्ण जगच सोडू शकते भाऊ... मग बटाला मध्ये काय ठेवलं आहे..? जुन्या वाड्याजवळ राहूया जाऊन... एक छोटंसं घर बनूया तिथे..." रवी बोलला...

"तुझ्या बरोबर बोलणेच बेकार आहे यार... डोक्यात तर कोंबड्यांनी अंडे देऊन ठेवले आहेत.. काही समझत तर नाही... तुला तर काय घंटा सांगितलं असतं मी..." रोहन रागात बोलला...

"असं का बोलतोस यार.. चल परत एकदा स्पष्ट गोष्ट ऐकव... ह्या वेळेस मी एकदम जरुरी गोष्ट नोट करून ठेवेन माझ्या बुक मध्ये... माझी बुक कुठे गेली यार...?" रवीने एवढं बोलताच सगळे जन जोर जोरात हसायला लागले...

"तुला गोष्ट ऐकायची काहीच गरज नाही आहे.. पुढची ऐक बस... पहिले नीरु ला शोधायचे आहे.. मग तिच्याशी मैत्री कराची आहे... मग सगळी गोष्ट तिला सांगायची आहे आणि तिला आपल्या सोबत एकदा त्या जुन्या वाड्यावर येण्यासाठी आग्रह करायचा आहे.. समझल काय.! आणि आत्ता तिथे घर बनवायची प्लानिंग नको करूस.. तिथे राहायचे नाही आहे आम्हाला..." रोहन ने एकदम खास खास गोष्ट परत एकदा सांगितली...

"राहायचे नाही आहे तर का जायचे तिथे... का बेचाऱ्या वहिनीला घाबरवतोस यार.." रवीच्या डोक्यात अजून एक प्रश्न आला...

"अबे डमरू.. तिथेच जाऊन तिला सगळं काही आठवणार... समझलास" रोहन रागात बोलला...

"एक मिनट रोहन... समझ तुझं स्वप्न खरोखर आहे.. ह्या शहरात किती तरी नीरु असणार... तू त्यांना शोधणार कसं...?"

"तिचं घर सरकारी कॉलेज जवळ आहे... तिथेच माहिती करूया कि तिथे कोणी निरू आहे कि नाही..." रोहन ने उत्तर दिले... "

"सरकारी कॉलेज जवळ..? तिकडच तर मी आत्ता माहिती करू शकतो... सलमा आणि साना तिथेच राहतात...!"

रोहन आणि रवी एकदम एकत्र बोलले, "मग माहिती कर ना यार...!"

"हो... आत्ताच माहिती कर... माहित तरी पडेल कि स्वप्न खरं आहे कि...!" शेखर ने पण उत्सुक होऊन मोबाईल  काढणाऱ्या अमन कडे बघितले...

क्रमश...

Previous Chapter                                  Next Chapter

0 comments:

Post a Comment