Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Wednesday, 13 June 2012

भाग ~ ~ २९ एक प्रेम कथा

एक प्रेम कथा

Update 29अमनने त्यांच्या मध्ये बसल्या बसल्याच सलमाला फोन लाऊन स्पीकर चालू केला, खूप वेळानंतर सलमा ने फोन उचलला " आई इथेच आहे... मी वरती जाते... ५ मिनट नंतर फोन कर..." हळू आवाजात बोलत सलमाने फोन लगेच कट केला...

"आई! साना कुठे आहे...?" सलमाने फोन खिशात टाकला आणि किचन मधून बाहेर येत बोलली...


"वरती अभ्यास करत असणार... का...?" आई काम करता करताच बोलली...


"मी ने दूध ग्यास(Gas) वर ठेवला आहे... आई... एकदा बघ... मी आत्ता येते..." सलमा सीडी चढत बोलली...


"काय करतेस साना... चल दरवाजा उघड...!" सलमाने वरती गेल्यावर दरवाजा ठोकवला...


"क काहीच नाही... ते थोडा अभ्यास करत होती...!" साना दरवाजा उघडत बोलली...


"ठीक आहे... थोडा वेळ मला सतावू नकोस..." सलमाने बेड वर दिवाळाला टेक लावून बसली... आणि आपला मोबाईल काढला, "अमनचा फोन आला होता... मी त्याला कॉल करते... एकदा...!" अमनला मिस कॉल मारून सलमा थोडा वेळ बसली...


लगेच अमनने तिला परत कॉल केला... तिने लगेच कॉल रिसीव केला...


"मला तुला काही तरी विचारायचे आहे...!" अमनने डाइरेक्ट कामाची गोष्ट काढली...


"हो... बोल ना... राजा...!" सलमा बोलली...


"हे... तुमच्या आजूबाजूला कोणी 'नीरु' नावाची मुलगी राहते काय...?" अमनने विचारले...


"खूप नालायक मुलगा आहेस तू... का मी तुला पसंत नाही आहे काय...?" सलमा रागात बोलली...


"तू सांग ना यार..." अमन चीढत बोलला...


"ओके... कोणत्या वयाची असेल...?" काही क्षण थांबून सलमाने विचारले...


अमनने हाताच्या इशाऱ्याने रोहनला विचारले... आणि रोहनच्या नकारार्थी मान हलवल्या नंतर बोलला, "हेच.. काही तुझ्या वयाची असेल...!"


सलमा विचार करायला लागली आणि काही क्षण थांबून, "नाही... माझ्या वयाची काय...? माझ्या मते कोणत्या हि वयाची मुलगी ह्या नावाने नाही आहे इथे...!"


सलमाचं उत्तर ऐकून रोहन निराश झाला, "पक्का हि सरकारी कॉलेज जवळच राहते ना... !"


सलमाने त्याचा आवाज ऐकला होता..., " हो यार.. ४०-५० घरंच तर आहेत इथे... सगळे एकमेकांना ओळखतात... कोणीच ह्या नावाने नाही आहे इथे..."


"चल ठीक आहे... आत्ता फोन ठेवतो.. उद्या बोलूया... ओके! बाय..." आणि अमनने तिची गोष्ट न ऐकताच फोन कट केला...


"मी बोललो नाही होतो... स्वप्न स्वप्नच असतात यार... जस्ट चिल & एन्जोय दि लाईफ...!" शेखर बोलला...


आत्ता कोणाकडे हि बोलण्यासारख काहीच उरलं नव्हंत... रोहनने सोफ्यावर डोकं टेकवून आपले डोळे बंद केले... तिथे एकदम शांतता पसरली...


"काय विचारत होता तो...?" सलमाने फोन ठेवताच सानाने विचारले...


"कोणत्या तरी मुली बद्दल विचारात होता... अमन ?" सलमा बोलली...


"कोणत्या मुली बद्दल...?" साना तिच्या कडे बघत बोलली...


"ते!.. माहित नाही.. आठवण नाही येत आहे.. पण आपल्या बद्दल नाही विचारत होता.. कोणी दुसऱ्याने त्याला विचारले होते... पण आपल्या कोलिनी मध्ये तर कोणी नीरु... हो... नीरुच नावाच्या मुलीबद्दल विचारत होता... आपल्या इथे नाही आहे ना कोणी...?" सलमाला बोलता बोलता नाव आठवले...


"अरे... ती शिनू... जी त्या कोपऱ्यातल्या मोठ्या घरात राहते... तिचंच नाव तर नीरु आहे... !" साना बोलता बोलता बसली...


"अच्छा..! पण तुला कसं काय माहित...? तिला इथे सगळे जण  शिनुच बोलतात... ती तर खूप सुंदर आहे यार... कोणाचे भाग्य उजळले...? नाही!... मला नाही वाटत हि गोष्ट असेल.. ती तर घरातून पण कमीच निघते... आणि मुलांकडे तर ती ढुंकून सुद्धा बघत नाही... ती नीरु नसणार... नाहीतर कुठली दुसरीच गोष्ट असणार... नाही तर अमन विचारणार नाही... पक्का निरुच आहेना ती...?" सलमाने बोलता बोलता फोन उचलला...


"अरे बाबा हो... पक्का माहित आहे मला... आपल्या कोलोनी मध्ये फक्त तीच एक नीरु आहे.." साना जोर देत बोलली...


"ठीक आहे... एक मिनट... मी अमनला सांगते..." एवढं बोलून तिने अमनचा नंबर डाईल केला...


अमनने फोन उचलून बघितला आणि परत खाली ठेवला...


"काय झालं? कोणाचा फोन आहे...?" शेखरने अमन फोन नाही उचलत आहे हे बघत बोलला...


"तीच यार... सलमा... ह्या मुली यार बोर करतात फोन करून... नाही? किती वेळा तर रात्रीचे २-२ वाजता फोन करून विचारणार..., 'काय करत आहेस जानू...? हा हा हा'.." अमन हसत हसत रोहनच्या चेहऱ्याला बघून लगेच गप्प झाला, "काय झालं यार एवढं सेंटी का होतो आहेस यार...? तुला एका पेक्षा एक चांगल्या मुली भेटतील... "


"आत्ता काय करायचे...?" रवीने विचारले...


"झोपायचे आहे मला...!" रोहन एवढाच बोलला होता कि अमनचा फोन परत वाजायला लागला...


"काय आहे यार...? तुला माहिती आहे ना आज माझे मित्र आले आहेत... परत फोन नको करूस..." अमन ने फोन उचलताच बोलला...


"एक मिनट... एक मिनट... ती नीरु आहे एक आमच्या कोलोनी मध्ये... काय करायचे होते तिचे...?" सलमा एवढं बोललीच होती कि अमन एकदम आश्चर्याने  आणि खुश होत उभा राहत बोलला, "काय... ? नीरु भेटली...?"


अमनची प्रतिक्रिया ऐकून सगळ्यांचे चेहरे खुश झाले... आणि ते सगळे पण अमन सोबत उभे झाले... रोहनचा चेहरा एकदम  खुश झाला...


सलमाला काय झाले काही कळले नाही, "असं काय झालं ...?"


"पण पहिले तुने नाही आहे असा का बोलली होतीस...?" अमनने तिचं न ऐकता तिला आपला प्रश्न विचारला...


"ते तिला इथे सगळे इथे शिनू बोलतात... मला नाही माहित होते कि तिचं खरं नाव नीरु आहे ते... आत्ता सानाने सांगितले..." सलमाने आपले बोलणे पूर्ण पण केले नव्हते कि रोहनने अमनच्या हातातून फोन खेचून घेतला..., "कशी आहे ती... म्हणजे दिसायला कशी आहे... ?"


"कोण आहेस तू...?" आवाज बदललेला ऐकून सलमाने विचारले..


"मी... रोहन...!" रोहनचं हृदय धडधडायला लागलं होतं...


"का..? लग्नाची मांगणी आली आहे काय तिची... तुझ्यासाठी..?" सलमाने सिरिअस होत विचारले...


"नाही ... ते... पण...!" रोहनला काहीच समझत नव्हते कि काय बोलू...

"नाही ना..? मग असं करा कि तिच्या बद्दल विचार करणे पण सोडून द्या... कारण ती मुलगी अशी तशी नाही आहे... सगळ्या मुलींपेक्षा वेगळी आहे.... तू समझत आहेस ना... ती कधी कधीच घराच्या बाहेर निघते... सरळ कॉलेजला जाते.. सरळ येते.. मुलांच्याकडे बघत सुद्धा नाही.. तिथे प्रयत्न करशील तर आपला वेळ फुकट घालवशील... समझलास...?" सलमाने रोहन ला समझावले...

"हो... पण दिसते कशी...? हे तरी सांगा... ?" रोहन बोलला...

"मुली मुलांच्या समोर दुसऱ्या मुलींची स्तुती नाही करत... खास करून जेव्हा ते त्यांच्या हून खूप सुंदर असेल तेव्हा.. हे हे हे... ऑल दि बेस्ट..! अमनला फोन दे..." सलमा बोलली...

रोहनने फोन अमनला दिला आणि सोफ्यवर जाऊन बसला... अमनने फोन घेताच कानाला लावला, "हो...!"

"काय मामला आहे...? मला तर काहीच समझले नाही... "सलमाने अमनला विचारले...

"तू हे सगळं सोड.. तुला माझं एक काम करायचे आहे..." अमन सलमाला बोलला...

"काय...? तुझ्यासाठी तर मी काही पण करायला तैय्यार आहे..!" सलमा ने विचारले...

"नीरुला सांगायचे आहे कि तिला भेटायला कोणी तरी आले आहे.. आणि जमलं तर तिला घेवून यायचे आहे..." अमन बोलला...

"नाही यार... मी बोलत तर होती... तिला घेवून यायचे लांबच आहे... जर तिच्या समोर कोणी असे बोलले तरी गोष्ट घरापर्यंत जाईल... मी काहीच नाही करू शकत... सॉरी...!" सलमा बोलली...

"सॉरीच मी काय लोणच टाकू आत्ता...!" अमनने रागात फोन कट केला...
क्रमश...

Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment