Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Friday, 15 June 2012

भाग ~ ~ ३० एक प्रेम कथा

एक प्रेम कथा

Update 30"ओये... बघा बघा आज किती दिवसा नंतर माझ्या मित्राच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे... आत्ता तर नीरु वहिनीला घेऊनच जायचे इथून... त्या जुन्या वाड्याजवळ" रोहनच्या चेहऱ्यावर आनंद बघत रवी बोलला...

"पण यार, सलमाने तर साफ नकार दिला... आपण तिच्या पर्यंत पोहोचणार कसे..? आय मीन... बोलणार कसे आपण... सलमा बोलत होती कि ती तर एकदम सभ्य मुलगी आहे... काही न काही तरी लिंक शोधली पाहिजे...!" अमनने आपल्या डोक्यावर जोर देत बोलला, "चला सोडा... आत्ता आरामात झोपून जाऊया... उद्या सकाळी बघू..!"

"अमन भाऊ... एकदा तिचं घर विचारलं असतं... आत्ता जाऊन जरा बघितलं असतं...!" रोहन उतावीळ होत बोलला...

"कमाल करतोस यार... रात्रीचे १० वाजता... आणि ते पण त्या मुलीला बघायला जायचे जी घरातून विनाकारण बाहेर पण निघत नाही ... ती घराच्या बाहेर भेटेल तुला... स्वतःचा चेहरा दाखवण्यासाठी..?" अमन जोर देत बोलला...

"तसं नाही आहे... मी तर फक्त असंच जरा बाहेरून घर बघून आलो असतो..." रोहनने आपले डोके खाजवत शेखर आणि अमनला बघितले...

"चला भाऊ... गाडी बाहेर काढा... वहिनीचं घर बघून येवूया... आत्ताच्या आत्ता..." रवी नशेमध्ये उभा होत बोलला...

शेखरने पण हमी भरली तेव्हा अमन पण उठला, "चला मग... बाहेरची हवा खावून येवूया..."

गाडी मध्ये जाताना अमन ने सलमाला फोन लावला, "सलमा!"

"आत्ता कशी माझी आठवण आली राजा...? मित्र गेले काय...?" सलमा आळस  देत बोलली...

"मला थोडी घाई आहे... ते जरा निरूच्या घराची लोकेशन सांग...?" अमन सरळ मुद्यावर येत बोलला...

"इथे येतोयस काय...?" सलमा खुश होत बोलली...

"हो... सांग तरी...?"

"माझं घर माहित आहे ना..?"

"हो...!"

"त्याच रोड वरती जेव्हा तू आमच्या बिल्डींगच्या जवळ येशील तर दुसरा नंबर तिची बिल्डींग आहे... एकदम मोठं बंगला टाईप ... डार्क ग्रे कलरचा पेंट आहे... पण आत्ता तिथे जाऊन करणार तरी काय...?" सलमाने घर सांगितल्यानंतर प्रश्न केला...

"ओके... बाय... धन्यवाद..." अमन बोलला आणि फोन कट केला...

तिथे जाताच अमनला सलमाने सांगितल्या प्रमाणे बिल्डींग भेटली... एक सुंदर २ माळ्याच्या घराला दोन्ही बाजूने गेट होते..., " घे भाऊ... रोहन... निरुच घर पण भेटलं... आत्ता बोल काय करायचे आहे...?" अमनने गाडी बिल्डींगच्या  जवळच उभी केली...

नीरुचं घर भेटलंय ऐकूनच रोहनला शहारे आले... त्याचे हृदयाचे ठोके वाढायला लागले... त्याला मनातल्या मनात वाटले कि तो आत्ता जुन्या वाड्याजवळ उभा आहे आणि लांबून नीरु त्याला हाक मारत आहे... रोहनने घर बघतच डोळे बंद केले... पण नीरुची जी प्रतिमा त्याच्या डोक्यात उभारली, ती 'श्रुती' ची होती, "परत चला....!" रोहनच्या डोक्यावर घाम सुटला...

"आत्ता काय झाले...?" शेखरने विचारले...

"काहीच नाही... फक्त घर बघायचे होते... बघितले... चला आत्ता...!" रोहन बोलला आणि अमनने गाडी वळवली...

----------------------------

"कुठे आहेस यार तू...? काल सकाळ पासून तुझा फोन ट्राय करतोय... फोन ऑफ का करून ठेवला आहे...?" नितीनला जसं सकाळी उठून रोहनने रवीच्या फोन वरून फोन केला तर तो लगेच बोलायला लागला...

"तो... फोन हरवला आहे यार... मी तुला सांगितले होते ना कि मी रवी बरोबर बटलाला जात आहे... तिथेच आहे मी सध्या..." रोहन बोलला...

"हो... बोलला होतास... पण रवीचा नंबर नाही आहे ना माझ्या जवळ... घरी पण गेलो होतो... तिथून पण नाही भेटला... तू पहिले पण करू शकला असतास.. माहित आहे तुझी किती काळजी आहे मला... " नितीनने हळू आवाजात रोहनच्या साठी काळजी घेत आहे ह्याचं नाटक करत बोलला...

"माहित आहे मित्रा.! पण इथे आल्यावर वेळच नाही भेटला... आत्ता सकाळी उठल्या बरोबर लगेच तुला फोन लावला... माहित आहे..." रोहन बोलतच होता कि नितीनने लगेच त्याला टोकले..." ऐक... ते मी श्रुती कढून सगळं काही माहिती करून घेतलं आहे... खरंतर तुझ्या स्वप्नाच्या मागे दुसरा तिसरा कोणी नसून तीच आहे... मी त्या ढोंगी बाबाला पण भेटून आलो आहे, ज्याने तिची मदत केली.. तू आपला भास सोड आणि परत ये...!"

नितीनच्या गोष्टीने रोहनला झटका लागला... तो अस्वस्थ होत बोलला, "पण... पण हे कसं होवू शकतं...?"

नितीनने त्याला परत एकदा मधेच थांबवले, "होवू शकत नाही यार... हेच झाले आहे... तू परत येशील तर मी सगळं तुला समझवतो... पण यार तिचा ध्येय चुकीचा नाही आहे.. ती तुझ्या वर खूप प्रेम करते... खरोखर... काल जेव्हा बोलत होती तर खूप रडत होती... आत्ता तू लवकर परत येवून तिला भेट... नंतर मी घरच्यांबरोबर वार्ता करो... येत आहेस ना..."

"पण यार... मला इथे नीरु भेटली... आणि जसं मला स्वप्न आलं होतं... ठीक त्याच जागेवर..!" रोहनच्या ह्या वाक्या ने नितीनला वाटले कि आता माझा प्लान फेल होणार..., "हे कसं काय होवू शकतं...?" तो आश्चर्यचकित होत बोलला...

"हो... यार... ठीक त्याच ठिकाणी तिचं घर आहे... एक गोष्ट अजून सांगू... मला स्वप्नामध्ये पण नेहमी हेच घर दिसायचं... एकदम हुभेहूब... मला तर घाम आला जेव्हा मी ते घर पाहिले तेव्हा... !" रोहन बोलला...

"दिसायला कशी आहे... ?" नितीन निराश होत बोलला...

"मी तिला बघितले नाही आहे अजून... पण सगळी माहिती काढली तिची... तिचं नाव नीरु आहे... पण सगळे तिला इथे शिनु बोलतात... खूप सभ्य मुलगी आहे... कधीच घरातून काम नसेल तर बाहेर नाही निघत ती... आणि बोलतात कि खूप सुंदर आहे..." रोहन एकदम खुश होत बोलला...

"बघ... तू मला भाऊ मानतोस... त्यामुळे मोठ्या भावाच्या नात्याने तुला समझवतोय... आत्ताच्या आत्ता परत ये... नाही तर कुठल्या तरी मोठ्या लफड्यात पडशील... श्रुती कमी सुंदर आहे काय...? आणि मी एकदम शर्त लाऊन सांगू शकतो कि नीरु श्रुती पेक्षा सुंदर नसणार...  तुझ्यावर इतकी प्रेम करते कि काय सांगू... आणि तिचा स्वभाव तर तू बघितला आहेस... तिची चुकी एवढीच आहे कि ती तुझ्यावर खूप प्रेम करते... फक्त सांगायला लाजते..." नितीन तर्क देतच होता कि मध्येच रोहनने त्याला टोकले... " पण यार... तिने मला पहिले कधीच बघितले सुद्धा नव्हते... मग ती माझ्यावर प्रेम कधी पासून करायला लागली... आणि ठीक आहे असं मानलं कि तिने मला कुठे बघितले असेल तर ती काहीच विचार न करता ढोंगी बाबाकडे का जाईल... सांग...!"

नितीनने ह्या गोष्टींचं उत्तर तैय्यार नाही केलं होतं... त्याच्या मनात तर फक्त हेच होते के रोहनला कोणी नीरु भेटणार नाही आहे... आणि जसेच तो त्याला सांगणार कि श्रुतीच हे सगळं करत आहे... तो त्याच्या वर विश्वास ठेवून लगेच पळत पळत येईल...

"तू येशील तेव्हा तर सांगेन ना... इथे फोन वर कसा सांगू... खूप मोठी गोष्ट आहे... येतोस ना आजच...?"

रोहनला काहीच समझत नव्हते..., "मी... मी थोड्या वेळानंतर फोन करतो..."

"जशी तुझी मर्जी... पण मी वाट बघेन तुझ्या फोनची.." नितीनने फोन कट केला आणि रागात फोन बेडवर आपटला.. त्याला आज परत श्रुतीला भेटायला जायचे होते...

"काय झालं यार...!" रोहनच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले बघून रवीने त्याला विचारले...

"काय सांगू यार... काहीच समझत नाही आहे.. "आणि रोहनने त्याल नितीन बरोबर झालेल्या वार्तेचा सार ऐकवला...

"एक बोलू काय...?" रवी बोलला...

"हो... बोल ना...!" रोहन त्याच्याकडे बघायला लागला...

"बघ... मनापेक्षा मोठं काहीच असू शकत नाही... तू आपल्या मनाची गोष्ट ऐक... आणि स्वतः ठरव... नितीनची गोष्ट जरी खरी मानली तरी एका गोष्टीचं उत्तर नाही भेटलं आहे अजून...!" रवी बोलला...

"ते काय...?" रोहन त्याच्याकडे बघत बोलला...

"ते हे... आपण जर हे सगळं खर मानलं कि श्रुती तुझ्या प्रेमात हे सगळं काही करत आहे.. तर ती आपलं नाव नीरु का सांगते... श्रुती नाही सांगितलं असतं... आणि बटालाचा पत्ता का दिला असता... बोल... विचार करायची गोष्ट आहे कि नाही... आणि इथेच बटाला मध्ये आपणाला नीरु भेटली पण आहे.. आणि तिचं घर... सगळ्यात मोठी गोष्ट तिचं घर भेटणं... ज्याच्या विषयी तुने काल येवून सांगितले होते... कि तुला स्वप्नात पण तेच घर दिसतं... त्यामुळे घाबरल्यामुळे तुला घाम सुटला होता..." रवी बोलला, "आत्ता बोल... काय बोलतं तुझं मन...?"

"तुझा फोन ऑफ करून टाक!" बोलत रोहन हसायला लागला, "तुझ्यात एवढी अक्कल आली तरी कुठून... मी तर ह्या बाबतीत विचार पण नाही केला... फोन ऑफ करून टाक... आत्ता आपल्याला तिथेच जायचे आहे... आंघोळ करून घे...!"

"कुठे जायचे आहे... ?" रवीने विचारले...

"तिथेच यार.. माझ्या सासरी... तुझ्या वाहिनीला बघूनच येवूया आज... पूर्ण दिवस जरी तिकडे गेला तरी चालेल.." रोहन हसत बोलला..


क्रमश...

Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment