Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Saturday, 16 June 2012

भाग ~ ~ ३१ एक प्रेम कथा

एक प्रेम कथा

Update 31रोहन आणि रवी त्या बिल्डींगच्या समोर एका बेंचवर बसले होते... अमन आणि शेखरला त्यांनी मुद्दामहून घरी जायला सांगितले होते... खिडकीला लागलेले परदे, कॉप्पर कलरचा गेट आणि भिंतींना लागलेला कलर... सगळं काही तसेच्या तसंच रोहनच्या स्वप्नासारखं होतं...

"यार... कोणी ना कोणीतरी बाहेर यायला पाहिजे होतं... माहित नाही आतमध्ये कोणी आहे कि नाही..!" रोहन निराश होत बोलला...

"येणार यार... इथे आरामात बसून चणे खाऊया... कधी न कधी तरी वहिनी दिसतीलच.." रवी बोलला...

अचानक घरामध्ये येणाऱ्या आवाजाने दोघांचे कान तिकडे लागले...
"नीरु बेटा... मी जरा मार्केटला जाऊन येते... खाली येवून दरवाजा बंद कर...!"

"आली आई... तू जा... मी बंद करून घेईल... लवकर ये... मला क्लासमध्ये जायचे आहे..." बाहेर कान लाऊन बसलेल्या रोहन आणि रविला समझायला वेळ नाही लागली कि येणारा दुसरा, एकदम सुरेख आवाज निरुचाच आहे..., "यार...आवाज तर खूप सुंदर आहे... देव करो.. आवाजासारखंच चेहरा हि सुंदर असावा...!" रवीने प्रार्थना केली...

"तुला माहित आहे रवी... जेव्हा आपण बटालाला येत होतो तेव्हा मी फक्त हाच विचार करत होतो कि एकदा फक्त बघून यायचे आहे... कि माझ्या स्वप्नामध्ये काही सत्य आहे कि नाही... सिरीअसली मला नीरुशी काही घेणं देणं नाही आहे... पण यार... इथलं वातावरण, हे घर... हा रस्ता... आणि हा आवाज... सगळं काही आपलाच आहे असं वाटत आहे यार.. असं वाटतच नाही आहे कि मी इथे नवीन आहे... असं वाटतंय इथे राहून जाऊ... हा आवाज ऐकत बसू... खर यार.. मला इथे खूप आनंद होतं आहे... काही तरी गोष्ट असणार ना...? ती पण माझी अशीच वाट बघत असणार कि नाही...? जर तिने माझं काहीच ऐकण्यासाठी साफ नकार दिला तर...!" रोहन भान हरपून बोलत होता...

"आत्ता पासूनच एवढा विचार नको करूस यार... बघ.. काकी येत आहे... हीच तुझी सासूबाई आहे... "एवढ बोलताच रवी उभा राहिला आणि मान खाली घालून हाथ जोडले, "नमस्कार काकी...!" रोहनने घाबरून पाठ वळवली...

"नमस्ते बेटा...!" बोलत काकी थांबल्या .., "काही काम आहे का बेटा...?"

"नाही... बस काकी.. तुम्ही मोठ्या आहात... बस त्यामुळे..." रवी आत्तापण हाथ जोडून उभा होता...
काकी काहीच नाही बोलल्या त्यांना आशीर्वाद देत आणि हसून निघून गेल्या...

"ओये... मार खाण्याचा विचार होता काय साल्या...? असं का टोकलंस..?" रोहन काकी गेल्यावर रविला एक टपली देत बोलला...

"हे हे हे... मित्रा मी तर आत्ता पासूनच ओळख वाढवतो आहे... लग्नात वहिनीला घ्यायला मलाच तर तुझ्या बरोबर यायचे आहे... आणि बघ आशीर्वाद पण भेटला...!" रवीला काहीच फरक नाही पडत होता...

"तू तर घनचक्कर आहेस पूर्ण... जर आज नीरु नाही दिसली तर...? ह्यांनी आत्ता तुझा चेहरा पण आठवणीत ठेवला असेल... ह्याच्या पुढे तू माझ्या बरोबर नको येवूस...!" रोहन रागात बोलला...

"सोड ना यार... ह्याच्यापुढे तुलाच इथे यायला नाही पडणार... बाहेरच भेट वहिनीला... एक मिनट... मी आत्ताच आलो..." रवी बोलला आणि गेटजवळ जायला लागला...

"ओये रवी... मरवणार आहेस काय...? कुठे जातोयस...!" रोहन एकदम उठत बोलला...

रवीने पाठी वळत आपली बत्तीसी दाखवली आणि रोहनची परवा केल्या शिवाय तो गेट जवळ पोहोचला आणि बेल वाजवली...

तेव्हा त्याला आतमधून कोणी मुलीगी येण्याचा आभास झाला... मनातल्या मनात त्याने देवाशी प्रार्थना केली आणि दरवाजा उघडायची वाट बघत राहिला...

"हो... तू...?" हो फक्त मुलीने बोललं होतं आणि 'तू' दोघांच्या तोंडून एकसाथ निघालं होतं... रवी दोन पावलं पाठी गेला... दरवाज्यावरती रितू उभी होती.. तीच पातळ आणि सुंदर उंच मुलगी जिच्या बरोबर रविचं बस आणि कार मध्ये भांडण झालं होतं...

"अ अ... हो.. पण तुझं नाव तर रितू आहे ना... ?" रवी अडखळत बोलला...

"हो... तर? इथे काय घ्यायला आला आहेस...? तुला कसं भेटलं हे घर.." रितूने रागात आपले दोन्ही हाथ आपल्या कमरेवरती ठेवले...

"ते... आम्ही तर... असंच आलो होतो... भटकत .. क्षमा करा... पण ती... कुठे आहे...?" रवीने कसं तरी आपले वाक्य पूर्ण केले...

"ती कोण..? तुला पाहिजे तरी काय...?" रीतुचा आवाज आत्ता एकदम वाढत चालला होता आणि रोहनला पण ऐकायला येत होता...

रीतुच्या रागात बोलण्यामुळे रवी अजूनपर्यंत स्वतःला सांभाळू शकला नव्हता.., "ती... व व... वहिनी!"

"कोण वाहिनी...? तुझ डोकं वैगेरे फिरलं आहे काय...? इथे कोणीच वहिनी नाही राहत... तू शेवटी घ्यायला काय आलायस...?" जसं रितूने रवीला ऐकवत हाथ पुढे केला... रवीला एकदम संधी भेटली, "आमचा फोन...! ओये रोहन... इथे ये... भेटला तुझा फोन... माझा अंदाजा  एकदम बरोबर होता... ह्यांनीच चोरला आहे... चेहऱ्यावरूनच वाटत होतं... कि ह्यांचंच काम असणार...?" रवी बोलला...

"फोन?" रोहनला अजून पर्यंत कळलं नव्हंत कि तो कश्यासाठी गेला होता आणि आत्ता काय बडबडतोय... पण रवीने बोलावल्या मुळे  तो मनातल्या मनात शिव्या देत तिथेच गेट वर पोहचला, "काय झालं?"

"अरे... तुझा फोन... हा हिच्या हातात... !" रवी रितूच्या हातामध्ये रोहनच्या फोन सारखा दिसणारा फोन बघून बोलला...

आत्ता शांत होण्याची पाळी रितूची होती... ह्या प्रकारे रोड वर स्वतः वरती आरोप लागत आहे त्यामुळे ती आश्चर्यचकित झाली होती, "आम्हाला तर हा फोन बस मध्ये भेटला होता... !" रितूने मान खाली घालत बोलली...

"अच्छा... बसमध्ये भेटला होता... बसमध्ये तर मी पण बसलो होतो... मला का नाही उचललं तुने... बोल... बोलली असतीस भेटला होता बस मध्ये...!" रवी सारखा सारखा तिच्या डोक्यावर चढत बोलत होता...

"गप्प तरी बस यार आत्ता.. एवढं बोलायची काय गरज आहे...?" रोहनने त्याला शांत करायचा प्रयत्न केला.

"का नाही बोलू मी...? घरी आलेल्या पाहुण्यांना पाणी विचारायचं सोडून... इज्जत उतरवायला लागली हि...! हिला तर हे पण आठवत नाही आहे कि कशी लिफ्ट दिलेली मी..." रवीचा आवाज अजून उंच झाला...

"त..तुम्ही प्लीज आतमध्ये या... इथे तमाशा का करत आहात...?" रितू बोलली...

"नाही... आम्हाला नाही यायचे आहे..." रवी बोलतच होता कि रोहनने त्याला पाठून धक्का मारला, "येत होतो ना यार धक्का का मारतोस..." आणि रितूकडे बघत तो तिच्याही पुढे गेला जसं हे तीच घर नसून त्याचं घर आहे...

"या.. आतमध्ये या... तुम्ही आतमध्ये बसा... मी आत्ताच आले...!" एवढं बोलून रितू वरती पळाली...

"तू एवढा ओरडत का होतास बे...? माझी वाट लावायची आहे काय...?" रोहनने आतमध्ये जाऊन सोफ्यावर बसत बोलला...

"अच्छा... तुला माझे ओरडणे ऐकायला आले... तिचे नाही कशी माझी वाट लावत होती ते... मग मला तिच्या हातात तुझा फोन दिसला... मग मी एवढी चांगली संधी हातातून का जाऊ देऊ... हे हे हे!" रवी हसत बोलला...

"ठीक आहे यार... पण आपण इथे नीरुसाठी आलो आहोत... विसरलास काय..?" रोहन शांत होत बोलला...

"ओह तेरी... मी तर विसरलोच होतो... सॉरी यार... अरे.. आपण तर घरामध्ये पण आलो... बघ...!" रवी आनंदी होत बोलला...

"गप्प बस... कोणी तरी येतंय.." रोहन बोलताच दोघेही शांत बसले...

आणि निरुचे घरात पाय ठेवताच रोहन आपली भान विसरून उभा झाला आणि तिला बघायला लागला.. त्याने ह्या परीला पहिले पण बघितले होते... पण आत्ताची तर गोष्टच वेगळी होती... पटियाला सूट घालून ती खरोखरच परी दिसत होती.. हळू हळू पावलांनी आपली नजर खाली करत ती चालत त्यांच्या जवळ आली आणि, "उभे का आहात बसा ना...!"

रोहन उभा राहून जसं बसनेच विसरला होता... तिला तो बघतच बोलला, "धन्यवाद... !" पण उभाच राहिला...

"अरे... बसा तरी... थंडा घ्या...!" निरुने त्याला परत टोकले...

"हो.. बसतोय... !" निरूच्या सौंदर्यात तो एवढा डूबला होता कि ह्यावेळी हि तो उभाच राहिला... रवीने त्याचा हाथ पकडून खेचले, "बस यार...!"

"ओह हो...!" रोहन जसं भानावर येत बोलला...

"तुम्ही घ्या मी येते..." बोलून नीरु जायला लागली...

"आपणच नीरु व..आहात ना...!" रवीच्या तोंडून वहिनी निघता निघता राहिले...

एवढा ऐकताच नीरु लगेच पाठी वळली, "तुम्हाला माझे नाव कसे माहिती...? हे नाव तर कोणी घेतंच नाही... इथे... लहानपणी होतं हे नाव माझं!" नीरु आश्चर्यचकित होवून रवीकडे बघत होती, "माझं नाव आत्ता शिनू आहे... प्लीज परत ते नाव नका घेवू..."

"बघा... आहे ना आम्ही कमालीचे... आम्हाला तर तुमच्या गेल्या जन्माची गोष्ट पण माहिती आहे...!" रवी हसत बोलला...

नीरुने ह्या गोष्टीला मस्करीमध्ये घेतले आणि रवीच्या मस्करीला इज्जत देत ती थोडी हसली आणि निघून गेली...

"कशी वाटली वहिनी...?" ती जाताच रवीने रोहनच्या कांध्याला कांधा भिडवला..

"हे तर मी कधी स्वप्नामध्ये पण विचार नाही केला होता यार... एवढी सुंदर मुलगी मी आज पर्यंत नाही बघितली...!" रोहन आत्ता ढगात होता...

"बघितली का नाही...? त्या दिवशी बसमध्ये नाही बघितली काय..?" रवीने आठवण करून दिली...

"हो पण... त्या दिवशी मी त्या नजरेने नाही पाहिले होते यार... फक्त एका क्षणासाठीच नजर फिरवली होती हिच्यावर...!" रोहनने आपले बोलणे पण पूर्ण नाही केले होते कि रितू आणि नीरु दोघेही तिथे आल्या, "हे घ्या तुमचा फोन...!"

"धन्यवाद..." फोन घेते वेळी जसं रोहनच्या बोटांचा स्पर्श निरूच्या हातांना झाला... त्याचं हृदय एकदम जोर जोरात धडधड करायला लागले...

तेव्हा रितू बोलायला लागली, "आम्ही चोरी नाही केली होती... सीटच्या खाली पडला होता... आम्ही विचार केला होता सरदारजीचा असेल... आम्ही तिथे ड्राईवरला पण द्यायचा विचार केला होता... पण आम्हाला वाटले हे बरोबर नाही आहे.. ज्याचा पण असेल तो फोन तरी करेल... तेव्हा आम्ही त्याला सांगू... घरी येवून बघितले तर ह्याची ब्याटरी डेड झाली होती... आमच्या जवळ चार्जर पण नव्हता... विश्वास नसेल तर काकींना पण विचारू शकता...  आम्ही येताच त्यांना सगळे सांगितले होते..."

"ओहो... तुम्ही तर मनावरती घेतलात... तुम्हाला तर माहितीच आहे ना माझी मस्करी करायची सवय आहे..." रवी बोलून हसायला लागला...

"तुझ्या बरोबर कोण बोलतंय...?" रितू रागात त्याला बोलली तर नीरु हसायला लागली...

"ठीक आहे... धन्यवाद... आम्ही निघतो..." एवढं बोलून रोहन उभा झाला...

बाहेर निघायच्या पहिले रोहनने मागे वळून बघितले... पण नीरु तर त्याला सोडायला बाहेर सुद्धा नाही आली... ती दुसरी कडे तोंड करून शिडी चढत होती...


क्रमश...

Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment