Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Sunday, 17 June 2012

भाग ~ ~ ३२ एक प्रेम कथा

एक प्रेम कथा

Update 32"आत्ता विचार काय करायचा आहे बॉस...?" सगळी गोष्ट ऐकल्या नंतर अमनने रोहनला विचारले...


"विचार काय असणार... तिच्या समोर सारखं सारखं जायचे आहे... तिच्या हृदयात आपली जागा बनवायची आहे... आणि आपल्यासोबत येण्यासाठी राजी करायचे आहे... अजून काय...?" रोहनने उत्तर दिले.


"म्हणजे आज पासून तू पूर्ण मुलगीबाज होणार... हे हे हे...!" रवी हसत बोलला...


"मुलगीबाज नाही... निरुबाज बोल... मी ह्या आगोदर कुठल्या मुलीविषय कधी असा तसा विचार केला आहे.. बोल?" रोहनने जाऊन त्याची मान पकडली...


"सोड सा... जीव घेणार काय..?" रवी स्वतःला सोडवत बोलला, "तर कुठला तीसमारखान बनलास तू... तुझ्यावरती मारणाऱ्या मुली तुला 'नल्ला' समझायला लागल्या असतील आत्ता पर्यंत... हा हा हा...!" रवी टाळी वाजवत हसायला लागला..


"माझ्या सभ्यपणाला कोणी 'नल्लागिरी' समझत असेल तर समझो... मी पहिल्या पासून मानत आलो आहे कि जर माणूस आपल्या बायको पासून निष्ठेची अपेक्षा करतो तर त्याला पण तिच्या प्रती निष्टा केली पाहिजे... वाट बघितली पाहिजे..!" रोहनने तर्क दिला... आणि चार्जिंगला लावलेला आपला फोन ऑन केला.


"एकदम सॉलिड गोष्ट बोललास रोहन भाऊ... तू एकदम नशीबवान मुलगा आहेस जे तुला नीरु सारखी मुलगी भेटली ते...!" अमन बोलला.


"अजून कुठे भेटली यार... आत्ता तर फक्त बघितले आहे... गोष्ट खूप लांब चालेल वाटतंय...!" शेखर बोलला...


"हो... डोन्ट वरी रोहन.. जेव्हा पर्यंत तुला ती भेटत नाही... तो पर्यंत तू इथे राहू शकतोस... पाहुणा बनून... आपला घर समझून... मी जरा बाहेर जाऊन येतो... एन्जोय करा...!" एवढा बोलून अमन उभा झाला..
 
"आणि मी...? मी कुठे राहणार...!" रवीने मस्करी केली...
अमन फक्त हसला आणि निघून गेला...


अमन बाहेर निघाला होताच कि रोहनचा फोन वाजला... नितीनचा नंबर बघून रोहनने लगेच फोन उचलला, "हो भाऊ... ती... नीरु भेटली...!"


"काय...? काय बोलतो आहेस यार तू... ? हे कसं काय होवू शकतं..?" नितीन बोलला..


"हो यार खरोखर... मीने तिला पाहिले हि आहे... जसं तिने मला स्वप्नात सांगितले होते... ठीक त्याच जागेवर्ती आहे तिझं घर...!" रोहन बोलला...


"मला वाटतंय कि तू स्वप्नाच्या चक्करमध्ये आपलं स्वतःचं जीवन वाया घालवशील... मी तुला सांगितले होते ना हि सगळी कारस्थान श्रुतीची आहे... आणि नीरु नावाची हजार मुली तुला मी दाखवू शकतो... काय नावाच्या चक्कर मध्ये तू कोणाही निरुला आपलं सगळं काही देवून टाकणार...?" नितीनचा इशारा त्याच्या दौलती वरती होता...


"पण यार ती खूप सुंदर आहे... एवढी प्रेमळ आहे कि... बस... आणि स्वभाव तर खूप चांगला आहे.. आणि.." रोहन काही बोलतच होता कि नितीनने मध्येच त्याला टोकले..., "मी तिथेच येतोय... श्रुती पण माझ्या बरोबरच येतेय..!" नितीन बोलला...


"काय..? पण इथे कसे...? आणि ती श्रुती कशी येणार...? तुम्ही दोघे राहणार कुठे...?" रोहनने आश्चर्यचकित होवून प्रशांत विचारात गेला...


"जिथे तू राहतोय तिथे आम्ही नाही राहू शकत का..? बाकी गोष्ट आल्या नंतर सांगतो... आम्ही उद्या सकाळी निघणार घरातून... काही आणायचे आहे का...?" नितीन बोलला...


"हो यार... माझा पोकेट घेवून ये... घाई घाई मध्ये मी घरीच विसरून आलो... माझा एटीयम वैगेरे सगळं काही त्याच्यात आहे... आणि हो... ५-७ जोडी कपडे घेवून ये...पण श्रुती कशी काय येवू शकते भाऊ...?" रोहनला काहीच समझत नव्हते...


"बोललो ना यार... सगळं काही आल्यावर सांगतो...!" एवढं बोलल्यानंतर लगेच नितीनने फोन कट केला..


श्रुती त्याच्या बरोबरच बसली होती..."मला खूप भीती वाटते... जर बाबांना समझले कि कॉलेज मधून कुठलीच ट्रीप नाही जात आहे... तर?" श्रुती घाबरलेली होती... जेव्हा पासून नितीनने तिला सांगितले होती कि तू पण बटालाला चल... तेव्हा पासून ती आतल्या आत घुटमळत होती...


"का खाली फोकट आपलं डोकं लावतेस...? ह्याचा तुला बटाला मध्ये खूप वापर करायचा आहे... घे... तुझं गांव पण जवळ आलं... विसरू नकोस... उद्या सकाळी ठीक ८:३० वाजता... इथेच..." नितीन बोलला आणि गाडी वळवली...क्रमश...

Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment