Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Tuesday, 19 June 2012

भाग ~ ~ ३३ एक प्रेम कथा

एक प्रेम कथा

Update 33


**************************************************************
मित्रांनो प्लीज रोज प्रतिक्रिया पाहिजेत मला ह्या ब्लोग वरती नाही तर मला कठीण जाईल हि कथा लिहायला... तुमची प्रतिक्रियाच मला प्रोत्साहन देते अजून चांगलं लिहिण्यासाठी...
**************************************************************

"यार... मला तर काहीच समझत नाही आहे कि नितीन इथे कशाला येत आहे..? आणि ते पण श्रुतीला घेवून...?" रोहन विचलित माणसासारखा बसून काही विचार करून अचानक बोलला...


"अरे बाबा... ह्याच्या मध्ये एवढं डोकं लढवायची काय गोष्ट आहे... येत आहे तर येवू... त्याचं पण ऐकून घे... प्रोब्लेम काय आहे...?" शेखरने रोहनच्या जवळ बसून त्याच्या कांध्यावरती हाथ ठेवला...


"ती गोष्ट नाही आहे यार... पण ते राहणार कुठे...? नितीन तर ठीक आहे... पण श्रुती..!" बोलता बोलता तो अचानक थांबला...


जवळ बसलेल्या रवी संधीचा फायदा उचलायला नाही विसरला, "यार, मुलीचा एवढा प्रोब्लेम होत असेल तर मी ठेवतो तिला माझ्या रूम मध्ये... हे हे हे...!"


"तुला ह्याच्या शिवाय पण काही काम आहे कि नाही.. जेव्हा बघा..." रोहन रागात बोलला...


"यार, ह्या गोष्टीला विसरून जा... एवढ्या मोठ्या घरात काय ६ जण पण नाही राहू शकत काय...?" शेखरने त्याला परत एकदा समझावण्याचा प्रयत्न केला..., "जर गरज पडली तर आपण रूम शेअर पण करू शकतो... मुलगी एकटी एका रूम मध्ये राहेन काय प्रोब्लेम आहे..."


"ती गोष्ट नाही आहे यार... पहिलेच तुने आणि अमन भाऊने आमच्या वर एवढा उपकार केला आहे.." रोहन बोलतच होता कि शेखरने त्याला प्रेमाने एक टपली दिली, "तू एकदम छान बोललास भाऊ... उपकाराची गोष्ट करून तर तुने मला परका केलास यार... अमनला तुम्ही लोकांनी अजून पर्यंत समझू नाही शकले आहात भाऊ... मित्रांचा मित्र आहे तो... जर तुम्ही पूर्ण आयुष्य जरी इथे राहिलात न तरी त्याच्या तोंडातून एक शब्द पण बाहेर नाही पडणार.. उलट तो तर अजूनच खुश होईल... एकटा राहून राहूनच तर त्याला नशा करायची आवड निर्माण झाली... त्याच्या सारखा 'मित्र' मीने अजून पर्यंत नाही पाहिला आहे... आणि कदाचित तुम्ही पण नाही पाहू शकता... जस्ट रील्याक्स आणि नीरु वर लक्ष केंद्रित कर... ओके...?"


"ठीक आहे यार... पण मी पूर्ण प्रयत्न करेन त्यांना इथून लवकरात लवकर परत घालवण्याचा.." रोहन बोलला होताच कि अमनने रूम मध्ये प्रवेश केला, "कोणाला लवकर पाठवतो आहेस मित्रा...?"


"ते यार... माझा अजून एक मित्र उद्या येत आहे... एक मुलगी पण आहे त्याच्या बरोबर...!" रोहन बोलला..


"अरे वाह... मग तर पार्टी व्हायला पाहिजे यार... ती... मुलगी पर्सनल आहे काय...?" अमनने काही वेळ थांबून विचारले...


"नाही यार... ती मुलगी तशी नाही आहे... खूप सभ्य आहे... तिच्या बरोबर काही लफडं नको प्लीज... मला तर हेच समझत नाही आहे कि नितीन तिला घेवून तरी कसा येणार...? म्हणजे तिच्या घरी काय सांगणार...?" रोहन अमनकडे बघत बोलला...


"सभ्य मुलींशी तर मला अशीच भीती वाटते भाऊ... चल येवू दे... बघूया तुझ्या त्या सभ्य आणि लाजाळू मुलीला... आजचा काय प्रोग्राम आहे..?" अमन बोलला...


"काहीच नाही आहे..." रोहन बोलला..


---------------------------


दुसऱ्या दिवशी दुपारी ठीक १२.३० वाजता बटाला हाईवे वरती उभे राहून रोहन आणि शेखर नितीनची वाट बघत होते... नितीनच्या गाडीला रोहनने लांबूनच ओळखले... आणि शेखरच्या गाडीमधून उतरून त्याला थांबण्याचा इशारा केला... नितीनने गाडी थांबवली... रोहनने नितीनशी  हाथ मिळवला... आणि त्याच्या बरोबर बसलेल्या श्रुतीला हेलो बोलून तो पाठच्या सीटवर जावून बसला, "पुढच्या गाडीच्या मागे मागे जायचे आहे भाऊ..."


--------------------------------


"तर... तुमचं सांगण हे आहे कि माझ्या स्वप्नाचं कारण तुम्ही आहात..." रोहनने श्रुतीला विचारले... तो आणि श्रुती घराच्या हॉल मध्ये एकटे एकमेकांसमोर बसले होते... नितीनने रवीला घेवून मुद्दामहून बाहेर निघून गेला होता, कारण श्रुती एकदम भोळ्याभाल्या रोहनला आरामात तिला सांगितलेली गोष्ट सांगू शकेल.. रवी नितीनच्या प्लान मध्ये घोळ करू शकला असता...


श्रुती रोहनच्या प्रश्नावर काहीवेळ गप्प बसून राहिली, मग पहिले होकारार्थी मान हलवली आणि आपली नजर वर करून बोलली, "हो...!"


श्रुतीचा चेहरा आणि रंग रूप एवढं चांगलं होतं कि जर रोहनने नीरुला नाही पाहिले असते तर तो कदाचित तिच्या ह्या उत्तरालाच शेवटच उत्तर मानलं असतं... पण त्याच्या जवळ आत्ता विचारायसाठी  अजून किती तरी प्रश्न होते... " पण का...? माझं म्हणजे असा आहे कि मी तुला पहिले तुझ्या घरीच बघितले होते ना.. आणि कदाचित तुने हि... मग अशी का करत होतीस... आणि असं कसं होवू शकतं कि कोणी जिवंत मुलगी कोणाच्या स्वप्नात येवून जे बोलायचे आहे ते बोलू शकते, त्याला तिच्या जवळ यायला बढाया करू शकेल...? प्लीज मला सगळी गोष्ट एकदम डिटेल मध्ये समझव... मी खूप कन्फ्युजन मध्ये आहे... "


बोलायला तोंड उघडताना श्रुतीच्या चेहऱ्यावरती एक शिखण आली.. तिला माहित होते कि ती जे पण काही बोलणार, खोटंच बोलणार.. नितीनच्या सांगण्यानुसार.. जे काही तिने स्मरण केलं होतं... ते ती एका स्वर मध्ये बोलत जाणार... न थांबता...


"खरं म्हणजे जे काही झाले, ते अर्ध मी केलं आणि अर्ध देवाने... पहिले माझ्या स्वप्नात तुम्ही दिसायला लागले होते... मी खूप बेचैन राहायला लागली होती... तुम्ही पण सारखं तीच गोष्ट करत राहायचे जे मी तुम्हाला स्वप्नात सांगितले होते आत्ता पर्यंत... हे सगळं जेव्हा एक महिन्यांपर्यंत चालू राहिलं तेव्हा मी गावात असलेल्या एका बाबांकडे गेली... ह्या स्वप्नांचं कारण समझण्यासाठी... त्याने मला सांगितले कि आपलं दोघांच काही गेल्या जन्माचा संबंध आहे.. आणि त्यामुळे मला असले स्वप्न येतात... त्याच बरोबर ते बोलले कि २१ दिवसांचा एक अखंड पूजा करून आपल्या आत्म्यांना एक दुसऱ्या पासून वेगळं करू शकतो, कारण परत कधी मला असले स्वप्न पडू नये..." बोलता बोलता श्रुती अचानक गप्प झाली... नितीनने तिला असंच बोलायला सांगितले होते...


"नंतर...?" रोहन खूप लक्ष देवून तिच्या प्रत्येक गोष्टींवर विश्वास करत होता... श्रुतीच्या थांबताच तो बेचैन झाला, "पुढे तरी सांग ना..."


"त्याने तुम्हाला माझ्या जीवनातून कायम स्वरूपी घालवण्याचं आश्वासन दिलं होतं..." श्रुती परत एकदा गप्प झाली.. ह्या वेळी नितीनच्या सांगण्या वरून ती गप्प बसली नव्हती... पण जे तिला सांगायला सांगितले होते... ते सांगायला तीला हिम्मत होत नव्हती...


"पण काय...? बोल ना...!" रोहन विचलित होत बोलला...


"पण... मला तुझ्या बरोबर तेव्हा पर्यंत... प्रेम झालं होतं... फक्त रात्रीच नाही तर मी दिवसा पण तुमचे स्वप्न बघायला लागली होती... मला माहिती पण नाही पडले कि कधी असे झाले... पण जेव्हा बाबाने तुम्हाला माझ्या जीवनातून काढून टाकायचं बोलला तर मी साफ नकार दिला..." श्रुती बोलली...


"तू थांबते का आहेस मध्ये मध्ये.. सगळी गोष्ट सांग ना... पुढे काय झाले...?" रोहनने स्वतः असले स्वप्नं पाहिले होते त्यामुळे श्रुतीच्या बोलण्यावर त्याला विश्वास बसने साहजिकच आहे...


"मी त्यांना सांगितले कि मला तुमच्याशी प्रेम झाले आहे.. आणि जर आमचा काही गेल्या जन्माचा संबंध आहे तर आम्ही ह्या जन्मात का नाही भेटू किंवा एक होवू शकत...? ते बोलले कुठे भेटू शकता...! मीने त्यांना विचारले कि तुम्हीच सांगा तर त्यांनी एक रस्ता सांगितला... ते बोलले कि ते मला स्वप्नामध्ये तुमच्या जवळ पाठवू शकतात... ते बोलले कि मला जे काही विचारायचे आहे ते मी स्वप्नात विचारू शकते... बाकी तुमच्यावर डिपेंड आहे कि तुम्ही स्वप्नाला कश्या प्रकारे घेता... मग त्यांनी माझ्या सांगण्यानुसार पूजा सुरु केली... आणि मी तुमच्या स्वप्नात यायला लागली..." श्रुतीच्या डोळ्यातून अश्रू निघायला लागले.. रोहनच्या प्रेमामुळे नाही... एका सभ्य मुलासमोर खोटांवर खोटं बोलण्यामुळे...

क्रमश...

Previous Chapter                                   Next Chapter

1 comments:

  1. gud going... and nice arrangement.......

    ReplyDelete