Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Thursday, 21 June 2012

भाग ~ ~ ३४ एक प्रेम कथा

एक प्रेम कथा

Update 34


"ओह! तुम्ही अशी रडत का आहात...?" रोहनने तिचे रडणे तिचं त्याच्या वर खूप प्रेम आहे असा समझलं ... खरंच..! रोहनचं हृदय विरघळल होतं तिची गोष्ट ऐकून... श्रुतीने रुमाल काढला आणि आपले अश्रू पुसले... पण  जुने अश्रू अजून सुखले पण नव्हते कि ती परत एकदा रडायला लागली... आपले पाय सोफ्यावर घेतले आणि गुढघ्यात आपलं तोंड टाकून ती रडायला लागली..


रोहन तिच्याजवळ आला आणि तिच्या डोक्यावर हरत फिरवत तिला समझवायला लागला, "प्लीज... तुम्ही रडू नका... मी तुझी हालत समझू शकतो... खरं म्हणजे मी पण काही दिवसांपूर्वीच प्रेमाचा अर्थ समझू शकलो आहे... नीरु... सॉरी... तुमच्या स्वप्नात येण्याच्या नंतर... तुम्ही रडू नका प्लीज... माझं पण मन दुखी होत आहे तुमचं रडणं बघून..."


'किती फरक होता रोहन आणि नितीनमध्ये; एक तर तो माणसाच्या रुपात असणार एक जनावर होता, ज्याच्या साठी मैत्री काहीच नाही आहे... एकीकडे रोहन, माणसाच्या रुपात देव! किती सभ्यपणा होता त्याच्या हृदयात..'


हे सगळं विचार करून श्रुतीने आपल्या शरीराला ढिलं सोडून तिचं डोकं त्याच्या कांध्यावरती ठेवलं... डोळ्यातून अश्रू अजून पर्यंत येत होते...


रोहनने तिच्या हातातून रूमला घेतला आणि तिच्या गालावरती येणाऱ्या अश्रूंना तो थांबवण्याचा प्रयत्न करू लागला... श्रुतीला त्याच्या डोळ्यामध्ये वासनेचा एक भाव पण नाही दिसला... त्याच्या हृदयात तर फक्त प्रेमच प्रेम भरलं होतं... हळू हळू श्रुती रडायची थांबली आणि ती परत सरळ बसली...


श्रुतीचं रडणे थांबले आहे हे बघून रोहनने आपल्या मनात आलेल्या काही प्रश्नांचे उत्तर माहिती करायसाठी प्रयत्न करू लागला, "जर तुम्ही आत्ता नॉर्मल झाले आहात तर एक विचारू का..."


श्रुतीला त्याला सगळं काही खरं सांगायचं होतं... पण तिचं सांगणे म्हणजे तिचं जीवनच खराब झालं असतं... थोडा वेळ गप्प बसून स्वतः ला सांभाळून तिने ते संभावित प्रश्न आठवले जे नितीनने तिला सांगितले होते आणि रोहनच्या डोळ्यात डोळे टाकून बोलली, "हो... मी ठीक आहे...!"


"तुम्ही मला त्या जुन्या वाड्या जवळ का बोलावले...? घरी का नाही...?" रोहन परत उठून समोर जाऊन बसला...


"ते त्या बाबानेच मला असं करायला सांगितले होते... खरं म्हणजे 'पूजा' तिथेच चालू होती... आणि पूजा चालू करायसाठी एकदा तुमची उपस्थिती आवश्यक होती... त्यामुळे त्यांनी तुम्हाला तिथे बोलावले होते..." ह्या प्रश्नच उत्तर श्रुतीने पहिलेच पाठ करून ठेवले होते... त्यामुळे बोलतांना ती मध्ये कुठेच अटकली नाही...


"ओह... म्हणजे जेव्हा आम्ही तिथे गेलो होतो तेव्हा तिथे आसपास दुसरे कोणीतरी होते... गाडीची हवा पण त्यानेच काढली असेल... काय नाव आहे त्या बाबाचे...?" रोहनने असंच विचारले...


"माहित नाही... लोकं त्यांना अज्ञात बाबा बोलायचे...!" श्रुतीने पहिलेच पाठ केलेलं नाव पण सांगितले...


"एक गोष्ट मला अजून पर्यंत समझली नाही... जेव्हा तुम्हीच माझ्या स्वप्नात येत होत्या... आणि तुच मला बोलावणार होती... तर हे 'नीरु' नावाचं काय चक्कर आहे...?" रोहनला हा प्रश्न आतल्या आत खात होता...


"ते बाबानेच मला असं करायला सांगितले होते... खरं म्हणजे त्यांनी मला सांगितले होते कि गेल्या जन्मी तुझं नाव नीरु होतं... त्यामुळे..."


"मग तुम्ही मला स्वप्नात असं का बोलली होतीस कि मी नीरु नाही आहे... नीरु तर बटालामध्ये राहते...!" अजून एक प्रश्न श्रुतीच्या समोर उभा होता...


कमालीची तैय्यारी करून ठेवली होती नितीनने... आपल्या कपटी डोक्याचा वापर करून त्याने छोट्याश्या छोट्या गोष्टींवर्ती विचार केला होता... श्रुतीला मिशन वरती लावण्याच्या आगोदर... श्रुतीच्या जवळ प्रत्येक प्रश्नाचं उत्तर होतं; पहिलेच तैय्यार केलेलं, "हे पण मी त्या बाबांच्या सांगण्यानुसारच केलं होतं... त्यांनी मला सांगितले होते कि पूजेच्या वेळी मला तुमच्या जवळ नाही जायचे आहे... तुम्हाला शिवायचे पण नाही आहे... त्यामुळे... त्यामुळे त्यादिवशी मीने तुम्हाला बघितले पण नाही... मान खाली करूनच होती प्रत्येक वेळी... आणि रात्री स्वप्नात तुम्ही मला हाथ लावू नये म्हणून मी असं बोलली होती...!"


"ओह्ह... पण इथे पण मला नीरु भेटली... एकदम तशीच जसं तुम्ही मला स्वप्ना मध्ये सांगितली होती.. आणि स्वप्नात जशी मला घराच्या बाहेर मला उभी दिसायची... एकदम ठीक तसंच घर आहे तिचं... मी तर हैराण झालो होतो ते बघून... तुमच्या गोष्टींवर मला विश्वास आहे... पण मला अजून पर्यंत समझत नाही आहे कि हा योगायोग कसा झाला... का ह्याच्यापाठी पण बाबा अज्ञातचा हाथ आहे...?" रोहनच्या डोक्यात अजूनपर्यंत प्रश्नांनी भडीमार घातला होता...


रोहनचे वाक्य पूर्ण होण्याआधीच श्रुती बोलायला लागली... नितीनला विश्वास होता कि हा प्रश्न पण विचारला जाणार, "हो... त्यांनीच आपल्या मंत्र शक्तीने 'कोण नीरु' नावाच्या मुलीचा पत्ता लावला... पूजा संपन्न होण्यासाठी मला गेल्या जन्माच्या नावाचा उपयोग करणे जरुरी होते... आणि मी जे काही सांगितले होते ते पूजेच्या नियमानुसार खरं होणे पण आवश्यक होते... त्यामुळे त्यांनी मंत्र शक्तीचा प्रयोग करून इथल्या निरूचा पत्ता लावला... आणि मला स्वप्नात ह्याच जागेचा उपयोग करायला सांगितला होता... "


"ह्म्म्म..." श्रुतीचं शेवटचं उत्तर त्याला पूर्ण पणे समझलं  नव्हंत... पण तो तिच्या कोणत्याच गोष्टीवर्ती शक नाही करत होता... त्यामुळे ती गोष्ट पचवायला सोप्पी होती...  बटालाची नीरु पूर्ण पणे त्याच्या डोक्यातून निघाली होती, "आत्ता तर मला स्वप्नात येवून घाबरवणार नाहीस ना...!" रोहन तिच्याकडे बघून हसायला लागला...


बेचाऱ्या श्रुतीला रोहनच्या स्माईलचं उत्तर पण स्वतःच्या मर्जीने पण देता आलं  नाही..., "बाबाने सांगितले आहे कि जो पर्यंत आपण.. ते... लग्न नाही करत... तोपर्यंत तुम्हाला असेच स्वप्न पडत राहणार... मी अशीच तुम्हाला जुन्या वाड्याजवळ बोलावत राहणार... आणि अशीच सांगत राहणार कि मी बटालामध्ये आहे... मी श्रुती नाही आहे... नीरु आहे..." नीरुने 'सेक्स' शब्दाच्या जागी 'लग्न' शब्दाचा वापर केला... एवढ्या सभ्य माणसासमोर तिला 'सेक्स' शब्द वापरणे कठीण जात होते...


"पण असं का...?" रोहनने उत्सुकतेने विचारले...


इथे श्रुती घाबरली... हा पहिला असा प्रश्न होता जो तिच्या जवळ पहिले नाही आला होता... पण ती लवकरच स्वतःला सांभाळत बोलली, "ह्म्म्म... माहित नाही... कदाचित पूजेचा प्रभाव तो पर्यंत राहील, जो पर्यंत आपण एक नाही होत...ते.. मी थोडा वेळ आराम करू...? मला थकवा वाटत आहे..." श्रुतीने आपली पिच्छा सोडवण्यासाठी बोलली...


"ओह शुअर...! सॉरी... मला असे एकदम एवढे प्रश्न विचारायला नाही पाहिजे होते... खाली ३ बेडरूम आहेत... पहिल्या वाल्याला सोडून कुठे पण जाऊन आराम करू शकता.. तो पर्यंत मी खाण्या पिण्याचा बंदोबस्त करतो.."


"धन्यवाद...!" श्रुती थकलेल्या सारखी उठली आणि ग्यालरी जवळ गेली.. अचानक तिला पाठून रोहनचा आवाज ऐकायला आला, "श्रुती..!"


"हो...?" श्रुती एकदम पाठी वळली...


"काहीच नाही... बस असंच... अजून एकदा तुझा चेहरा बघण्याचं मन होत होतं..." रोहन बोलला...


श्रुतीने फक्त एक फिकी स्माईल दिली आणि परत पाठी वळून निघून गेली...
क्रमश...

Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment