Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Sunday, 24 June 2012

भाग ~ ~ ३६ एक प्रेम कथा

एक प्रेम कथा

Update 36डोळ्यात अश्रुंचे अथांग सागर घेवून श्रुती रूममधून बाहेर आली... आपल्या थरथरत्या पायांनी ती रोहनच्या बेडरूम जवळ गेली... काही अंतर पुढे चालल्यानंतर तिने मागे वळून बघितले; नितीन दरवाजा जवळ उभा राहून तिच्याकडे बघून हसत होता... पुन्हा पुढे बघून ती सरळ चालत रोहनच्या बेडरूम जवळ गेली आणि हळूच दरवाजा ठोकवला...

"कोण...?" आत मधून रोहनचा आवाज आला...

"मी आहे श्रुती... प्लीज जरा दरवाजा खोल...!" एवढं श्रुतीच्या बोलताच नितीनने आपला दरवाजा बंद केला...

रोहनने दरवाजा उघडताच श्रुतीला बघून तो आश्चर्यचकित झाला... रडल्या मुळे तिचे डोळे लाल झाले होते आणि ती घाबरल्यामुळे थरथरत होती.., "काय झालं श्रुती...? काय झालं तुला...?"

त्याची परवनागी घेतल्या शिवाय ती आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आहे बघून रोहन एका बाजूला झाला आणि तिला आतमध्ये येण्याचा रस्ता दिला... पण जसेच रोहनने लाईट ऑन केली तसा तो दुसर्यांदा आश्चर्यचकित झाला, "हे..." पण तो काहीच नाही बोलू शकला...

श्रुतीला त्या कपड्यांमध्ये बघून आणि त्या कपड्यांमध्ये तिला आपल्या जवळ पाहून रोहनचं अचंबित होणं अनिर्वार्य होतं... ड्रेसमध्ये ती जसं आतमध्ये काहीच न घालता उभी आहे असं वाटत होती... रोहनने कधीच श्रुतीला ह्यासारख्या मुलीच्या रुपात नाही पाहिले होते... श्रुती तर त्याच्या समोर पहिलेच मान खाली घालून उभी होती... लज्जित होवून रोहन पण ज्यास्त वेळ तिला बघू शकला नाही... आपला चेहरा दुसरीकडे फिरवत बोलला, "काय झालं श्रुती...? ह्यावेळी इथे...?"

"ते... मला वाईट स्वप्नं येत होते... मला खूप भीती वाटत होती..." श्रुतीने उत्तर दिलं...

"ओह... स्वप्नांना घाबरायचे कशाला... थोडं पाणी पी आणि झोपून जा..." टेबल वर ठेवलेल्या तांब्यामधून रोहनने ग्लासमध्ये पाणी टाकले आणि दुसरीकडे बघत तो ग्लास श्रुतीला दिला...

"मला खरोखरंच भीती वाटते रोहन... मी... मी इथेच झोपून जाऊ काय...?" श्रुतीने थरथरणाऱ्या ओठांनी आपले वाक्य पूर्ण केले...

"इथे..? तुला वाटते हे ठीक असेल...?" रोहन कपाटामध्ये काहीतरी शोधत बोलला...

"पण मला खूप भीती वाटते... मी एकटी नाही झोपू शकत...!" श्रुती जोर देत बोलली... नितीनने तिला बजावले होते... 'जर तिथून परत आलीस तर तुला माझ्या जवळ झोपायला लागणार...'

रोहनने ने कपाटा मधून एक चादर काढून आणली आणि श्रुतीच्या खांद्यावर टाकून चारही बाजूने लपेटली... "ये बस...!"

रोहनच्या चादर टाकण्याचा अभिप्राय ओळखून श्रुती लाजेने पाणी पाणी झाली... स्पष्ट होतं कि रोहनला तिचा 'हा' पेहनावा बिलकुल पण पसंत नव्हता... श्रुती दीर्घ श्वास घेवून विचार करू लागली... कि कुठे रोहन आहे आणि कुठे नितीन...! रोहनच्या ह्या एका अदेने श्रुतीला कायमस्वरूपी त्याचा दिवाना बनवलं... तिचं हृदय आत्ता रोहनच्या प्रेमात पडलं होतं...

पाय खाली लटकवूनच ती बेडवर बसली... किती तरी वेळ रूम मध्ये शांतताच पसरली होती... श्रुतीने रूममध्ये चहुबाजूने आपली एक भिरभिरती नजर फिरवली.. आणि तिला 'फेन्सि लाईट' च्या बरोबर जोडलेला एक छोटा कॅमेरा शोधायला वेळ नाही लागला... कॅमेरा बेडवरच फोकस केलेला प्रतीत होत होता... नितीनने त्याच्या बाबतीत पहिलेच बोलून... रोहन बरोबर सेक्स नाही केल्यावर परिणाम वाईट होतील अशी एक चेतावणी पण दिली होती..

श्रुतीला आत्ता रोहन बरोबर प्रेम करायला काहीच अडचण नव्हती... उलट आत्ता तिचं हे एक स्वप्नंच बनलं होतं... आत्ता रोहनच तीचा पहिला आणि शेवटचा प्रेम होता... पण रोहनचं व्यक्तित्वच असं होतं कि श्रुतीला काहीच समझत नव्हत कि सुरुवात कशी करावी...

"झोपून जा...!" रोहन बोलला आणि दुसरी तोंड करून बेड वर झोपला...

"एक मिनट...!" श्रुतीने दिवाळाला आपली पाठ टेकत आपले पाय बेड वर पसरले... हे सगळं तिने ह्या प्रकारे केलं कि अंगावर लपेटलेली चादर तिच्या कंबरेपर्यंत आली आणि तिची नग्न चिकणी जांघे पूर्णपणे दिसायला लागली... एवढ्या वरती कि रोहनने जर आपली कुशी तिच्या कडे केली असती तर तो तिच्या गुलाबी निकरच्या किनाऱ्यांना पण एकदम साफ बघू शकला असता...

"ह्म्म्म..." रोहन दुसरीकडे तोंड करूनच बोलला...

"इकडे एकदा वळ ना प्लीज..." श्रुती बोलली...

रोहनने जसेच आपली कुशी बदलली, श्रुतीचं हे रूप बघून तो भडकला, "श्रुती... मला तुझी हि हरकत बिलकुल पसंत नाही आली आहे... मी तुला चांगली मुलगी समझत होतो... हे सगळं बकवास बंद कर...!"

"माझ्याबरोबर 'प्रेम' कर ना प्लीज... मी तुझ्यासाठी किती तरी दिवसांपासून तडपतेय..." आपल्या हृदयाला दगड बनवून श्रुती बोलली आणि रोहनला बहुपाश्यात घेण्यासाठी त्याच्याकडे वळली... रोहन तिच्या ह्या हरकती वरती हतप्रभ होता... धक्का देवून त्याने श्रुतीला तिथेच आपटले, "प्रेम...! तुझ्या सारख्या मुली समझतात का तरी प्रेम काय असते ते... सेक्सच्या संतुष्टी साठी तू प्रेम मांगतेस... आणि दावा करतेस कि आपण जन्मा जन्मा पासूनचे साथी आहोत... धिक्कार आहे तुझ्या वर... नितीन भाऊ एकदम बरोबरच बोलला होता... हे तुम्हा दोघा बाप लेकीचीच कारस्थान असणार... लाज वाटायला पाहिजे... आपल्या शरीराला तू मला सोपवून हा पुरावा देतेस कि तू माझ्या वर प्रेम करतेस... आत्ताच्या आत्ता निघून जा इथून..." रोहनचा चेहरा क्रोधाने एकदम तापला होता आणि डोळे तर एकदम लाल लाल झाले होते...

श्रुती जवळ आत्ता बोलण्यासाठी काहीच नव्हते... जे होतं ते ती बोलूच शकत नव्हती... लाजेने मान खाली केली होती तरी पण ती हाथ जोडून अश्रू वाहवून हीच प्रार्थना करत राहिली, "प्लीज रोहन... माझ्या बरोबर प्रेम कर... इथून नको काढूस प्लीज...! माझ्या बरोबर प्रेम कर..."

रोहनची सहन शीलता तुटली... रागात तो उठला आणि श्रुतीचा हाथ पकडून जवळ जवळ खेचतच तिला बाहेर घेवून गेला... थोडासा धक्का दिला आणि आपला दरवाजा बंद करून घेतला... एक दोन वेळा श्रुतीने दरवाजा हलकासा ठोकवला आणि रडत ती तिथेच गुढग्यामध्ये बसली आणि रडायला लागली...

रोहनचं डोकं चक्रावत होतं... त्याला समझत नव्हते कि काय करू... अचानक उठला आणि बाहेर निघून जबरदस्तीने उचलून तिला तिच्या रूम मध्ये सोडले आणि बाहेरून कडी लाऊन घेतली... श्रुती फक्त रडत राहिली...

किती तरी वेळ श्रुती अशीच दिवाळा कडे बघत अश्रू वाहवत होती...तिच्या जवळ आत्ता तिचं काहीच उरलं नव्हतं... प्रेम भेटलं सुद्धा ते पण अर्धचं...!

अचानक तिने आपल्या पर्स मधून एक कोरा कागद आणि एक पेन काढला आणि अश्रूंनी कागदाला भिजवत ती त्यावर काही तरी लिहायला लागली...

----------------------------------


दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी एक किंकाळी ऐकून बेड वरून उठण्याची तैय्यारी करणारा रोहन आश्चर्य चकित होवून बाहेर निघाला... नोकर श्रुतीच्या रूमच्या बाहेर उभा होता... आणि आपल्या दोन्ही हातांनी आपले डोके पकडत होता, "साहेब... म्याडम...!"

रोहन पळत त्याच्या जवळ गेला, "काय झालं ...?" पण आतमध्ये बघितल्या वर त्याला दुसऱ्यांदा विचारायची गरज नाही भासली... श्रुतीचा मृतदेह आतमध्ये पंख्याला लटकलेला होता...
क्रमश...

Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment