Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Tuesday, 26 June 2012

भाग ~ ~ ३७ एक प्रेम कथा

एक प्रेम कथा

Update 37पुढच्या क्षणी रोहनला चक्कर येत आहे असे वाटले... त्याच वेळी त्याला रात्री त्याचं आणि श्रुतीच्या मध्ये जे काही झाले, सगळं काही त्याच्या डोळ्यासमोर आलं... कदाचित रोहनने ह्याच्यासाठी स्वतःला दोषी मानलं होतं... जसं तसं त्याने दिवाळ पकडले आणि आपल्या डोक्याला हथामध्ये पकडून खाली बसत गेला...


जवळ उभा असलेला नोकर अचंबित होवून कधी श्रुतीच्या मृत शरीराला; तर कधी रोहनला बघत होता.. अचानक त्याला नाही समझले कि काय करू वा काय नाही करू... रवी, अमन आणि शेखर खाली झोपले होते...


नोकराने खाली जाऊन अमनला सांगायचा विचार केला होताच कि नितीन आपल्या रूम मधून बाहेर निघाला... रोहनला ह्या अवस्थेत बसलेला पाहून तो लगेच त्याच्या जवळ आला आणि श्रुतीच्या बेडरूममध्ये बघतच त्याच्या तोंडून निघाले, "अरे देवा...!"


नितीन जवळ जवळ पळत बेड वर चढला आणि श्रुतीच्या शरीराला पकडून वरती उचललं, "इकडे ये... मला मदत कर...लवकर...!" त्याने नोकराला आवाज दिला...


"शिट...! शी इस नो मोर...!" नीतीनने एक पाय दुमडून श्रुतीच्या मृतदेहाला त्याच्या वर टेकवून आपल्या डोळ्यातले अश्रू पुसले...


तेव्हा पर्यंत रोहन पण रूममध्ये आला होता... त्याने नितीनच्या खांद्यावरती हाथ ठेवला... जसेच नितीन त्याच्याकडे वळला, रोहन त्याच्या छातीशी लागला, "भाऊ...! हे मी काय केले...?"


नोकर रोहनचे हे वाक्य ऐकून दचकला... वेळ फुकट न घालवता तो खाली पळाला...


"म्हणजे काय...? म्हणजे तुने हे सगळं... ? पण का यार..?" नितीनने रोहनच्या डोळ्यात बघितले..., "हे काय केले तुने...?"


"हो भाऊ... मीच... मीच तिला जीव देण्यासाठी मजबूर केले...!" रोहन अश्रू गाळत बोलत राहिला, "रात्री हि माझ्या रूममध्ये आली होती.. मी स्वतः हिच्या मिलनाची हिची वासना समझलो... 'हि' बेचारी तर आपलं गेल्या जन्माचं 'अधुऱ्या प्रेमा' ला पूर्ण करायला आली होती... आणि मी हिला काय काय बोललो... बे-इज्जत करून काढून टाकले हिला, आपल्या रूम मधून...!" एवढं बोलून तो ह्या जगाला सोडून गेलेल्या श्रुतीच्या मृतदेहाला आलिंगन देवून रडायला लागला...


"स्वतः ला सांभाळ यार... तू स्वतः ला ह्या साठी दोषी का मानतो आहेस? तुने हिला फक्त रूममधून काढले होतेस... जीव द्यायला थोडी सांगितले होते..!" नितीनने त्याला श्रुतीच्या शरीरापासून वेगळे केले...


"पण यार...! हि माझ्या वर किती प्रेम करत असणार... काय केले हिने...? बघ तरी...! आआआआ.... आआआआ" रोहनच्या रडण्याचा आवाज पूर्ण घरात पसरला होता...


तेव्हा रूममध्ये अमन, शेखर आणि रवीने प्रवेश केला... सगळ्यांना खबर लागली होती... डोळे मोठे करून सगळे जन येवून बेड जवळ उभे झाले...


"हे काय झाले यार...? कसे झाले हे सगळे...?" अमनने विचारले...


"हि माझ्या बरोबर प्रेम करायची यार..." रोहनने बोलण्यासाठी सुरु केलेच होते कि नितीनने त्याचं तोंड दाबत तो स्वतः  सांगायला सुरुवात केलं... रवी नितीनच्या चेहर्या कडे बघून लक्षपूर्वक ऐकत होता...


"अरे देवा...!" पूर्ण गोष्ट ऐकल्यानंतर अमन आणि शेखरच्या तोंडातून निघाले..., "हे तर खूप वाईट झाले...? आत्ता काय करायचे...!" अमन श्रुतीच्या बाबतीत बोलत होता...


"आत्ता काय करू शकतो...?... आत्ता हिला घरी पोहचवण्याची तैय्यारी करा...!" रवीच्या तोंडून निघाले...


"नाही! हिला घर नाही पाठवू शकत... हि आपल्या वडिलांना खोटं बोलून आली होती... कि कॉलेजच्या सहिलीसाठी आली होती... हिचं दुसरंच काही तरी करायला लागणार..!" नितीनने आपले वाक्य पूर्ण केले...


"नाही... मी घेवून जाणार हिला.. हिच्या घरी..! हिच्या मृतदेहाला अग्नी देणार... आत्ता पण काय हिच्या प्रेमाला इग्नोर करू...!" रोहन भाऊक झाला होता...


"आत्ता फिल्मी गोष्ट सोडून दे यार... जे व्हायला पहिले ते झाले आहे... नितीन बरोबर बोलत आहे... आपल्यांना हिच्या मृतदेहाला कुठे तरी नायनाट करायच्या बाबतीत विचार केला पाहिजे... नाहीतर सगळ्यांवर गधा येवू शकते..." रवी रोहनला बोलला...


रडणाऱ्या रोहनने परत श्रुतीच्या शरीराला बहुपाश्यात घेतले..., "नाही...! जे काही होईल, ते मी बघेन.. पण हिला हिच्या घरापर्यंत मी घेवूनच जाणार... हिच्या आत्म्याला परत भटकायला नाही देणार...मी.."


"वेरी गुड...!" दरवाज्यावर एकदम कठोर आवाज ऐकून सगळे जण दचकून पाठी वळले... वर्दी घालून एक इन्स्पेक्टर एका शिपाया बरोबर दरवाज्या जवळ उभा होता... सगळे उभे राहिल्यावर तो आतमध्ये आला आणि एकदम लक्ष देवून श्रुतीच्या मृतदेहाला बघत होता..., "तर मुलीच्या आत्म्या बरोबर खेळता तुम्ही लोकं..?" इन्स्पेक्टरने एक एक करून सगळ्यांना लक्षपूर्वक बघितले...


"एक मिनट... साहेब तुम्ही माझी गोष्ट ऐका...!" नितीन बोलला तर इन्स्पेक्टरने आपलं एक सरळ बोट दाखवून त्याला थांबायचा इशारा केला..., "खूप वेळेपासून तुमच्या सगळ्यांचेच ऐकतो आहे... नोकर कुठे आहे...?"


"एक मिनट...!" एवढं बोलून अमन बाहेर निघाला आणि बाल्कनी मध्ये उभा राहून आवाज दिला...


नोकर पुढच्याच क्षणी इन्स्पेक्टरच्या समोर होता..., "होय... साहेब...!" त्याचा आवाज थरथरत होता...


"घाबरू नकोस राजू... सगळं काही एकदम खरं सांग इथे काय झाले आहे ते...!" इन्स्पेक्टरने विचारले...


"मला काहीच नाही माहिती साहेब.... मी तर रात्रीपासून खाली होतो... खरंच..!" नोकराने मध्येच गळा साफ करून आपले बोलणे पूर्ण केले..


"तर फोन का केला होता भोस...? मी बोलत आहे ना... कोणालाच घाबरायची जरुरत नाही आहे.. माझ्या आतमध्ये केलेली चूक पूर्ण केली शिवाय बाहेर येत नाही... आणि तो पर्यंत तर हे चेहरा पण विसरले असतील... राहिला नोकरीचा सवाल... तर तुझ्या चोरी करण्याच्या सवयी शिवाय पण मी तुला परत माझ्या घरी ठेवायला तैय्यार आहे... आत्ता सरळ सरळ सगळी गोष्ट सांग मला... नाही तर सगळ्यात पहिले तुझी ठुकायी होईल...!" इन्स्पेक्टर एवढं बोलला आणि नोकराची मान खाली झाली... त्याने तर रेक्यूस्ट पण केली होती कि माझं नाव नाही आले पाहिजे... पण इन्स्पेक्टरने पोलीस आणि नोकराच्या नात्याला मान नाही दिला...


"तुम्ही आमची पण गोष्ट ऐकून घ्या एकदा... ह्याला पूर्ण गोष्ट नाही माहित आहे...!" नितीनने परत एकदा इन्स्पेक्टरला टोकले... बाकी गपचूप उभे राहून नोकर आणि इस्न्पेक्टरला बघत होते...


"सगळ्यांचं ऐकलं जाणार...! बोल राजू..." इन्स्पेक्टरने नितीनच्या बोलण्याला मान नाही दिला...


"मला जास्त नाही माहित आहे साहेब... मी सकाळी ह्या म्याडमला चहा देण्यासाठी आलो होतो... दरवाजा ठोकला तर माहिती पडले कि तो तर उघडा आहे... तरी पण मी ३-४ वेळा आवाज देवून बघितलं... पण म्याडमने काहीच उत्तर दिला नाही..." एवढं बोलून नोकर थांबला...


"नंतर...?" इन्स्पेक्टरने नोकराच्या छातीवरती आपली दांडी ठेवली...
क्रमश...

Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment