Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Friday, 29 June 2012

भाग ~ ~ ३९ एक प्रेम कथा


Update 39

इन्स्पेक्टर रोहन बरोबर रूम मधून बाहेर निघाला होताच कि एक हवालदार हातात काही कपडे घेवून त्यांच्या कडे येताना दिसला... मानव तिथेच उभा राहिला...!

"सर! फक्त हे एक लेडीज कपडे भेटले आहेत... एका रूम मधून... बाकी काहीच खास नव्हंत...!" हवालदारने येताच कपडे इन्स्पेक्टर मानवला दाखवले...
रोहन कपडे बघतच लगेच बोलला, "हे श्रुतीचेच कपडे आहेत... जे तिने काल दिवसा घालून आली होती..."

"ह्म्म्म... कुठे भेटले हे...?" मानवने विचारले...

"सर... ते लास्टवाल्या बेडरूमच्या बाथरूम मध्ये...!"

रोहन अचंबित होत बोलला, "काय? पण...?" हवालदार नितीनच्या रूमच्या दिशेने इशारा करत होता...

"पण काय...?" मानवने उत्सुकतेने रोहन कडे बघितले...

"नाही... काही खास नाही सर!" रोहनने आपल्या मनातली गोष्ट खाऊन टाकली...

"बघ... गोष्ट खास आहे कि नाही, हे मी ठरवणार... मनामध्ये कुठलीच गोष्ट नको ठेवुस... जे काही आहे मनात... सगळं काही सांगून टाक..."
"सर... खरोखर काहीच गोष्ट नाही आहे... मी फक्त हेच विचार करत होतो कि श्रुतीचे कपडे नितीनच्या बाथरूम मध्ये कसे आले..." रोहनने उत्तर दिले...

"हाच तर तो प्रश्न आहे बेटा, ज्यांची उत्तरं मला शोधायची आहेत... नितीनने तुझ्या प्रेम कहाणी मध्ये एवढा इंटरेस्ट का घेतला...? तो तिथेच थांबून तुला बोलवायच्या बदली श्रुतीलाच इथे का घेवून आला...? नितीन बाबाला का भेटला...? कडी कोणी खोलली...? आणि आत्ता हे तिचे कपडे त्याच्या बाथरूम मध्ये कसे पोहचले... असो... रात्री जेव्हा श्रुती तुझ्या जवळ आली होती तेव्हा तिने हेच कपडे घातले होते...?" मानवने विचारले...

"नाही... तो दुसरा ड्रेस होता...?" रोहनने उत्तर दिले...

"म्हणजे...? काय हा ड्रेस पण नव्हता जो आत्ता तिच्या शरीरावर आहे...?" इन्स्पेक्टर आपले डोके खाजवत बोलला...

"नाही... खरं म्हणजे त्या ड्रेस मुळेच मला राग आला होता.. अशीच कुठली तरी विचित्र ड्रेस घातली होती.. "

"ये माझ्या बरोबर..!" एवढं बोलून मानवने हवालदाराला ड्रेस आपल्या जवळ ठेवायला बोलला.. आणि रोहनला परत श्रुतीच्या रूममध्ये घेवून गेला... श्रुतीच्या मृतदेहाला हॉस्पिटल वाले घेवून गेले होते... तिथे उभे असलेल्या सगळ्या लोकांचा चेहरा उतरला होता... सगळ्यांचे चेहरे सफेद पडले होते...

"जरा रूम मध्ये शोध ते कपडे कोणते होते...?" मानवने रोहनला इशारा केला...

रोहनला ते कपडे शोधायला जास्त वेळ नाही लागला... एकदम अश्लील नाइटी होती ती... रोहन तिला उचलायला गेला तर इन्स्पेक्टरने त्याला हाथ लावायला नाही सांगितले..., "हाथ नको लाउस तू त्याला...!" आणि एका हवालदाराला सवधाणीने ते उचलायला सांगितले...

"आत्ता हिची ब्याग खोलून हिचे सगळे कपडे काढा...!" मानवने हवालदाराला सांगितले... हवालदाराने ब्याग उचलून उलटी केली आणि सगळे कपडे खाली पडायला लागले... 'त्या' एक नाइटीच्या बदली अजून कुठलाच उत्तेजक कपडा त्या ब्याग मध्ये नाही सापडला.. उलट सगळे कपडे शरीराला पूर्ण पणे झाकणारे होते... इन्स्पेक्टरने हि गोष्ट नोटीस केली आणि सगळ्यांना सोबत घेवून पोलिसांना इशारा केला...

अर्ध्या तासानंतर पाच हि जण मानवच्या समोर होते...

इन्स्पेक्टरने नितीनला खुर्ची बदलून मध्येच त्याला त्याच्या समोर यायला सांगितले... नितीनेने तसेच केले आणि रोहन लाईन मधल्या शेवटच्या खुर्चीवर जाऊन बसला...

"तू एवढा थकलेला का वाटतोस...? रात्रभर जागरण झाला आहे काय...?" मानवने नितीनला विचारले...

"नाही तर... मी बिलकुल ठीक आहे... आणि जो थोडासा थकवा तुम्ही माझ्या चेहऱ्यावर बघत आहात... तो 'बेचारी' श्रुतीचा मृतदेह बघितल्याने झाला आहे... तिच्या सोबत खरंच खूप वाईट झाले आहे...?" नितीनने स्वतःला सांभाळत उत्तर दिले...

"तूच श्रुतीचा खुनी आहे...!" मानव एकदम बोलला...

"काय बोलत आहात तुम्ही...? तिने आत्महत्या केली आहे.. सगळ्यांना माहित आहे... रोहनने तिच्या बरोबर संबंध ठेवण्यास इन्कार केला... त्यामुळे तिने हताश होवून..." नितीन एकदा तर दचकला होता...

जवळ जवळ हेच एक्स्प्रेशन रोहनच्या चेहर्यावरती पण आले होते..., "सर तुम्ही खालीपिली रोहन वरती शक करत आहात...!"

"मला कोणी पागल कुत्र्याने नाही चावले आहे... जे मी ह्याच्यावर असंच संशय नाही करत आहे... मी तुझ्यावर नाही केला... कारण, तिच्या बरोबर सगळ्यात ज्यास्त वेळ तूच होतास... मी हे पण बोलू शकलो असतो कि तुनेच जबरदस्ती करायचा प्रयत्न केला आणि जेव्हा नाही ऐकली तर तिला मारून फांसी वर लटकावून टाकलं... पण मी नाही बोललो ना..? आमचं रोजचं हेच काम असतं बच्चू... आम्ही खुनीला आपल्या नजरेने ओळखतो..."

इन्स्पेक्टर बोलता बोलता उत्तेजित झाला होता... टेबल वर ठेवलेल्या पाण्याच्या पेल्याला संपवून तो परत एकदा बोलायला लागला...

"माझा बोलायचा अर्थ असा होता कि जर तू हिला इथे नाही आणले असते तर तिच्या बरोबर हे सगळे झाले नसते... बरोबर ना...?"

"हो बरोबर..." नितीनने आपली नजर झुकवली...

"तर का घेवून आलास हिला...? तुझा काय फायदा होता ह्याच्या मध्ये...?" मानवने जोर देत विचारले...

"माझा त्यात काय फायदा होता... मी जे काही केले, ते फक्त रोहनसाठी केले...!" नितीन बोलला...

"असं काय केलेस तू रोहनसाठी..." मानवने परत विचारले...

"ते... तो इथे कोणत्या तरी मुलीसाठी आला होता... श्रुतीने जेव्हा मला हे सांगितले कि... खरं म्हणजे रोहनला काही महिन्यांपासून स्वप्न येत होते... तर ह्याने मला घेवून त्या मुलीकडे ज्याण्याचा निर्णय घेतला... मुलीने आम्हाला जुन्या वाड्या..." बोलता बोलता नितीनला मध्येच मानवने टोकले..., "हे सगळं बकवास मी ऐकलं आहे... हे सांग श्रुतीने तुला काय सांगितले...?"

"ते... हेच कि हे सगळं तिनेच केलं आहे... एका बाबाच्या मदतीने... तिने मला सांगितले कि....." नितीनने तीच गोष्ट सांगितली जी पहिल्या दिवशी श्रुतीने रोहनलाला आणि आज रोहनने इन्स्पेक्टरला सांगितली होती...

"तुला हे सगळे श्रुतीने कसे सांगितले... सांगायचं असतं तर तिने त्याच दिवशी सांगितलं असतं ज्या दिवशी तू तिला कॉलेजमध्ये सोडलं होतं... वा असं असू शकतं तुने नंतर तिच्या बरोबर काही जबरदस्ती केली असेल...?" मानवने विचारले...

ह्या प्रश्नावर्ती तर नितीन एकदा इकडे तिकडे बघायला लागला... नंतर बोलला, " आत्ता हे तर तीच सांगू शकते कि तिने मला का सांगितले... मी तिला फक्त एवढेच सांगितले होते कि रोहन कोणी 'नीरु' च्या चक्कर मध्ये बटालामध्ये गेला आहे..."

"काय...? काय नाव सांगितले तुने...?" इन्स्पेक्टर अचानक आश्चर्यचकित होवून बोलला...

"ते... नीरु..!" नितीनने उत्तर दिले...

"ओह्ह... अच्छा...!" मानवने एकदा रोहनला लक्षपूर्वक बघितले आणि समोर बघत बोलला, "नंतर...?"

"हे ऐकून ती बैचेन झाली आणि तीने मला रोहन बरोबर बोलायचे आहे असे बोलली.. पण जेव्हा रोहनचा फोन नाही लागला तेव्हा तिनेच मला सगळं सांगितले..." नितीनने एवढ्या वेळातच गोष्ट बनवली होती...

"बाबाला भेटला होतास तू...?" मानवने विचारले...

"नाही...!" नितीनच्या एवढं बोलताच त्याच्या बरोबर बसलेल्या रवीने त्याला अचंबित होत बगीतले... नितीनने त्याचा हाथ दाबून गप्प राहण्याचा इशारा केला... तर तो रागावला, "माझा हाथ का दाबतोस भाऊ... जे खरं आहे... तेच सांग ना... काल तू मला सांगितले होते कि..."

नितीनने दचकून त्याच्याकडे पाहिले.., " ते मी असंच बोललो होतो यार.. कारण तुला तिच्या गोष्टींवर विश्वास होईल..." 


क्रमश...

Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment