Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Sunday, 1 July 2012

भाग ~ ~ ४० एक प्रेम कथा


Update40

"कमाल आहे ना..? तू खरं काय आहे हे जाणण्याचा पत्ता लावत होतास... पण बाबाला भेटल्याशिवाय तूला त्याच्यावर विश्वास झाला... तूला कुठल्याही प्रकारे हेच पाहिजे होते कि रोहनला श्रुतीच्या गोष्टींवर... वा मी ह्याला एकदम ठीक करून सांगू, कि तुझ्या बनवलेल्या गोष्टींवर विश्वास होवो... त्यामुळे तू ह्यांना खोटं सांगितलेस कि मी बाबाला भेटलो आहे... खरं म्हणजे तू कुणाला भेटलाच नाहीस... तर शोधा शोध काय घंटा केलीस...?" मानव खुर्चीवरून उठला...

नितीनच्या जवळ काहीच उत्तर नव्हते... तो गप्प बसून समोर बघत राहिला..


"बोलत का नाही आहेस...?" मानव परत खुर्चीवर बसला...


शेखर आणि अमन जे आत्ता पर्यंत उदास बसले होते... ते पण आत्ता ह्या मामल्यात रस घेत होते...


"आत्ता मी काय बोलू सर... तुम्ही गोष्टीला खालीफुकट फिरवून बघत आहात..." नितीन हताश झाला होता...


"एक बोलू काय...? तू शिकलेला वाटतोयस म्हणून माझं डोकं लावतोय... अन्यथा हिथे गोष्टींला फिरवायची गरज लागली नसती... हाथ फिरवल्याने काम लवकर होतं... ती
किंचाळी ऐकतो आहेस ना तू...?" मानव रागात येवून बोलला...

"हम्म...!" नितीन अजून काहीच नाही बोलला...


"आत्ता लक्षपूर्वक ऐक..! जेवढी गोष्ट मला समझली  आहे... ती माझ्या कडून ऐकत जा... आणि मध्ये मध्ये माझ्या प्रश्नांना नोट करत जा आणि शेवटी मला त्यांचे उत्तर एकसाथ दे... नाहीतर मी विसरून जाणार कि तू पण माझ्या सारखा एक माणूस आहेस...!" मानव बोलला आणि... सुरु झाला...


"मला नाही माहित कि स्वप्नाचं काय नाटक आहे आणि नाही... ते मी विचारणार पण नाही... पण जेव्हा रोहन बटालाला आला तेव्हा तुला काय खाज सुरु झाली... तू श्रुतीला भेटलास... माहित नाही कसा आणि का, पण तुने रोहनच्या स्वप्नांच्या गोष्टींचा फायदा घेण्यासाठी श्रुतीला जबरदस्ती पार्टनर बनवलंस... आणि रोहन कुठे तुझ्या हातातून निघून न जावो म्हणून तू श्रुतीला घेवून इथेच आलास... तुने तिला एक अश्लील नाइटी घालायला दिली आणि तिला रोहनच्या रूममध्ये पाठवले... तिच्या जवळ असले दुसरे कपडे का नाही भेटले... पुरावा आहेत तिचे ते कपडे, जे तिने काल दिवसा घातले होते आणि रात्री तुझ्या बाथरूममध्ये भेटले... काही बोलायचे आहे तुला ह्या विषयी...?"


"मला नाही माहित कि तिचे कपडे माझ्या बाथरूम कसे आले... ? असं असू शकतं जेव्हा मी बाहेर होतो तेव्हा तीने माझ्या बाथरूममध्ये कपडे चेंज करून गेली असेल... सर तुम्ही..." नितीनच्या कपाळावर घाम आला.... त्याला आत्ता मनातल्या मनात वाटले होते कि तो आत्ता फसला आहे, "मी तिला कुठलीहि नाइटी घालायला का देवू... ? माझा काय फायदा झाला असता त्यात...?"


"हेच तर मला माहिती करायचे आहे कि त्यात तुझा काय फायदा झाला असता...? असो... श्रुती कोणी लहान मुलगी नव्हती, जर ती अशीच तुझ्या रूममध्ये कपडे बदलायला गेली असती तर तिने आपले कपडे तिथे कधीच सोडले नसते... खास करून ती 'ब्रा' पण नाही जी तिथे आम्हाला सापडली आहे... श्रुती एक सभ्य मुलगी आहे आणि तिला तू एका वैश्यासारखी रोहन पुढे सादर केलीस..." इन्स्पेक्टरच्या एवढ्या बोलण्याने सगळ्या लोकांचे भुवया उंचावल्या...


"मी... मला काही समझत नाही आहे सर तुम्ही काय बोलत आहात...!"


"आत्ता तुला समझेल.., " ते श्रुतीचं लेटर घेवून ये...!" मानव मोठ्याने बोलला... नितीनचा चेहरा आश्चर्याने आणि भीतीने सफेद पडला...


"हो... घेवून येतो साहेब..." आणि एक हवालदार येवून मानवला लेटर देवून गेला...


"ऐका श्रुतीने... काय लिहिले आहे मारण्याच्या अगोदर..."


"रोहन!


मला क्षमा कर... मी जे काही केले... ते सगळं मी तुमच्याच एका मित्राच्या दबाव खाली केलं..."


मानव लेटर वाचतच होता कि नितीनने एक हाथ मारून त्याच्याकडून तो पेपर हिसकावून घेतला आणि लगेच खाऊन गिळून पण टाकला... हा लेटरच शेवटी त्याला फाशीची सजा देणार होता..., "हो... मी केला आहे तिचा खून..." नितीन खुर्ची वरून उठून आपल्या दोन्ही हाताने आपले डोके पकडून धर्तीवर बसून रडायला लागला...


मानव जोर जोरात हसायला लागला... रोहन आपल्या खुर्ची वरून उठला आणि एक जोराची लात त्याने नितीनच्या पोटात मारली..., "साल्या...!" आणि रोहन पण आपले डोके पकडून दिवाळाला टेक लावून उभा राहिला...


"शांत...! आत्ता तर ह्याला खूप काही सांगायचे आहे.." मानवने त्याची कॉलर पकडली आणि परत त्याला खुर्ची वर बसवले..., "आत्ता तू सगळं काही सांगत आहेस कि...?"


खुर्ची वर बसलेल्या नितीनने एक दीर्घ श्वास घेतला आणि कोणत्या तरी मशीन प्रमाणे बोलायला लागला...


"मला आज जाणवले कि मित्राच्या दौलतीला हडपण्यासाठी मी कोणत्या थराला गेलो ते... ह्याच्या स्वप्नावरती मला तेव्हा पण विश्वास नव्हता आणि आज हि नाही आहे... पण माझ्या डोक्याने ह्या गोष्टीचा फायदा घेण्याचे ठरवले आणि मी त्याच्यातच गुंतत गेलो.. मी श्रुतीला जबरदस्ती आपल्या बंद पडलेल्या एका फ्याक्टरी मध्ये घेवून गेलो... तिथे तिला घाबरवले आणि तिला माझ्याबरोबर सेक्स करायला मजबूर केले... मी त्याची एक सी.डी. बनवली... तिला ब्ल्याक्मेल करून मी तिला आपल्या प्लान मध्ये सहभागी केले... मला हे पाहिजे होते कि तिने रोहन बरोबर लग्न करून त्याला घटस्पोट दिला पाहिजे... आणि लिगली ती ह्याच्या अर्ध्या प्रोपरटीची मालकीण बनली पाहिजे... मग त्या सी.डी.च्या सहाय्याने सगळे माझेच झाले असते...


प्लान असा होता कि मी श्रुतीकडून रोहनला विश्वासात घेवून कि 'श्रुतीच' ती 'नीरु' आहे जी त्याला स्वप्नात दिसते... त्याच्या नंतर तो आरामात हिच्या बरोबर लग्न करायला तैय्यार झाला असता... पण जेव्हा मला ह्याने सांगितले कि ह्याला इथे पण 'नीरु' भेटली आहे तर मला माझ्या प्लान वरती पाणी फिरताना दिसले... त्यामुळे मी तिला जबरदस्ती इथे येण्यासाठी तैय्यार केले... सगळं काही व्यवस्थित चाललं होतं पण जेव्हा तिने मला सांगितले कि रोहनला तिच्या कुठल्याच गोष्टीं वरती विश्वास नाही बसला आहे तर मला दुसरा प्लान तैय्यार करायला लागला जो माझ्या डोक्यात पहिल्या पासून होता... मी संध्याकाळीच रोहनच्या रूम मध्ये कॅमेरा बसवला होता... श्रुतीला मी सांगितले होते कि मी रोहनच्या रूममध्ये कॅमेरा बसवला आहे ते... आणि मी तिच्या प्रत्येक हरकती वरती लक्ष ठेवणार आहे ते... आणि हि पण धमकी दिली कि जर तू रोहनला सेक्स करण्यासाठी तैय्यार नाही केलेस तर तुला माझ्या बरोबर झोपायला लागणार... मी तिला 'ती' नाइटी घालायला दिली आणि रोहन कडे पाठवले... इथेच माझा प्लान उलटा पडला... रोहन कदाचित त्या कपड्यांमुळे चीढ्ला आणि तिला बाहेर काढून तिच्या रूम मध्ये बंद करून आला...  नंतर मी तिला खूप फोन केले पण तिने फोन उचललाच नाही.. मी तिच्या रूम मध्ये गेलो तेव्हा ती पंख्यावर लटकली होती... खाली लेटर ठेवला होता... माझ्या जवळ काहीच वाचले नव्हते... मी गपचूप तो लेटर आणि फोन आपल्या खिशात टाकला आणि बाहेर निघालो.. तरी पण मी मानतो कि तिचा खुनी मीच आहे..." एवढं बोलून नितीन जोर जोरात रडायला लागला...


रूममध्ये खूप वेळ शांतता पसरली होती.. मानवनेच नंतर बोलणे चालू केले, "रडण्याने काहीच नाही होणार रोहन...! पण श्रुतीने जाता जाता तुझ्या एका धोकेबाज मित्राकडून सुटका मिळवून दिली... जो तुझ्याकडे एक विषारी साप सारखा राहिला आणि तुला कधीही दंश केला असता...  ह्याने तर विचार पण केला नसेल कि राजू मला फोन करेल आणि हा ह्या प्रकारे फसेल... ह्याने तर चुपचाप मृतदेह कुठे गायब केली पण असती... आणि तुझा मित्र असल्याचा ढोंग पण करत राहिला असता जीवनभर... परत नंतर कधी तरी दुसरा प्लान काढला असता आणि परत दंश केला असता ... जर ह्याने बाहेर आल्यावर दरवाज्याला कडी लावली असती तर मी तुझ्या गोष्टींवर विश्वास ठेवला असता आणि मामला पंचनाम्या पर्यंत शांत झाला असता... आणि पंचनाम्या मध्ये तर कदाचित माहितीच पडले असते कि तिने आत्महत्याच केले आहे.. आणि कारण पण मी हेच मानले असते कि तुझ्या रूममधून बेइज्जत होऊन निघाल्यावर तिच्या कडे जीव देण्याशिवाय काहीच पर्याय उरला नव्हता.. पण तुझं रूमला कडी लावणे आणि सकाळी राजूला कडी खुललेली भेटणे ह्या गोष्टी वरतीच मला पहिले शंशय झाला होता कि हिचा कुणी तरी खून केला आहे... एक गोष्ट अजून... आत्महत्या करणारे लोक काही ना काही तरी नोट लिहून ठेवून जातात... ते पण आम्हाला तिथे नाही भेटलं... त्यामुळे माझा संशय अजून वाढला कि हिचा जरुरू खून झाला असावा... त्याच्या नंतर ह्याच्या रूममध्ये श्रुतीचे कपडे भेटणे आणि एक कामूक नाइटी घालणे... जे हिच्या नेचर मध्ये नव्हतेच... ह्याचं तिला बटालाला आणने.. आणि नंतर तुझ्या रूममध्ये मला कॅमेरा पण दिसला; ह्या सगळ्या गोष्टींनि मला विचार करण्यासाठी मजबूर केले कि श्रुतीला ब्ल्याक्मेल केले जात आहे... आणि खूप पहिलेच मला ह्याच्या वर शक झाला होता कि हाच तो असेल... पण जेव्हा ह्याने तो कोरा कागद माझ्या हातातून हिसकावून घेतला... मला विश्वासच नाही होत होता कि गुनेगार एवढ्या लवकर समोर येईल ते..."


"असो... आत्ता तुम्ही जाऊ शकता... जर दोस्ती खातीर ह्याची जमानत करायची असेल तर एक लेटर जमा करा कोर्ट मध्ये... आणि जर नाही करायचे आहे तर कमीत कमी ह्याच्या घरच्यांना तरी माहिती सांगा..." मानव बोलला आणि नितीनला उचलून घेवून गेला...


क्रमश...

Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment