Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Tuesday, 3 July 2012

भाग ~ ~ ४१ एक प्रेम कथाUpdate41

"आत्ता असा चेहरा लटकवून का बसला आहेस... जे काही झाले त्याचे आम्हा सगळ्यांना दुखः आहे... पण आपण करू काय शकतो..? चांगला झालं कि त्या नितीनची नियत आपल्यांना समजली... मित्रत्वाच्या नावावर एक मोठा डाग होता...!" अमनने रोहनच्या जवळ बसून त्याच्या खांद्यावरती हाथ ठेवला...

"सॉरी यार...! माझ्या मुळे तुला हे दिवस बघायला लागले... पोलीस ठाण्यापर्यंत जायला लागले... मला क्षमा कर...!" रोहनने खांद्यावरती ठेवलेला अमनचा हाथ पकडला...


"अबे साल्या... बघितले शेखर...! आत्ता हा आम्हाला पण नितीन सारखाच समझतो आहे... हे बोलून तर तुने आम्हाला शिवीच दिली यार... आमचं काय झालं...? जे खरं होतं ते समोर
आलं ना... चल सोड, तुला स्पेशिअल चहा पाजतो पंजाबवाली... सगळी टेन्शन गायब होवून जाईल... अबे राजू...! साल्या चुग्लीखोर..!" अमनने राजूला आवाज दिला...

पण राजू तिथे असता तर भेटला असता...!


"वाटतंय भीतीने पळून गेला साला...! खरं म्हणजे त्याने काम खूप चांगला केलं... जर त्याने पोलिसांना नाही बोलावले असते तर आपण तर हाच विचार केला असता कि श्रुतीने..." गोष्ट पूर्ण न करताच तो पुढे बोलला, "आणि नितीन साफ साफ वाचला असता... नंतर माहित नाही कुठला परत प्लान काढला असता त्याने... असो... तू बस... मी चहा बनवून आणतो...!"


अमन एवढं बोलून उठायला लागला तर शेखर उभा झाला, "तुम्ही लोक बोलत बसा ... आज मी तुम्हाला माझ्या हाताची जादू दाखवतो..." आणि किचन कडे निघाला...


"मग आत्ता काय विचार केला आहे...?" अमन परत त्याच्याकडे बसत बोलला... रवीचं डोकं ज्यास्त खराब झालं होतं... म्हणून जवळच एका सोफ्यावर बसून तो रुमाल आपल्या चेहऱ्यावर घेवून डोळे बंद करून पडला होता...


"आत्ता करायला उरलंच काय आहे...? श्रुतीच्या बाबांना सांगायला पाहिजे..." रोहनचे डोळे पाणावले..., "परत तेच जीवन घालवायचे आहे यार... सकाळी कॉलेज... संध्याकाळी घरी...!"


"का...? आपल्या नीरुला विसरून जाणार का...? तिला अशीच तडपवत ठेवणार काय...?" अमनला जसे वाटले तो निरुला विसरूनच गेला आहे...


"आत्ता विचार करायला काय उरलं यार... आत्ता तर सगळं माहितीच पडलं आहे कि हा नितीनचा प्लान होता... स्वप्न पण त्याच्याच मुळे येत असतील.." रोहनने असंच आपले तोंड लटकवत बोलला...


रवी त्याचे बोलणे ऐकून अचानक उठला आणि, "अबे साल्या... मला डमरू बोलतोस... स्वतः तुने कधी आपल्या डोक्याचा उपयोग केला आहे... किंवा ते आहेच नाही तुझ्या डोक्यात... नितीनने कट त्याला स्वप्न सांगायच्या नंतर तैय्यार केला... श्रुतीची गोष्ट हा एक कट असू शकतो... तिच्या स्वप्नाची गोष्ट खोटी असू शकते... असू काय शकते, खोटी होतीच... पण तुझे स्वप्न तर कुणाचे कट नाही आहेत ना... ते तर खरेच आहेत.. आणि जो घर तू स्वप्नामध्ये बघत होतास... तसंच घर तू निरूचं सांगत आहेस... आत्ता तर हे साफ झालं आहे कि हि तीच मुलगी आहे जी तुझी वाट जाणो किती तरी जन्मापासून बघत आहे... काय विचार करत आहेस तू..."


"हो... यार.. काल पासून माझं डोकंच खराब झालं आहे... खरंतर सकाळी हे सगळं बघितल्या नंतर मला काही अजून सुचलंच नाही... जे काल रात्री विचार करत होतो तो पण आत्ताच करत होतो... ह्याचा अर्थ 'नीरु' आहे...!" रोहनच्या डोळ्यात एक छोटीशी चमक आली...


"नाही... नाही... नीरु कुठे आहे...!" रवी तोंड वाकडं करत बोलला, "मी तुला काल पण बोललो होतो... कि मला नितीन वर विश्वास नाही आहे... पण तुने माझे बोलणे ऐकलेच नाही... नितीनने तुझ्या स्वप्नात एवढा इंटरेस्ट का घेतला हे इन्स्पेक्टर बोलला होता तेच तुला मी सांगत होतो... उलट जेव्हा तो मला बाहेर गोष्ट सांगत होता... तेव्हाच मला शंका आली होती  कि नितीन खोटं बोलत आहे.. आणि ते खोटं पण आपल्या मर्जीने... पण इथे ऐकतं कोण माझं... मेली ना बेचारी 'श्रुती'!" एवढं बोलून रविचे डोळे लाल झाले...


"सोड यार...! जे झाले ते झाले...!" अमनने रविला शांत करायचा प्रयत्न केला...


"असं कसं सोडू शकतो मिस्टर अमन!" रूममध्ये इन्स्पेक्टर मानवने प्रवेश केला तर तिघेही दचकून उभे झाले, "या इन्स्पेक्टर साहेब..!" अमन त्याचं स्वागत करत बोलला... 
क्रमश...

Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment