Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Wednesday, 4 July 2012

भाग ~ ~ ४२ एक प्रेम कथा


Update 42

"लेटर वाचून माझं डोकं खराब झालं... म्हणून मला इथे यावं लागलं... सॉरी..!" मानव हसत बोलला...


"अरे जेव्हा पाहिजे तेव्हा या... आपलंच घर समजा... पण तुम्ही तर बोलत होता कि लेटर नाही आहे... फक्त एक कोरा कागद होता जो तुम्ही आमच्या समोर वाचत होता...!" अमनने उत्सुकत होत विचारले...


तेव्हा हातात ट्रे घेवून शेखरने रूममध्ये प्रवेश केला... इन्स्पेक्टरला बसलेला बघून एकदा तो दचकला... मग स्वतःला सांभाळून गपचूप ऐवून टेबल वर चहा ठेवला...


"धन्यवाद...! खूप इच्छा होत होती... राजू पळाला काय...?" मानवने एक कप चहाचा उचलून शेखरच्या चेहऱ्याकडे बघत बोलला...


"हो... त्याने विचार केला असेल कि..." अमन आपले वाक्य पूर्ण करणार तेवढ्यात इन्स्पेक्टर बोलला, "डोन्ट वरी... संध्याकाळ पर्यंत परत येईल... आत्ता तर तुम्ही सगळे खुश असाल ना कि तुम्हाला नितीनची वास्तविकता माहिती पडली ते..."


"हो... एकदम...!" ह्यावेळी रोहन बोलला, "पण ते लेटरच्या विषयी तुम्ही काय बोलत आहात..."


"हम्म... खरं म्हणजे जे लेटर श्रुतीने लिहिलं होतं, तो लेटर आम्हाला नितीनची झडती घेताना त्याच्या खिशात सापडला... हे घे... वाच जरा... त्याची एक कॉपी आहे.." मानवने लेटर रोहनला दिले...


अक्षर एकदम छोटं छोटं काढलं होतं... कदाचित श्रुती जवळ कागदाची कमी होती... रोहन त्याच्या मध्ये डोळे लावून मोठ्याने वाचू लागला...


--------------------


"रोहन...!


सकाळी जेव्हा तू झोपून उठणार तेव्हा मी तुला ह्या दुनियेत नाही भेटणार... अत्यंत लाजिरवाणी हरकत केली आहे मी तुमच्या बरोबर; माझं पण मन रडत होतं त्या वेळेस... प्लीज मला क्षमा कर... सगळी माझी मजबुरी होती... मजबुरी पण अशी कि जी सांगू नाही शकत... नाहीतर माझे 'बाबा' असेच मरून जातील... पण मी तुझ्या वर खूप प्रेम करते... आणि आत्ता तुझ्या नजरेचा सामना मी नाही करू शकत... त्यामुळे मी हि दुनिया सोडून जाते...


जमल्यास माझ्या बाबांकडे जा... मी जिवंत असे पर्यंत असं कुठलंच काम नाही केलं ज्याने माझ्या बाबांची मान खाली होईल... मी मेल्या नंतर 'कोणी' मला बदनाम करायचा प्रयत्न करेल... जमल्यास सांभाळून घे...!


बोलतात कि देवाच्या मर्जी शिवाय एक पान पण हलत नाही... देव भेटले तर त्यांना काही गोष्ट विचारणार... माझ्या सोबतच असं का झालं...? कोणत्या कर्माची सजा मिळाली मला...? मी कधी कोणाकडे नजर उचलून सुद्धा नाही पाहिले... कोणाच्या विषयी विचार सुद्धा नाही केला... शिवाय तुमच्या... मग मला तुच्या समोर असं बदनाम का केलं...? का नाही त्यांनी मला पहिलेच नाही बोलावले त्यांच्याकडे हे सगळं करताना... त्यांनी हे 'प्रेम' चं का बनवलं ...? आणि बनवलं तर प्रत्येक वेळी ते अपूर्णच का ठेवलं ... का नाही भेटू देत ते प्रेम करणार्यांना...?


नंतर त्यांच्याकडे  प्रार्थना करेल... ह्या जन्मात त्याला निरूचं  प्रेम देवून टाक, आणि पुढच्या जन्मी मला माझं अधुरं प्रेम...!


मी तुझीच झाली आहे, वाट पाहेन; पुढच्या जन्मात...!


श्रुती"


----------------------------


सगळ्यांचे डोळे पाणावले होते... शिवाय मानवचे..., "तू श्रुतीला किती वेळा भेटला आहेस रोहन..?"


"बस दोन वेळा... एकदा तिच्या घरी, आणि एकदा काल रात्री...!" रोहन आपला रुमाल काढून आपले डोळे पुसत बोलला...


"तुमच्या दोघांमध्ये काही बोलणे पण झाले होते काय...? आय मीन... रोमांटिक... प्रेमळ...!" मानवने विचारले...


"नाही... जे पण बोलणे झाले होते, ते कालच झालं होतं..." रोहन अचानक थांबून बोलला, "मग काल रात्री..." एवढं बोलून रोहन रडायला लागला... रात्री तो जसा श्रुती बरोबर वागला होता, ते आठवून...


"कूल डाऊन यार... जीवनात सगळं काही होत असतं... तुझ्या जागी कोणीही सभ्य माणूस असता, तर त्याने पण तेच केले असते... तुला थोडी माहित होतं कि ती हे सगळे मजबुरी ने करत आहे... पण आत्तापर्यंत हि एकंच गोष्ट मला समजत नाही आहे...! तेच मी माहिती करायला आलो आहे..." मानव बोलला...


"काय...?" रोहन बोलला...


"मी कधी प्रेम केलं नाही आहे... पण जेवढं मला माहित आहे कि... प्रेम हळू हळू होतं ना... खास करून एवढं प्रेम कि कोणी कोणाच्या नजरेतून उतरलं आहे तर आत्महत्याच करेल... तिच्या जवळ अजून किती तरी रस्ता होता... नितीन 'कॅमेरा' मध्ये बघणारच होता कि श्रुतीने खूप प्रयत्न केला... मग ती जसं चालत आहे... तसंच चालून द्यायला पाहिजे होतं तिने... जीव देणं तर शेवटचं उपाय असतं आणि ते तर ती केव्हा पण करू शकली असती... जर कुठला रस्ता उरला नसता तर...?" मानव बोलला, " आणि सगळ्यात खास गोष्ट, श्रुतीला प्रेम कधी झालं रोहनशी.... जर ती ह्याच्या बरोबर ठीक बोलली सुद्धा नाही... आणि त्याच्या बरोबर वेळ व्यतीत नाही केला तर..."


ह्यावेळी अमन स्वतःला बोलण्यापासून थांबवू नाही शकला, "तुम्ही एक बरोबर बोलत आहात इन्स्पेक्टर साहेब... 'प्रेम' केल्याशिवाय तर माहित पण नाही पडत कि 'सालं' हे असतं तरी काय... एवढं छोटासं नाव आहे... पण ह्याच्यामध्ये एवढे रंग भरलेले आहेत कि माणूस फक्त आपल्या प्रेमाला समझू शकतो... दुसर्याच्या प्रेमाला नाही..."


"कधी कधी तर आपण वर्षानुवर्ष एकत्र असतो आणि माहिती हि नाही पडत कि आपणाला 'प्रेम' झाले आहे... बोलायला बघतो, पण केव्हा बोलूच शकत नाही ... माहित नाही का तिच्या समोर आपले तोंड पण नाही खुलत... आणि जेव्हा तोंड खुलतं  तेव्हा वेगळे होणे आपली मजबुरी बनते..."


"एकतर्फी प्रेम पण असतं... आपण पागल होवून कोणाच्या पाठी लागतो आणि लाख प्रयत्न करून सुद्धा तिला सांगू नाही शकत कि 'ती' आपल्यासाठी काय आहे... तिच्या साठी सगळं काही सोडून देतो... आपलं  भविष्य, आई वडिलांचे स्वप्न, सगळं काही विसरून आपल्याला फक्त एकच वस्तू आठवते, 'तिचं  नाव'! आपलं  सगळं काही बरबाद केल्याच्या नंतर पण आपल्याला कधीच पचतावा होत नाही कि तिने आपल्या प्रेमाला कधीच भाव दिला नाही ... आणि आपल्यांना सोडून निघून जाते..."


"कधी कधी 'तिच्या' घृणाने पण आपल्यांना प्रेम होवून जातो... आणि आपण समोरच्या व्यक्तीच्या घ्रुणेच्या व्यतिरिक्त तिच्या वर आपला जीव द्यायला तैय्यार असतो.. हे पण एक प्रेम आहे..."


"श्रुतीचं प्रेम हे पण रोहनच्या घृणेमुळेच तैय्यार झाले आहे... ह्याची अशी घृणा ज्याने रोहनच्या व्यक्तिमत्वाला तिच्या नजरेत किती तरी पटीने उंचावले होते... तिने ह्याला आपलं  शरीर सोपवलं पण त्याने तिला हाथ पण नाही लावला त्याने 'प्रेमा' ची कदर ठेवली... ती इथे आली होती आपल्या मजबुरीने... पण रोहनचं  व्यक्तिमत्व बघून ती त्याच्यावर जीव द्यायला तैय्यार झाली... तिने दोन्ही बाजूचे लोक बघितले; नितीन सारखे पण आणि नंतर रोहन सारखे पण... मग प्रेम का नाही होणार रोहन बरोबर...!"


"प्रेम..." अमन न थांबता बोलतच जात होता कि त्याला मध्येच मानवने टोकले..., "तुने 'प्रेमा' ची पी.यच.डी. केली आहे काय...? वा कोणी 'लवगुरु' आहेस...?"


"नाही इन्स्पेक्टर साहेब...! प्रेमाचं  कोणी कसं काय गुरु असू शकतो... प्रेमच जन्म देतो आणि प्रेमच मृत्यू देतो... प्रेमच सगळं काही शिकवत आणि प्रेमच सगळं काही विसरायला लावता... प्रेमच माणसाला उभा करत आणि प्रेमच माणसाला खाली पाडतं... सगळी दुनिया त्याच्याच कारणामुळे चालते आहे... प्रेमच सगळ्यांचे गुरु आहे..." अमनने दीर्घ श्वास सोडला...


"उफ... मी तुला असंच समझत होतो यार... तू तर कमाल आहेस... माय नेम इज मानव, नाईस टू मीट यु ब्रो...!" मानव अमन कडे हाथ करत बोलला तर अमनने दोन्ही हाताने त्याचा हाथ पकडला...


"आत्ता निघायचा वेळ झाला आहे... लवकरच भेटेन तुम्हाला... मला पण प्रेम करून बघायचे आहे यार... हा हा हा..." मानव बोलला आणि बाहेर निघून गेला...
क्रमश...

Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment