Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Thursday, 5 July 2012

भाग ~ ~ ४३ एक प्रेम कथा


Update 43

"अरे शिनू...! आज कॉलेजला नाही जायचे आहे काय...?" आईने खालून आवाज दिला...

"हो जाणार आहे आई ..! बस एकदा रितूला येवू दे..!" निरुने वरतूनच आवाज देवून उत्तर दिलं आणि परदा बाजूला करून रोड वर बघायला लागली... रीतुचं घर समोरच्या गल्लीमध्ये काही घर सोडूनच होतं... तिला जेव्हा रितू येताना नाही दिसली तर ती फटाफट शिडीवरून उतरून रीतुच्या घरी फोन लावला, "हेल्लो.. नमस्ते काकी...!"


"नमस्ते बेटा...!" फोनवर कदाचित रीतूची आई होती...


"आली नाही रितू अजून पर्यंत... मी वात बघते तिची..." नीरुने विचारले...


"बस आत्ताच निघाली आहे बेटा... बघ... पोहोचली असेल..." तिथून उत्तर मिळालं होतंच कि दरवाजाची बेल वाजली...


"वाटतंय आली... अच्छा काकी...!" एवढं बोलून निरुने फोन कट केला आणि आपली पुस्तक घेवून ती बाहेर निघाली.. रितू दरवाजा वरती उभी राहून तिची वाट बघत होती...


"केलंस ना उशीर... काय करत होतीस आत्ता पर्यंत तू...?" नीरु बाहेर निघतच रितू वर भडकायला लागली...


"अरे मी लवकर निघाली होती यार... तुला माही आहे... तुला माहित आज परत ते दोघे तिथे उभे होते... म्हणून मी परत निघून गेली... खाली फुकट आज परत काही पंगा केला असता... काही भरोसा नाही त्या माकडाचा..." रीतुने नीरु बरोबर चालता चालता तोंड वाकडं करत बोलली...


"कोण दोघे...? कोणाची वार्ता करतेस तू...?" नीरुने आश्चर्याने विचारले...


"अरे तेच यार... ज्यांचा फोन हरवला होता बसमध्ये... आज परत इथे आले होते... माहीत नाही काय प्रोब्लेम आहे...?" रीतुने उत्तर देवून कॉलेजच्या समोर असलेल्या रोडच्या दोन्ही बाजूला बघितले, "अरे देवा...! ते दोघे उभे आहेत... चल सरळ चल...!"


दोघांनी पटकन रोड क्रॉस केला आणि कॉलेजमध्ये घुसल्या...


"नीरुला एक नजर बघतच माझा पूर्ण थकवा निघून गेला यार..." रोहनने आपल्या हृदया वरती हाथ ठेवत रविला बोलला...


"तू थकवा घालवण्यासाठी आला होता कि बोलण्यासाठी... जर तू असाच ५० पावलं लांब राहून तिची तुझ्या कडे येण्याची वाट बघत राहिलास ना तर ह्या जन्मी पण ती बेचारी अशीच निघून जाईल... मी बोललो होतो ना गेट जवळ उभं राहायला... तुझी तर फाटली..." रवी त्याला खेचत गेट जवळ घेवून गेला...


"पण यार, हे बरं नाही वाटत... समजत जा... अमन बोलला आहे ना गौरीला (गौरी शेखरच्या गर्ल-फ्रेंडची (शिल्पाची) मैत्रीण आहे... जिचा उल्लेच मी ह्या स्टोरीमध्ये करू शकलो नाही... कारण त्यांचा उल्लेख केला असता तर हि कथा खूप मोठी झाली असती...) ... ती बोलेल तिच्याशी..." रोहनने त्याला परत खेचले, "चल परत घरी जाऊया...!"


"अरे शिनू..! तू आत्ता आली आहेस... तुला कोणी तरी विचारत होतं ..." तिला बघून एक मुलगी तिच्या जवळ आली...


"कोण...? आणि तू बाहेर काय करत आहेस.. क्लासमध्ये नाही गेलीस काय...?" नीरु ने समोरून येणाऱ्या मुलीला बघत विचारले...


"गेली होती यार... फक्त १ मिनट लेट होती, सरांनी बाहेर काढले... तू पण नको जाऊस... काहीच फायदा नाही आत्ता...!" मुलीने उत्तर दिलं...


त्या दोघांचे चेहरे उतरले... कॉलेजच्या बाजूच्या पार्कमध्ये बसून निरुने विचारले..., "कोण विचारत होतं मला...?"


"माहीत नाही यार... कोणी अनोळखी मुलगी होती... पहिले नीरु करून विचारले... नंतर शिनू म्हणून विचारले... नीरु पण तुझंच नाव आहे काय...?" मुलीने उत्तर देवून प्रश्न विचारला...


"नाही...! माझं नाव शिनुच आहे...!" एवढं बोलून निरुने विचारलं, "कॉलेजची नव्हती काय...?"


"कॉलेजची असती तर मी तिला ओळखलं नसतं... कोणी बाहेरून आली होती... तुझं घर पण विचारत होती... मी सांगितले... कदाचित ह्या शहरातलीच नव्हती ती... हरयाणा साइडचा टोन होता आवाजामध्ये...!"


"कोण असू शकतं...?" नीरु आपल्या डोक्याला जोर देवून विचार करत होती... कि अजून एक मुलगी समोर तिला त्यांच्याकडेच येताना दिसली, "हाय...!"


"हाय सोना...! कशी आहेस...?" रितू आणि नीरुने जवळ जवळ एकसाथ विचारले...


"मी तर ठीक आहे... 'ती भेटली काय...?'" सोनाने त्यांच्या जवळ बसत विचारले...


"कोण...?" रितूने विचारले...


"माहित नाही... एक सुंदर मुलगी सकाळी सकाळी तुझ्या बद्दल विचारत फिरत होती..." सोनाने उत्तर दिलं...


निरुने आपल्या बोटाला आपल्या दातांमध्ये घेवून नख खायला सुरुवात केली... आणि विचार करू लागली..., "काय यार... कोण असू शकते...?"


"तू सोड ना... जी कोणी असेल... घर सांगितले ना तिने...!" रितूने निरूच्या डोक्यावरती एक चापट मारली..


"शिनू...! इथे ये जरा..!" कॉलेज मधून येणाऱ्या शिल्पाने (शिल्पा शेखरची गर्ल-फ्रेंड...) लांबूनच तिला आवाज दिला...


"हम्म... येते...!" नीरुने आपली पुस्तक उचलली आणि शिल्पाजवळ जाऊन उभी राहिली, "आत्ता तू पण नको बोलूस कि मला कोणी शोधत होती..."


"हो... पण तुला कसे माहित...?" शिल्पाने विचारले...


"बस माहिती पडलं... कदाचित प्रत्येक मुलीला तिने विचारले आहे वाटते...! चल सोड... अजून काही काम होतं का...?"


"हो... तुझ्या जवळ वेळ आहे ना?" शिल्पाने तिचा हाथ पकडून विचारले...


"हो बोल...! हा तास तर खालीच आहे... समज...!" नीरु बोलली आणि तिच्या बरोबर चालायला लागली...


"तुझं नाव नीरु पण आहे ना...?" शिल्पाने इथूनच गोष्ट सुरु केली...


"किती वेळा बोलू यार... कोणी मला नीरु नका बोलू... माझं नाव शिनू आहे शिनू...!" नीरु चीढत बोलली...


"एवढी चीढतेस का...? तुला आवडत नाही तर पुस्तकांवरती का लिहिले आहे...?" शिल्पाने पुस्तकांकडे इशारा केला...


"अरे देवा..! हे कोणी लिहिले...?" नीरुने पटकन पेन काढला आणि पूर्ण नाव खोडून टाकले..., "माझ्याशी अशी मस्करी करत जावू नका यार... प्लीज...!"


"मी काय केले आहे शिनू...? मी तर फक्त लिहिलेलं दाखवल आहे... 'ती मुलगी पण पहिले निरुच विचारत होती... जेव्हा मला समजले नाही तेव्हा ती शिनू बोलली... घरचा पत्ता विचारत होती तुझा... पण मला माहितीच नव्हता... असो मला तुला दुसरीच गोष्ट विचारायची आहे...!" शिल्पाने तिचा हाथ पकडला आणि पार्कमध्ये एका कोपर्यात असलेल्या बेंचवर तिला घेवून बसली...


"बोल..!" निरूचा मूड खराब झाला होता...


"बघ मला माहिती आहे कि तुला हे सगळे आवडत नाही... तरी पण, ऐकून घे पूर्ण गोष्ट... मध्येच उठून पळून नको जाऊस..." शिल्पा बोलली...


"अशी कोणती गोष्ट आहे...? बोल ना...!" निरुने उत्सुकतेने तिच्याकडे बघत विचारले...


"ते... कोणी तुझ्यासाठी ५०० कि मी...लांबून आला आहे... पूर्ण गोष्ट ऐकशील ना...?"


"कोण आला आहे...? काय बोलतेस तू... आत्ता कोड्यात बोलणं सोड... जे बोलायचे आहे... ते एका लाईनमध्ये बोलून टाक..." नीरु गोष्ट ऐकायला उतावीळ झाली...


"रोहन...! तो खूप प्रेम करतो तुझ्यावर... ऐक तर...!" उठून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या निरूचा हाथ पकडून शिल्पाने तिला परत खाली बसवलं, "मी पहिलेच बोलली होती कि पूर्ण गोष्ट ऐक माझी...! नंतर तुझी मर्जी..."


"अजून दुसरी कोणती पण गोष्ट कर... पण हि बकवास गोष्ट मला आवडत नाही... काय असतं प्रेम..? ५०० कि. मी. लांब कोणाला माझ्याशी प्रेम झाले... त्याला कोणतं स्वप्नं आलं होतं का माझं...!" निरुने व्यंग केला...


"हो... स्वप्नंच येतात त्याला तुझे... तेव्हाच आला आहे तो इथे... तुला माहित आहे हे सगळे तुला का आवडत नाही..? कारण तुझ्यात हृदयच नाही आहे... त्यामुळे...!" शिल्पाने स्पष्ट करायचा प्रयत्न केला..


"हा हा हा हा... माझ्यात हृदय नाही आहे... व्हाट अ जोक यार... मग मी जिवंत कशी आहे... हे काय धडधड करत आहे माझ्या छातीत..." नीरुने आपल्या डाव्या हातला आपल्या छाती वर ठेवून बोलली..., "आज तर १ एप्रिल पण नाही आहे... मग काय इरादा आहे तुझा..." नीरु अजून पर्यंत हसत होती...


"तू माझ्या गोष्टीला सिरिअस का नाही घेत आहेस...?" शिल्पाने तिचे दोन्ही खांदे पकडले आणि तिला गदागदा हलवले...


"काय सिरिअस घेवू यार तुझ्या गोष्टींचं... कोणत्या वर्ष्यात जगते आहेस तू... आत्ता हि कोणती गोष्ट झाली कि माझ्या छातीत हृदयच नाही आहे... ५०० कि. मी. लांब बसलेल्या कोणाला माझे स्वप्नं येतात... त्याला माझ्या बरोबर प्रेम झाले आहे... हुंह...!" नीरु तिच्या गोष्टींवर चीढत बोलली...


"यार, हृदय म्हणजे माझे म्हणणे फिलिंगशी आहे... तू एकदा त्याला भेट बस...! तुला सगळं काही समजेल...!" शिल्पा जोर देत बोलली...


"कोणाला भेटू...? कुठे भेटू...?" नीरु मजबूर होत बोलली...


"ये... तू माझ्या बरोबर एकदा कॉलेजच्या गेट पर्यंत ये...!" शिल्पा नीरुला उठवून जवळ जवळ जबरदस्ती खेचत कॉलेजच्या गेट जवळ घेवून गेली... रोहन आणि रवीला जसं नीरुने आपल्या जवळ येत आहे बघितलं.. आपला हाथ सोडवून ती पळत आतमध्ये आली आणि जोर जोरात हसायला लागली...


"काय झालं...? तू पळून का आलीस...?" शिल्पा तिच्या पाठो पाठ आली आणि तिला रागात बघायला लागली...


"हे..." नीरु आत्ता पण जोर जोरात हसत होती, "
ह्यांना येतात माझे स्वप्नं... अरे तुला मूर्ख बनवलं... ह्यांना आम्ही बसमध्ये भेटलो होतो... अम्रीत्सर हून येताना... तेव्हा पासून ते आमच्या पाठी लागले आहेत... हा हा हा हा..."क्रमश...

Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment