Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Saturday, 7 July 2012

भाग ~ ~ ४४ एक प्रेम कथा


Update 44

"काय झालं...? बोलणे झाले काय तिच्या बरोबर...?" अमन जसा घरात रोहन आणि राविचीच वाट बघत होता..., "काही झाले कि नाही...?" रोहनने येवून आपलं अंग बेडवरती टाकले आणि नकारार्थी मान हलवली, "गेट पर्यंत आली होती... परत पळाली... अजून एक मुलगी होती तिच्या बरोबर...!" रोहनने सरळ झोपत आपला चेहरा उशीखाली लपवला...


"मी तर बोललो होतो त्याला... जाऊन सरळ बोलले पाहिजे... आणि हे महाशय तर गेट पर्यंत जायला पण घाबरत होते... असं थोडी ना होणार यार..." रवी हताश होत बोलला...


अमन रवी कडे बघत हसला, "होईल यार... वाट तर पाहायला लागणार यार... पण हे काम एवढ्या लवकर नाही होणार... एक मिनट..! मी गौरीला विचारतो...!" एवढं बोलून अमनने आपला फोन काढला...


"हेल्लो...!"


"हो अमन बोल..."


"काय झालं...? काय बोलणे झाले शिनू बरोबर...?" अमनने सरळ मुद्दया वर येत विचारले...


"ते... मी आज काल कॉलेजला नाही जात आहे... मी शिल्पाला सांगितले होते वार्ता करायला... सगळं काही समजवून सांगितले आहे तिला...! तिचा नंबर देते मी... तू तिच्याशीच बोल..." गौरीने उत्तर दिलं...


"ह्म्म्म... दे! दे नंबर.." एवढं बोलून अमनने नंबर नोट करायसाठी रोहनचा फोन घेतला...


गौरीने अमनला शिल्पाचा नंबर दिला..., "एक मिनट... अमन! काय हे विचारण्यासाठी शेखर नाही फोन करू शकत शिल्पाला...?"


"हो हो...! मला काय प्रोब्लेम आहे... ? शेखर करेल तिला फोन काही खास कारण आहे काय...?" अमनने विचारले...


"नाही... बस असेच... ते तिला त्याच्याशी बोलायचे आहे..." गौरी बोलली...


"ठीक आहे...! मी त्याला आत्ताच बोलतो... तो बोलेल तिच्याशी...!" अमन हसला आणि फोन कट केला...


"एक मिनट...! मी शेख ला उठवून घेवून येतो... शिल्पाने वार्ता केली आहे नीरु बरोबर... तीच सांगेल कि काय झाले ते...?" अमन बोलला आणि बाहेर निघून गेला...


-------------------------


"काय गोष्ट आहे बे...? तू तर सेटिंग पण करून आलास आणि मला बोलला सुद्धा नाही...!" अमन दुसऱ्या रूममध्ये घुसताच झोपलेल्या शेखरला जोरात हलवत बोलला... शेखर दचकून उठला, "काय...? काय झाले...?"


"घे... हा घे तुझ्या शिल्पाचा नंबर.. तिला तुझ्या बरोबर बोलायचे आहे... आणि नीरु बद्दल विचारायला नको विसरूस..." अमनने शेखरचा फोन उचलून शिल्पाचा नंबर डाईल केला आणि फोन शेखरला दिला...


शेखरने शिल्पाला फोन लावला शिल्पाच्या फोन उचलताच पहिले त्याने काही प्रेमाची गोष्ट केली आणि सरळ मुद्दया वर येत बोलला..


"नीरुने काय बोलली... रोहन विषयी..." शेखरने विचारले...


"ओह्ह...! शी इज इम्पोसिबल शेखर... मी तिला समजवण्यासाठी काय काय केले... पण तिच्या बरोबर ह्या विषयी बोलणेच व्यर्थ आहे.. " शिल्पा बोलली...


"काही आशा आहे... तुझ्या कडून...?" शेखरने विचारले..


"मला नाही वाटत तिच्या वर काही फरक पडणार आहे... पण तू बोलतोस तर मी तिच्या बरोबर एकदा परत बोलते...!" शिल्पा बोलली...


"नाही... आत्ता राहू दे... जेव्हा गरज पडेल तेव्हा मी तुला सांगेन... बाय दि वे, थ्यांक्स फॉर नाव..! ओके नंतर फोन करतो... अजून काही...?" शेखरने एवढं बोलून फोनला एक पप्पी दिली... ह्या पाप्पीचा आवाज शिल्पाला ऐकायला आला... आणि ती थोडीशी लाजली...


"आय लाव यु...!" एवढं बोलून शिल्पाने लगेच फोन कट केला...


-----------------------


"आई...! कोणी मुलगी आली होती काय...?" निरुने घरात घुसताच दरवाजा बंद करत प्रश्न विचारला...


"नाही तर...! कोणी येणार होती काय..?" आईने विचारले...


"नाही... पण कॉलेजमध्ये मला कोणी विचारत होती... म्हणून विचारले..." नीरु बोलली आणि शिडी चढायला लागली...


"अरे... काही खाऊन तरी जा... सकाळी पण अशीच निघून गेली होतीस तू...!" आईने खालून आवाज दिला...


"येते आई...! जरा कपडे तरी बदलू दे..." नीरुने उत्तर दिले आणि वरती रूममध्ये घुसली...


आतमध्ये घुसताच निरुची नजर टेबल वर ठेवलेल्या एका कागदावरती पडली... उत्सुकतेने तिने तो कागद हातात घेवून वाचायला लागली... पण जस जसे ती कागदाच्या पहिल्या लाईन वरून दुसऱ्या वरून तिसऱ्या लाईन वर आली... तस तसे तिचे हाथ पाय थर थर कापायला लागले...


"नाव बदलून तू आपले भाग्य नाही बदलू शकत नीरु...! आणि खास करून तेव्हा; जेव्हा भाग्याची 'ती' जाड रेष गेल्या जन्मातील प्रेमाचा गळा दाबून एक दुसऱ्या वर प्रेम करणाऱ्या आणि एकत्र झालेल्या दोन आत्म्यांच्या रक्तामध्ये डूबवून सातव्या आकाशाच्याही वरती लिहिली आहे..."नीरु अचंबित होवून त्या कागदाला बघत होती, मग ती फटाफट खाली आली...


"आई...! कोण गेलं होतं वरती...? कोण आलं होतं घरात...?" निरूचा चेहरा रागाने लाल झाला होता...


"तुला सांगितले तरी... कि कोणी नाही आले होते... मी तर सकाळ पासून इथेच आहे... काय झाले...?" आईने चिंतेने बसल्या बसल्याच विचारले...


काहीच न बोलता नीरु बाहेर निघाली आणि गल्लीच्या दुसऱ्या रूमच्या गेटला बघितले... पण त्याला तर टाळा लागला होता...


'त्यांची एवढी हिम्मत झाली कि दिवाळ पार करून चोरांसारखे घरात घुसायला लागले...' बडबडत निरुने कागदाचे तुकडे तुकडे केले आणि बाहेरच्या कचरा पेटीत फेकून दिलं...


"कक क कक... कोण आहे...?" नीरु स्तब्ध होऊन रूममधल्या बाथरूमच्या दरवाजा समोर उभी राहून भीती मुळे सुख्या पानासारखी थर थर कापायला लागली... दरवाजाला हाथ लावायची परत तिची हिम्मत नाही झाली...


"आईई ई ई ई " अचानक निरूच्या ह्या किंकाळीने पूर्णच्या पूर्ण घरच हादरले...


निरूचा आवाज ऐकून आई धावत धावत वरती आली... आणि नीरु बाथरूमच्या दरवाजा समोर उभी थर थर कापत आहे हे बघून..., "काय झाले शिनू...? काय झाले बेटा...?" आणि तिला आपल्या छातीशी लावले...


"ते... बाथरूममध्ये कोणी आहे...?" आईच्या छातीला लागून निरुने डोळे पण नाही उघडले...


"गप्प बस... घाबरगुंडी कुठली... कोण असेल..?" एवढं बोलून आईने जोरात दरवाजा आतमध्ये ढकलून खोलला... आतमध्ये कोणीच नव्हंत.. "बघ... कोणी पण नाही आहे...!"


"पण कोणी तरी होतं आई... जरूर कोणी तरी आलं होतं... दरवाजा पण नाही उघडा होता आत्ता...!" निरुने घाबरत घाबरत डोळे उघडले आणि बाथरूमच्या आतमध्ये डोकावून पाहिले...


"पागल... तुला माहित आहे ना कि ह्याला जरा जोर लावून उघडायला लागते... कपडे बदलून घे... मी तुझ्या बरोबरच खाली जाणार..." आई बोलली...


"नाही... मी कपडे खालीच बदलून घेईल... चल...!" आपले कपडे उचलून ती तिच्या आई बरोबरच खाली आली...


------------------------


"आई... !" नीरु जेवता जेवता बोलली...


"हो बेटा...!"


"माझं नाव पहिले नीरु होतं ना...!"


"का खाली फोकट जुन्या गोष्टी आत्ता काढतेस... तुला मनाई केली आहे ना तुझं जुनं नाव कोणाला सांगायला ...!" आई थोडी नर्वस होत बोलली...


क्रमश...

Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment