Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Tuesday, 10 July 2012

भाग ~ ~ ४५ एक प्रेम कथा

Update 45


"आई... !" नीरु जेवता जेवता बोलली...

"हो बेटा...!"

"माझं नाव पहिले नीरु होतं ना...!"

"का खाली फोकट जुन्या गोष्टी आत्ता काढतेस... तुला मनाई केली आहे ना तुझं जुनं नाव कोणाला सांगायला ...!" आई थोडी नर्वस होत बोलली...


"मी कोणाला नाही सांगत आई... तरी पण... सांग ना...! तुम्हा सगळ्यांना का 'त्या' नावाची एवढी चीढ आहे...?" नीरुच्या मनात राहून राहून कागदावरचे लिहिलेले आठवत होते...


"एकदा बोलली ना...! काहीच गोष्ट नाही आहे... आम्हाला 'ते' नाव नाही आवडत बस... तुझं नाव शिनुच आहे... आणि काहीच नाही... आणि आत्ता हि सगळी गोष्ट सोड आणि मुकाट जेवून अभ्यासाला लाग..." आई बोलली आणि उठून बाहेर निघून गेली... पण ह्याने निरुच मन शांत नाही झालं... उलट आपल्या स्वतःच्या नावबद्दल काही तरी जाणून घेण्याची तिची इच्छा अजून वाढली...


रितू आल्यावर दोघेही वरती अभ्यासाला गेले...


------------------------------


रात्री जवळ जवळ १२ वाजता..! निरुला लाईट बंद करून आणि आपली पुस्तक जवळच असलेल्या एका टेबल वर ठेवून, झोपलेलं अर्धा तास पण झाला नव्हता कि... अचानक रूममध्ये बाहेरून येणाऱ्या प्रकाशने तिला एक सावली आपल्या रूम मध्ये दिसली... ती सावलीचे फक्त कपडे उडताना बघू शकत होती बाकी तिला काहीच दिसत नव्हते... नीरु एवढी घाबरली होती कि तिची किंकाळी पण नाही निघाली... बेडवर बसून नीरु पाठी दिवाळाला टेकली... ती काही समजू शकेल तेवढ्यात त्या सावलीने बोलणे सुरु केले...


"घाबरू नकोस नीरु...! तुला काहीच नाही करणार... आणि मला तुला घाबरवायचे पण नाही आहे... तुला वाटत असेल कि तू जागी आहेस... पण असं नाही आहे...! खरंतर मी तुझ्या स्वप्नामध्ये आहे... हो...! तू स्वप्नंच बघत आहेस... आत्ता माझी गोष्ट लक्षपूर्वक ऐक.. मला फक्त तुला तुझ्या गेल्या जन्मा विषयी तुला काही तरी सांगायचे आहे... असा जन्म, जे ऐकून तुझे डोळे भरून येतील... तू पाहिजे तर मला प्रश्न पण विचारू शकतेस... ठीक आहे ना...?"


"ह्ह्हो...!" निरूच्या डोक्याला घाम सुटला... तिच्या जवळ हो बोलण्याशिवाय दुसरा काही पर्याय पण नव्हता...


"एक मुलगी होती प्रिया... आणि एक मुलगा होता देव...! दोघे एकमेकांना खूप प्रेम करायचे... प्रेम पण एवढं कि मेल्यावरही त्यांची आत्मा एक दुसर्यांसाठी तडपत आहेत... वर्षानुवर्ष...! प्रियाचं प्रेम आज पण देवची वाट बघत आहे... आणि देव प्रियाला खूप शोधण्याचा प्रयत्न करत आहे... देवचे शोधणे शेवटी पूर्ण झाले... त्याला माहिती पडले आहे कि त्याची 'प्रिया' ह्या जन्मात कोण आहे... पण प्रियाचं मन ह्या जन्मात तिच्या आत्म्याच्या बरोबर नसल्यामुळे ती आपल्या प्रेमाला ओळखू शकत नाही आहे... तू ऐकतेस ना...?"


"ह्ह्हो...!" खूप मुश्कीलने निरूच्या तोंडून आवाज निघाला...


"तुला माहित आहे ते दोघे कोण आहेत...?" त्या सावलीने विचारले...


"ह्हो... नाही...!" नीरु एकदम घाबरत बोलली...


"तुला माहिती नाही करायची आहे...?"


"नाही... हुंह... हो...!" निरूचं  हृदय आत हळू हळू एकदम शांत होत होतं... आणि तिच्या डोक्याने आत्ता काम करणे चालू केले होते...


"तर ऐक..! ह्या जन्मात त्या मुलाचे नाव आहे रोहन... आणि त्या मुलीचे नाव आहे... नीरु... म्हणजे 'तू'!" एवढं बोलून ती सावली नीरु काय बोलते त्याची वाट बघायला लागला...


नीरुच्या तोंडून काहीच प्रतिक्रिया नाही निघाली... जवळच असलेल्या टेबल वर तिचा हाथ 'काही' तरी शोधण्याचं प्रयत्न करत होतं...


"तू ऐकत आहेस ना...?" सावलीने परत विचारले...


नीरुने आव बघितला ना ताव... पेपर वेट हातात येताच तिने तो जोराने त्या सावली वर फेकून मारला... निशाणा एकदम ठीक होता... पण...



क्रमश...


Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment