Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Wednesday, 11 July 2012

भाग ~ ~ ४६ एक प्रेम कथा

Update 46


नीरुने आव बघितला ना ताव... पेपर वेट हातात येताच तिने तो जोराने त्या सावली वर फेकून मारला... निशाणा एकदम ठीक होता... पण सावली निरूच्या हाताची हालचाल बघताच सावध झाली होती आणि स्वतःला सांभाळून एकीकडे झाली आणि आवाज त्याच्या पाठीमागून आला, "ओय तुझ्या आईला... मेलो यार...!"

टोर्च त्याच्या हातातून खाली पडला आणि तो आपले डोके आपल्या दोन्ही हातांनी पकडून खाली बसला...

सावली लगेच पाठी वळली आणि त्या आपल्या साथीदाराकडे गेली आणि त्याला जबरदस्ती उठवण्याचा प्रयत्न करू लागला, "लवकर पळ यार... नाही तर आपण फसलो समझ...!"

"अबे तुला पळण्याची घाई झाली आहे... इथे डोकं फुटलं माझं... थांब एक मिनट... मध्ये परदा नसता ना तर मी आज गेलोच होतो..." उठण्याचा प्रयत्न करत तो बोलला...

नीरुला तो आवाज काही ओळखीचा वाटला... तिने हिम्मत दाखवून पटकन लाईट चालू केली...

"तुम्ही...?????" नीरु हळू आवाजात बोलली...

रोहन आणि रवी तिच्या समोर एका अपराध्यासारखे तोंड खाली करून उभे होते... आश्चर्यचकित असलेल्या निरुला काय बोलावे तेच समजत नव्हते कि काय बोलू आणि काय करू... ती त्यांना फक्त बघत उभी राहिली...

शेवटी मौन रोहाननेच तोडलं, "तुझाच प्लान होता ना हा... आत्ता घे...!" रोहन बोलला आणि नीरुकडे दयनीय भावनेने बघायला लागला.. नीरु अजून पर्यंत त्यांना फक्त प्रश्नार्थक नजरेने बघत होती...

पेपर वेट सरळ जाऊन रवीच्या डोक्याला नाही लागला होता... तरीपण त्याचा निशाण त्याच्या डोक्यावर उमटला होता... त्याला हाथ लावत तो रोहन वर खेकसला, " साल्या... अशी करतात काय भूतांची अक्टिंग (acting)...? तू तर असा बोलत होता जसा रामलीलाचे डाईलॉग वाचून बोलत आहे... २ तासांच्या रिहर्सलची ऐशी तैशी करून टाकलीस... मग प्लानमध्ये काय कमी होती... तूच बोलला होतास ना कि जर मी निरूच्या स्वप्नात येईल तर काही तरी होईल..."

"चल सोड... आत्ता सटकूया  इथून...!" रोहन नीरुकडे बघत हळूच बोलला आणि रविला खिडकी जवळ ढकलले..

जसा रवीने खिडकीच्या बाहेर पाय ठेवला; नीरु जवळ जवळ ओरडत बोलली, "अबे...!"
आणि रवीने आपला बाहेर ठेवलेला पाय परत आतमध्ये घेतला..., "सॉरी... ते... नीरु...! ह्याच्या पुढे अशी चूक नाही होणार... मी आपले कान पकडतो..."

"मरायचे आहे काय...? शिडी उतरून जावा..!" नीरु जवळ जवळ चीढत बोलली...

"पण...!" रवीला काय बोलायचे आहे ते नीरु समजली...

"ह्याच्या पुढे जर घरात असे पाऊल ठेवलात तर सोडणार नाही मी तुम्हाला... ओरडणे चालू करेन मी... माझ्या पाठी पाठी या...! आणि बिलकुल आवाज नका करू..!" नीरु बोलली आणि रूमच्या बाहेर निघून गेली...

दरवाजा मधून बाहेर निघताना एकदा रोहनने नीरुकडे बघितले... मन एकदम खुश झाले आणि त्याला वाटले कि परत एकदा आतमध्ये जावं आणि निरुला सगळं काही सांगावं... पण निरूच्या डोळ्यामधला  राग पाहून तो पुढे निघून गेला...

निरुने काहीच आवाज न करता दरवाजाची कडी लावली आणि परत वरती आल्यावर ती आपले पोट पकडून हसायला लागली... आणि किती तरी वेळ ती हसतच होती...


क्रमश...


Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment