Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Friday, 13 July 2012

भाग ~ ~ ४७ एक प्रेम कथा

Update 47
"हा हा हा हा हा .... हा हा हा हा हा हा... मग...? हा हा हा हा हा..." सकाळी अमन आणि शेखर कधी रवीच्या डोक्यावर आलेल्या टेंबूला बघून आणि तर कधी त्याच्या बोलण्यावर खूप हसत होते...

"मग काय...? ते तर बरे झाली कि तिला आमच्या वर दया आली... जर ती किंचाळली असती तर आमचे काय झाले असते... तुम्ही स्वतःच विचार करा... !" रवी रोहनला रागाने बघत बोलला...

"हे घ्या... स्वतःचा प्लान... जबरदस्ती घेवून गेला... आणि आत्ता मला शिव्या देतोय... मी बोललो होतो काय...? हे सगळं करायला..." बोलता बोलता रोहन पण हसायला लागला...

"प्लानमध्ये काय कमी होती बोल...? इथे अर्धा तास मला डाईलॉग बनवायला लागले... इथे तू एकदम बरोबर पण बोलायला लागला होतास... तिथे गेल्यावर तुझी का ऐशी तैशी झाली...? आर्ध्या तासाच्या गोष्टीला तू २ मिनटात बोललास... तूच सांग मी काय करू शकलो असतो...?" रवीने आपल्यासाठी शेखर आणि अमनकडे समर्थन मांगीतले....

"माहित नाही यार... तिच्या समोर जाताच सगळं काही विसरून गेलो... कायच्या काय निघायला लागले तोंडातून... मला स्वतःलाच समजत नव्हते..." रोहनने आपली चुकी स्वतःच स्वीकार केली...

"असं होतं यार... प्रेमामध्ये असंच होतं..." अमन मध्येच बोलला, "पण हि गोष्ट तर साफ आहे कि नीरुला तुमच्या हरकतींमुळे ज्यास्त राग आला नाही... ह्याचा अर्थ असा... चान्स आहे बॉस...!" एवढं बोलून अमनने आरश्यात बघणाऱ्या शेखरला विचारले..., "तू कुठे जाण्याची तैय्यारी करत आहेस...?"

"मला कोणाला तरी भेटायला जायचे आहे..." शेखर बोलला...

"कोणाला भेटायला...बे..? तू तर काही सांगतच नाहीस... आम्हाला पण सांगत जा यार..." अमन त्याची फिरकी घेत बोलला...

"जरूर सांगेन... संध्याकाळी घरी आल्यावर... हे हे हे...!" शेखर हसला आणि बाहेर निघून गेला...

"वाह भाऊ वाह...! भाऊ रवी सगळे जण सेट होत आहेत...! आपला नंबर कधी येणार... तू बोलतोस तर सलमाला बोलावू..." अमन बोलला...

"नको यार... मी जर ह्याच्या जागी असलो असतो तर वाहिनीला जबरदस्ती उचलून त्या जुन्या वाड्या जवळ घेवून गेलो असतो... त्याच्या नंतर तर तिला तिथे सगळं काही आठवलं असतं..." रवी बोलला...

"डोन्ट वरी...! माझ्या डोक्यात अजून एक प्लान आहे..." अमन काही विचार करत बोलला...

"पण ह्या वेळी मी सोबत नाही जाणार... पहिलेच बोलतो...!" रवी आपल्या डोक्याला लागलेला भाग चोळत बोलला...

"ठीक आहे... ह्या वेळी तू घरी बसून आराम कर... मी जातो रोहन बरोबर...!" अमन हसायला लागला, "शेवटी मला पण बघायचे आहे वहिनीला..."

--------------------------

"तुने त्यांना असंच जायला दिले...? पकडवले का नाही त्यांना...? त्यांची तर धुलाई झाली पाहिजे होती... असे कसे घुसले ते घरात...? विचित्रच आहेत..." कॉलेजच्या नंतर निरूच्या घरी बसलेल्या रितूने तेव्हा निरूच्या घरी झालेल्या प्रसंगावर आपली प्रतिक्रिया दिली...

"माहीत नाही यार... पहिले मी असाच विचार केला होता... मग माहित नाही कसं मला त्यांच्यावर दया आली... खूप सभ्य वाटतात बिचारे... नाहीतर रूममध्ये घुसल्यानंतर त्यांनी माझं तोंड पण दाबला असतं... मी काय करू शकली असती...? मी लाईट चालू करताच त्यांचे चेहरे असे पिवळे पडले होते कि जर कोणी दुसरा असता तर त्यांना चोरच समजला असता..." नीरु हसायला लागली...

"हि गोष्ट तर आहे शिनू ... पण आहेत दोघे विचित्रच...! हि पण पद्धत असते काय मुलींना पटवायची... सभ्य माणसासारखे सकाळी येवून सरळ विचारले असते... 'स्वप्नात' येण्याचं नाटक का केलं...?" रितू बोलली...

"हम्म... हि आयडिया आत्ता तू त्यांना दे... सरळ येवून विचारले पाहिजे...!" निरुने तोंड वाकडं करून रीतूची नक्कल केली... "जसं मी त्यांचीच वाट बघते आहे इथे...!"

"अरे कोणा ना कोणा बरोबर तर तुला लग्न करायलाच लागेल ना... मग त्याच्यामध्ये काय कमी आहे...? स्मार्ट आहे... सभ्य आहे... मला बोलला असता तर मी लगेच तैय्यार झाली असती... पण देव देतो पण त्याला, ज्याला गरज नसते... तू पूर्ण आयुष्य अशीच बसून राहणार आहेस का...? ह्या घरात...?" रीतु आपल्या मनातली गोष्ट बोलली...

"हो...! अशीच बसून राहीन... मला तर लग्न ह्या नावानेच चीढ आहे...!" निरुने उत्तर दिलं...

"पण का यार...? तू अशी का आहेस...?" रितूने जोर देवून विचारले...

"माहित नाही रितू... पण मी पक्का लग्न नाही करणार... मला माहित आहे... आत्ता ह्या चर्चेला बंद कर आणि पुस्तक खोल... ह्याच्यापुढे जर त्यांनी असं काही करायचा प्रयत्न केला तर मी त्यांना सोडणार नाही...!" एवढं बोलून नीरुने आपलं पुस्तक उघडलं...

-------------------------

रात्री रूममध्ये आभ्यास करणाऱ्या निरुला राहून राहून काहीतरी विचित्र वाटत होतं... काय माहित असं का होत होतं...? पण ती सारखी सारखी समोरच्या खिडकीला बघत होती... परद्याची हलकीशी हालचाल झाली तरी तिचं लक्ष्य तिकडे वेधलं जायचं... काल रात्री रोहन आणि रवी ह्याच खिडकीने आत मध्ये आले होते... अचानक काही आठवताच नीरु उठली आणि खिडकी जवळ आली... परदा बाजूला करून तिने बघितले... खिडकी आज बंद होती... तिने कडी खोलली आणि बाहेर बघायला लागली... खिडकीला लागून एक पाण्याचा पाईप वर पर्यंत जात होता... ते लोकं जरूर ह्या पाईपने वरती चढले असतील...

अचानक निरुला हसायला आले... ती वळली आणि हसता हसताच ती बेडवर जाऊन पडली, "ईडीअट्स...!" निरूच्या तोंडून निघाले... लाईट चालूच ठेवून तिने आपली पुस्तकं टेबलावरती ठेवली आणि चादरीत शिरली... काल रात्रीचा प्रसंग आठवता आठवता कधी तिला झोप लागली तिलाच कळाले नाही...

"कोण आहे...?" अचानक रूममध्ये झालेल्या आवाजाने तिची झोप मोड झाली आणि दचकून तिने आपले डोळे उघडले... आज तिच्या मनात भीती कमी आणि राग ज्यास्त होता... ती सरळ परद्याकडे बघत बोलली..., "कोण आहे तिथे..? मी ओरडायला चालू करेन...!"

पण तिथून काहीच उत्तर नाही मिळालं...

परद्याची हालचाल निरुला सामान्य नाही वाटत होती... तिने पटकन पेपर वेट आपल्या हातात उचलला..., "वाटतंय... आज परत तुझं डोकं फुटणार... चुपचाप परत जा..!" निरुने मारण्यासाठी आपला हाथ वरती उचलला... आणि काही विचार करून परत खाली केला..., "तुमची प्रोब्लेम काय आहे...? आतमध्ये ये...!"

काहीच उत्तर नाही भेटल्यावर नीरु हळूच उठली... आणि सावधानीने ती खिडकी जवळ जायला लागली... परद्या जवळ जाताच ती काही वेळ उभी राहिली आणि अचानक परदा एकीकडे सरकवला... पण तिथे कोणीच नव्हते...

"अरे देवा...!" निरुने खिडकीतून बाहेर बघितले... पण पूर्ण रोड एकदम शांत होता... आपल्या डोक्याला हाथ लावून निरुने एक दीर्घ श्वास घेतला आणि खिडकी आतमधून बंद केली... पण परत वळताच तिचा श्वास एकदम जोरात वाढायला लागला...

बेडवर, जिथून ती आता उठून आली होती; पेपर वेट खाली एक कागदाचा तुकडा फडफडत होता... अचंबित आणि दहशतीने निरूच्या अंगावर शहारे आले... "हे कसं असू शकतं...?" नीरु आपल्या मनातल्या मनात बडबडली आणि रूममध्ये चार हि बाजून आपली नजर फिरवायला लागली... जणू कोणाला शोधण्याचा प्रयत्न करत आहे...

पण कोणी असणार तर भेटणार...! एकदम भारी आणि थकलेल्या पावलांनी नीरु बेड जवळ वळली आणि कागदाचा तुकडा पेपर वेट खालून काढून वाचायला लागली...

"प्रेम अमर असतं नीरु, ते कधीच नाही मरत...! तू विचार पण नाही करू शकत कि तुम्ही दोघे एकमेकांवरती किती प्रेम करता ते... आज स्वतः रोहनला पण आभास नाही आहे कि तू त्याच्यासाठी काय आहेस... आणि तो तुझ्यासाठी काय होता... मला माहित आहे कि तुला काहीच आठवण नाही आहे... पण नियती तुम्हाला दोघांना परत मिळवायला बघते... ह्या गोष्टीला नजरअंदाज नको करूस...! आपल्या भूतकाळातील गोष्टीला जाणून घेण्याचा प्रयत्न कर...! माहिती करायचा प्रयत्न कर कि तुझ्या घरच्यांनी तुझं नाव नीरु बदलून शिनू ठेवायला का मजबूर झाले... रोहनला भेट...! त्याच्या हृदयात तुझ्यासाठी त्याची भावना आणि त्याचं अपार प्रेमाला फिल करण्याचं प्रयत्न कर..."


क्रमश...


Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment