Sunday, 15 July 2012

भाग ~ ~ ४८ एक प्रेम कथा

Update 48


नीरुचं डोकं चक्रावलं... तिने भीती शिवाय रूमचा कोपरा न कोपरा शोधून काढला... पण काहीच नाही भेटलं... जवळ जवळ १ मिनटाच्या आत हा प्रकार घडला होता... कोणी आतमध्ये आला आणि लेटर ठेवून गेला... जरासा पण आवाज केल्याशिवाय... कोण असं करू शकतं...?

अचानक बाथरूममध्ये सुरु झालेल्या पाण्याच्या 'टप-टप' ने तर तिचा जीवच घेतला होता... जोरात किंचाळत ती पळत बाहेर निघून सरळ खाली आली...


किंचाळी ऐकून आई आणि बाबा आगोदरच आपल्या रूममधून बाहेर आले होते, "काय झालं बेटा...?" दोघांनी जवळ जवळ एकत्र विचारलं...


नीरुने खाली जाताच आईला घट्ट मिठी मारली... तिचं शरीर थरथर कापत होतं..., "वरती... वरती कोणी तरी आहे आई...!" निरुला वरती बघण्याची पण हिम्मत होत नव्हती...


नीरुचं बोलणं ऐकताच बाबा वरती पळाले... रूममध्ये जाऊन त्यांनी एका एका वस्तूला निरखून पाहिले.... बेडवरती ठेवलेल्या त्या कागदाच्या तुकड्या शिवाय त्यांना तिथे काहीच नाही भेटलं... वरती सगळीकडे व्यवस्थित बघून आलेल्या बाबांनी निरुला विचारले, "हे काय आहे शिनू...?"


"माहित नाही... मी फक्त एका मिनटासाठी बेडवरून उठली होती.. परत आली तर तिथे 'हे' ठेवलेलं भेटलं... माहित नाही कोणी ठेवलं ..." एवढं बोलून नीरु रडायला लागली...


"रडतेस का बेटा..? कोणी त्रास देतोय का...?" आईने निरुला बाबांपासून लांब नेत विचारले...


प्रश्न ऐकताच निरूच्या मनात रोहन आणि रवी आले... पण काही वेळ थांबून ती बोलली, "नाही आई...! असं तर काहीच नाही आहे...!"


"किंवा असं तर नाही कोणीतरी तुझ्या पुस्तकांमध्ये हे टाकलं असेल... आणि पुस्तक उघडताच बेडवरती पडलं असेल..." बाबा जवळ येत बोलले...


"नाही बाबा...! बेडवरती हा कागद पेपर वेट खाली होता... कोणी तरी आत्ता ठेवला आहे... थोड्या वेळा पूर्वी.." नीरु बाबांकडे बघत बोलली...


बाबांचा चेहरा लटकला आणि कपाळावर चिंता आणि राग दोन्ही दिसायला लागले... अचानक काही विचार करून त्यांनी आपला फोन काढला आणि मानवला फोन लावला...


"नमस्ते काका..! एवढ्या रात्री कशी आठवण काढली...?" मानव बोलला...


"कोणी शिनूला त्रास देत आहे बेटा... वेळ मिळाला तर इथे एकदा फेरी मार... इथेच बसून बोलूया..."


"का नाही काका...? प्रोब्लेम जास्त सिरिअस असेल तर आत्ताच येतो.." मानव बोलला...


"नाही... अशी कोणती गोष्ट नाही आहे... मी तर सकाळी लवकर निघून जाईल... तुझ्या काकींशी भेट..." बाबा फोनवर बोलले...


"नो प्रोब्लेम काका... मी उद्या लवकर येण्याचं प्रयत्न करतो...!"


"ठीक आहे बेटा... मी आत्ता फोन ठेवतो..." एवढं बोलून बाबांनी फोन कट केला...


तिघेही खालीच झोपले होते... नीरु आई जवळ होती... तिच्या डोळ्यात झोपच नव्हती... ती ह्याच विचारात होती कि उद्या मानव समोर रोहन आणि रवीचं नाव घेवू कि नको...


विचार करता करता तिचं डोकं लेटरमध्ये लिहिलेल्या त्या गोष्टीं वरती गेलं.., "आपल्या भूतकाळातील गोष्टीला जाणून घेण्याचं प्रयत्न कर..! माहिती करायचा प्रयत्न कर कि तुझ्या घरच्यांनी तुझं नाव नीरु बदलून शिनू ठेवायला का मजबूर झाले..."


"आई...!" नीरु उठून बसली...


"हो बेटा...! काय झालं..?" आईने विचारले...


"तुम्ही मला सांगत का नाही आहात कि, तुम्ही माझं नाव का बदललं..." नीरु बोलली...


"झोपून जा बेटा... सकाळी उठून बोलूया..." आईने तिचा हाथ खेचून जबरदस्ती तिला झोपवण्याचा प्रयत्न केला...


नीरु चीढली..., "मला झोप नाही येत आहे आई... शेवटी अशी कोणती गोष्ट आहे जे तुम्ही मला सांगत नाही आहात.. सांगा ना पप्पा...!" नीरुने उठून बसलेल्या बाबांकडे बघितले...


"शिनू आत्ता मोठी झाली आहे... माझ्या मते तिला आत्ता सांगायला पाहिजे..." बाबांनी आईला विचारले...


"पण बाबाने मनाई केली होती...!" आई बोलली...


काही वेळ चुपचाप बसून बाबा जुन्या गोष्टी आठवू लागले...


"तू जेव्हा ५ वर्षांची होतीस शिनू...! एक दिवस अचानक तुझ्या प्रिन्सिपलने मला फोन करून हॉस्पिटलमध्ये यायला सांगितले... माझा तर जीवच निघाला... मी कसा तरी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो... तू कोणतं तरी नाव सारखं सारखं घेवून बेशुद्ध झाली होतीस.. नाव आठवत नाही आहे मला..." बाबांनी डोक्याला जोर दिला आणि नाव आठवायला लागले... नाही आठवले तर ते पुढे बोलू लागले...


"हॉस्पिटलमधून सुट्टी घेवून मी तुला सरळ घरी आणलं... डोळे उघडल्या नंतरही तू घाबरलेली वाटत होतीस... पहिले आम्ही ह्या गोष्टीला जास्त भाव नाही दिला... पण तुझा विचित्र व्यवहार वाढतच गेला... तू कोणाशीच जास्त नाही बोलाचीस... आणि नाही कुठल्या छोट्या मुलांबरोबर तू ज्यास्त खेळायचीस... एकदम गुपचूप राहायला लागलीस.."


"ह्या गोष्टीला पण आम्ही नजरअंदाज करू शकलो असतो... पण जेव्हा तू झोपेत ओरडणे चालू केलेस तेव्हा आम्हाला मोठी चिंता व्हायला लागली... किती तरी मोठ्या डॉक्टर्सला दाखवले.. पण परिणाम काहीच झाला नाही... काही डॉक्टर्सने सांगितले सुद्धा ह्या वयात काही मुलांना आपल्या स्म्रिती मध्ये पूर्व जन्माची गोष्ट फिरत असतात... असं असू शकत कि तेच कारण आहे..."


"नातेवाईकांच्या सारखं सारखं सांगितल्यानंतर आम्ही तुला एका बाबाकडे घेवून गेलो... मला तर विश्वास नव्हताच कि काही फायदा होईल... पण त्यांनी तर चमत्कार केला... एक पूजा करून त्यांनी तुझं नाव 'नीरु' बदलून शिनू ठेवायला सांगितले... त्यांनी सांगितले कि कोणती आत्मा तुझ्या शरीरात घुसून तुझ्या पूर्व जन्माची कहाणी जागवण्याचा प्रयत्न करते... त्यांनी ज्यास्त काहीच नाही सांगितले... फक्त एवढेच बोलले कि नाव बदलून ती आत्मा परत तुला सतावणार नाही... आणि त्यांनी हे पण बजावून सांगितले होते कि तुला हे सगळे सांगायचे नाही... तुला जर हे सगळे कळले तर तुला परत ती आत्मा तुझी पूर्व जन्माची कहाणी जागवण्याचा पर्यंत करेल..."


"त्याच्या नंतर आम्ही तुला घरी घेवून आलो... मला हे सगळं एक मस्करी वाटत होती... पण तुझ्या चेहऱ्यावर आलेल्या शांतीने व तुझ्या हसऱ्या चेहऱ्याने मला विश्वास बसला... मग मी तुझं नाव प्रत्येक रेकॉर्डमध्ये बदलून टाकले... हीच गोष्ट आहे जे आम्ही तुला सांगून त्रास नाही देणार होतो..." एवढं बोलून ते गप्प होवून नीरुच्या डोळ्यात बघायला लागले...


नीरु एकदम अचंबित होवून रोहन आणि त्या रहस्यमयी लेटरच्या विषयी विचार करू लागली...


------------------------------------


सकाळी उठल्यावर नीरु आपल्या कॉलेजला निघून गेली होती आणि मानव घरी येवून काकिंकडून सगळी कहाणी ऐकून... आणि हे कार्य लवकरात लवकर पूर्ण करेल असं आश्वासन दिलं... आणि काकी कडे त्याने निरूचा हाथ मांगीतला... काकी पण खुश झाल्या आणि संध्याकाळी तिचे पती आल्यावर ह्या विषयी सांगेल असं त्याला बोलल्या... त्याच्या नंतर मानव तिथून निघून गेला...


निरूच्या आईने लगेच तिच्या बाबांना फोन करून हि बातमी कळवली कि निरुला चांगलं मांगण आलं आहे... तर तिचे वडील पण खूप खुश झाले आणि मानवच्या वडिलांशी वार्ता करायला तैय्यार झाले...


---------------------------------------------


"एक्स्क्यूज मी, मिस नीरु...!"


नीरु कॉलेजमध्ये आपले पाउल ठेवणारच होती कि पाठून आपलं नाव ऐकून दचकली...


"मी अमन आहे... रोहनचा मित्र...!" अमन हसत बोलला...


पहिलेच रागात असलेली नीरु एकदम भडकून बोलली, "तर...?"


एक वेळ निरुचं असं नेचर बघून अमन पण घाबरला... काही वेळ थांबून तो बोलला, "तर... मला तुमच्याशी काही तरी बोलायचे आहे.. ह्याच गोष्टीसाठी... जर तुम्हाला गरज असेल तर तुझ्या मैत्रिणीला पण तू तुझ्या बरोबर घेवू शकतेस..."


"नाही... मला कोण बरोबरच नाही बोलायचे आहे..." एवढं बोलून ती वळलीच होती कि रितू आणि शिल्पाने तिचा हात पकडला, "ऐकून तर घे शिनू...? ऐकायला काय जाते...?" रितू बोलली..., "मला रोहन जे काही बोलला ते एकदम खरं आहे असं वाटते..."


"आत्ता तू पण...?" नीरु रितू कडे बघत बोलली...


"माझ्या वर विश्वास नाही आहे काय...?" रीतु तिचा हात दाबून
बोलली...

"यार... ह्याच्या मध्ये विश्वासाची काय गोष्ट आहे...? बस, मला काहीच बोलायचे नाही आहे..." नीरु आपल्या निर्णयावर कायम होती...


"बघ...! मी
तुला रोहनच्या गोष्टींचे खूप काही पुरावे पण देवू शकते... पण तू एकदा आमच्या सोबत चल बस...!" रितू जोर देत बोलली...

"सोबत चलू ...? पण कुठे...?" नीरु बोलली...

"चल ये..." रितू बोलली आणि जवळ जवळ तिला जबरदस्ती करत अमनच्या गाडीमध्ये बसवले... त्यांच्या सोबतच शिल्पा पण बसली...


क्रमश...


Previous Chapter                                   Next Chapter

No comments:

Post a Comment

लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... माळावरची जखीण..!