Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Tuesday, 17 July 2012

भाग ~ ~ ५० एक प्रेम कथा

Update50रात्रीचे जवळ जवळ १२ वाजता मानवला झोपायला भेटले होते... दिवस भराच्या धावपळी मुळे त्याला थकवा आला होता... रोहनशी त्याने श्रुतीवाल्या केस बद्दल न विचारता नीरु बद्दलच जास्त विचारले होते... पण त्याने रोहनला स्वतः बरोबरच जेवायला दिले आणि स्टाफच्या एका मेंबर बरोबर पण त्याला झोपायला जागा दिली माणुसकीच्या नात्याने त्याने हे सगळे केले होते... म्हणजे तो त्याच्या वर जास्त सक्ती दाखवत नव्हता...

तो स्वतः ठाण्यातच झोपला... अचानक दरवाज्यावर पडलेल्या थापेने त्याची झोप मोड झाली, "कोण आहे...?"


पण त्याच्या प्रश्नाचं उत्तर कोणीच नाही दिलं... आणि तो कुशी बदलून परत झोपायचं प्रयत्न करू लागला...


थोड्या वेळातच दरवाजावरती २ वेळा जोरात थाप पडली... तो चिडत उठला...


"काय आहे रे...?" दरवाजा उघडून त्याने समोर असलेल्या शिपाईला विचारले...


"काही नाही साहेब..! काय झालं..." शिपाई पळत त्याच्या जवळ आला...


"दरवाजा का ठोकवत होता...?" मानव चिडत बोलला...

"नाही तर साहेब..! मी तर आर्ध्या तासापासून इथेच उभा आहे.... दरवाजा तर कोणीच नाही ठोकवला..."

मानवने विचित्र नजरेने त्याला बघितले आणि बाहेर निघून फिरायला लागला... परत येताना तो रोहनच्या रूममध्ये शिरला... रोहन जागाच होता...

"काही प्रोब्लेम तर नाही आहे ना बॉस...?" मानवने विचारले...

"तुम्ही असताना काय प्रोब्लेम होणार मला...?" रोहन व्यंग करत बोलला... मानवने काहीच बोलणे उचित नाही समजले आणि बाहेर निघून आला... आणि आपल्या रूममध्ये घुसून त्याने रूमची लाईट बंद करून झोपला...

जवळ जवळ ५ मिनटच झाले असतील कि रूमची लाईट अचानक ऑन झाली...

दचकून लगेच मानव एकदम उठून बसला, "कोण आहे...?"

पण एकदा परत त्याला कोणीच प्रतिउत्तर नाही दिले...

मानवच्या हृदयाचे ठोके वाढायला लागले... तो बेडवरून उठला आणि कपाटाच्या पाठी असलेल्या स्वीच बोर्डकडे गेला.. तिथे कोणालाच नाही बघून त्याचा जीव त्याच्या तोंडाशी आला, "काय टेन्शन आहे यार..?" तो तोंडातल्या तोंडातच पुटपुटला आणि लाईट बंद करून वळला... मग काही विचार केला आणि तो पुन्हा वळून पुन्हा लाईट चालू केली...

परत बेड जवळ येताना जणू एक विजेचा जोरदार झटका बसावा तसा मानव एकाच जागी उभा राहिला... अचंबित आणि त्या भायास्पद दृश्यामुळे त्याचे बटाट्यासारखे डोळे मोठे झाले होते... हळू हळू चालत त्याने बेडवर पडलेल्या त्या कागदाच्या तुकड्याला उचलले... लाल रंगाने त्या कागदावर फक्त एवढेच लिहिले होते..., 'डेड नेव्हर लाई...!'

अचंबित झालेल्या मानवला क्षणाचाही वेळ लागला नाही हे समजायला कि रूममध्ये कोणी तरी आहे... पण आहे कोण; हे त्याच्या डोक्याच्या बाहेर होतं... एवढं तर त्याला कळून चुकलं होतं कि कोणी ना कोणी तरी तो कागदाचा तुकडा काही मिनटांपूर्वीच तिथे ठेवला होता...

हैराणीने पागल झालेल्या मानवने बेडच्या खाली, परत कपाटाच्या मागे बघितले, पण कुठेच काही भेटण्याचं किंवा त्या रूममध्ये कोणी माणूस किंवा व्यक्ती असण्याचं चिन्ह दिसतच नव्हतं...

"कोण आहे यार...? हे लपाछपिचा खेळ का खेळत आहात... समोर येवून वार्ता करा ना.." मानव एका जागीच उभा राहून चारही बाजूने फिरून फिरून बघत होता...

"जर तुम्ही रोहन किंवा नितीनला वाचवण्याच्या इराद्याने आला आहात तर समोर या...! मला पण खरं काय आहे ते जाणायचे आहे... समोर ये यार...!" मानव ह्या प्रकारे बोलत होता जसा काही फोनवर बोलत आहे... बोलतेवेळी त्याची नजर समोरच्या भिंतीवर स्थिरावली होती... त्याच्या बोलण्यावर वाटत होतं आत्ता त्याला भूतांवरती विश्वास बसला आहे...

पुढच्याच क्षणी त्याने स्वतःला बेशुद्ध होण्यापासून थांबवले होते... त्याच्या टेबलावर ठेवलेला पेन पहिले सरकला आणि मग हवेमध्ये उठला... पुढच्याच क्षणी पेन टेबलावर अश्या प्रकारे उभा राहिला जसा कोणी तरी पेन हातात उचलून हात टेबलावरती  ठेवला आहे...

आश्चर्यमध्ये मानव आपले पापण्या पण उगड झाप करायाल विसरला... तो दोन पावलं पाठी सरकला आणि आपले हात कपाटाला लावले... त्याचे डोके सुन्नच पडले होते... विचार करण्याची शक्तीच गोठली होती... डोळे बटाट्यासारखे मोठे झाले होते... गळा सुखला होतं... पण बोलणे एकदम बंद झाले होते.. आत्ता तर त्याचे हृदयाचे ठोके पण आपण ऐकू शकू... एवढ्या जोर जोरात ते धडधडायला लागले होते...

काही वेळ पेन असाच हातात धरल्यासारका हवेत उडत होता... मग अचानक त्याच्या सी. डी. (केस डाईरी) ची काही पाने पलटली गेली... शेवटी पाने पलटणे बंद झाले तेव्हा पेन डाईरीला लागून उभा राहिला... ह्या प्रकारे हलायला लागला जणू पेपरवरती काही तरी लिहिले जात आहे...

मानव आपले श्वास कोंडून पानावरती पेनाचं नृत्य बघत होतं... ह्या पूर्वी त्याने कधीच विचार हि केला नव्हता कि असं पण काही बघायला भेटेल... त्याच्यात एक गोष्ट मात्र चांगली होती कि त्याला काहीच हानी झाली नव्हती... पण तरी पण तो पचतावत होता कि त्याने आपली बंदूक आपल्या ड्रावरमध्ये का ठेवून दिली... जर पेन उठू शकतो तर बंदूक का नाही...

अचानक डाईरी पेनाला आपल्यामध्येच घेवून बंद झाली... काही वेळात कडी आपोआप खुलली आणि दरवाजा आपोआप उघडला गेला...

मानव अजूनपर्यंत अचंबित होवून दरवाज्याकडेच बघत होता... कि शिपाई पळत पळत आला, "होय साहेब...! तुम्ही बोलावलं...!"

आत्ता तर मानव त्या शिपाईलाच  संशयाने बघत होता, "नाही तर...!"

"ते... तुम्ही दरवाजा उघडला म्हणून मला वाटले..." शिपाई आपली मान खाली करून बाहेर निघू लागला...

"अरे ऐक...!" मानवने आवाज दिला...

शिपाई लगेच परत त्याच्या सेवामध्ये हाजीर झाला...

"ते... रोहनला इथेच पाठव माझ्या जवळ..." मानव बोलला...अखेर 50 वा अपडेट दिला... मला सुरुवातीला वाटलं सुद्धा नाही कि मी हि कथा पूर्ण करू शकेन.... मित्रांनो तुमच्या अश्याच साथीची मला गरज आहे... ह्या कथेत अजून 5 ते 7 अपडेट्स बाकी आहेत... अशीच साथ देत राहा.... त्याहि पेक्षा मला तुमच्या प्रतिक्रियांची खूप गरज आहे... प्लीज मला ह्या ब्लोग वरती आपल्या प्रत्रीक्रिया देत राहा....

क्रमश...


Previous Chapter                                   Next Chapter

1 comments: