Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Thursday, 19 July 2012

भाग ~ ~ ५१ एक प्रेम कथा

Update 51"आपण मला बोलावले?" रोहनने  आत येवून विनम्रतेने विचारले...

"हो यार... ये आत मध्ये ये..." केस डाईरी आत्ता मानवच्या हातात होती..


"ये... आरामात बस... आणि इथेच झोप... उद्या सकाळी उठून घरी जा...!" मानव बेडवरती बसत बोलला... काही वेळापूर्वी झालेल्या अलौकिक अनुभवाचे दृश्य अजून हि त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होते...


रोहनने आश्चर्याने मानवकडे बघितले, "ह्याचे कारण जाणू शकतो का...?"


"घे... हे वाच...!" एवढं बोलून मानवने 'ते' पान खोलून
डायरी रोहनच्या हातात दिली...

"हे काय आहे...?" रोहन डायरीकडे न बघताच बोलला...

"अरे यार... आधी वाच तरी... नंतर सगळं सांगतो..." मानव एक स्मित हास्य देत बोलला...

रोहनने डायरी समोर पकडली आणि वाचायला लागला...

"तुमच्या दुनियेच्या पलीकडली दुनिया विचित्र असते इन्स्पेक्टर साहेब...! आम्ही जिवंत नसतो; पण किती तरी वेळा मरत पण नाही. तुम्ही मला इथे जाणून बेचैन झाला आहात; पण खरं सांगू तर आम्ही लोकं तुमच्या धर्तीच्या जिवंत लोकांना खूप घाबरतो... लोभ, अहंकार, तिरस्कार, ताठा, घृणा, वासना, असूया, विश्वासघात; काय काय नाही होत इथे.... आमची दुनिया तुमच्या दुनियेपेक्षा किती तरी पटीने चांगली आहे...

आमच्या पैकी खूप लोकं तुमच्या दुनिये पासून खूप लांबच राहणे पसंत करतात... मी पण कदाचित परत येण्याचा  विचार कधीच केला नसता... पण 'अपूर्ण प्रेम' आमच्या पैकी काही लोकांना आपल्या प्रियकराशी बांधून ठेवतं... आणि आम्ही तुमच्या आणि आमच्या दुनियेच्या मधोमध अटकून राहतो...

हि प्रेमच अशी वस्तू आहे इन्स्पेक्टर साहेब... हि पाण्यासारखं तरल पण आहे आणि बर्फापेक्षा कडक पण असतं... हे नाजूक पण आहे आणि सर्वशक्तिशाली पण आहे... ताकतवर एवढं कि देव पण त्याच्या समोर आपले गुडघे टेकतो... प्रेमाच्या कच्च्या धाग्याने बांधलेल्या लोकांना मेल्यावर पण देव पूर्ण पणे आपल्यामध्ये सामील नाही करत... आम्हाला जिथे राहायला पाहिजे; तिथेच राहतो... आणि प्रत्येकवेळी आपल्या प्रियकरा बरोबर...

निरुला लिहिलेला तो लेटर मीच लिहिला होता, ठीक तसाच जसा आत्ता तुमच्या समोर लिहित आहे... तुम्हाला घाबरवण्याचा माझा काहीच उद्येश्य नव्हता... पण तुम्हाला माझी उपस्थितीचा पुरावा देणे गरजेचे होते... क्षमा करा...!

गरज पडल्यास आपल्या 'अपूर्ण प्रेमा' साठी परत येईन...!"


रोहन अचंबित होवून सारखा त्या डायरीलाच बघत होता, नंतर आपले डोके उचलून बोलला, "हे कोणी लिहिले...?"

"श्रुती आली होती...!" मानव एक दीर्घ श्वास घेत बोलला...

-----------------

"अजून पर्यंत तुझा मूड खराब आहे...? आत्ता विसरून पण जा यार...!" रीतुने दुसऱ्या दिवशी पण नीरुचं तोंड लटकलेलं बघितलं तरी ती तिला समजवायला लागली, "माझीच चुकी होती... मीच तुला तिथे घेवून गेली होती..."

"अरे ती गोष्ट नाही आहे यार... मला काय फरक पडते... आपल्या चुकीची शिक्षा भेटणारच... जशी करणी तशी भरणी.." नीरु तोंड वाकडं करत बोलली...

"तर मग कोणती गोष्ट आहे..? चेहऱ्यावरती १२ का वाजले आहेत तुझ्या..." रीतुने विचारले...

"माझ्या घरातले माझे लग्न करायला माझ्या पाठी लागले आहेत... परवा ते लोकं
येत आहेत मला बघायला..." निरुने नाराजीने आपले ओठ बाहेर काढले...

"अरे वाह... अभिनंदन..." नीरु तिच्याकडे रागाने बघत आहे असं तिला जाणवलं... तेव्हा लगेच रितूने पलटी मारली, "ओह... सॉरी... हे तर खूप वाईट झाले...! खरंच यार... आत्ता तू काय करणार...?" रितू आपल्या चेहऱ्यावरती खोटे दुखांचे भाव आणत बोलली...

"मला तर काहीच नाही समजत आहे... पप्पा तर सरळ बोलले आहेत कि... ह्यावेळी तुझी काहीच कारणं नाही चालणार..." नीरु बोलली...

"का ह्या वेळी काय झाले...? पहिले पण तुझी गोष्ट ऐकायचे ते...!" रितू बोलली...

"बोलत होते कि, हे मांगण आपल्यांना नशिबाने भेटलं आहे... ह्याला कोणत्याही प्रकारे हातातून नाही जाऊ देणार आहेत ते..." नीरु बोलली...

"अच्छा...! असं कोणतं मांगण आलं आहे...?" रीतुने उत्सुकतेने विचारले...

"तो.. इन्स्पेक्टर नाही आहे... जो काल तिथे आला होता... मानव...!" नीरु तोंड वाकडं करत बोलली...

"ओह... वॉव...!" रितू एवढी बोललीच होती कि निरुने तिला मारायसाठी आपलं पुस्तक उचललं...

"माझा असा अर्थ नव्हता यार... पण मी तुझ्या घरच्यांशी पूर्ण पणे सेहमत आहे...
शेवटी काय कमी आहे त्याच्यामध्ये...?" रितू बोलल्याशिवाय नाही राहिली...

"तर तू कर ना लग्न... एवढाच पसंत आहेत तर... मला लग्न नाही करायचे म्हणजे नाही करायचे... बस...!" निरूच्या एका एका शब्दातून राग प्रकट होत होता...

"हाय... काश माझ्यासाठी असं मांगण आलं असतं... मी तर पटकन हो बोलली असती..." रीतुने आपली बत्तीसी दाखवत बोलली आणि परत सिरिअस होत बोलली, "पण तू नाही कशी बोलणार... परवा येवून तो तुला 'आपलं' करणार... नंतर नकार दिल्यावर दोघांच्याही घरांची बदनामी होणार... असं नको करूस प्लीज... तुला लग्न नाही करायचे आहे तर पहिलेच नकार दे..."

"तोच तर विचार करते कि... कसं नकार देवू... काहीच समजत नाही आहे.."

"एक गोष्ट होवू शकते..?" रीतुने काही विचार करत बोलली...

"ते काय...?" नीरु तिच्याकडे बघत बोलली...

"मानवने काल आपल्यांना रोहनकडे बघितले होते... कदाचित तोच ह्या लग्नाला नकार देईल...?" रितू आपलं डोकं लावत बोलली...

"नाही... कदाचित त्याला काहीच फरक नाही पडला... काल संध्याकाळी परत
घरी आला होता... हेच सांगायला कि आत्ता कोणी त्रास नाही देणार... आईशी खूप हसत हसत बोलत होता... माझ्या तर मनात येत होतं कि फ्लॉवर पॉट उचलून त्याच्या डोक्यात घालावा... एका बाणेने दोन शिकार..." नीरु बोलली...

"हे हे हे... आजकाल तुला डोकं फोडण्यामध्ये खूप मज्जा येते वाटतं... काल त्याचं डोकं बघितलं होतं...? मला तर खूप मज्जा आली होती... हे हे हे..." रितू हसत बोलली...

"तू माझ्या गोष्टीला सिरिअस का नाही घेत आहेस...?" नीरु रागात बोलली...

"घेत तर आहे यार... तूच सांग, आपण काय करू शकतो...?" रितू सिरिअस होत बोलली..

"पळून जाऊ घरातून...?" नीरु असं सहजतेने बोलली कि जसं हा काही छोट्या मुलांचा खेळ आहे...

"पागल झाली आहेस काय...? हे काय बोलतेस तू... 'पळायचा' अर्थ तरी माहित आहे काय तुला..?" रितू तिला रागात बघत बोलली...

"हो... माहित आहे... माझी बदनामी होईल... कोणी माझ्याशी लग्न नाही करणार... कायस्वरूपी प्रोब्लेम संपली...?" नीरु एकदम विश्वासाने बोलली...

"कसली गोष्ट करतेस यार... काका काकींच काय होणार... विचार केला आहेस कधी...? ते कसे राहतील...? जरा विचार कर...! एवढी पण अक्कल नाही आहे काय..?" रितू आत्ता खूपच रागावली होती...

"हो हो... मस्करी करत आहे यार... पण हे पण खरंआहे... लग्न तर मला कुठल्या हि परीस्थित नाही करायचे आहे... परवा पर्यंत जर घरचे तैय्यार नाही झाले तर... २-४ हफ्त्यांसाठी कुठे तरी पळून जाईल...!" नीरु काही तरी विचार करत बोलली...

रितू आत्ता काही बोलणार... तेवढ्यात शिल्पा जवळ जवळ धावतच त्यांच्याकडे आली, "अभिनंदन...!!!"

रितू आणि नीरुने आश्चर्याने तिला बघितले..., "तुला कसे माहिती पडले...?" रीतुने अचंबित होवून विचारले...

"अरे, मला तर सगळे काही माहिती पडले आहे, तुलाच नाही माहित...!" शिल्पाने त्यांच्या जवळ बसत खुश होत बोलली...

"काय...?" दोघे एकसाथ बोलले...

"रोहन परत आला आहे... तो बिलकुल निर्दोष आहे... काल रात्रीच 'त्या' इन्स्पेक्टरला पूर्ण गोष्ट माहिती पडली..." शिल्पा बोलली...

रितूचं मन करत होतं कि शिल्पाला सांगून टाकायला पाहिजे कि नीरुचं लग्न ठरलं आहे... पण नीरु तिकडे असतांना  तिची हिम्मत नाही झाली तिला बोलायला...

"अच्छा... पण कसं...?" रितूने विचारले...

"सगळी गोष्ट येवून सांगेन... आत्ता मला कुठे तरी जायचे आहे... माझी प्रॉक्सी लावा प्लीज...!" शिल्पा बोलली...

"जा जा... ऐश कर... आजकाल तू
खूप गायब राहायला लागली आहेस... नंतर विचारेन शेवटी राज काय आहे...!" रितू स्मित हास्य देत बोलली...

------------------------

"आज तर खूप मोठी पार्टी झाली पाहिजे... काय..?" अमन, रोहन आणि रवी बरोबर पूर्ण दिवस घरी असणारा शेखर आज सकाळीच कुठे तरी गायब झाला होता...

रोहनला सोडून दोघांचे चेहरे खूप खुश होते... सगळ्यांना विश्वास होता कि रोहन निर्दोष आहे... आणि लवकरच परत येईल... तेव्हाच सकाळपासून सगळ्यांचे चेहरे खूप खुश दिसत होते...

"कसली पार्टी यार... खालीफुकट नीरुसमोर  बदनामी झाली आहे... कोण जाणे काय विचार करत असेल...? मी तर श्रुतीची कहाणी तिला सांगणारच नव्हतो.. खालीफुकट सगळ्या मेहनतीवरती पाणी फेरलं गेलं ...!" रोहन बोलला...

"अरे, काहीच नाही होणार... शेखरने शिल्पाला फोन करून सगळं काही सांगितलं आहे... आत्ता पर्यंत तर निरुला माहिती सुद्धा पडलं असेल कि तू निर्दोष आहेस... पण यार हे तर कामालाच झाले... श्रुतीच्या आत्माने स्वतः येवून तुला वाचवले.. इट्स अमेजिंग यार...!" अमनने रोहनला निश्चिंत करण्याचा प्रयत्न केला...

"अरे वाचवायलाच नाही... रोहन आणि नीरु एकत्र भेटले पाहिजेत हेच तिची पण इच्छा आहे... तिच्या घरी पण तर लेटर मिळाले... कमाल होत आहे यार..." रवीने त्यांना मध्येच टोकले...

"हम्म.. मला तर शाहरुखच्या त्या सिनेमाचा डाईलॉग आठवतोय... ते काय आहे... 'इतनी शिद्दत से मैंने तुम्हे पाने कि कोशिश कि है, कि जर्रे जर्रेने हमें मिलाने कि साजिश कि है..!' खरंच यार... तुम्हाला भेटवण्यासाठी जणू पूर्ण जगच आपली ताकत लावत आहे... तुम्हाला आत्ता कोणीच नाही थांबवू शकत..." अमन दीर्घ श्वास घेत रोहनकडे स्मित हास्य देत बोलला...

एवढं बोलणे ऐकून
रोहनचं मन पण एकदम खुश झालं आणि तो पण हसायला लागला...

"अबे तू का एवढा खुश का होत आहे रे... प्रयत्न तुने नाही, जुन्या वाड्याजवळ असणाऱ्या आणि  tujhi वाट पाहणाऱ्या वहिनीच्या  मनाने केलं आहे... आपल्यामध्ये कोणी थोडा प्रयत्न केला आहे तो आहे मी... हे बघ माझं डोकं... मला तर वाटत, वहिनीने कायमचीच एक  निशाणी दिली मला... कमीच नाही होत..." रवी बोलला आणि तिघेही हसायला लागले...

------------------

"रितू...!" संध्याकाळी नीरु सिरिअस होत रितूशी बोलणे सुरु केलं... दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दोघीही निरूच्या घरीच होते..

"हम्म... बोल...!" रितू बोलली...

"आत्ता काय करू यार...? विचार करून करून माझं तर डोकं खराब झालं आहे..." नीरुने आपले डोके पकडले होते...

"बघ... मी तर हेच बोलेन कि घरच्यांचे ऐकण्यामध्येच भलाई आहे... काय फायदा उगाच टेन्शन घेवून... जेव्हा काहीच होवू शकत नाही...! आणि मग लग्न करण्यामध्ये वाईट काय आहे...? मला हेच समजत नाही आहे कि लग्न करायला नकार का देतेस... कोणी दुसरा पसंत पडला आहे काय...?" रितू सिरिअस होत बोलली...

"तू
आत्ता बकवास गोष्टी बोलतेस... काही आयडिया असेल तर दे...!" नीरु रागात बोलली..., "ते उद्या येत आहेत... आणि तुला मस्करी सुचते आहे..."

"मस्करी नाही करत आहे यार... एकदम बरोबर तर बोलते... शेवटी लग्न करण्यामध्ये वाईट काय आहे... ते तर सगळेच करतात...!" रितू जोर देत बोलली...

"मला नाही माहित... पण मला पक्का एवढं माहित आहे कि लग्न करताच मी मरून जाईल..." नीरु उदास होत बोलली...

"अच्छा...! आज पर्यंत तर कोणी मेलं नाही... असं
तुला का वाटते..." रितू बोलली...

"माझं मन बोलत आहे.., त्यामुळे... आणि मला माहित आहे हे खोटं नाही आहे... मरायचेच आहे तर का नाही लग्ना आगोदरच मरून जाऊ..." नीरु हताश होत पुन्हा बोलली, "आपल्या घरातच तर मरेन..."

"बघ... आत्ता तू बकवास गोष्टी बोलतेस... प्लीज... असं नको बोलूस... काहीच नाही होणार... काका काकींना तुझं वाईट व्हाव असं कदापि नाही आवडणार..." मरण्याच्या गोष्टीवर रितूला राग आला...

"ठीक आहे तर जा...! तू पण त्यांचाच पक्ष घे... मला जे करायचे आहे ते मी करेन...!" नीरु बोलली आणि झोपून आपला चेहरा उशी खाली लपवला...

रितूने नीरुच्या जवळ सरकून तिच्याकडून उशी खेचून घेतली, "अच्छा बोल... काय करायचे आहे... मी तुझ्याच सोबत आहे पागल...!" रितू तिच्या केसांमध्ये आपले हात फिरवायला लागली...

रितुचे बोलणे ऐकून नीरु खुश होवून बसली... "बघ... मी कालपासून आई वडिलांच्या पाठी पडली आहे... पण त्यांना काहीच फरक नाही पडला आहे... आत्ता तर फक्त एकच पर्याय आहे..!" एवढं बोलून नीरु गप्प झाली...

"तो कोणता...?" रीतुने विचारले...

"निहारिकाकडे हॉस्टेलमध्ये राहीन २-४ दिवसांसाठी... तिला तर काहीच माहिती पण नाही आहे ह्या लग्नाच्या बद्दल... मी जाऊन आईला फोन पण करेन कि लग्न नाही करायचं वचन द्या तरच मी येईल... मग 'हे' आरामात माझ्या लग्नाचा हट्ट सोडून देतील..." नीरु बोलली...

"तुने आपला विचार तर केला... पण त्यांची जी बदनामी होईल त्याचं काय...?" रितू बोलली...

"मी अजून करू तरी काय... मी आई कडून त्याचा नंबर पण घेण्याचा प्रयत्न केला... पण ती ऐकतच नाही आहे... तूच सांग मी काय करू..." नीरु बोलली...

"ह्म्म्म... बघ, मी तर सगळं साफ बोलते... मला तर तुझं असं करणं चांगलं नाही वाटत आहे... उद्या जे होणार आहे ते होवू दे... नंतर विचार करूया...!" रितूने तिला समजावण्याचा प्रयत्न केला...

"अरे, तुला माहिती नाही आहे... ते उद्या सरळ साखर पुड्यासाठी येत आहेत... फक्त बघून जाण्याची गोष्ट असती तर ते मी मान्य केलं असतं... पण घरच्यांचा लवकर लग्न करायचा प्रोग्राम झाला आहे... त्यांच्याच सांगण्यावरून... आत्ता तू स्वतःच विचार कर... आत्ता जास्त बदनाम होणार कि नंतर...?" नीरुने जोर देत विचारले...

"बघ, मी काहीच नाही बोलत... तुला जे करायचे आहे ते कर...!" रितू काही तरी विचार करायला लागली...

"बघ..! तू माझा प्लान कोणाला नाही सांगणार ना...?" नीरु तिला बघत बोलली...

"काहीच नाही करत मी... जे करायचे आहे ते कर... मी जातेय..." रितू उभी होत बोलली... तिच्या चेहऱ्यावर निराशा साफ दिसत होती...

-------------------------

रितूला पूर्ण रात्र झोपच आली नाही... पूर्ण रात्र ती कुशी बदलत निरूच्या निर्णयाबद्दलच विचार करत होती कि त्याचा परिणाम काय होणार... किती तरी वेळा तिच्या मनात आले कि तिच्या घरी फोन करून काकींना सगळं काही सांगाव... पण हे करायला तिची हिम्मतच होत नव्हती...

सकाळी तिची आई तिला उठवायला आल्या आल्या तिला विचारले, "काय झालं बेटा...? तबियत तर ठीक आहे ना तुझी...?" तिच्या आईने तिच्या कपाळावर हात ठेवत बोलली... तिचं पूर्ण अंग तापलं होतं... तिचे डोळे लाल झाले होते आणि चेहरा एकदम मरगळलेला वाटत होता...

"ओ...हो... तुला पण आजच आजारी पडायचे होते... आज तर नीरुला बघायला येणार आहेत...? चल चहा बरोबर काहीतरी खाऊन घे आणि गोळी घे... ठीक होशील..." आई बोलली...

अचानक रितू रडायला लागली... तिने आपले डोके आपल्या गुडघ्यांमध्ये लपवले आणि रडायला लागली... आत्ता तर सगळ्या सोसायटीला माहिती पडलं असणार कि आज निरूचा साखरपुडा आहे... आत्ता काय होणार...

अचानक तिला असं बघून आई विचलित झाली, "काय झाले बेटा...? असं का करतेस तू...? काही गोष्ट आहे काय...?" आईने तिचं चेहरा आपल्या छातीशी लावत बोलली...

"काहीच नाही आई...!" एवढं बोलून रितू अजून जोरात रडायला लागली...

"ये... काय झालं... माझ्या लाडकीला...! असं का करतेस...? कोणती गोष्ट आहे ते तर सांग ना... तू पण माझ्याशी काही गोष्ट लपवतेस कधी...?" आई बोलली...

"आईई... ते... नीरु...!" रितू परत मोठे मोठे अश्रू गाळत रडायला लागली...

"काय झाले...? परत तुमच्या दोघांमध्ये भांडण झालं का...? घे तू चहा पी..." आईने टेबलावरती  थंड होत असलेली चहा तिला दिली...

"तिला लग्न नाही करायचे आहे आई... त्यामुळे ती घरातून पळून जात आहे..." एवढं बोलून रितू अजून जोरात रडायला लागली...

"अरे देवा...! हे काय बोलतेस तू...? तिच्या घरचे का समजत नाही... आत्ता काय होणार...?" आईच्या हातातून चहाचा कप सुटता सुटता वाचला...

"त्यांना नाही माहित आई... ती कुणालाच न सांगता जाणार आहे..." रितू बोलली...

"अरे देवा... मी आत्ता त्यांच्या घरी जाते अशी कशी जाणार...?" आईने एक क्षण पण फुकट न घालवता चप्पला न घालता ती बाहेर निघाली...

"त्यांना हे नको सांगूस आई... कि मी सांगितले आहे.. ती बोलणार नाही कधीच माझ्याशी..." रीतुने जोपर्यंत आपले बोलणे संपवले... तोपर्यंत तिची आई बाहेर निघून गेली होती... माहित नाही ऐकले कि नाही...

---------------------

रीतुच्या आईने निरूच्या घरची बेल वाजवली.. तिच्या आईने दरवाजा उघडला, "या... आम्ही तर आज खूप लेट उठलो..." निरूच्या आई एक स्मित हास्य देत त्यांचं स्वागत करत बोलल्या...

"नीरु कुठे आहे...?" रीतुच्या आईने सरळ हाच प्रश्न विचारला...

"झोपली आहे वरती... का...?"

"जरा बोलवा... मला काहीतरी काम आहे... नाही राहू द्या... मीच वरती जाऊन बघते..." रितूची आई त्यांना गोष्ट न सांगताच वरती गेल्या...

"अरे का त्रास घेता... या
तोपर्यंत चहा प्या... मी बोलावून आणते..." एवढं बोलून निरुची आई पण वरती पोहोचली...

------------------

सकाळ होण्या आधीच नीरु घरातून बाहेर निघाली होती... माहित नाही कोणती गोष्ट होती पण, तिचं लग्न नाही करायचा दृढ निश्चय निश्चितच नियतीनेच निर्धारित केला आहे... बाहेर निघायच्या पहिले तिच्या मनात एवढी भीती नव्हती, जेवढी ती आत्ता घरातून बाहेर निघताना फील करते... त्याच्यात एवढं चांगलं होतं कि तिच्या समोर एकच लक्ष्य होतं... अम्रीत्सरचा गर्ल्स हॉस्टेल...! नाही तर तिचं काय हाल झालं असतं... कधी घरच्यांची आठवण आणि कधी त्यांच्या इज्जतीची आठवण... कुठे न कुठे तिचं मन हे करण्यापासून स्वतःला थांबवत होतं... पण तिची पावलं पुढे चालतच होती...

बस स्टेशनवर जाऊन तिने अम्रीत्सरची एक तिकीट घेतली आणि बसमध्ये बसली..

--------------------------

"अरे देवा...! हे काय झाले...? काय उत्तर देणार आपण त्यांना... ह्याच्यापेक्षा आपण तिचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं..." पूर्ण गोष्ट समजल्यावर तिच्या आई वडिलांच्या पाया खालून जमीन सरकली होती... रितुचे पप्पा पण तिथेच आले होते... सगळ्यांच्या कपाळावर चिंता साफ दिसत होती...

"मी गाडी घेवून बघून येतो... " विचलित झालेले बाबा बोलले आणि बाहेर निघून गेले...

क्रमश...


Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment