Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Friday, 20 July 2012

भाग ~ ~ ५२ एक प्रेम कथा

Update 52"काका...! किती वेळाने निघणार आहे बस...?" निरुने बसमध्ये चढलेल्या कंडक्टरला विचारले...

"अजून ५-७ मिनट लागतील बेटा... एकदा मिस्त्रीला क्लच ठीक करू दे... नंतर तर इथून सरळ गाडी ५व्या गिअरमध्ये जाणार आहे... हे हे ..." कंडक्टर बोलला आणि पुढे निघून गेला...


-----------------------


निरुचे वडील सरळ बस स्टेशन वरच पोहोचले... आतमध्ये आले आणि सरळ अम्रीत्सारला जाणाऱ्या बससमोर उभे राहिले... अचानक त्यांना घरातून फोन आला... ते परत वळले आणि थोडं लांब उभे राहून आपला फोन काढला...


"ह्म्म्म" आईचा आवाज ऐकून बाबांनी विचारले...


"रितू बोलत होती कि ती अम्रीत्सरला जाणार आहे अशी तिला बोलत होती... तिच्या मैत्रिणीकडे 'निहारिका' कडे... " आई बोलली...


रितू पण तिथेच आली होती...


"देवाचे धन्यवाद आहे...!" बाबांनी एक दीर्घ श्वास घेतला, "तीच ना जी हॉस्टेलमध्ये राहते..."


"हो तीच...!" आई बोलली...


"ठीक आहे... तू तिथे फोन नको करूस... मी तिला घेवूनच येणार... फोन ठेव...!" बाबा बोलले आणि फोन कट केला..


फोन परत आपल्या खिशात ठेवून बाबा अम्रीत्सरला जाणाऱ्या बसमध्ये चढले...


त्यांनी आपली एक भिरभिरती नजर प्रवाश्यांवरती टाकली, पण नीरु तिथे नव्हती... ते सरळ कंडक्टर जवळ पोहोचले, "ह्याच्या आगोदर कोणती बस गेली आहे काय.. अम्रीत्सरला...?"


"हो बस... १५ मिनटांपूर्वीच गेली आहे... का...?" कंडक्टरने विनम्रतेने विचारले...


"नाही... काहीच नाही..." बाबा बोलले आणि फटाफट उतरत ते बाहेर निघून आपल्या गाडीत बसले आणि आपल्या गाडीला त्यांनी अम्रीत्सारच्या दिशेने वळवली...


-----------------


५-७ मिनटांचा अवधी मिळाल्यावर नीरु बसमधून उतरली आणि सरळ बस स्टेशन जवळ असणाऱ्या फोन बूथ जवळ गेली होती... आणि तिथूनच तिने निहारीकाच्या हॉस्टेलमध्ये फोन लावला होता... पण कोणीच फोन उचलला नाही...


ती परत निघणारच होती कि तिने तिच्या वडिलांना बससमोर उभे असताना बघितले... ती थोडी घाबरली आणि परत फोन बूथ मध्ये शिरली...


"हम्म म्याडम...! फोन करून झाला असेल तर बाहेर निघा... मला पण करायचा आहे..." बाहेर निरूच्या बाहेर येण्याची प्रतीक्षा करणाऱ्या माणसाने विचारले...


"एक मिनट प्लीज..." एवढं बोलून निरुने मजबुरीने फोनचा रिसीवर उचलला... आणि पुन्हा नंबर रीडाईल केला...


पण फोन कोणीच नाही उचलला... निरुने बाहेर बघितले... तिचे बाबा आत्ता बसमधून उतरले होते... तिने परत एकदा नंबर रीडाईल केला...


"हेल्लो...!" ह्यावेळी फोन कोणी तरी उचलला होता...


"एकदा रूम नंबर १३ मधून निहारिकाला बोलावता का प्लीज...!" नीरुने विनंती केली...


"कॉलेजमध्ये ३ दिवसांची सुट्टी आहे... सगळी  मुलं आपआपल्या घरी गेले आहेत... तुम्ही कोण...?" तिथून आवाज आला...


एवढं ऐकून निराश झालेल्या निरुने लगेच फोन कट केला... बाबा निघून गेले होते आणि त्याच वेळी बस पण निघून गेली... ती बाहेर निघाली आणि बस स्टेशनच्या पाठी गेली...


"अरे देवा...! आत्ता काय करू..." निराशेने तिच्या डोळ्यात अश्रू आले...


-----------------------


बाबांनी पुढची बस पकडायला वेळ नाही लावला... बसला थांबवून... ते बसमध्ये घुसले... पण त्याच्यामध्ये पण निरुला नाही बघून हताश झाले... बसमधून उतरून त्यांनी गाडी थेट अम्रीत्सरलाच वळवली... हॉस्टेलला जाऊन निरुची वाट पाहण्यात आत्ता त्यांच्याजवळ कुठलाच पर्याय उरला नव्हता...


तिथे नीरु जवळ पण कुठलाच पर्याय उरला नव्हता... जवळ जवळ अर्धा तास तर ती हाच विचार करू लागली कि घरी जाऊ कि नाही... नंतर अचानक तिच्या मनात काय आले काय माहित ती बाहेर निघाली आणि एक रिक्षा पकडून त्यात बसली, "चलो भैय्या..."


--------------------------


ओह माय...! नीरु अमनच्या घराच्यासमोर उभी होती...

"ते घरात आहेत काय...?" निरुने बाहेर उभा असलेल्या नोकराला विचारले...


"हो... एक मिनट...!" एवढं बोलून राजू आतमध्ये गेला... सगळ्यात पहिले त्याला रवी भेटला आतमध्ये...


"कोण आहे...?" बोलत रवी बाहेर निघाला...


बाहेर येवून एक वेळेस तर तो तिथेच दचकून उभा राहिला... पागल सारखा काही वेळ तर तो तिला लांबूनच बघत राहिला... नंतर आपल्या डोक्याला पकडून आतमध्ये पळाला, "भाऊ... भाऊ...!"


"काय झालं ओरडतोयस का...?" रोहनने विचारले...


"तते... ते तु स्वतःच बघ... मी नाही सांगत..." रवीच्या चेहऱ्याची चमक सांगत होती कि काही ना काही तरी चांगलच झालं आहे..


"कुठे बघू... सांग तरी... तू एवढा उतावीळ का होत आहेस..." रोहनने आश्चर्याने विचारले...


"नाही नाही... तू नको बघूस... तू आपले कपडे बदल... मी घेवून येतो त्यांना आतमध्ये..." रवी काही विचार करत बोलला...


"कपडे बदलू..?" रोहनला काहीच समजत नव्हते... रवीला रागाने बघून रोहन बाहेर निघाला...


"ततत... तू...तुम्ही..!" रोहन पण निरुला बघून अडखळायला लागला... तो पटकन गेटजवळ गेला आणि परत बोलला, "तुम्ही... इथे...?"


"आतमध्ये येवू का...?" निरुने विचारले...


"हह... हो...हो... या ना... तुम्ही... काय झालं...?" रोहन नीरु बरोबर चालता चालता बोलत होता..., "सगळं ठीक आहे ना..."


निरूच्या
चेहऱ्यावरून वाटत होते कि सगळं काही ठीक नाही आहे... त्यामुळे ती मोठ्या चिंतेत होती...

"आपण... ते... तुम्ही काय बोलत होता ते जुन्या वाड्या बद्दल...!" निरुने सहज विचारले...


"ते... मला खरंच स्वप्न येतात... तुमची... रवीची शपथ... देवाची शपथ... मी काहीच खोटं नाही बोलत होतो..." रोहन तिची गोष्ट नाही समजला होता... तोपर्यंत अमन आणि रवी पण तिथेच आले होते...


"तुम्ही बसा ना...!" अमनने आग्रह केला...


"माझं तसं म्हणणं नाही आहे..." नीरु बसत बोलली, "तुम्ही बोलत होता ना कि जुन्या वाड्याजवळ जाऊन मला सगळं काही आठवणार ते..."


"हो... ती बोलत होती... नीरु... स्वप्नात... एकदम खरा बोलतोय..." रोहन अजून पर्यंत उभाच होता आणि अडखळत बोलत होता त्याला काहीच सुचत नव्हते कि काय बोलावे...


"तर चला...!" नीरु बोलली...


"कुठे...?" रोहनने विचारले...


"जुन्या वाड्याजवळ...!" नीरुने उत्तर दिलं...


"काय...? खरंच...?" रोहन खुश होत बोलला... पण पुढल्याच क्षणी मायुस होत बोलला, "पण ते तर खूप लांब आहे इथून... आज जाऊन लगेच परत नाही येवू शकत..."


"किती दिवस लागतील... ३, ४, हफ्ता?" निरुने विचारले...


"हो... हफ्त्यामध्ये तर सगळं काही होवून जाईल... म्हणजे आपण आरामात जाऊ शकतो... पण..?" रोहन हे विचारायला बघत होता कि तिचे घरचे काय बोलतील... पण त्याला निरुने मध्येच टोकले...


"ठीक आहे... चला निघूया...!" नीरु बोलली...


--------------------


"अरे देवा...! माहित नाही कुठे गेली ती पागल... ! हेच करायचे होते तर पहिलेच सांगितलं असतं... आम्ही तिला लग्नाशिवाय राहू दिलं असतं..." घरी परत येवून तिचे बाबा सगळ्यांच्या बरोबर विचारात पडले होते...


"पण जर हॉस्टेल बंद आहे तर गेली कुठे असेल... कुठे काही झाले तर तिला... ती तर एकटी कुठे जात पण नव्हती..." तिची आई रडत होती...


"त्यांना तर मनाई करा... कमीत कमी तो पंगा तर नाही होईल...!" रितूचे वडील बोलले...


"काय बोलू...? कसा बोलू...? मी अम्रीत्सरला जात होतो तर त्यांचा फोन आला होता.. मी तेव्हा तर त्यांना काही बोललोच नाही... आत्ता तर त्यांचे नातेवाईक सुद्धा आले असतील... हा कसला दिवस दाखवला देवा...!" बाबांचे डोळे पण ओले झाले होते...


अचानक त्यांना दोन गाड्यांचा बाहेर थांबण्याचा आवाज आला
... सगळे घाबरले... बाहेर निघून बघितलं तर तेच होते...

"आत्ता काय करायचे...?" बडबडत निरुचे पप्पा मानवच्या पप्पांकडे गेले...


मानवचे पप्पा पण एकदम खुश होवून त्यांच्या गळे मिळाले, "अरे..! चेहरा का लटकावून ठेवला आहे... हे घ्या...! सांभाळा माझ्या मुलाला आणि शिनुला मला सोपवून द्या..." ते स्मित हास्य देत बोलले...


मानवने विनम्रतेने त्यांच्या पाया पडला... पण चिंतेमुळे तिच्या वडिलांनी त्याला आशीर्वाद पण दिला नाही...


"माझ्या सोबत जरा येत का प्लीज... काही तरी बोलायचे आहे...!" निरुचे पप्पा हळूच बोलले...


"बघ मित्रा... हुंड्याची वार्ता नको करूस... आम्ही तुम्हाला आपला मुलगा देतोय... हुंडा नाही घेणार..." मानवचे वडील बोलले...


"तुम्ही या तरी एकदा... वरती..." निरूच्या पप्पांनी त्यांचा हात पकडला आणि वरती जायला लागले... रितुचे पप्पा पण त्यांच्या सोबतच होते... बाकीचे सगळे लोक खालीच थांबून एकमेकांचे इंट्रोडक्षन घेत होते...


-----------------


"हे काय बोलत आहात तुम्ही..! तुम्हाला पहिलेच विचारायला पाहिजे होते... आत्ता.. तर हा माझा डोक्यावर बांधलेल्या पगडीचा प्रश्न झाला...!" पूर्ण गोष्ट ऐकल्या नंतर मानवचे वडील बोलले... त्यांच्या चेहऱ्यावरचा पूर्ण रंग उडाला होता...


"मी मानतो... पण तुम्ही कुठल्याहि प्रकारे आजचा कार्यक्रम चार पाच दिवसांसाठी पुढे ढकला.. काही दिवसांनी ती परत येईलच तुम्हाला तर माहित आहे निरूच्या स्वभावाबद्दल... ती अशी नाही आहे... ती आल्यानंतर आम्ही प्रयत्न करू कि 'ती' मानव बरोबर लग्नाला तैय्यार होईल..." निरूचे वडील आपली मान खाली झुकवत बोलले...


"कमाल करत आहात तुम्ही...! माझ्या नातेवाईकांना मी काय बोलू...? हे कि माझी होणारी सून आज कुठे तरी बाहेर गेली आहे ते पण न सांगता... आणि मग ती परत आल्यावर जबरदस्ती लग्नासाठी तैय्यार करायचा काय फायदा... उद्या परत निघून जाईल... आमच्या घरातून... नाही नाही...! हे नाही होवू शकत...!" मानवचे वडील बोलले...


"तर मग तुम्हीच सांगा मी काय करू...? हि तर अनहोनी आहे..." निरूच्या पप्पाने आपले डोके शरमेने झुकवतच बोलले...


"ना ना...! अनहोनी नाही, हि तुमची नादानी आहे... तिच्या वर लग्नासाठी दडपण तुम्ही आणायलाच नाही पाहिजे होतं.. ती नाही बोलत होती तर तुम्ही कालच फोन करून आम्हाला सांगायला पाहिजे होतं... आम्ही काही पण बोललो असतो... पण आजच्या सारखं बदनामीचा सामना नाही करायला पडला असता..." मानवचे बाबा बोलले...


"जे व्हायला पाहिजे, ते झाले आहे... आत्ता हा विचार करा कि आत्ता आपण काय कर शकतो..." रितुचे वडील मध्येच बोलले...


"यार, आत्ता करायसाठी राहिले तरी काय आहे... मी तर आता कोणाला तोंड दाखवायच्या पण लायकीचा राहिलो नाही आहे... मला तर सून पाहिजे होती... जी इथे आहेच नाही..." मानवचे वडील खूप हताश होत बोलले...


"एक गोष्ट बोलू... जर पसंत पडली तर..." एवढं बोलून रितुचे पप्पा थांबले...


काहीच न बोलता नीरु आणि मानवचे वडील त्यांच्याकडे बघायला लागले...


"जर तुम्हाला माझं घर परिवार पसंत आहे तर मी आपली मुलगी द्यायला तैय्यार आहे..." रितुचे पप्पा बोलले...


निरुचे पप्पा डोळ्यात पाणी घेवून त्यांच्या कडे बघायला लागले...


"ती तर खूप लांब गोष्ट झाली मित्रा... मानव तिला बघणार... आत्ता शिनू तर त्याला खूप पसंत होती... तुम्ही तर समजू शकता आज कालची मुलं... मग काय माहित तुमच्या मुलीला शिनूसारखा मानव पसंत नाही आला तर... आणि मग हे एक दिवसात पण नाही होवू शकत ना..." मानवच्या पप्पांच्या चेहऱ्यावर अजून पर्यंत हताशा आणि निराशा साफ दिसत होती...


"माझी मुलगी खाली आहे... मी आणि तिची आई रितूला बोलावून आणतो... तुम्ही मानवला बोलवा... बघा जर गोष्ट बनते तर...?" रितुचे वडील बोलले...


अजून कुठलाच पर्याय उरला नव्हता... ते बाहेर निघाले आणि मानवला वरती घेवून आले...


------------------------------


मानव पण सगळी गोष्ट ऐकून एकदम सुन्न पडला होता... पुढच्याच क्षणी त्याला आभास झाला हो न हो नीरु रोहनकडे गेली असेल... परत तीच गोष्ट झाली असती... जबरदस्ती लग्न... मानवने आपल्या वडिलांच्या कपाळावर चेन्तेची एक वळ बघितली आणि आपल्या भरून आलेल्या गळ्याने तो बोलला, "ठीक आहे पप्पा...! जसं तुम्ही तुम्ही ठीक समझा... मला काहीच प्रोब्लेम नाही आहे..."


त्याच्या पप्पाने पटकन उठून त्याला आपल्या बहुपाश्यात घेतलं, "अशी असतात मुलं... मला तुझ्यावर गर्व आहे... बेटा...!" डोळ्यातून अश्रू वाहायला लागले...


"तुम्ही असं का करत आहात पप्पा.. मी रितूला बघितले आहे... मला पसंत आहे ती... मी पागल होतो... मी कधीच निरूच्या डोळ्यातले भाव ओळखू शकलो नाही... तुम्ही रितूला विचारा... जर तिला मंजूर असेल तर ह्यात माझं सौभाग्याच असेल..." भरलेल्या गळ्याने मानव बोलला...


"आम्हाला माफ कर बेटा... आमच्याकडून चूक झाली..." निरुचे पप्पा उभे होत पश्चाताप प्रकट करत बोलले..


"तुम्ही पण काका... देवाच्या मर्जी शिवाय काही होतं काय...? काहीच चुकी झाली नाही तुमच्याकडून... प्लीज मला लाजवू नका..." मानव बोलला तर स्वतः निरुचे पप्पा त्याला आपल्या बहुपाश्यात घेण्यापासून थांबले नाहीत...


-----------------------------


जेव्हा रितू आली तेव्हा तिला जाणीव पण नव्हती कि काय होणार होते आणि काय झाले... ती तर हाच विचार करत होती कि नीरु बद्दल विचारण्यासाठी तिला बोलावले जात आहे...


"बेटा... जर मानव बरोबर लग्न करायला तुला काहीच प्रोब्लेम नाही आहे तर आमची बदनामी वाचेल..." मानवच्या वडिलांनी सरळ विचारले...


रितूला आपल्या कानांवरती विश्वासच बसला नाही... एकदम बलिष्ट स्मार्ट इन्स्पेक्टर तिच्या समोर उभा राहून तिलाच बघत होता, "मम... मी..?"


"काही जबरदस्ती नाही आहे बेटा... तुझ्या पप्पांनी आमच्यावर उपकार करण्यासाठीच हा पर्याय सुचवला आहे... पण जर तुला काही प्रोब्लेम आहे तर..."


रितूने मानवच्या डोळ्यात पाहिले आणि लाजून आपल्या आईच्या पाठी लपली...


"बोलून टाक बेटा... जे काही तुझ्या मनात आहे बोलून टाक...!" आई प्रेमाने बोलली...


"मला काय प्रोब्लेम असणार आई... माझ्यासाठी तर हि सौभाग्याची गोष्ट आहे... आणि मग ह्याच्यापेक्षा कुठलाच चांगला पर्याय नाही निघू शकत..." रीतुने आईच्या कानात हळूच बोलली... पण ऐकलं सगळ्यांनी...


ह्याच बरोबर घरात परत आनंदाचं वातावरण पसरलं...


संधी साधून निरुचे पप्पा रीतुच्या पप्पांकडे गेले, "तु मला वाचवलस मित्रा... मी तर जिवंतपणी मेलोच असतो... हि ग्लानी घेवून जिवंत राहूच शकलो नसतो..." आणि दोघे जण एकमेकांच्या गळे मिळून किती तरी वेळ आपले अश्रू गाळत राहिले... आनंदाचे पण आणि दुःखाचे पण...

 
 

क्रमश...


Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment