Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Sunday, 22 July 2012

भाग ~ ~ ५३ एक प्रेम कथा

Update 53रोहन तिला बोलला का जरा थांबता मी एकदा फोन वर आपल्या आई वडिलांशी बोलून घेतो... आणि इथे गाडी पण नाही आहे.. शेखर कुठे तरी बाहेर गेला आहे... त्याला फोन केला होता तो बोलला कि दीड ते दोन तास लागणार... तो पर्यंत तुम्ही आरामात इथे बसा... तुम्हाला कुठल्याही वस्तूची किंवा काही गरज असेल तर रवी किंवा मला बोलवा... ठीक आहे... एवढं बोलून रोहन बाहेर निघून गेला...

-----------------------------


जसा जसा वेळ निघत होता, तसं तसं निरुला आपल्या घरच्यांची आठवण येत होती... घरातून निघतेवेळी ह्या गोष्टीला तिने एवढ्या हलक्यामध्ये घेतलं होतं... खरं म्हणजे तिचा हा निर्णय तिला तेवढाच भारी वाटत होता... आई वडिलांची आठवण आणि तिच्याशिवाय त्यांची हालातीची चिंता तिला व्याकूळ करत होती...


"नीरु..." रोहनने तिचं स्वप्न भंग केलं तिला समजलंच नाही कि रोहन कधी आतमध्ये आला ते...


"हम्म.. ते.. माझं नाव शिणू आहे... मला त्याच नावाने हाक मारा प्लीज..." नीरु अचानक आपल्या तंद्रीतून परत येवून बोलली...


"ते... पप्पा हो बोलले आहेत... पण उद्या यायला बोलले आहेत..." रोहन तिच्या झुकलेल्या नजरेत बघत बोलला...


"मला एक फोन करायचा आहे... एक मिनट देता का... प्लीज..." नीरु रोहनकडे न बघताच बोलली...


"हो हो... हे घे..." रोहनने खुश होवून फोन निरुकडे दिला...


"ते... मला एकांतात बोलायचे आहे..." नीरु बोलली...


"ठीक आहे.. आम्ही बाहेर जातो.. जेव्हा तुमचं बोलणं संपेल तेव्हा आम्हाला आवाज द्या..." रोहन बोलला आणि रवीला घेवून बाहेर निघून गेला...


---------------------


"हेल्लो" तिथून आवाज आला...


आवाज
रीतुच्या आईचा होता... नीरुने न बोलताच फोन पटकन कट केला...

"कोण होतं आई...?" रितू त्यांच्या जवळच बसली होती...


"माहित नाही... फोन कट झाला..." आई बोलली...


"हमखास शिनुचा असणार... ह्यावेळी मी फोन उचलते..." रितू फोन जवळ येवून बसली...


"ठीक आहे तिच्याशी प्रेमाने वार्ता कर आणि तिला लवकर घरी बोलाव जर ती कुठे हि असेल तिथून.... तिचे घरचे खूप काळजी करतायत तिच्यासाठी..." तिची आई एवढं बोलून निघून गेली... आणि रितू फोनची वाट बघत बसली...


आई बाहेर गेल्यावर लगेच फोन आला... रितूने पटकन फोन उचलला, "हेल्लो...!"


"हेल्लो... रितू...!" नीरु बोलली...


"कुठे गेलीस आहेस तू... तू तर खरोखर गेलीस यार... असं पण कोणी जातं काय... तुला माहित आहे सगळे जण इथे किती तुझी काळजी करत आहेत..." रितू बोलली...


"आई बाबा कसे आहेत...!" निरुने विचारले...


"असे कसे ठीक असू शकतात... काकी तर सकाळपासून खूप रडत आहेत... तू असं नाही करायला पाहिजे होतं यार..." रितू बोलली...


"ते... आले होते काय...?" निरुने विचारले...


"हो आले होते... पण आत्ता तुला चिंता करायची काहीच गरज नाही आहे... तू घरी ये... तुझा सगळा भार मी माझ्या डोक्यावर घेतला आहे...." रितू बोलली...


"माझ्या डोक्यावरचा भार म्हणजे... आणि पप्पा पण मला कधीच क्षमा नाही करणार..." नीरु बोलली...


"तुझ्या डोक्यावरचा भार म्हणजे... मानव बरोबर आत्ता मी लग्न करणार आहे... आत्ता तर तू खुश आहेस न.." रितूने तिला समजावले...


नीरु काही वेळ अशीच सुन्न उभी राहिली.. नंतर अचानक जोरात रडायला लागली... तिच्या रडण्याचा आवाज बाहेर रोहन आणि रविला पण आला, ते पळत आतमध्ये आले... पण नीरु फोनवरती बोलत आहे हे पाहून परत पाठी वळले...


"ये... हे काय करतेस तू...? रडतेस का...? आत्ता तुझं मन झालं आहे काय लग्न करायचं... चिंता नको करूस... अड्जस्ट करूया..." रितू बोलली आणि हसायला लागली...


"तू काय आहेस यार... माझ्यासाठी तू एवढं काही केलंस... मी काय करू..." नीरु बोलली..


"मी पागल आहे काय, जे तुझ्यासाठी करू... मी पहिलेच तुला काय बोलले होते... कि जर माझ्यासाठी असं मांगण आलं असतं तर मी कधीच नकार दिला नसता... ते तर पप्पांच्या डोक्यात माहित नाही कसे आले... हे हे हे... आत्ता तू हे सगळे सोड आणि सांग कुठे आहेस...? हॉस्टेल तर बंद आहे... असो कुठे पण असशील तिथून लवकर परत ये... बाकीची गोष्ट इथेच बसून करूया..." रितू बोलली...


"ठीक आहे... तू माझ्या घरीच भेट... मी येते २० मिनटांत" नीरु बोलली आणि फोन कट केला...


फोन ठेवताच तिने रोहनला आवाज दिला...


रोहन बोलावण्याची वाटच पाहत होता... रविला त्याने बाहेरच थांबवले होते..., "तुम्ही रडत का आहात...!"


"मला घरी जायचे आहे..." नीरु फोन रोहनकडे देत बोलली...


"हे हे... काय बोलतेस तू... मी तर पप्पांना पण बोललो आहे..." रोहन बोलला...


"सॉरी.. ते.. मला वाटत होतं कि मी जाऊ शकते.. मला माहित आहे तुम्हाला खूप वाईट वाटत असणार... पण... मी नाही जाऊ शकत... माझ्या घरचे चिंता करत आहेत... सॉरी... पण मी तुमच्याशी नंतर बोलेन... प्रॉमिस...!" नीरु बोलली...


"काय... तुम्ही न सांगता आला होता... असं का केलं..? मी तर पहिलेच विचारले होते...?"


"सॉरी...! मी नंतर भेटेन तुम्हाला..." २ क्षणासाठी निरुने रोहनच्या डोळ्यात पाहिले... आज तिला रोहनच्या डोळ्यात आपलं पण वाटलं... त्याच्या नजरेमध्ये दुसऱ्यान सारखी वासना नव्हती...


नीरु बोलली आणि बाहेर निघून गेली...


-----------------------------


"काही बोलले नाही न काका काकी...?" रीतुने नीरु वरती येताच विचारले...


नीरु घरी आल्यानंतर जवळ जवळ १५ मिनिटानंतर वरती आली होती... जेव्हा आई बोलली कि रितू वरती आहे तेव्हा...


"नाही काही खास नाही... पप्पा तर काहीच बोलले नाही... वाटतंय माझ्याशी नाराज आहेत... तू सांग... तू पण नाराज आहेस काय...?" नीरुने रीतुच्या शेजारी बसत तिचा हात पकडला...


"तू तर खरंच पागल आहेस यार.. मला विश्वासच नव्हता कि तू निघून जाशील... शेवटी तुने विचार काय केला होता...? पूर्ण वय असंच घालवणार आहेस काय लग्नाशिवाय...?" रितू बोलली...


काहीवेळ तिथे शांतता पसरली... नंतर अचानक रीतुनेच मौन तोडले, "तू गेली कुठे होतीस...?"


"त्यांच्या जवळ...!" नीरु बोलली...


"त्यांच्या जवळ...? रोहनच्याकडे काय...?" रीतुने अंदाज लावून अचंबित होवून विचारले...


"हो...!" नीरु बोलली...


"काय...?" आपल्या अंदाजाची पुष्टी झाल्यावर... रितू परत अचंबित झाली, "त्या दिवशी तर तू माझ्या बरोबर यायला पण घाबरत होतीस... मग अशी कशी काय गेलीस.. एकटी...?"


"माहित नाही यार... पण माझ्या कडे अजून कुठलाच पर्याय उरला नव्हता...!" नीरु बोलली...


"त्यांनी काही विचारले नाही...? तू काय बोलली...?" रितू अजून पर्यंत अचंबित होती...


"मी त्यांना हेच दाखवले होते कि मला त्यांच्या स्वप्नांवरती  विश्वास बसला आहे... त्यामुळे मी त्यांच्या बरोबर जुन्या वाड्याजवळ जाण्यासाठी तैय्यार आहे... !" नीरु बोलली...


"मग...? काय बोलले ते...?" रितू खुश होत बोलली...


"त्यांनी तर निघायची तैय्यारी पण केली होती... मग मला वाटले मी चुकीचे करत आहे... त्यामुळे मी तुझ्याजवळ फोन केला... आणि परत आली.." निरुने स्पष्ट केला...


"अरे देवा...! तू हा विचार नाही केलास कि तुझ्या ह्या मस्करीने त्यांच्या मनावर काय परिणाम होईल... ते खरोखरच बोलतात... तुझ्यात मनच नाही आहे... !" रितू भडकत बोलली...


"मी काय करू शकते यार... खरं सांगू तर मलाच लाज वाटत होती त्यांना नकार देते वेळी... पण मी कशी काय जाऊ शकते... तूच सांग... मी तर दोन चार दिवस घरातून बाहेर राहण्यासाठी त्यांना असं बोलली होती..." नीरु बोलली...


"ते काहीच बोलले नाही... खूप राग आला असेल त्यांना तुझ्यावर..!" रितू बोलली...


"माहित नाही... मी त्यांना हेच बोलून आले कि नंतर बोलूया..?" नीरु बोलली...


"आणि आत्ता तू त्यांच्याशी बोलणार नाहीस... आहे ना...? हे वचन तोडणे पण तुझ्यासाठी कठीण नाही आहे... बोल..?" रितूला रोहनची दया येत होती...


"माहित नाही... पण खरं बोलू... मला विश्वासच होत नाही आहे... कि त्यांचे स्वप्नं आणि माझं नाव बदलण्याची कहाणी एकमेकांना जुडलेली आहे... माहित नाही का... मला खूप वेगळं फील होतं त्यांच्यासमोर गेल्यावर... असं वाटायला लागलं आहे कि मी त्यांना खूप पहिल्यापासून ओळखते... खूप वर्षापासून... पण माहित नाही... माझं मन का हे सगळं मानायला तैय्यार नाही आहे..." नीरुने आपल्या मनातील गोष्ट बोलली...


"तुझ्यात मन असतं तेव्हाच ते मानलं असतं ना...! नाहीतर तू त्यांना खोटा विश्वास देवून त्यांच्या भावनांशी खेळली नसतीस... खरंच यार... मन करतंय तुला जबरदस्ती उचलून त्या जुन्या वाड्याजवळ घेवून जाऊन आपटावं... पुढे काय होईल ते बघितलं गेलं असतं..." रितू प्रेमळ रागाने बोलली...


नीरु काहीच बोलली नाही... आणि हसायला लागली... कदाचित ती स्वतः वर हसत होती...!


--------------------


"मला तर तिच्यावर पहिलेच संशय आला होता... कि तिच्या डोक्यात काही ना काहीतरी विचार चालला आहे... न बोलणारी वहिणी एवढ्या लवकर तिथे जाण्यासाठी तैय्यार कशी झाली..." रवी आणि रोहन बसून बोलत होते...


"पण यार... ती बोलून तर गेली आहे ना, कि नंतर बोलूया करून... आपण वाट पाहण्यापेक्षा काहीच करू नाही शकत..." रोहन मायुस होता... पण त्याने हिम्मत नाही हारली होती...


"एक मिनट... तुझा फोन दे..." रवी बोलला...


"काय करणार...?" रोहनने त्याच्याकडे फोन दिला...


रवी काहीच न बोलता कॉल डिटेल काढली आणि शेवटचा डाईल नंबर लावला... रोहनला त्याने गप्प राहण्याचा इशारा केला...


"हेल्लो...!" फोन रीतुच्या आईने उचलला...


रवी हेल्लो बोलला आणि फोन म्युटवरती टाकला... तो फोन कट करणारच होता कि तिथून आईचा आवाज आला..., "मानव बोलतोयस ना बेटा तू.. एवढं लाजायचं कारण काय आहे... रितू शिनूच्या घरी गेली आहे... तिथे कॉल कर... " एवढं बोलून त्या गालातल्या गालात हसायला लागल्या...


रवीने पटकन म्युट मोड हटवला, "हो काकी... एकदा तिथला नंबर द्या प्लीज..."


"आत्ता आई बोलायची सवय कर..." आई स्मित हास्य देत बोलली, "तुझ्याजवळ नाही आहे काय...?"


"हो... नाही... ते माझ्याकडून हरवला आहे..." रवी पटकन बोलला, "हो सांगा नंबर आई..."


रीतुच्या आईने नंबर सांगितला आणि फोन ठेवला...


रवीने पटकन निरूच्या घरचा नंबर डाईल केला... तिथे पण फोन काकींनी उचलला, "हेल्लो..!"


"मानव बोलतोय... काकी... रितू असेल इथे..." रवी बोलला...


आईने काहीवेळ विचार केला आणि नंतर काही जास्त न बोलता, "आत्ता देते बेटा.." एवढं बोलून त्यांनी फोन उचलून बाहेर आणला, "रितू... फोन घेवून जा... मानवचा आहे..."


रीतुच्या खुशीचा काही ठिकाणाच नाही उरला... ती शिडीवरून जवळ जवळ पळतच खाली आली आणि फोन वरती घेवून गेली..


क्रमश...


Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment