Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Tuesday, 24 July 2012

भाग ~ ~ ५४ एक प्रेम कथा

Update 54"हेल्लो...!" रितू एकदम लाडीगोडीने बोलली...


"नीरु आहे काय...?" रवीने सरळ सरळ विचारले...


"कोण...?" रीतुने दचकून विचारले...


"मी आहे... रवी... फोन नको कट करूस...!" रवी खरं बोलला...


"ओह.. हो... काय आहे...? तुला हा नंबर कुठून मिळाला...?" रीतुने हैराणीने विचारले..


"तुला असं नाही करायला पाहिजे होतं... बेचारा रोहन दुपार पासून रडत आहे.. छोट्या मुलांसारखा..." रवीने रोहनकडे बघत डोळा मारला...


"आत्ता मी काय बोलू...? मी पण तिला हेच समजवते... पण जे झाले तिच्यात हिची मजबुरी होती...!" रितू दोन्ही पक्षांची बाजू घेत बोलली..


"ती बोलू शकते काय एकदा...? रोहन बरोबर..." रवी कामाच्या गोष्टीवरती येत बोलला...


"हो... शिनू... हे घे... आत्ता बोल रोहनशी..." रीतुने फोन निरुकडे दिला...


"नाही.. मी नाही बोलणार..." नीरु बिचकून उभी राहिली...


"बोल ना त्याच्या बरोबर... तू बोलून आली होतीस ना त्याला... बेचारयांनी माहित नाही कोणा कडून नंबर काढला असेल... आत्ता बकवास नको करूस.." रितू रागाने बोलली...


"नाही... माझ्याने नाही होणार... मी नंतर बघेन..." निरुने स्पष्ट नकार दिला...


रीतुने परत फोन कानाला लावला, "रोहनला फोन द्या एकदा..."


"रोहनच बोलतोय...!"


"ओह... मी तिच्या तर्फे क्षमा मांगते... खरं म्हणजे तिने जाणूनबुजून मस्करी नाही केली... मी तुम्हाला भेटून सांगते..." रितू क्षमा मागत बोलली..


"पण मी खूप मुश्कीलने आपल्या पप्पांना सांगितले होते... आत्ता तिच्याशिवाय घरी कसा जाणार... मी पप्पांना बोललो पण आहे कि मी निरुला घेवून येतोय... " रोहन बोलला...


"काय...? तू पप्पांना हे बोललास... तू तर खूप हिम्मतवाला आहेस यार... चेहऱ्याने तर नाही वाटत... हे हे..." रितू चेष्टा करत बोलली...


"पण आत्ता तुम्हीच सांगा मी काय करू..?" रोहनने विचारले...


"ह्म्म्म... तर मी हिला घेवून येवू..?" रीतुने विचारले...


"कुठे...?"


"जुन्या वाड्याजवळ... अजून कुठे...?" रितू स्मित हास्य देत बोलली...


"काय...? पण तुम्ही एकटे जाणार तिथे...?" रोहन आश्चर्यचकित होत बोलला...


"ऑफकोर्स यार... तुमच्या सोबर येणार... पण दिवस किती लागतील...?" रितूने विचारले...


"पण तू तिला राजी कसं करणार...?"


"ते तू माझ्यावर सोड... किती दिवस लागतील...?"


"४-५ दिवस तर लागतीलच... एक हफ्ता पण लागू शकतो..." रोहनने उत्तर दिलं, "पण... तू पण सोबत येणार काय...?"


"नाही नाही... वधूसारखी तुला हिच्या बरोबर पाठवेन... मी काय करणार दोन प्रेमी जोड्यांच्यामध्ये...!" रितू व्यंग करत बोलली आणि परत शांत होत बोलली, "हो... मला पण तुमच्या सोबत यायला लागणार... तिच्या घरातले तिला एकट  नाही पाठवणार... कोणत्याही परिस्थिती... समजलास...?"


"हम्म... पण तिला तर विचार...!" रोहन आशंकित होत बोलला...


"विचारलं समज... मी काही वेळानंतर फोन करते.. तू उद्या सकाळी निघण्याची तैय्यारी कर..." रितू बोलली आणि फोन ठेवला...


"हे काय बोलतेस तू...? आत्ता तू का मस्करी करतेस त्यांच्या बरोबर...!" नीरु हताश होत बोलली...


"मस्करी नाही करत आहे... आपण खरोखर जात आहोत... उद्या सकाळी... खूप मजा येईल...!" रितू खुश होत बोलली...


"नाही... मी नाही जाणार..." नीरु बोलली...


"एक गोष्ट विचारू का...? तुला काय वाटते...? रोहन घाणेरडा मुलगा आहे...?" रीतुने विचारले...


"नाही तर...! मी कधी अशी बोलली..."


"त्याच्या चेहऱ्याशी घृणा वाटते..."


"नाही तर..."


"तुला काय वाटते... तो आपला फायदा उचलू शकतो...?"


"पण तू विचारतेस का...?" निरुने उलट प्रश्न विचारला...


"तू सांग ना..."


"नाही..."


"आत्ता पर्यंत जेव्हापण भेटलो आहे... तुला वाटलं कि त्याच्या मनात चोर आहे... वा हे सगळं तो खोटं बोलत आहे...?"
"नाही...!"


"तर प्रोब्लेम काय आहे यार... जर तू मला विचारशील तर मी तुला हेच सांगेन कि तू एकदा त्याच्या बरोबर जाऊन बघितले पाहिजे... तुला स्वतःलाच वाटते कि कुठे ना कुठे तरी तुमचं काही तरी जुडलेलं  आहे... आणि मी एकदम ठामपणे सांगू शकते कि तो असा मुलगा नाही आहे जो असाच मुलींच्या पाठी फिरेल... आणि मग तुझ्यासोबत मी पण येत आहे...


शेवटी मला पण बघायचे आहे कि तुमच्यामध्ये असं किती प्रेम आहे जे तुला मानवशी लग्न नाही करायला तू घरातून पळून जाण्यासाठी मजबूर झालीस... आज पर्यंत तू स्वतः देखील विचार केला नसशील कि तू कधी असू करू शकतेस... तरीपण तू केलंस... जर त्याला नाटकच करायचं होतं तर तो आपल्याच शहरात नाही करू शकला असता... मुलींचा एवढा पण तोटा नाही आहे यार..." एवढं बोलून रीतुने एक दीर्घ श्वास घेतला...


"पण तुला नेमकं काय बोलायचे आहे... आपण जाणार कसे...?" निरुला समजत नव्हते कि रितू कोणत्या बेसवरती बाहेर जाण्याचा विचार करत आहे... ते पण एक हफ्त्यासाठी...


"मी सगळा प्लान तैय्यार केला आहे... मी आज आईला सांगणार कि अम्रीत्सरहून माझ्या मैत्रिणींची सहल जात आहे... मला माहित आहे कि ते कधीच नकार नाही देणार... पहिले मी आईला विचारतो... माझी हो झाल्यानंतर काका पण तैय्यार होतील...!" रितू बोलली...


"पण मला नाही जायचे आहे यार...!" नीरु तोंड वाकडं करत बोलली...


"बघतेच मी कि तू कशी नाही येणार... आत्ता मी जाते... आईला विचारताच तुझ्याकडे येईन... आणि त्यांना सांगूया...!" रीतुने आपला फैसला सुनावला आणि फोन घेवून खाली आली...


------------------------


"तुला विश्वास आहे कि त्या दोघी येणार...?" शेखर गाडीची चावी उचलत बोलला...


"आत्ता येवू किंवा न येवो, मला तर एकदा जायलाच लागणार... आई बाबांना बोललो आहे..." रोहन सारखा सारखा बाहेर निघून गेटकडे बघत होता...


"तू परत येणार ना शेखर...!" अमन उदास बसलेला... खूप दिवस घरात आनंदी वातावरण होतं पण आत्ता हे सगळे गेल्यानंतर परत तेच जीवन म्हणून अमन खूप उदास होता...


"हो हो... येणार का नाही.. पण ह्या वेळी वराडी घेवून येणार, तुझ्या शहरात..." शेखर स्मित हास्य देत बोलला...


"अमन भाऊ... तू पण आमच्या सोबत चल ना... तुला आमच्या इथली मुलगी दाखवतो..." रवी मस्करी करत बोलला...


"बस यार.. आत्ता मन भरलं आहे... माहित नाही आत्ता कोणाच्या आधारे जगेल..." अमन दीर्घ श्वास घेत बोलला...


"तर मग तू लग्न कर ना... खूप झाली मजा मस्ती... आत्ता तू पण कोणी नखरे दाखवणारी शोध...!" रवीने येवून अमनच्या खांद्यावरती हात ठेवला तर अमन डोळे बंद करत स्मित हास्य देत बोलला, "माझ्या गर्लफ्रेंडचं लग्न पण झालं असेल यार..."


"काय बोलतोस भाऊ...? तुझं पण चक्कर चालू होतं कधी..." रवी बिचकत बोलला...


"काय बे... चक्कर काय तुम्ही लोकंच चालवू शकता... माझं चक्कर तेव्हा चालू होतं जेव्हा तुम्ही लोकं दोन पायांची सायकल चालवत असाल... हा हा हा.." अमनच्या मस्करीने पण त्याचं मन भरून आला होतं...


"मग काय झालं यार...?" रवी त्याला घेवून सोफ्यावर बसला...


"सगळे नशीबवाले  नसतात.. सगळ्यांना प्रेम नाही भेटत... !!!" अमनने आपलं बोलणं पूर्ण केलं होतंच कि दरवाजावर रितू प्रकट झाली, "हाय..!"


सगळ्यांच मन खुश झालं, पण रोहन अजून पर्यंत बेचैनच होता, "ती नाही आली काय...?"


"तिच्या शिवाय मी कशी आली असती... ती उभी आहे बाहेर... लवकर चला..." रितू बोलली...


"हेल्लो...!" बाहेर येताच रोहनने निरूच्या ओशाळलेल्या चेहऱ्याला बघून संशयमध्ये पडला, "येत आहात ना; तुम्ही पण..."


"हो हो... येत आहोत... सारखं सारखं विचारून मन बदलवण्याचा विचार आहे काय...?" रितू बोलली...


"मग हि अशी का उभी आहे... एकदम चुपचाप...!" रोहन निरूच्या चेहऱ्यावर आलेली निराशा बघून बोलला...


"आत्ता तुम्ही हिच्या चेहऱ्यावर जास्त लक्ष नका देवू... हि अशीच आहे... आपोआप ठीक होईल... निघा इथून..." रितू बोलली...


"तुमचीच वाट बघत होतो... आम्ही तर केव्हाचेच तैय्यार आहोत..." शेखर बोलला आणि ड्राईविंग सीटवर जाऊन बसला... रवीने पण पुढची सीट पकडली..


रीतुने निरुला गाडीच्या आतमध्ये ढकलले आणि स्वतः पण तिच्या शेजारी जाऊन बसली...


"थोडं तिकडे सरकून बस... मला पण तर बसायचे आहे..." रोहन एकदम खुश होत मनातल्या मनात हसत होता...


"त्या साईडने ये ना...!" रितू स्मित हास्य देत रोहनला बोलली... तिचा हसून सांगण्याचा इशारा निरुसोबत बसण्याचा होता...


"तुम्ही त्या साईडलाच बसा ना..!" रोहन त्या साईडचा दरवाजा उघडताच नीरु बिचकत बोलली...


"चुपचाप इथे सरक... तुला खाणार नाही आहे तो.." रितू बोलली आणि तिला आपल्याकडे खेचले... रोहन बसला आणि सगळ्यांनी 'अमनचा' निरोप घेवून निघाले...


--------------------


शहरातून बाहेर पडल्यावर रितू एकदम रील्याक्स फील करत होती... तिने निरूच्या चेहऱ्याकडे बघितले...


"अशी का तोंड फुगवून बसली आहेस येडाबाई..? बाहेर बघ वातावरण किती चांगलं आहे...!" रितू बोलली...


नीरु जी एकटक समोरच्या सीटला बघत होती ती आत्ता आपली नजर वर उचलून बाहेर बघायला लागली... पण चेहऱ्याचे भाव आत्ता पण नाही बदलले...


"तुम्ही काय विचार करून माझं डोकं फोडलं... वहिनी...!" रवीला शांत नाही राहवलं गेलं...


"मला नावाने बोलव...!" नीरु बोलली...


"ओह्ह.. सॉरी... नीरु...!" रवी क्षमा मांगत बोलला..


"माझं नाव शिनू आहे... नीरु नाही..!" निरुने त्याला परत टोकले...


"ते तर जुन्या वाड्याजवळ जाऊन माहिती पडणार... हा हा हा... वही (रवी वहिनी बोलता बोलता थांबला..)..सॉरी... तुम्हाला भूतांची भीती नाही वाटत ना..?"


"भुतं नसतातच... मी का घाबरू...!" नीरु रागात बोलली...


"अच्छा...! इन्स्पेक्टरला एकदा विचारून बघा... ते काय बोलतात ते... हा हा हा...!" रवी बोलला आणि जोरात हसायला लागला...


"तुम्हाला अजून पर्यंत माहित नाही त्यांच्या बरोबर माझं लग्न होणार आहे..." रितू एकदम खुश होत बोलली...


रोहनने रीतुकडे आश्चर्याने बघितले, "पण त्या दिवशी तो आला होता, तेव्हा तर असं काही वाटलं नाही..."


"हो... अजून सगळं काही नाही घडलं... तुम्हाला माहित आहे... त्यांचं लग्न शिनुशी होणार होतं...!" रितू बोलली...


"मग...?" रवीने विचारले...


"मग काय...? हि पळाली घरातून... हे हे हे... आणि मला हा चांगला फायदा मिळाला..." रितू एकदम खुश होत बोलली...


"खरोखर...!" रोहन पण एकदम खुश होत बोलला...


"जास्त खुश व्हायची गरज नाही आहे... मी तुमच्यासाठी नाही; स्वतः साठी पळून आली होती...!" निरुने पहिल्यांदा डिस्कशनमध्ये भाग घेतला होता...


रोहनच्या चेहऱ्यावर अचानक आलेला आनंद लगेच गायब झालं, "ते का...?"


"नाही तर काय...? काल जेव्हा हि तुमच्याकडे आली होती फक्त लग्नापासून वाचण्यासाठी...!" रितू बोलली...


"पण आम्हाला तर काल काहीच नाही बोलली..." रवी एकदा परत पाठी वळत बोलला...


"हि पागल थोडी आहे... फक्त हिचा चेहराच पागल लोकांसारखा आहे... हे हे" रितू हसली, "हिने तुम्हाला सांगितले असते, तर काय माहिती तुम्ही तिला परत सोडलं असतं.. !"


"एवढा पागल तर मी पण नाही आहे.. जर मला माहिती पडलं असतं तर मी हिला परत जायलाच दिलं नसतं... वा मला हिला जबरदस्ती गाडीमध्ये टाकायला पडले असते तरी चालले असते..." रोहन बोलला...


"अच्छा...! आत्ता उतरवू खाली... घेवून जावा जबरदस्ती..." नीरु रागात बोलली...


"भाऊ... पहिले बघून घे... ह्यांच्या हातात काही सुरी किंवा चाकू तर नाही आहे ना.. ह्यांना दया नाही येत... सरळ आतमध्ये उतरवतील... हा हा हा..." रवी मजे घेत बोलला... आणि शेखरच्या खंद्यावरती हात ठेवला आणि बोलला, "तू एवढा गप्प का आहेस...?"


"मी काय बोलू यार...? मला आपली पडली आहे... एका हफ्त्यामध्ये सगळं काही अरेंज करायचे आहे... माझ्या लग्नासाठी... लग्नाला तर यायला ना माझ्या..?" शेखरने विचारले...


रवी त्याचं उत्तर देणं सोडून आपलीच राम कहाणी सांगायला लागला, "यार...! तुम्ही सगळे तर लग्न करत आहात... माझं काय होणार...? मी तर कुंवाराचा कुंवाराच राहिलो..."


"तू आहेच त्या लायकीचा...!" रितू बोलली आणि आपला गळा फाडून हसायला लागली... तिची साथ सगळ्यांनी दिली


क्रमश...


Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment