Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Wednesday, 25 July 2012

भाग ~ ~ ५५ एक प्रेम कथा

Update 55ठीक संध्याकाळी ५ वाजता शेखरने सगळ्यांना रोहनच्या वडिलांच्या ऑफिस जवळ उतरवले...

"तू पण ये ना यार...! उद्या निघून जा...!" रोहनने हात मिळवण्यासाठी आलेल्या शेखरच्या हाताला पकडत बोलला...


"नाही यार... आत्ता तर लग्नानंतर तुमच्या वहिनीलाच घेवून येणार... आत्ता काम भरपूर करायचे आहेत आणि वेळ पण कमी आहे... आत्ता तर निघतो.." शेखरने रविशी हात मिळवला... मुलींकडे बघून हसला 'बाय' बोलला आणि निघून गेला...


"एक गोष्ट लक्षात ठेवा... आत्ता पप्पांना हे नाका सांगू कि आम्हाला जुन्या वाड्याजवळ जायचे आहे... प्लीज... खालीफुकट टेन्शन घेतील... समजलात ना..!" रोहन आपला फोन काढत बोलला...


"चिंता नका करू... मी हिला सगळं काही समजवतो... पण आत्ता आपल्यांना जायचे कुठे आहे..?" रितू रोहनला बोलली...


"एक मिनट... मी पप्पांना एकदा फोन करतो... बघतो कुठे आहेत...? तेच काहीतरी उपाय सुचवतील..." रोहनने फोन लावलाच होता कि एक काळ्या कलरची मर्सडिज त्यांच्या जवळ येवून थांबली...


"पप्पा आले..!" रोहन बोलला आणि गाडीकडे गेला...


रीतुने निरुला आपल्या हाताचा कोपरा मारून तिला छेढलं, "तुझ्या सासरचे लोकं खूप श्रीमंत आहेत यार... तुला माहित होतं काय...?"


निरुने आपलं तोंड दुसरीकडे वळवलं...


"तिकडे काय बघतेस... पाया पड जाऊन.. एवढी पण अक्कल नाही आहे काय...?" रीतुने तिला परत वळवले...


सगळे एकमेक्कांना भेटून झाल्यानंतर त्याचे वडील बोलले...


"तुम्ही सगळे बाहेर का उभे आहात... आतमध्ये चला... बाहेरच उभं राहायचं आहे काय...?" पप्पा बोलले आणि ऑफिसकडे वळले... सगळ्यांना घेवून...


आतमध्ये जाऊन त्यांनी सगळ्या स्टाफ लोकांना सुट्टी दिली आणि नोकराला सांगितलं कि बाहेर 'ऑफिस क्लोज्ड' बोर्ड लाव...


ऑफिस बघून रितू एकदम हैराण झाली होती... तिने स्वप्नात पण विचार नव्हता केला होता कि रोहन एवढा श्रीमंत आहे... निरूच्या भविष्याला घेवून ती पूर्णपणे निश्चिंत झाली होती... आणि तिने मन बनवले होते कि निरुला कुठल्याही परीस्थित राजी करायचे...


"चला मुलांनो... खूप थकला असाल... जो पर्यंत जेवण येईल तोपर्यंत तुम्ही थोडा आराम करा... मी रोहनचे थोडे कान खेचून घेतो... एवढ्या दिवस घरातून बाहेर राहिल्यामुळे..." स्मित हास्य देत पप्पा बोलले आणि रितूला आणि निरुला बेडरूम दाखवला... दोन्ही मुली बेडरूममध्ये शिरल्या...


"हम्म बेटा...! आत्ता बोल...!" पप्पाने रोहनला विचारले...


"आम्ही रात्री कुठे राहणार पप्पा..!" रोहनने विचारले...


"भाऊ... आज होम मिनिस्टरकडे फाईल पाठवणार... मी बाहेर होतो म्हणून....काल पासून तुझ्या आईशी वार्ताच झाली नाही आहे.. बघूया त्यांचा रीस्पोंस काय येतो... पण आज तर तुम्हाला इथेच थांबायला लागणार... इथेच झोपा.." पप्पा बोलले...


"पण मी...? बेडरूम तर एकच आहे...!" रोहन बोलला...


"तुम्ही दोघे इथे बाहेर सोफ्यावर झोपा त्या दोघी आतमध्ये झोपतील..." पप्पा बोलले...


"ठीक आहे..." रोहन आपले खांदे उचलत बोलला...


"चला आत्ता मी निघतो... मला काही काम पूर्ण करून लवकर घरी जायचे आहे... तुझ्या आईला पण समजवायचे आहे ना... जेवण वैगेरे चांगलं करा.. मी सकाळी येईन..." पप्पा उभे राहत बोलले...


"ठीक आहे पप्पा..." रोहन बोलला आणि रवी बरोबर त्यांना बाहेर सोडायला आला...


------------------


"कसं वाटलं तुला...?" बाथरूममधून बाहेर येत रीतुने विचारले...


"काय कसं वाटलं..?" नीरु बोलली... ती थोडी विचलित वाटत होती...


"हेच सगळं...!" रितू आपली नजर बेडरूममध्ये फिरवत बोलली, "रोहनचे पप्पा... अजून काय...?"


"बघ रितू...! तुझ्या बोलण्यावर मी यायला तैय्यार झाली आहे.. जुन्या वाड्याजवळ पण जाईन... पण पूर्ण निर्णय माझाच असणार... समजलीस ना... आत्ता तू सारखं सारखं हि गोष्ट नको काढूस... उद्या जर रोहनच्या परिवाराला काही ठेस पोहचते तर ह्याची पूर्ण जिम्मेदारी तुझी... माझी काहीच नाही..." नीरु बोलली आणि परत आपले नखं चावायला लागली...


"सोड ना यार जुन्या वाड्याचा चक्कर.. मला रोहन तुझ्यासाठी पसंत आहे.. तू आरामात ह्याला हो बोल... नंतर तर त्याचे वडील आरामात मामला सांभाळतील... किती चांगले आहेत ना.. इथे ऐश करशील तू.. ऐश...! लग्न न करायची जिद्द सोडून दे..." रितू तिच्याजवळ बसत बोलली...


"मी बोलली ना सोड ह्या गोष्टींना...!" नीरु रागात बोलली...


"तुला काय वाटते..? ह्याच्या पेक्षा जास्त प्रेम करणार तुला भेटेन...? आयुष्यभर शोधत बसशील नंतर..." रितू पण चिडली...


"मला नाही पाहिजे, प्रेम करणारा... आत्ता माझं डोकं नको खाऊस...यार..." नीरु बोलली आणि बेडवर आपलं अंग टाकून कुशी दुसरीकडे केली, तेव्हा दरवाजा ढोकवला गेला, नीरु परत उठून बसली... रीतुने जाऊन दरवाजा उघडला...


दरवाज्यावरती रोहन उभा होता, "या... जेवून घ्या..."


"चल शिनू...! मला पण खूप भूक लागली आहे..!" रितू पटकन तैय्यार झाली...


"मला भूक नाही आहे... तुम्हीच जेवून घ्या...!" निरूचा मूड अजून पर्यंत खराब होता...


"चल ना यार... अच्छा सॉरी... ह्याच्या पुढे असं तसं काहीच नाही बोलणार... ये...!" रितू एवढी बोलली आणि निरूचा हात खेचला... थोड्या ना नुकुर नंतर ती तैय्यार झाली आणि तिघेही बाहेर निघाले...


"हे सगळं तुझंच आहे ना रोहन...!" जेवण जेवता जेवता रीतुने विचारले आणि काण्या डोळ्याने निरुला बघितले...


"नाही...!" रोहन बोलला...


"तर...?" रितू बिचकत बोलली...


"आत्ता तर सगळं काही वडिलांचं आहे.. मी अजुपर्यंत शिकतो आहे..." रोहन विनम्रतेने बोलला...


"ओह्ह.. मी समजली...!" आपलं बोलणं अधुरं सोडत तिने पाण्याचा ग्लास उचलून पाणी प्यायली...


काही अशीच हलकी फुलकी वार्ता आणि थट्टा मस्करी करत ते जेवले आणि नंतर नीरु आणि रितू परत जाऊन बेडरूममध्ये घुसल्या...


---------------------


"रितू..!" नीरु बोलली...


"होल बोल.. तू एवढी टेन्शनमध्ये का आहेस...? जे बोलायचे आहे ते बोल... जर तुला नाहीच बोलायचे आहे तर चल उद्या सकाळीच परत जाऊया... जेवढे दिवस आपण इथे राहणार... तेवढाच त्रास तुला होणार..." रीतु तिचा हात पकडून बोलली...


"तू एक मिनट... बाहेर जा... आणि... 'त्यांना' आतमध्ये पाठव... मला काही तरी बोलायचे आहे..." नीरु बोलली...


"अशी कोणती खास गोष्ट आहे... मी पण इथेच थांबते ना...!" रितू बोलली...


"बोलली ना यार... काही अशीच गोष्ट आहे... तेव्हा तर तुला बाहेर जायला सांगते..." नीरु चिडत बोलली...


"बघ... काही उलट सुलट बोललीस तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही आहे..." रितू बोलली आणि बाहेर निघून गेली...


------------------------


"हो... नि..." रोहन एकदम खुश होत उड्या मारत आतमध्ये आला होता... पण निरूचा रडका चेहरा बघून त्याची पूर्ण कल्पनाच हवेमध्ये उडाली, "काय झालं...?"


"बस...!" नीरु एका बाजूला सरकत बोलली...


"काही चुकी झाली काय..?" रोहन बेडवर बसत बोलला...


"हे... प्रेम म्हणजे काय असतं रोहन..!" निरुने विचारले...


"प्रेम...! मला काय माहित प्रेम म्हणजे काय...! पण मला एवढं माहित आहे कि मला तू आत्ता माझाच एक भाग आहे असं वाटायला लागलं आहे... तुला बघताच हृदय खूप जोरात धडधड करायला लागते... झोपतो तर तुला बघतो... जेव्हा झोपून उठतो तर सगळ्यात पहिले तुझी आठवण येते... खाता पिता, उठता बसता... फक्त हाच स्वप्न बघतो कि कधी माझं स्वप्नं खरं होतंय... केव्हा तू मला भेटशील... केव्हा तू हो बोलशील..." रोहन भावनेमध्ये बोलतच गेला असता जर निरुने त्याला टोकले नसते तर...


"मला माहित आहे रोहन...! मला हे पण माहित आहे कि कोणी नशीबवानच मुलगी असेल जी तुम्हाला नवऱ्याच्या रूपामध्ये बघेल... मी तुला चांगल्या प्रकारे ओळखून चुकली आहे... पण काय करू...? प्रेम नावानेच मला चीढ येते... समजण्याचं प्रयत्न कर... मला नाही वाटत कि मी कोणाच्याही बरोबर लग्न करायचा विचार करू शकते... आज मी तुझ्या वडिलांना भेटली किती चांगले आहेत ते... उद्या जर त्यांना ठेस पोहचते तर मी जिवंत पणीच मरून जाईन... प्लीज... रोहन मला उद्याच परत पाठवा...! मी नाही राहू शकत इथे... मी तुला साथ देवू नाही शकत...!" बोलता बोलता निरूचा आवाज भारी झाला आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले...


रोहानच्याने काही बोलणेच नाही झाले... काही वेळ 'आपल्या' निरुला बघत राहिला आणि उठून बाहेर निघून गेला...


----------------


राजवाड्यामध्ये सगळीकडे अफ्रा-तफ्रीचं वातावरण होतं... शहराच्या जवळच एकदम सुन्न पडून राहणारा विशाल मैदान रणभूमीमध्ये बदलला होता... राहून राहून राजवाड्यापर्यंत येणारा हत्तींचा आवाज, घोड्यांच्या पायांचा आवाज आणि आपला जीव धोक्यात टाकून लढाईत आपला जीव झोकणाऱ्या सैनिकांची राहून राहून एकदम येणारी असाह्य किंकाळी आणि ह्या सगळ्यांमध्ये राजवाड्यात उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीची आत्मा आतपर्यंत कापते...


"माताश्री... आपण शत्रूंवर विजय प्राप्त करू शकतो काय......?" शैय्यावर पहुडलेली भयभीत राजकुमारीने राजमातेला विचारले... राजकुमारी दिसायला खूप सुंदर होती... तिचा कोमजलेला चेहरा त्या घडी पण एकदम पौर्णिमेच्या चंद्रासारखा चमकत होता...


"देवावर विश्वास ठेवा राजकुमारी... ते सगळे ठीक करतील..." राजमातेच्या चेहऱ्यावर पसरलेला एक विचित्र सन्नाटा त्यांच्या ह्या वाक्यावर मेळ नाही खात होता... तरीपण ती राजकुमारीला सांत्वना देण्यामध्ये काहीच कमी नाही सोडत होती...


"पण आपण मात्र १०,००० आहोत आणि ते २०,०००... कसं जिंकणार... माताश्री...?" राजकुमारी प्रियदर्शनी उठून बसली...


"तू थोडा विश्राम कर बेटा... थोडी निद्रा घे... काल रात्रीपासून तू आपले डोळेसुद्धा झाकले नाही आहेस... झोपून जा...! देवावर विश्वास ठेव...! सगळं काही ठीक होईल..." राजमातेने परत तिला खोटा दिलासा देण्याचा प्रयत्न केला...


"कशी झोपू माताश्री...? तिथे... रणभूमिमध्ये... तो... आमचा देव काल रात्रीपासूनच युद्ध भूमीमध्ये आहे... त्याने आम्हाला परत येण्याचं वचन दिलं आहे... ते तर आलेच नाही आहेत अजूनपर्यंत... आम्ही त्यांना बघितल्या शिवाय कसे झोपू शकतो..?" राजकुमारी बोलली...


"तुम्ही परत त्याचे नाव घेत आहात... किती वेळा समजवलं आहे बेटा; तुम्ही एक राजकुमारी आहात... तुमचं लग्न कोणत्यातरी राजकुमार बरोबरच होईल.. आत्ता तुम्ही त्यांची वाट बघणं सोडून द्या...! माझी गोष्ट ऐका..."


राजमातेने हात पुढे करून प्रियाच्या गालाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला... पण ती सरकून त्यांच्या पासून लांब झाली.., "नाही...! मी दुसऱ्यांच्या विषयी विचार पण नाही करू शकत...!.. आम्हाला विश्वास आहे... ते इथे येवून आम्हाला घेवून जाणार इथून... राजवाड्यात कोणाची हिम्मत नाही आहे त्याचा रस्ता रोखण्याची... आणि नाही तुमच्या राजकुमारांमध्ये एवढी कुवत आहे त्यांचा सामना करण्याची... तुम्ही बघाच..." प्रिया बोलली आणि उठून राजवाड्याच्या मुख्य द्वाराजवळ पळाली...


"ए... पकडा हिला...!" राजमातेने आज्ञा दिली आणि सेवकांनी अक्षरशः  त्याचं पालन केलं...


"ऐकत जा बेटा... नाही तर आम्हाला परत तुम्हाला बेड्यांमध्ये जकडून ठेवायला लागणार...!" राजमातेने प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवत बोलली...


"बांधा मला... बंदी बनवून टाका... पण तुम्ही सगळे बघा... जेव्हा माझा देव येणार तेव्हा तुमचे सगळे पहारे अस्त-व्यस्त होतील... तुमच्या सगळ्या बेड्या तुटून जातील... करा तुम्हाला जे करायचे आहे ते..." प्रिया ओरडून ओरडून सांगत होती...


खूप वेळाने राजकुमारीला शांत करून पुन्हा बसवण्यात आलं... पण तिचे डोळे शांत नव्हते... तिचे अरमान शांत नव्हते... तिच्या देवने तिला परत येण्याचे वचन दिले होते... आणि तिला विश्वास होता; निष्टुर आणि निर्मम देव पण त्याला त्याचं वचन पूर्ण करण्यापासून थांबवू शकत नव्हता... तिचे कान देवच्या पावलांची आवाज ऐकण्यासाठी आतुर झाले होते... तिचे डोळे देव दर्शनासाठी व्याकूळ होते...


देव येण्याची वाट पाहणाऱ्या प्रियाच्या डोळ्यात तो सुखद क्षण आला जेव्हा तिने आपल्या सखीं बरोबर उपवनमध्ये विचरण करताना पहिल्यांदा देवला पाहिले होते...

क्रमश...


Previous Chapter                                   Next Chapter

0 comments:

Post a Comment